एक पद्धत आहे, म्हणतात, ” आपला तो बाब्या, आणि दुसऱ्याचं ते कार्टं” म्हणूनच “तो नितीन” असं काही करेल असं कधी वाटलंच नव्हतं, असं मी म्हणणार नाही. मी स्वतः संघाचा म्हंटल्यावर निश्चितच भाजपाला मत देतो. पण कॉंग्रेसच्या लोकांनी पैसे खाल्ले की ओरड करायची, आणि आपल्या आवडीच्या पक्षाच्या लोकांनी पैसे खाल्ल्यावर त्याचे समर्थन करायचे , हे मला अजिबात पटत नाही .
तुम्ही आज कुठलाही राजकारणी घ्या, अगदी मध्यमवर्गीय घरात जन्म घेतलेले काही राजकारणी ( शरदराव , अजीत, सुरेश माया, इन्क्लुडेड ) आज कोट्यावधींची माया जमवून बसले आहेत. सरळ मार्गाने इतका पैसा मिळणे केवळ अशक्य आहे हे अगदी शेंबडं पोरंही जाणतं. पण तरीही, आम जनता मात्र, ” हा माझ्या गावचा, माझ्या आवडीच्या पक्षाचा, किंवा अजून काही तरी निकष लावून त्याला सपोर्ट करतात आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करतात.
दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणूकांच्या वेळेस जेंव्हा नेते आपली प्रॉपर्टी चे आकडे प्रसिद्ध करतात, तेंव्हा त्यातली झालेले वाढ बघूनही कोणालाच( फॉलोअर्स ) काही संशय येत नाही का? की संशय येऊनही , “चलता है, सगळेच जण खातात, मग आपल्या नेत्याने खाल्ले तर काय हरकत आहे?- कॉंग्रेसने इतकी वर्ष खाल्लं, आता ह्यांनी थोडं खाल्लं तर काय हरकत आहे? ” असा विचार करणारे पण दुर्दैवाने बरेच लोकं आहेत.
सगळे राजकीय नेते हे गरीबी दूर करण्याचे हजारो आश्वासनं देतात. माझी त्यांना एकच विनंती आहे, त्यांनी गरीबी दूर करण्याची काही गरज नाही, त्यांनी फक्त स्वतः करोडो रुपये केवळ चार पाच वर्षात कसे कमावले हे जरी लोकांना सांगितले, तरीही लोकं पण त्यांच्याच प्रमाणे करोडॊ रुपये कमावतील, आणि भारतातील गरीबी आपोआपच दुर होईल.
आपल्याकडे म्हणतात, की गुन्हा सिद्ध होई पर्य्ंत सगळेच निर्दॊष असतात, या न्यायाने, सगळेच राजकीय नेते हे निर्दोष आहेत. म्हणूनच तर राजकीय नेत्यांचं फावतं. आपण कसेही वागलो, काहीही केले तरीही आपले पाठीराखे आपल्याला सोडणार नाहीत याची खात्री असते त्यांना. मनमोहन, सोनिया, राजा, वगैरे बरेच नेते असाच विचार करत असतिल का? पूर्वाध्यक्ष प्रमोद ( एकेकाळी शिक्षक असलेले) यांनी पण इतके पैसे कसे कमावले असतील हे उघड गुपीत आहे, फक्त त्यांनी जे काही केलं ते उघड झाले नाही त्यामूळे ते बचावले.
या सगळ्या गोष्टी पाहून मला थोडं वाईट वाटतं, पण जनतेची स्मृती फार कमी असते, काही दिवसांनी लोकं सगळं काही विसरून जातात. तुम्हीच सांगा आयपीएल मधे शरदरावांच्या सुप्रियाच्या नवऱ्याच्या कंपनीला किती पैशाचे कॉंट्रॅक्ट दिले गेल? कर्नाटकात भाजपा मुख्यमंत्र्यांनी किती करोडचा जमिन घोटाळा केला? दूर कशाला जयललिता बद्दल सांगा बरं? नाही आठवत ना? हेच म्हणायचंय मला.
