वाचन संस्कार..

धावत धावत कुर्ला स्टेशनला पोहोचलो. इंडीकेटर कडे नजर टाकली, गाडी यायला एक मिनिट होता. बाजूच्या भैय्याचा  ’सुक्का भेल”  चा स्टॉल खुणावत होता. ट्रेन अगदी प्लॅटफॉर्म वर येत असेल तरी पण ती थांबायच्या आत अगदी ३०-४० सेकंदात भेळ बनवून तुमच्या हाती पुडा देण्याचे त्याचे कसब खरंच वाखाणण्यासारखे आहे. गाडीत बसे पर्यंत अर्ध्याहून जास्त भेळ संपली होती. गाडीत  बसलो, आणि   हातातला भेळेचा कागद उघडून वाचणे सुरु केले. काही जन्मजात सवयी असतात, त्या कधीच जात नाहीत , त्यातलीच ही एक!

माझ्या लहानपणी किराणा सामान हे नाक्यावरच्या एका गुजराथ्या  कडून आणले जायचे. दुकानात तुम्हाला हव्या असलेल्या सामानाची यादी दिली, की वर्तमान पत्राच्या कागदात त्याच्या पुड्या बांधून तो द्यायचा.’ प्रि पॅक्ड ग्रोसरी” चा जमाना तेंव्हा आलेला नव्हता. घरी सामान आणल्यावर डब्यात भरून ठेवल्यावर , रद्दी पेपर वरच्या तुटक बातम्या वाचायची मला सवय होती. बरेचदा तर  कागद फाटलेला असल्याने, अर्धवट बातमी वाचल्यावर , पुढे काय असेल ? ही रुखरुख पण लागायची, तरीही सवय काही मोडली नाही.

माझा वाचनाचा पिंड जोपासला गेलाय तो केवळ रद्दी मुळे. रद्दी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच मार्ग वापरते. जसे गाडीवर वडापाव , खारे दाण्याची पुडी,तिकिटं,  वगैरे वगैरे तर आहेतच पण लोकल मधे भिंतीवर चिकटवलेली रद्दी म्हणजे कुठल्यातरी बाबाच्या , जादू टोणा, मुठ-करणी, वशीकरण वगैरे जाहिराती पण मला वाचायला चालतात. या जाहिराती म्हणजे पण रद्दीचा  प्रकार आहे, फक्त भिंतीवर चिकटवलेला…. कुठल्याही मार्गाने ’रद्दी” कागद हाती लागल्यावर तो वाचल्या शिवाय मला अजिबात फेकवत नाही. लहानपणापासून रद्दीच्या दुकानात उभे राहून तिथे कोणीतरी रद्दी मधे विकलेली कॉमिक्स चाळत उभे रहाण्याची सवय होती मला. सुदैवाने, त्या दुकानदाराने ही कधी  हरकत  न घेतल्याने हा वाचनाचा छंद जास्त जोपासला गेला. माझ्या वाचनाच्या आवडीचे श्रेय त्या रद्दीवाल्याला मी नक्की देईन.केवळ या रद्दीच्या दुकान मुळेच वेगवेगळ्या विषयावरच्या पुस्तकांना हात लागला, नाही तर  कदाचित वाचनाची आवड निर्माण झालीच नसती.

कधी थोडे पैसे असले, की त्याच रद्दीच्या दुकानातून गुरुनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या घेऊन वाचायचो. एकदा पुस्तक वाचून झाले की दुकानदार दहा पैसे दर दिवसाचे लावायचा. थोडक्यात ’रद्दी लायब्ररी”म्हणा ना ! घरच्या लायब्ररी मधून डिटेक्टिव्ह पुस्तकं आणून वाचण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे   ही पुस्तकं अशीच  लपून वाचावी लागायची. कधी तरी त्या वयाप्रमाणे ’तशी’  पुस्तकंही वाचली जायची.

