वापीचे एक हॉटेल. नेहेमीप्रमाणे काम आटोपल्यावर रुम वर जाऊन फ्रेश झालो, तेवढ्यात रुम बॉय काही हवे आहे का म्हणून विचारायला आला. वापी चे लोकेशन खूप इंटरेस्टींग आहे . एका बाजूला केंद्रशासित प्रदेश सिल्वासा, आणि दुसऱ्या बाजूला दमण, वापी मात्र गुजरात मधे. दमण आणि सिल्वासा ला भरपूर दारूचे बार आहेत, पण वापीला मात्र गुजरात मधे असल्याने दारूबंदी चा नियम लागू होतो, आणि त्या मुळे एकही बार नाही, पण हॉटेल मधल्या रुम मधे मात्र रुमबॉय हवी ती दारू आणून देतो. दमण/सिल्वासा फक्त तीन – चार किमी दूर असल्याने, तिकडेच जायचे ठरवले.
गुजरात मधे दारू बंदी असली तरीही दारू अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अगदी उघडपणे दारू विकली जाते. मला एक समजत नाही, हे दारूबंदीचे फॅड पाहिले की मला मात्र ती पोपटाची गोष्ट आठवते. एक राजा असतो, त्याच्याकडे पिंजऱ्यात एक पोपट असतो, राजाचा तो खूप आवडता, एक दिवस तो पोपट मेला. आता राजाला सांगितलं तर वाईट वाटेल, म्हणून राजाला पोपट मेल्याचे कोणीच सांगत नाही, आणि राजाचे दरबारी लोकं पण तो पोपट झोपला आहे असे म्हणून त्या मेलेल्या पोपटाच्या चोची मधे दाणे भरवत रहातात.
दारू बंदीचा पोपटाची पण अशीच अवस्था झालेली आहे. ज्या कुठल्या ठिकाणी दारूबंदी आहे, तिथे अगदी दारूच्या नद्या वाहताहेत, पण सरकार मात्र मेलेल्या पोपटाला दाणे भरवल्या प्रमाणॆ दारू बंदीच्या पोपटाला दाणे भरवत बसले आहे.
गुजरात मधे ही अवस्था आहे, वर्धेला पण असाच प्रकार सुरु असतो. वर्धा जिल्ह्यातही दारूबंदी चा पोपट अजूनही पिंजऱ्यात बसवलाय. वर्धा जिल्ह्यातही दारू अगदी भरपूर मिळते. जिल्ह्याच्या सगळ्या बाउंड्री वर दारूचे अड्डे आहेतच आणि त्याच सोबत वर्धा जिल्ह्यातही भरपूर प्रमाणात हवी ती दारू उपलब्ध आहे. दारूबंदीचा हा तमाशा अजून किती वर्ष सुरु रहाणार ते कोण जाणे.
महाराष्ट्रात तर दारू पिण्यासाठी तुम्हाला एक परमीट लागते. ही गोष्ट बार मधे जाणाऱ्या किती लोकांना ठाऊक आहे? जर तुम्ही बार मधे बिना परमीट दारू प्यायला बसलात तर तुम्हाला अटक केली जाऊ शकते. जर एखाद्या दिवशी महाराष्ट्रात हा दारूचा परवाना तपासून , नसलेल्या लोकांना अटक करायचे ठरवले तर जेल मधे ठेवायला जागा पण पुरणार नाही.
हे दारूचे परमीट पूर्वी ३० रुपयांना मिळायचे. त्यात तुम्हाला एका डॉक्टरचे सर्टिफिकेट द्यावे लागायचे, त्यात लिहिलेले असायचे की ” मला तब्येतीच्या कारणासाठी दारूची आवश्यकता आहे, सबब, मला दारू पिण्याची परवानगी देण्यात यावी..” असा काहीसा मजकूर असतो. माझ्याकडे पण २० एक वर्षापूर्वी परमिट काढले होते, पण नंतर काही गरज पडत नाही म्हणून रिन्यु केले नाही. हे कायदे पण मोठे विचित्र आहेत, दारूच्या परमीटचा पण पोपट सरकारच्या पिंजऱ्यात आहे. जेंव्हा पोलीस एखाद्या बार वर छापा घालतात, तेंव्हा या नियमाचा वापर केला जातो. असो..
तर आजचे पोस्ट या पोपटांच्या साठी., लोकं पुरेसे समजदार आहेत, ज्याला प्यायची आहे तो कितीही कायदे केले तरी पिणार . हा दारुबंदीचा कायदा केल्याने लोकांनी दारू पिणे बंद केलेले नाही हे उघड गुपीत आहे,पण प्रश्न एकच आहे,सरकारला सांगेल कोण ” की पिंजऱ्यातला पोपट मेलाय म्हणून ”
चपखल उपमा…
खरच, फाल्तूची नाटक बंद कार्याला हवीत हि.. काहीही फरक पडत नाही त्याने..