भाजपाला समर्थ करतांना काही लोकं अगदी सारासार विचार बाजुला ठेउन समर्थन करतात. सुखराम ( टेलीफोन घोटाळा), जयललिता जो पर्यंत विरोधात होते तो पर्य्ंत त्यांच्या नावे खडे फोडले जायचे, पण नंतर जेंव्हा सुखराम भाजपा मधे आला, तेंव्हा लगेच गंगा अंगावर घेऊन पवित्र झाल्याप्रमाणे त्याचे पापं धुतले गेले असावे , म्हणून त्याच्या बद्दल बोलणे एकदम बंद झाले. जयललिताचे पण तसेच.. असो.. फार जुन्या गोष्टी आहेत या, बहूतेक तुम्ही सगळे विसरले असाल.
श्री गुरुजींच्या एका पुस्तकातलं वाक्य जे मी बरेचदा वापरतो,” त्यांना राजकारणात, घाण साफ करायला पाठवले, पण ते तिथेच लोळले” .आज आपल्या देशात राजकारण नाही तर भ्रष्ट कारण चालते.हेच कारण आहे की निवडणूका आल्या की पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो.
हा लेख कुठल्या, पक्षा विषयी राजकारण्याविषयी नाही , तर ह्या समाजाच्या मनोवृत्ती बद्दल आहे. समाजाची ही मनोवृती पाहिल्यावर मला वाटतं की आपण खरंच लोकशाही साठी योग्य आहोत का? एकेकाळी राजे राज्य करायचे, नंतर इंग्रज आले, आणि आता राजकारणी नेते … एकंदरीत काय तर जनतेची गुलामगिरीची सवय रक्तातच भिनलेली आहे, पुर्वी राजे, नंतर इंग्रज आणि सध्या जनता नेत्यांची गुलामी करते आहे . समाजाची मनोवृत्ती कधी बदलणार ?
wow kaka ekdum masta ahe artical aani te pramod kon pramod mahajan ka
dusare kon asanaar.
😀
nehmi pramane ek changla vishay 🙂
sagli satya paristhiti aahe mahendra ji
pan aata je kahi chalu aahe deshat …..whether it is 2G or coal scam ….ani barech kahi ghotale
kiti sopa aahe fakta hya rajkarnyana dosh lavna ….pan hyane kahich sudharna honar nahi …
aaj congress geli udya BJP yeun aapla khosa bharel …he aasach chalu rahnar ….jopariyat aapan aapli vichar-sarni badlat nahi ……
vote kartana paratekane fakta deshachach vichar karava …..baki kaslach nahi ……..kahi navin rajnaitik pariyay yetya kalat aaplya samor yetilach Kejrival yanchya rupat …..me aasa nahi mhanat ki hyacha paksha jo banel to dhutlya tandla sarkha swacha aasel …..pan nishchitach hya chikhlat
rahnarya baki pakshan peksha vegla aasel ……tevha navin vichar karun pahu
सुहास
केजरीवाल जरी एकटे स्वच्छ असले, तरीही त्यांचे पाठीराखे किंवा सहयोगी कसे मिळतात यावर त्यांचे सरकार ( जर झाले तर) अवलंबून असेल.
बरेचदा मुख्य नेता जरी स्वच्छ असला, तरी करप्ट फॉलोअर्स हे नेहेमीच नेत्याला अडचणीत आणतात.
agdi patla tumcha mhanna ….may be tyach karnane anna hajare tyachya sobat pudhe sarakle nahit…….
pan ek vichar karnya sarkhi goshta aahe
aaplya kade ek Army officer select karayla 5 diwsacha SSB interview ghetat , IAS IPS IFS cha selection etka kasun kela jata ….(hi goshta vegli ki etka test karun pan corrupt lok select hotat kahi vela 😛 )
mag deshachya parliment madhye janarayanach ka konti test nahi ….ethe tar laj sharam vikun khalele gunda pravruttiche lok pan chaltat 😛
अण्णा हजारे… अगदी बरोबर. त्यांची पण तर परिस्थिती आता कोणी विचारत नाही अशी झाली आहे. पहिल्या पानावरून एकदम शेवटल्या पानावर पोहोचले ते. याचं कारण एकच, त्यांच्या आंदोलनाने काही साध्य होणार नाही ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आली आहे.
