हल्ली इंटरनेट मुळे प्रत्येकाला कुठल्याही घटनेवर आपले मत मांडायचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे वाटत असते, आणि मग तो फेसबुक, मायबोली, मी मराठी,मिसळ पाव – किंवा सकाळ मुक्तपीठ ऑन लाइन एडीशन वर , आपल्या प्रतिक्रिया देत असतात. ह्या प्रतिक्रिया तर बरेचदा मूळ लेखापेक्षा पण जास्त वाचनीय असतात. मानवी मनाचे विनोदी कंगोरे दाखवणाऱ्या ह्या प्रतिक्रिया खरंच वाचायला मजा येते. माझ्यासारखे काही लोकं तर चक्क “काय वाटेल ते” ब्लॉग वर लिहितात !
पूर्वीच्या काळी असे नव्हते, इंटरनेट नसल्याने आपली मते स्वतः पुरतीच मर्यादित ठेवावी लागायची . फार तर फार वाचकांची पत्रं मधे एखादे पत्र प्रसिद्ध झाले की खूप काही मिळवलं असं वाटायचं. समजा, जर “त्या काळी” इंटरनेट असते, “तर त्या काळच्या” मोठ्या घटनांवर या इंटरनेट फ्रेंडली लोकांनी कशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या असत्या ? हा विषय आजचा!
बातमी क्रमांक १ :-
११ सप्टेंबर १६३२ , शहंशहा शहाजहां यांनी ताजमहालाचे काम पुर्ण झाल्याचे जाहीर केले. लवकरच तिथे मुमताजचे शव आणून दफन करणार …….हा लेखाचा मथळा
आणि ह्या प्रतिक्रिया लेखा खालच्या-
जुम्मा खान:- अभिनंदन शहेंशहाचे.. इतकी अप्रतिम सुंदर वास्तू बांधल्या बद्दल.
जुबेदा ( दूसरीबेगम):- बधाई हो.. शहंशहां.. हमारे लिए भी ऐसाही ताज बनवाओगे ना?
सुरेश:-तशी पण मुमताज काही खास आयटम नव्हती दिसायला, जितके पैसे त्या ताज वर खर्च केले, तितक्या पैशात तर दररोज नवीन मुमताज मिळाली असती.
रमेश काका:- उत्तम बातमी.
सदुभाऊ :-या बांधकामासाठी जो खर्च करण्यात आला , तेवढा पैसा एखादे धरण जर बांधण्यात जर खर्च केला असता तर करोडो एकर जमीन ओलिताखाली आली असती.
रामभाऊ:- सदुभाऊ तुम्ही पुणेकर का हो?
प्रकाशचंद्र :-खरे तर ही मूळ बातमीच खोटी आहे. ताजमहाल ही फार जुनी वास्तू आहे. ज्याला तुम्ही ताजमहाल म्हणता तो म्हणजे इथे पूर्वी शिव मंदीर होते. कळसावरच्या सूर्य प्रतिमा याची पुष्टी करतात. पूर्वी आमच्या असलेल्या मंदिराच्या चारही बाजूला मिनार बनवले आणि तिथे मुमताजला गाडणार म्हणे. तेजोमहालय चा ताजमहाल केला. निषेध!
मनोज( पुणेकर):- पुण्याचे नाव घ्यायचे काम नाही . मुद्याचे बोला रामभाऊ, उगाच कांगावा नको, आणि पुणेकरांना दुषणे लावणे पण नको. तुम्ही बहुतेक मुंबईकर वाटतं?
(शहाजहांचे जेष्ठ पुत्र ) औरंगजेब:- की अशा तऱ्हेच्या वास्तू ची गरज काय? म्हातारचळ लागलाय, म्हाताऱ्याला बंदच करून टाकतो जेल मधे.
श्रीमती (इस्रायल) :- आमच्या इस्त्रायल मधे पण अशीच एक इमारत बांधण्याचा विचार केला गेला होता, पण असा पैसा खर्च करू नये ही जाणीव लोकांनी सरकारला करून दिल्याने बारगळला..