एकदा किराणा दुकानातून सामान आल्यावर लहान पुड्या पुलंच्या ’अपुर्वाई’च्या एका फाडलेल्या पानात बांधलेल्या सापडल्या. जो पर्यंत पुस्तक शेल्फ मधे असते, तो पर्यंत त्याची किंमत – नाही तर रद्दी! अपुर्वाई पण रद्दी मधे असू शकते ही कल्पनाच तेंव्हा विचित्र वाटली होती. अजूनही घरच्या पेपरची रद्दी मी दारावर विकत नाही, तर स्वतः  त्या दुकानात घेऊन जातो. नुकताच रद्दीच्या दुकानात गेलो असता मोरोपंतांची ’केकावल” हे पुस्तक सापडले, रद्दी वाल्याने त्या  ६० पानांच्या दुर्मीळ पुस्तकाची  किंमत केवळ दहा रुपये लावली. बरं ते पुस्तक उघडले, तर त्यावर चक्क लोकसत्ताचे पूर्व संपादक  विद्याधर गोखले यांची  स्वाक्षरी दिसली.एखादे पुस्तक ,  मग ते कितीही ’वजनदार’  व्यक्तीने लिहिलेले असले तरी फक्त  रद्दी च्या दुकानात किलोच्या भावानेच विकले जाते हे कटू सत्य फार लवकर समजले होते .

असेच एकदा एक जुने पुस्तक ( रवी किरण मंडळाने प्रकाशित केलेले) ’श्री मनोरमा’ नावाचे  १९२६ साली प्रकाशित झालेले पुस्तक  त्यांच्या कवितांचे पुस्तक पण ह्याच दुकानात विकत घेतले- २० रुपयांना 🙂  जवळपास १०० च्या वर ’वृत्तबद्ध”कवितांचा दुर्मीळ  संग्रह आहे हा, आणि ह्या पुस्तकावर पण   स्वतः श्री रानडे यांची  शुभेच्छांसह अशी स्वाक्षरी  आहे. असा अनमोल ठेवा हाती लागला की खूप आनंद होतो, म्हणूनच रद्दीच्या दुकानात जायला मी कधी पण तयार असतो.

माझ्या मुलींना पण  माझ्याबरोबर लहानपणापासून रद्दीच्या दुकानात   जाऊन पुस्तकं घेतांना पाहिल्यामुळे  त्यांनी पण पुस्तकं विकत घेणे सुरु केले..  त्यांचा सुरुवातीला ओल्ड क्लासिक्स, हार्डी बॉइज, नॅन्सी ड्रू वगैरे पासून सुरु झालेला प्रवास शेक्सपिअर , खलिल जिब्रान किंवा रविन्द्रनाथ टागोरांपर्यंत जेंव्हा पोहोचलेला दिसला, तेंव्हा रद्दी वाल्याने आपल्या मुलांवर वाचनाची आवड जोपासण्यासाठी  किती उपकार केले आहेत याची जाणीव झाली. अगदी लहानपणापासून रद्दीच्या दुकानातून गोष्टीची पुस्तकं विकत घेतल्याने त्यात काही वावगे आहे असे त्यांना कधीच वाटले नाही.

पुस्तक हे  कधीच रद्दी नसते, तर जो त्याला किलोच्या भावाने विकतो  त्याला त्याची किंमत समजलेली नसते, म्हणून रद्दी मधे विकले जाते. श्रीकृष्णाची  रुक्मिणी, आणि सत्यभामेने सुवर्ण तुला केली , आणि स्गळे सोने एका पारड्यात टाकले तरीही   श्रीकृष्णाचे पारडे  खाली राहिले, पण जेंव्हा राधेने त्यावर तुळशीचे पान ठेवले, तेंव्हा मात्र कृष्णाचे   पारडे वर उचलले गेले , तसेच या रद्दीचे पण आहे, खरी किंमत अजूनही समजलेली नाह……….. आणि इथे फक्त ते तुळशीचे पान अजूनही सापडलेले नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