पिणारे पितातच, सरकारचा रेव्हेन्यू तेवढा वाया जात असतो..
नेहेमी प्रमाणेच मस्त पोस्ट ..
अमित
धन्यवाद.. नेहेमीच ही नाटकं पहातो. बडोद्या जवळ असलेल्या एका गावात चक्क उघड्यावर बाजार भरतो , भाजी पाल्याप्रमाणे तिथे दारू विकली जाते. तेंहा गुजरात मधे खरच दारू बंदी आहे का असा प्रश्न पडतो.
सरकारने परमिट आणले ते दारू विक्री नियोजित करता यावी म्हणून. कारण स्वातंत्र्योत्तर भारतात जिथे अन्न-धान्याची कमतरता होती, तिथे लोकांनी दारू वर पैसे उधळू नयेत असे वाटत होते म्हणून. सरकारचा हेतू काही वाईट नव्हता. पण, परमिट, लायसन्स ह्या गोष्टी म्हंटल्या की आपोआप भ्रष्टाचार आलाच. जो परमिट देतो त्याला देवतुल्य शक्ती मिळाल्या सारखी वाटते. मग काय, मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग सुरू होतो. त्यातूनच दारू विक्रीचे ‘अवैध’ धंदे चालू होतात.
दारू जर उघड्याने मिळायला सुरवात झाली, तर समाजातील आर्थिक रीत्या दुर्बल असलेल्या लोकांचे काय होईल? मुळातच दारू-व्यसनाचे दुष्परिणाम त्या स्तरातील लोकांनाच अधिक भोगावे लागतात. वडील आहे तो थोडा पैसा दारूत उडवत असल्याने, मुलं पौष्टिक आहार, शिक्षण, इ. गोष्टींना मुकतात. म्हणूनच त्यांचा विकास खुंटतो. अर्थात, केवळ दारू-बंदीने हे प्रश्न सुटणार नाहीत हे खरे. दारू व त्याचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्व, इ. गोष्टी खोलपणे सगळ्यांच्या डोक्यात शिरल्या पाहिजेत. शिक्षण आणि चांगली नोकरी, ह्यातूनच खरी प्रगती होईल आणि मग हे परमिट, दारू-बंदी वगैरे गोष्टी करावयाच लागणार नाहीत.
विनय,
दारूबंदी करण्यामागचे उद्देश हे राजकीय होते. बहूतेक ज्या ठिकाणी गांधीजींचे वास्तव्य झाले तिथे ही दारूबंदी करण्यात आली आहे. परमीट ची खरंच गरज आहे का? जर तुम्ही परमीट नसणाऱ्यावर काहीही कारवाई करणार नसाल तर ही परमीट पद्धती सरळ रद्द करणॆ जास्त श्रेयस्कर ठरते.
दारूचे दुष्परीणाम सगळ्यांनाच माहिती असतात. पण हे वाक्य पुणपणे पटले “” अर्थात, केवळ दारू-बंदीने हे प्रश्न सुटणार नाहीत हे खरे. दारू व त्याचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्व, इ. गोष्टी खोलपणे सगळ्यांच्या डोक्यात शिरल्या पाहिजेत. शिक्षण आणि चांगली नोकरी, ह्यातूनच खरी प्रगती होईल आणि मग हे परमिट, दारू-बंदी वगैरे गोष्टी करावयाच लागणार नाहीत.””
i agree with u sir . जर माणसाने दारू वर पैसा वाया न घालवता त्याने तोच पैसा आपल्या कुटुंबावर आणि आपल्या मुलांच्या शिक्षांवर खर्च केला तर त्याची मुल चांगले शिकतील आणि त्यांची प्रगती होहील मग ह्या दारू सारख्या निरुपयोगी वस्तू वर माणसाला निर्भर राहायला लागणार नाही . आणि मला एक समजत नाही काही educatated लोक दारू पितात मला समजत नहीं की ह्या लोकाना दारू पिउन कोणते समाधान मिलते हे माला अजुन न उलगडलेले कोड़े आहे हे कोणी मला सांगू शकल का ?
नितीन
वैय्यक्तिक आवडी आहेत त्या. अजून एक गोष्ट आहे, एखादी गोष्ट करू नका म्हंटले, की लोकं ती जास्त करतात.. म्हणूनच असेल गुजरात मधे सगळ्यात जास्त दारू विकल्या जाते असे म्हणतात.
aho kulkarni kaka this is nice post ha u r work is excellent i proud of u.