सुभाष:- नेहा , तुझ्यासाठी पण बांधेल का ग ताजमहाल कोणी?? ( कोणी म्हणजे मी बरं कां नेहा……)
नेहा :- सुभाष, सकाळी आराशात तोंड पाहिलं होतं का? म्हणे ताजमहाल बांधतो…
रघु पुणेकर : निषेध.. निषेध.. निषेध.. जनतेच्या पैशाचा अपव्यय..
दुसरी बातमी :- २० जुलै १९६९
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले. ही मुख्य बातमी…..
- चंद्रावरचे पाऊल…
आणि ह्या प्रतिक्रिया :
टॉम:- अमेरिका रॉक्स! ये …….
(राजशेखर ) रॉक्सी:- लॉंग लिव्ह अमेरिका. अभिनंदन! मानवाच्या उत्क्रांती मधला एक आवश्यक आणि खूप महत्वाचा दिवस.
सदुभाऊ (पुणेकर) :- उत्क्रांती?? काय च्या कायच !
नुतन :- तुम्ही कितीही अमेरिकेचे कौतूक करा, पण अमेरिकेतल्या नासा मधे ८५ टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय मुळाचे आहेत, म्हणजे एकंदरीत ह्या विजयाचे श्रेय केवळ भारतालाच दिले जाऊ शकते.
रामभाऊ :- भारतीय वंशाचे तर आहेतच, पण त्या ८५ टक्के शास्त्रज्ञांपैकी ९० टक्के हे मराठी आणि त्यातूनही औरंगाबादचे आहेत हे विसरून चालणार नाही. मराठवाडा रॉक्स!
विजय:- काहीच्या काही.. मराठवाड्यात तर सारखा दुष्काळ असतो . पश्चिम महाराष्ट्र रॉक्स!
कोंकणी :- अरे घाटी… काय च्या काय पण बोलतो काय रे? कोंकणाची सर नसे कुणालाच… रुपेरी वाळू, माडाची बने.. सगळं काही आहे ते फक्त कोंकणातच, तुमच्या घाटावर काय आहे रे? आणि होय, ते ९८ टक्के शास्त्रज्ञ आमच्या रत्नांग्रीचे बरं कां…
फेस्बुकर:- च्या मायला, काय टाइम पास करून रायले बे? त्या ९० टक्के शास्त्रज्ञां पैकी ८० टक्के हे गडचिरोलीचे आहेत, तुम्हाले मालुम नसल तर नावं बी सांगतो…
शिरप्या गणपत :-आता चंद्रावर जाऊन इतका खर्च करायची काय गरज होती का ? आणि आणलं ,तर काय म्हणे दगड -गोटे.. कमीत कमी सोनं तरी आणायचं. नसती ऊठाठेव आहे ही.
तिसरी बातमी :
१९६५ जवाहरलाल नेहरूंची मुलगी इंदिरा गांधी पंतप्रधान झाली.
ही मुख्य बातमी..
आणि ह्या प्रतिक्रिया….
तुषार:- कॉंग्रेसचा विजय असो.. काय दिसते नेहेरूंची मुलगी?? सुंदर .. अशा सुंदर मुली जर राजकारणात पडल्या, तरच देशाचे भले होईल. तरूणांमध्ये पण राजकारणाची गोडी वाढेल.
रामभाऊ :- इंग्रजां पूर्वी राजे महाराजे होते, आता इथे लोकशाही आहे ना? पण वारसाहक्क सुरु झालाय . या पेक्षा इंग्रजांचे राज्य काय वाईट होते?
सुभाष :- नेहा, तू कुठे आहेस? तुझी कॉमेंट दिसली नाही बरेच दिवसात. तुझी कॉमेंट वाचली नाही की कसे उदास मन होते.
