ओह माय गॉड!

आजच्या पेपर ,मधे वाचले की काही हिंदी चित्रपटांवर इतर देशातही  ( पाकिस्तान, मलेशिया, नेपाळ वगैरे)बंदी घातलेली आहे . त्या मधे एक नांव आहे ’ ओह माय गॉड” . कालच हा सिनेमा पेन ड्राइव्ह मधे आणला होता मोठ्या मुलीने . या सिनेमावर बंदी आणण्या सारखे काय आहे हे पहावे म्हणून हा सिनेमा पहाणे सुरु केले.
एकदा सुरु केल्यावर  मात्र पूर्ण संपेपर्यंत मेस्मराइझ होऊन गेलो होतो.  अतिशय सुंदर चित्रपट आहे हा. या बद्दल जास्त काही लिहित नाही, कारण जर काही लिहिले तर पहाण्यातला इंटरेस्ट कमी होईल.फक्त जर पाहिला नसेल तर अवश्य पहा एवढेच सांगतो. माझ्या मनात नेहेमी येणारे विचार या सिनेमात प्रोड्युसर अक्षय कुमार ने मांडलेले आहेत.

परेश रावलचा अभिनय , उत्कृष्ट! तसेच अक्षय कुमारचे काम सुद्धा खूप छान झाले आहे. स्टोरी लाइन नेहेमीच्या सिनेमा पेक्षा एकदम हटके.आय एम डी बी किंवा इतर कुठेही चेक न करता , किंवा कुठल्याही पेपरमधल्या रिव्ह्यु वर  अवलंबून आपला निर्णय न घेता हा सिनेमा नक्की पहा..

या पोस्टला कॉमेंट डिसेबल केल्या आहेत.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , . Bookmark the permalink.