अगदी अगदी……याची सुरुवात खूप तळागाळातील राजकारण्यांपासून होते. मागे एकदा याच विषयावर लिहिले होते.
http://anaghaapte.blogspot.in/2011/10/blog-post_30.html
अनघा
छान झाली आहे पोस्ट.
वाचली . बौद्धिक दिवाळखोरी बऱ्याच ठिकाणी पहायला मिळते.
त्यांनी फक्त स्वतः करोडो रुपये केवळ चार पाच वर्षात कसे कमावले हे जरी लोकांना सांगितले, तरीही लोकं पण त्यांच्याच प्रमाणे करोडॊ रुपये कमावतील, आणि भारतातील गरीबी आपोआपच दुर होईल. +1
Vishay ha nehamichach, aapan sagle baslo tari baryachda nighto asa…. Durdayva he aahe ki aplyala samjun pan umagat nahi 😦
स्नेहल
हा प्रश्न तर नेहेमीच मनात येतो, हळू हळू गडकरींची पाळं मुळं खणली जात आहेत, पण इतकं असुनही पार्टी आणि कार्यकर्ते मात्र त्याची पाठराखण करताना दिसताहेत.
स्नेहल
हा प्रश्न तर नेहेमीच मनात येतो, हळू हळू गडकरींची पाळं मुळं खणली जात आहेत, पण इतकं असुनही पार्टी आणि कार्यकर्ते मात्र त्याची पाठराखण करताना दिसताहेत.
केजरीवाल इतकी स्वच्छ राहण्याची आपल्यासमाजाचीच मुळात मॅच्युरीटी नाही असं वाटतं काका, लोकांना आज बरं वाटतंय टोप्या उडवत फ़िरायला पण विचार करा उद्या सत्ता बदल झाल्यावर जर एका रात्रीत भारताचा “इंडीया” झाला तर तो बदल लोकांस पचनी पडेल?? केजरीवाल च्या लेव्हलला सामान्य जन पोचायला अजुन ५० वर्षं तरी खचितच आहेत असं माझं मत आहे….. ऑफ़िस टाईम ला सिग्नल तोडुन वरतुन न बोलता न मागता हवालदाराच्या हाती तुम्ही आम्ही आपण इतके स्वच्छ रहायला तयार आहोत काय हा विचार पहिले करणे पडतो!!!
राजकीय रंग लावलेला कोणी कसा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असू शकतो? केजारीवालांवर काही आरोप आहेतच की जसे कि त्यांच्या सुट्टीचे प्रकरण. कॉंग्रेसचा आरोप आहे कि ते भाजप चे एजंट आहेत….आगामी काळात यामागचे छुपे हेतू लक्षात येतीलच.
रजत शर्माला आरोप झाल्यानंतर किती कमी कालावधीत शिक्षा ठोठावली गेली, आणि आपल्याकडे, सगळी वेळकाढू धोरणे. आरोपी वेळ काढत राहतात, शेवटी वर पोहचतात, पण शिक्षा काही होत नाही. परवा दिग्विजय सिंग म्हणे ” मी राजकीय दृष्टीने आरोप करत नाही. गडकरींच्या मुलाचे भ्रष्टाचाराचे प्रकरण मी मीडिया समोर आणले नाही., राजकीय नेत्यांचे नातेवाईक हे “privet पर्सन आहेत”.
याला काय अर्थ आहे का? उद्या म्हणजे ही पुढची पिढी पण हेच करणार किंबहुना आजही करताच आहे. व्यक्तीच नव्हे तर राजकारणात घराणीच भ्रष्टाचारी बनत आहेत. बाप से बेटा सवाई या न्यायाने.
अनघा,
रजत शर्माची केस जशी चालवली गेली तिच जर भारतात चालवली गेली असती, तर रजत शर्माला कधीच शिक्षा होऊ शकली नसती. पण लॉबिंग मुळे त्याला दहा वर्षाऐवजी फक्त १८ महिने शिक्षा झालि हा पण एक प्रकारे अमेरिकन लॉबिंगचा विजयच आहे असे सखेद म्हणावे लागेल.
केजरीवाल यांची सुट्टीचे प्रकरण म्हणजे वैय्यक्तिक पातळीवरचा म्हणावा लागेल.