धन्यवाद..
pan kaka ek sangu mala chid ahe ho tya daru chi kay mahiti daru che naav kadhale tar na koni samor kay hote kay mahiti maal gruna nirman hote tya manasachi daru che naav kadhale tar i hate daru ji apali sansarachi aani apali waat lawate
कुठलेही व्यसन अती झाले की वाईटच ठरते. आयुर्वेदातील बऱ्याच औषधांमध्ये मद्यार्काचे प्रमाण असते. बाकी कुलकर्णी साहेब … पोपटाची उपमा उत्तम. इंटरनेटवरून साभार घेतलेल्या पिंजऱ्यामध्ये मात्र बहुदा मैना असावी. 😉
हा हा हा.. खरच मैना दिसते आहे. पण काय करणार नेट वर हेच एक चित्र सापडले.
अहो मला सांगायचं. मी केलं असतं काळ्याच पोपटी. 😉 नाहीतर हा ग्राफिक डिझायनर काय कामाचा?
नेक्स्ट टाइम नक्की. आता पर्यंत भुंगा होता, मदत करायला, पण हल्ली तो पण जरा बिझी असल्याने फारसा नेट नसतो. माझ्या ब्लॉग चा लोगो पण त्यानेच बनवून दिलाय. 🙂
अगदी खरंय काका. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे (नाईलाजाने) दारू पिण्याचा परवाना म्हणजे ढोंग आहे. दारू पिण्यासाठी किमान वय २५ हेसुद्धा ढोंगच आहे. जितके जास्त परवाने आणि कायदे, तेवढे फक्त बेकायदा धंदे वाढतात असं मला वाटतं.
्गौरी,
सगळे सरकारी तमाशे आहेत , स्वातंत्र्यापासून गेली ६० वर्ष हेच कायदे सुरु आहेत, कधी बंद होतील कोण जाणे. सगळा मूर्खांचा बाजार वाटतो मला तर हा!
वाह क्या बात है महेंद्रजी! मुद्द्यावर बोट ठेवलत! परमीट चा मुद्दा अगदी वास्तववादी पातळीवर विश्लेषण केलेत. दारु कशी प्यावी वा कशी पिउ नये हे सांगणे आता मला गरजेचे वाटू लागले आहे. दारु प्यायला परमिट कुठे कुठे लागत हो?
प्रकाशजी
🙂 अगदी बरोबर.. परमीट, दारूबंदी या सारखे बरेच विषय आहेत ज्या संबंधीचे कायदे आता बदलायची वेळ आलेली आहे.
दारू प्यायला परमीट लागत नाही… खरंय.. 🙂
खरे सांगायचे तर आपल्या इथ्ल्या हवामानाला दारू जरुरीची नाही, जिथे हवा थंड असते तिथे शरीरात गरमी आणण्यासाठी घ्यावी लागते असे म्हणतात, पण ते ही तितकेसे खरे नाही.मी लडाखसारख्या ठिकाणी बर्फामधेही राहिले आहे. कधी दारूची गरज भासली नाही. आणि नशा, दुःख विसरणे वगैरे एव्हढे क्षणिक असते की असे वाटते की , it’s waste of good time and money.
अरूणा
पण त्या पोपटाचं काय? मेलाय की तो… 🙂
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
थोडक्यात सांगू ! अप्रतिम !!
नितीन
धन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत.
काका, मस्त पोपस्ट……
रमेश
ब्लॉग वर स्वागत आणि मनःपूर्वक आभार.
अहो काका, मी तुमच्या ब्लॉग वरच पडीक असतो फ़क्त प्रतिक्रिया देत नाही……
रमेश
🙂 धन्यवाद.
असे बरेच पोपट आहेत. आर टी ओ ऑफीस असो वा नगर परिषद, सगळे मेलेल्या पोपटांनी भरलेले पिंजरे आहेत.
सिद्धार्थ,
खरं आहे. 🙂
हेहेहेहेहेहेहे……”ओ पिलाने वाले जरा नजरे मिलाके पिला”
हे गाणे ऐकवायला हवंय मायबाप सरकारास!!!!!…….. स्वत:च पायघड्या घालुन पाजतंय अन स्वतःच बोंबलतय तिच्यायला!!!!!!!…..
अवांतर….. काका इंपोर्टेड बियर्स मधे तुम्ही कुठली पसंत करता???
कोरोना?? पेरोनी?? जमल्यास एकदा ओरिजिनल मिलर ट्राय कराच करा!!!!!
गुरु
मला कय बिअर म्हटलं की कुठली पण चालते ..:)
pharach chan kaka … nice one
धन्यवाद..
saglikade sarkhech
अगदी बरोबर 🙂