नेहा: आहे, रे.. मी इथेच आहे, पण हल्ली जरा वेळ नसतो ऑन लाइन यायला. मी पण राजकारणात पडायचं म्हणते आहे. माझे बाबा म्हणतात, मी दिसते इंदिरा सारखी.
कुमार :- खरं तर बाबासाहेब हेच खरे लायक उमेदावार आहेत पंतप्रधान पदासाठी. जातीयता नष्ट झालीच पाहिजे, तेंव्हाच खरा मागासवर्गीय पंतप्रधान होऊ शकेल..
सदुभाऊ पुणेकर:- अहो, कुमार, ते देशाचाच विचार करताहेत, एकत्र येऊन लोकसंख्या कशी वाढवायची याचा..
राजश्री :- मी पण राजकारणात पडणार होते, पण ’ह्यांनी’ आधार दिला आणि राहून गेलं!
राजशेखर :- अरे कॉंग्रेस विसर्जित करा म्हणाले होते महात्मा गांधी. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेसचे काय काम? दिव्यावर शिक्का मारा .. मते कुणाला?…. जनसंघाला..
संतोष :- सदुभाऊ, +१ पण गेले कित्येक महिने हे दोघंही इथेच मुक्तपीठ टाइमपास करत असतात, यांची केस काही पुढे सरकतच नाही बॉ.
वर दिलेली तीन उदाहरणं केवळ सॅंपल समजा. अशा अनेक घटना आहेत, की ज्यावर मस्त कॉमेंट्स आल्या असत्या. जसे, १९७४ :- भारताने अणूस्फोट केला.१९७५ :- इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली, जनता पार्टी सत्तेवर आली, बोफोर्स, वगैरे वगैरे….
इंटरनेटचा शोध जरा उशीराच लागला नाही का ?
. (concept rd)
ha ha ha ha ha…
🙂 😀
nice 🙂
्वैशू
धन्यवाद.
आता या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचून लोटपोट होणार……
्धन्यवाद!
hahhaahhaahhaa!!!!
राज,
सगळ्यांना प्रतिक्रिया देता याव्या म्हणून तू सोय करून ठेवली आहेच मी मराठी वर. 🙂
Hasun Hasun purevat, pan khup sahi lihile ahe tumhi 🙂
सोनाली,
धन्यवाद.
मला पोस्ट वाचायला उशीरच झाला की! ्मी सकाळी मेल उघडलं तर आधी तुमची पोस्ट ओपन केली तरी आधी कॊ‘मेन्ट्स आल्याच आहेत! पण मस्त पोस्ट. मजा आली.
अरुणा
धन्यवाद.
उत्कृष्ट! मराठी लोकांच्या मनातील ओळखणे हि काय खायची गोष्ट आहे. पण तुम्हाला ती छान जमते. छानच फार!
अभय
धन्यवाद. कधी काळी मी पण अशाच कॉमॆंटस देत नेट वर टाइम पास करायचो, म्हणून जमलं असेल. 🙂
ते नेहा च्या मागं लागलेलं बेनं वाचुन वाचुन कुत्र्यागत हसायला येतंय!!!! मुरडतय राव पोट!!!!!
गुरु
मुपी वर दोघंही असायचे पूर्वी. आणि सगळीकडे अशाच कॉमेंट्स .
हसून हसून लोळलो की लोळून लोळून हसलो….!
अभिषेक
मुपी वाचकांना खरी गम्मत कळॆल या पोस्ट मधली. घरी सौल ला वाटतं की मी ऑन लाइन सकाळ बातम्यांसाठी वाचतो, पण खरं कारण आहे की ऑन लाइन सकाळ करमणूकीसाठी उत्कृष्ट पेपर आहे. कुठलाच पेपर त्या तोडीचा नाही.
लय भारी…..