गुरु,
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फेसबुक वर आंदोलनाला सहकार देणे इतकेच लोकं करू शकतात. तुम लडो, हम कपडे सम्भालात्ताय.. अशी परिस्थिती आहे आज.
लेखाचे काय बोलु!!!! लिटरली द हिंदु नंतर आज पहिल्यांदा “बॅल्न्स्ड” लेख वाचला अगदी “ज्याचे त्याचे न्याय माप” त्याच्या त्याच्या पदरात टाकल्यागत!!! खुप आवड्ला!!!!….. इतकेच काय ते माझे म्हणणे
गुरु,
🙂 धन्यवाद.
>> पण कॉंग्रेसच्या लोकांनी पैसे खाल्ले की ओरड करायची, आणि आपल्या आवडीच्या पक्षाच्या लोकांनी पैसे खाल्ल्यावर त्याचे समर्थन करायचे , हे मला अजिबात पटत नाही .
अगदी अगदी अगदी !! आणि त्यामुळेच प्रचंड आवडला लेख !
हेरंब
धन्यवाद.
Bold para is the best part kaka….
mast lekh
अपर्णा
धन्यवाद. 🙂
aamhi he sarva vaachoon visarnar naa . mug lihoon kaya upayog he pan khadad te pan khadad mug konala nivdoon dyayache ? sarvanni miloon fakta ek kam karave right to reject he ekach hatyar janatela milvoon dyave janata shahani aahe sarva baghoon gheiil. he eka manasache kaam naahi. kitihi bombala aamhi jithe hoto tithech aahoot. jevhan aamhi sarvanna reject karoon dakhavoo tevhan hyanna jaag yeiil.nantar lokpal hyanna manjoor karavach laagel. ervi koni kitihi paya aapatle tari kaahi hoonar naahi.
विजय
ब्लॉग वर स्वागत. अगदी मुद्देसूद विश्लेषण केले आहे.
राईट टू कॉल हेच उत्तर होऊ शकते.
लेख सुंदर आहेच यात शंकाच नाही .आपण एक चांगला प्रकाशझोत टाकला .लेख उतम आहे..
महेश
धन्यवाद.
Tumcha lekh vachala, atishay chhan aahe.
Rajkarani aani tyanche ghotale he aata sarvana savaiche jhale aahet. Roj navin ghotale aani kontya na kontya navin netyache nav aste. Etke ghotale karunahi tyana kontich shiksha hot nahi kinva tyanchya jeevansheilit kahich pharak padat nahi.
Aamhi tya divsachi vat pahot aahot jya veli ekhyadya netyane kelelya ghotalyachi pramanikpane purn choukashi keli jail aani tya netyala tyachya gunhyachi shiksha hoil aani to neta kharokharach ti shiksha bhogel.
Khare tar kitihi manat aale tari aplyakade vote denyasathi konta changla paryay nahi. Karan konalahi vote kele tari to paksh paise khanarach. Pakhache pahile dhyey hech aste ki satta milvun jastit jast maya jamavane.
श्वेता
मला वाटतं भारता मधे तरी ते शक्य नाही. माझ्या आजोबांच्या रस्त्यावरच्या ऍक्सिडेंट ची केस गेली ६३ वर्ष सुरु आहे सुप्रिम कोर्टात.. 😦
नेत्यांना तर वेळकाढूपणा करणे सहज शक्य आहे, केवळ शिक्षा होत नाही म्हणूनच तर भारतात राजकिय नेत्यांची अशी वागण्याची हिम्मत होते. जर चीन मधे असे झाले असते तर?? सरळ फाशी दिली गेली असती. बरेचदा वाटतं, कम्युनिझम, नक्षलवाद जास्त बरा आहे का?
भ्रष्टकारणाच्या निमित्तने…
राजकारणाबद्दल काय बोलावं. आजकाल बोलायचा कंटाळा येतो.
मत कुणाला द्यावं?