52 Responses to वाचन संस्कार..

 1. अगदी महेंद्रकाका,
  कळायला लागल्यापासून घरची रद्दी हट्टाने मीच घालायला जायचे कारण एकाच – इथे पुस्तके कमी भावात मिळायची… आणि वर उत्सुकता यावेळी कुठलं पुस्तक हाती लागेल याची… जाम मजा यायची.. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  लेख नेहेमीप्रमाणेच उत्तम…

 2. ruchira2702 says:

  Mast lekh kaka… Majh pan asach aahe…. Disel te vachat asate mi..tyamule majhi aai mi lahan asalyapasun gharat agdi nivadak pustak aanaychi.. Pan ho tyatun majhi svatahachi aavad nirman zali…. Raddichya dukanatun pustak fakt abhyasachich ghetlit… Juna bazar mhantat nagpurla tyala…. Pustakansathi aata ekda jav mhante

  • रुचिरा
   नागपूरला बर्डी पोलिस स्टेशन शेजारी एक माणूस बसायचा ( १५ वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही) त्याच्याकडे मी नेहेमी पुस्तकं विकत घ्यायचो.
   रद्दी च्या दुकानात पुस्तक शोधणं म्हणजे कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखं आहे , फरक एवढाच , की इथे हिरा नाही तर कमीत कमी हिरकणी तरी निश्चितच सापडते.

 3. bhiu nakos,maajhyaa kavittaMche binder tayar hot aahe,te laakarach raddeechyaa dukaanaat saapadel,tech tulasiche paan na Tharo

 4. Piyu says:

  मस्त !!!

  खूप दिवसांनी तुमच्या लेखातले एकूण एक वाक्य पटले… 🙂

 5. Amol says:

  masta …. pudcha veli me pan try karin … pan Bangalore madhe aslya mule bahutek kanada pustaka hathi lagtil asa watta , pan harkat nahi praytna nakki karel …..ani ho sadya tar Diwali cha saaf safai mohim mule scope khup ahe ….

  • अमोल
   कर्नाटकातही बरेच मराठी लोकं आहेत, तेंव्हा बेस्ट लक.. एखादं ,मराठी पुस्तक सापडूनही जाईल 🙂

 6. अभिषेक says:

  काका, लेख उत्तम झालाय!

 7. Shweta2607 says:

  Kaka, “Vachan” he ekach vyasan ase aahe je pidhi dar pidhi sanskarasahit rujavala jat…!! ni tyala kunachich harkat nasavi…!!! Post mastach zaliy…!!! 🙂

  • वाचनाची सवय सगळ्यांनाच असते, पण हल्ली फेसबुक मुळे वाचनाचा वेळ फेसबुक वर चकाट्या पिटण्यात जास्त जातो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 🙂 फेसबुक च्या जमान्यात वाचन संस्कृती टिकुन रहाणं फार कठीण दिसतंय.

 8. gouri0512 says:

  ते पुड्याचे कागद वाचणं एकदम सेम टू सेम … आईने कधी सामान भरून ठेवायला सांगितलं, म्हणजे मल इतका वेळ लागायचा – एक एक पुडा उघडल्यावर वाचल्याशिवाय टाकणार कसा ना? 🙂
  रद्दीच्या दुकानातून नाही, पण जुनी पुस्तकं विकणार्‍यांकडून घेतलीत काही सुंदर पुस्तकं.

  • आणि हो, तो कच्चा दोरा वापरला जायचा पुड्य़ा बांधायला. त्या दोऱ्याची गुंडाळी करून ठेवायला पण आवडायचं . खरं तर त्या दोऱ्याचा उपयोग कधीच होत नव्हता, पण प्रत्येक घरात एक मोठा गुंडाळा नक्की असायचा. 🙂

 9. mazejag says:

  Agdi 100 % sahmat….