परवाच एका ई-पेपर मधे इन्फीच्या रीझल्ट मधे “इन्फी येत्या वर्षात ३५००० नवीन लोक घेणार.” असे लिहिले होते,
त्यावर कोणीतरी कमेंट टाकली होती- “३५००० घ्या नाहीतर ५०००० घ्या पण त्यातल्या एकालाही पुण्यात पाठवू नका”
🙂 😀
अनघा
ह्या अशा कॉमेंट्स पाहूनच तर हे सुचलं.पुणेकरांचा सेन्स ऑफ ह्युमर थोडा जास्तच चांगला आहे..
Maja aali vachun , khup chan lihita tumhi …
अमोल
मनःपूर्वक आभार. आणि ब्लॉग वर स्वागत.
धमाल धमाल धमाल… 😀 😀 😀
प्रसाद,
धन्यवाद. 🙂
खरच अशा आणि याहूनही खूप अतरंगी comments येतात.
पण तुम्ही बातम्या खूप छान निवडलात, मजा आली वाचताना. 😀
अक्षता
सकाळचा हात कोणीच धरू शकत नाही. सकाळवर कॉमेंट्स करणारे खरंच खूप मजेदार कॉमेंट देतात. मुक्तपिठ वाचून पहा एकदा.
हाहाहा.. फुल्टू धम्माल एकदम..
>> सदुभाऊ पुणेकर:- अहो, कुमार, ते देशाचाच विचार करताहेत, एकत्र येऊन लोकसंख्या कशी वाढवायची याचा..
अत्युच्च लोळागोळा !
हेरंब
धन्यवाद.. 🙂
हो इंटरनेट खूपच उशिरा आले. अनेक जुन्या हाडानां आपले खवचट कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली नाही 😀
तेंव्हा संधी मिळाली नाही म्हणून आता सगळे बॅकलॉग भरून काढताहेत.. 😀
कसलं भन्नाट लिहिलंय!…. मजा आली…
दिपक
धन्यवाद.. 🙂
लई भारी…. अजून बातम्या येऊ देत 🙂 🙂
सुहास ,
बातम्यांची कमतरता नाही, पण लेटेस्ट बातम्यांवरच्या कॉमेंट्स साठी सकाळ आहे ना..
लैच भारी काका, दंडवत स्विकारा आमचा!
हसून हसून पुरेवाट! सगळ्याच कमेंट्स एकदम भारीच पकडल्या आहेत!
ब्रिजेश
धन्यवाद.
खरच खूपच छान ! आंतरजालावरील लेखांचा ताजमहालच म्हणावा लागेल हा लेख. तुमच्या कल्पनेचे आणि अनुभवाचे कौतुक करायला शब्द कमी पडतील.
विलास
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
बाब्बो.. हहपुवा!! धमाल
हाथ आखडता घेतलात काका. येऊदेत पार्ट २ ह्या लेखाचा. 🙂
दिपक
दुसरा भाग म्हणजे तोच तो पणा होईल.. 🙂 इतरही बरेच विषय आहेत.
जबरदस्त कल्पना
नेट आणि सोशल नेटवर्किंग उशीरा आला.( ह्याच बातम्या चेहरा पुस्तकावर स्टेटस अपडेट केला तर
आजची तरुणाई अगम्य इंग्रजी भाषेतून सर्व शब्द लघु करून किमान भाषेत कमाल आशय व्यक्त करतील.
आणि त्या अगम्य भाषेचा अर्थ प्रत्येक जण आपल्या आपल्या सोयीने वेग-वेगळा लावेल. एकाच लेखातून अगणित नवे लेख तयार होतील!
अरुणा
शक्य आहे. 🙂
कदाचित नवीन आशय ( नसलेला ) पण निर्माण होईल . 🙂
हा हा हा , कल्पना भन्नाट . वाचून खरच अस वाटायला लागलय INTERNET जरा लवकर यायला हव होत . पण आपल्या पुढच्या पिढीला अशी खंत राहणार नाही .
हसू आवरण अशक्य झालंय … हा हा हा
संजिवनी
धन्यवाद.. 🙂
excellent one sir
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.