सामान्य लोकांना मत कोणाला द्यायचा असा प्रश्न पडतो. समजा एखाद्यानं ठरवलं की मी न चुकता, दर वेळी नक्की मत देणार. पण मत द्यायला गेल्यावर ती उमेदवार यादी पाहिली की बरेच वेळा ५ गुन्हेवाले, १० गुन्हेवाले, ५० गुन्हेवाले अशी यादी असते. मग कुणालाच मत देऊ नये असं वाटतं यावर उपाय म्हणून असं म्हंटलं जातं की चांगल्या लोकांनी राजकारणात जावं. पण अशा लोकांकडे निवडणूक लढविण्याकरता लागणारा पैसा आणि करावे लागणारे छक्केपंजे नसतील. तर तो निवड्णूक कसा लढवणार. आणि समजा एखादा चांगला उमेदवार आलाच निवडून आणि राजकारणात जावून चांगलं वागायला लागला तर त्याचा भ्रष्ट लोकांना जाच वाटून त्याला अचानक कुठं नाहिसा करतील किंवा कुठे अडकवतील याचा नेम नाही. मग उपयोग काय झाला, चांगल्या लोकांनी तिथं जाऊन.
संघाबद्दल,
संघाच्या कार्याबद्दल मला आदर वाटतो. देशाच्या कानाकोपर्यात जाऊन खूप परिश्रम घेऊन, सातत्यानं विकासकाम किंवा चांगली कामं करत रहाण्याचा उपक्रम चांगला आहे. आणि तेसुद्धा जाहिरातबाजी न करता. (किंवा निदान मी तरी अशी जाहिरातबाजी पाहिली नाही)
असं विकासाचं, सुधारणा घडवून आणण्याचं कन्स्ट्रक्टिव काम कोणत्याही संघटनेनं करावं, लोकं त्याचं कौतूकच करतील. तोडफोड, जाळपोळ अशी विघातक कामं करणं (घडवून आणणं ) केव्हाही सोपं असतं. पण चांगली कामं करण्यासाठी खूप जिद्द, चिकाटी, लोकसंग्रह, नियोजन, सातत्य अशा अनंत गोष्टींची गरज असते.
राजकारणात गेल्यावर पण स्वच्छ राहिल असा नेता हवा असेल तर आधी कायदे कडक करायला हवे, जे होणे शक्य नाही 😦
आपण सरळ पक्ष पाहुन मतदान करतो, व्यक्ती पाहून मतदान करण्याची परंपरा आपल्याकडे नाही हे अजून एक सत्य!
kOMgress ne kaahee swachCh mantri dawalale,paN aparaadhyaaMnaa shikshaa naahee.sangh suddha ase kaahetari karel ase waaTate.Pan tyaasaaThee sanghalaa sattepaasun door Thewane yogya naahee.
काका,
संघ सत्तेपासून दूर रहाणे पसंत करतो, अगदी बंदीच्या काळापासूनच.
he mi lihile navhate
sorry mi ase lihile hote kee sattepaasun door thevaNe yiogya naahee,karan sarvaaMs mahit aahe te kuNaalaa paathimbaa detaat.majhaa worpress chaa blog krishnakumarpradhan2 pahaa
kalnarya janatela valavnyasathi ekhad netrutwa lagatach….bhrashtacharach karan hi bhandwalshahi pan ahe
माधव
ब्लॉग वर स्वागत. नेतृत्व हवे, पण ते स्वच्छ चारित्र्याचे ! नाही तर यथा राजा तथा प्रजा प्रमाणे समाजही तसेच वागू लागेल. भांडवलशाही हा तर प्रगतीचा आत्मा समजला जातो, तेंव्हा ती तर रहाणारच.
आपल्याला नियम मोडून वागू देतील अशाच लोकांना आपण नेते मानतो – हे आपल्या लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे!!
अतिवास,
दुर्दैवाने, नियम हे नेत्यांसाठी नसतात हा पण एक नियम आहे लोकशाहीचा 🙂
आजच्या पेपरला एका स्त्री ला पोलिसांना चिरडले म्हणून पाच वर्ष जेल ची सजा दिल्याचे समजले. हा खटला फक्त दोन वर्षात (!) निकाली लावण्यात आला.परंतू सलमान खानची केस तर त्या पूर्वीची आहे, तरी सलमान बाहेर कसा? हा प्रश्न पडला सकाळी बातमी वाचल्यावर.
execellent
धन्यवाद.
He sagla khara ahe pan curruption kadhi sampnar nahi……….
its well known fact. and we have to live with it!