 10. Ganesh Atkale says:

  अप्रतिम लेखनशैली !
  लेख आवडला आपल्याला…

 11. Tanvi says:

  शब्द न शब्द पटला महेंद्रजी…. आमच्याकडे तर अजूनही जुने पुस्तकं, रद्दी आवरायला काढली की अमित आणि आई आधि बजावतात मला वाचत बसू नकोस 🙂
  बाकि माझी मुलं तितकी आवडीने वाचत नाहीत ही खंत पुन्हा एकदा सामोरी आली 😦

  • तन्वी
   मुलांच्या आवडी वयाप्रमाणे बदलत असतात, कदाचित थोड्या दिव्सानंतर लक्षात येइल त्यांना काय आवडतं ते. मी स्वतः रसिकाला नेहेमी हॅरी पॉटर का वाचत नाही म्हणायचो, कारण माझ्या दृष्टीने सर्वसाधारण मुलांना तशीच पुस्तकं आवडतात, पण नंतर तिला जेंव्हा जून्य क्लासिक्स मधे इंट्रेस्ट घेतांना पाहिलं तेंव्हा लक्षात आलं की तिची आवड लिटररी साईडला जास्त आहे . तुला पण कधी तरी लक्षात येईलच मुलांना काय वाचायला आवडतं ते..

 12. Guru says:

  “मग ते कितीही ’वजनदार’ व्यक्तीने लिहिलेले असले तरी फक्त रद्दी च्या दुकानात किलोच्या भावानेच विकले जाते हे कटू सत्य फार लवकर समजले होते”
  .
  करके तो तुम्हारा लिखेवा बॅल्नस्ड लगता काका……. मस्त लेख नेहमीप्रमाणेच!!! जुन्या पुस्तकांच्या बाबतीत बोलायचे झालेच तर चर्चगेट ते सी.एस.टी पायी जाताना जे लागते वाटेत त्याचा उल्लेख अपरिहार्य आहे असे मी समजतो….. “कन्साईज इन्सायक्लोपिडीया ऑफ़ गन्स” दिसला होता फ़क्त ७०० ला म्हणाला होता पण तेव्हा पैसे़च नव्हते साले!!!….. अप्रतिम पुस्तक होते!!! गन्स -बॅरल्स- ऍमो गेजेस- सर्व्हिसिंग सगळ्याच टिप्स फ़ारच भारी अश्या होत्या

  • गुरु
   असेच एक टॅंक्स वरचे पुस्तक पण पाहिले होते त्याच फुटपाथवर. तिथे गेलो की कमित कमीदोन तास कसे निघुन जातात हेच लक्षात येत नाही.

 13. __/\__

  रद्दीवाला घरीच येतो त्यामुळे रद्दी डेपोत कधी जाणे झाले नाही पण कधीतरी चक्कर मारायला हरकत नाही. कोळशाच्या खाणीत कधी हिरा भेटेल सांगता येत नाही.

 14. अप्रतिम लेख.. नेहमीप्रमाणेच !!

 15. aruna says:

  वाचनाचे वेड असेच असते. माझी वहिनी नेहेमी म्हणायची की तुम्ही काहीही वाचता. भेळ घ्र्तली तर त्याचा कागद पण सोडत नाही! पण काय करणार, राहवतच नाही. आणि आता भेळ पण कागदात मिळत नाही. by the way, मी पण शाळेत असतांनाच संपूर्ण अर्नाळ्कर वाचून संपवले होत. णंतर पुण्याच्या एका लायब्ररीत आम्हाला त्याचे ओरिगिनल इंग्रजी अवतार पण वाचायला मिळाले!

 16. गरम गरम जेवण करायच्या ऐवजी कधी मधी घरातलेच शिळेपाके खाल्ले तर कदाचित या साधनेत लवकर यश ला”भेल” (तुळशीचे पान शोधायच्या…)

 17. Santosh Kudtarkar says:

  Tumhi kharach mazhe Kaka ahaat… tumcha warsa ya putanya kade pan ahe todasa 😉 🙂
  Hahahahahaha… Masta lihilay apan!!! 🙂

 18. Aparna says:

  काका सेम पिंच…
  आमच्या शेजारी मारवाडी राहायचा. त्यांच्याकडे येणार्‍या रद्दीचे ते कागदाच्या पिशव्या बनवायचे.तर ती लोकं गॅलरीत हा सगळा माल घेऊन बसली की त्यांच्या मुलांशी बोलताना मी कितीतरी मासिकं पुस्तकं अशीच वाचायला घ्यायचे आणि मग वाचून झालं की परत करायचे. त्यांच्याकडे षटकार, स्पोर्ट्स स्टार आणि गौतम राजाध्यक्ष्यांचे फ़ोटो असायचे ते अशी मासिकं ही पोस्ट वाचताना आठवली..

  मागे एकदा आरुषबरोबर वाचतानाचा व्हिडिओ इथे टाकला होता. कदाचित तुम्ही पाहिला असेल… 🙂

  मस्त पोस्ट….तुम्ही फ़ोर्टला रस्त्यावर वगैरे पुस्तक विकतात तिथेही चक्कर मारतात का? माझ्या मावसबहिणीला एकदा तिथे तिच्या डॉक्टरी विषयातलं कुठलंतरी पुस्तक स्वस्तात मिळालं होतं.

  • अपर्ण,
   मस्त खजीना असतो रद्दीवाल्याकडे. कधी काय मिळेल ते सांगता येत नाही .
   फक्त तिथे नियमीत जाण्याचा उत्साह शिल्लक राहिला पाहिजे.

 19. स्वप्नील सहस्त्रबुद्धे says:

  चांगला लिहिला आहे आपण हा लेख. आम्ही लहान असताना, मी माझ्या बहिणी सोबत सकाळी सकाळी जरा फिरायला गेलो होतो.येताना आम्हाला रस्त्यात चक्क बिरबलाच्या गोष्टींचे जीर्ण, असे पुस्तक मिळाले. दिवस पावसाचे असल्याने ते पुस्तक ओले झाले होते. पहिली, शेवटची पणे ही नव्हती.पण आम्ही सगळ्यांनी ते पुस्तक इतके आवडीने वाचले की आज ही ती आठवण आली की मन भरून येते. नंतर काही पुस्तके घेतली, अगदी अलीकडे ५५ कोटींचे बळी वगैरे ही घेतले पण ते जीर्ण पुस्तक वाचून त्याने त्यावेळी जो आनंद मिळाला तो निव्वळ अवर्णनीय , आणि मधुर असाच होता. तुमच्या या पोस्ट ने त्या मधुर अशा प्रसंगाची आठवण झाली.

 20. sagarkokne says:

  चांगली सवय आहे. ‘सखाराम गटणे’ची आठवण झाली. 🙂
  मलाही वाचायला फार आवडते. रोजचे वर्तमानपत्रही अथपासून इतिपर्यंत वाचायची माझी इच्छा असते, पण वेळेचे गणित जमत नाही.

  • mitali says:

   mala hi khup aavad ahe ,vachanachi pan vachayala basli ki zop yete.
   mhanun aata asi net basun bachte katha..

   • मिताली,
    ब्लॉग वर स्वागत. कूठेही वाचलं तरी काही हरकत नाही. वाचनाशी नाळ जुळलेली कधीच तुटत नाही.

 21. vaishu says:

  khup chan kaka mala pn vachnachi svay ashich lagli vadapv,kacchidabeli etc brobr yenare newspaper pn vachun kadte ani kdi kdi khup chan lekh vachyla miltat

 22. same here …mala pan ashi khupashi pustak milali..raddi chya dukananatun
  pan me nahi te raddila dile japun thewale..

  • अनन्या,
   खरं आहे. पण घरी किती पुस्तकं जमा करायची हा पण प्रश्न आहेच . जागा पण तर हवी ना, मग त्यातल्या त्यात चांगली आहेत ती ठेवतो, आणि इतर देऊन टाकतो रद्दी मधे. 🙂

 23. Vishal Vinayak says:

  Mastch sir..
  Lekh
  Raddi wala ghari yeunch ghet jaat asla tari ek raddi walyakade mi aadhipasun jaaycho.
  Khupshi pustke milali aahet..
  Pan vaait gosht mhnje ya raddi walyala pustkanchi khari kimmat mahit aahe..
  Paise khup lavaycha..:D

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s