बाबा जोक्स

माझ्या मते आईचं मुलांशी बाऊंडींग फार लवकर आणि चांगलं होत असतं, आणि ते नेहेमी साठी टिकतं, याचे  कारण अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी बरोबर घालवलेला ’क्वालिटी टाइम’.   त्या साठी खास प्रयत्न करावे लागतात ते  वडीलांना!  याचं कारण हे की मुल मोठं होत असतं, आणि वडील कामात बिझी असतात.

“कुछ कुछ होता है” पहायला आम्ही सगळे गेलो होतो, आणि माझ्या धाकट्या मुलीला  ( वय वर्ष ४-५ असेल तेंव्हा तिचे) तो शाहरुखखानचा सीन ( पॅंट न घालता बाहेर निघण्याचा) खूप आवडला होता. घ्री आल्यावर सारखी ” बाबा, एक जोक सांगू?? ती अंजली असते ना तिचे बाबा ना एकदा ऑफिसला जातांना पॅंट घालायचे विसरतात, आणि  हसायला लागायची “. दोनतीन दिवस सारखा तिचा तोच तो जोक सांगणे सुरु होते.

एक दिवस  सकाळी ऑफिसला जाताना , मी मुद्दाम पॅंट घालणे विसरलो आहे असे दाखवले  , आणि तिला बाय करायला गेलो.  मला  तसे ऑफिसला जातांना पाहून तिला खूप आनंद झाला,आणि खो खो हसून मला ” अहो बाबा, तुम्ही पण पॅंट घालायचे विसरलात की!” असं म्हणाली. अंजली सारखं बाबांना पॅंट घालायचे विसरले आहात म्हणून सांगायला मिळाल्याच्या आनंदाची चमक तिच्या डोळ्यात सरळ दिसत होती.  हा जोक आमचा खास जोक होता, आणि   पुढचे काही महिने  मी दररोजच पॅंट घालायचे विसरायचो. काही दिवस ती हा जोक एंजॉय करत होती, पण पुढे म्हणजे आठ  एक महिन्यात  मात्र ’ बाबा आता बास करा, किती बोअर करता हो तुम्ही ” असे म्हणायला लागली, तरीही त्या ’ बाबा जोक ’ मधली गम्मत काही कमी झाली नव्हती. एक वेगळा बॉंड फॉर्म झालं होता आमच्यामध्ये.

आजचा हा लेख सगळ्या ’ बाबा’ लोकांसाठी. मुलांच्या बरोबर आईचं बॉंडींग जितक्या सहजपणे होतं तितक्या सहजपणे वडिलांचे होत नाही. कारण संध्याकाळी बाबा ऑफिस मधून घरी परत आल्यावर ” बाबा आले , बाबा आले, म्हणून ओरडत घरात जाऊन आईला वर्दी देण्याचे  काम बहुतेक आमच्या पिढी बरोबर बंद झाले असावे. आमच्या काळी पण बाबांच्या बद्दल मनात भीती युक्त आदर होता, पण बॉंडींग कधीच झालं नाही.

मुलं लहान असे पर्यंत बाबांसोबत जरा गप्पा , होत असतात. , पण मुलं मोठी झाल्यावर बाबांशी गप्पा, इंटरअ‍ॅक्शन एकदम कमी होते . हा अनुभव बहुतेक सगळ्या टिनएजर्स  वडिलांनी   घेतला असावा .  आपल्याला  खूप वाटत असतं की मुलांनी जसे ते आईशी बोलतात ,तसे आपल्याशी पण बोलावं, पण तसं होत नाही. हो की  नाही? त्यावर निश्चितच उपाय आहे.

काही लोकं आपल्या टिनएजर्स मुलांना आपल्या फेसबुक फ्रेंड्स लिस्ट मधे अ‍ॅड करतात, आणि त्यांचे मित्र कोण वगैरे गोष्टींवर लक्ष देऊन त्यांच्या आयुष्यात नको तितका इंटरेस्ट घेतात.प्रत्येकाचे पर्सनल लाइफ असते, आणि दुसऱ्याने त्याचा आदर केला पाहिजे . म्हणूनच म्हणतो की मुलांना लिस्ट मधे अ‍ॅड करणे पूर्ण पणे चूक आहे. मी स्वतः माझ्या मुलींना किंवा बायकोला फ्रेंड लिस्ट मधे ( फेस बुक वर असतांना) अ‍ॅड केले नव्हते 🙂 कारण असे वागण्याने मुलांशी इंटरअ‍ॅक्शन वाढते असे नाही, तर त्यांच्यावर उगाच नको ती बंधनं येतात.

हल्ली बाबा घरी आल्यावरही एक तर मुलं आपापली पुस्तकं घेऊन बसलेली असतात, किंवा व्हिडीओ गेम, मोबाइल वरचा गेम , चॅट , किंवा फेसबुक वर, किंवा ..असू दे.. ही लिस्ट फार मोठी होऊ शकते. बाबा आल्यावर घरी जर आई आलेली नसेल  तर , त्यांच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहून, ” आईचा फोन आलाय, तिला मिटींग मुळे वेळ होणारेय” अशी वर्दी मिळते. या शिवाय काही बोलणं होत नाही.

तुम्ही विचारलं, काय कॉलेज कसं काय सुरु आहे? तर ठीक! असे उत्तर मिळून पुन्हा  डोकं मोबाईल च्या चॅट मधे शिरतं. वडिल आणि मुलांचं बॉंडींग सहजासहजी का होऊ शकत नसेल बरं? बाबा, म्हटलं की एक प्रकारचा दरारा असतो, रिस्पेक्ट असतो, जर मुलं कल्ला करत ( नागपूरी शब्द आहे हा – म्हणजे दंगा करणे)  असतील तर बाबा घरी आल्याबरोबर आवाज बंद होतो. मुलांच्या बरोबर आपलं ट्युनिंग कसं जुळवायचं? कठीण प्रश्न आहे. लहान असतांना अंजली सारखे जोक चालतात, पण मोठं झाल्यावर?   त्यांची प्रायव्हसी जपून त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता कसं काय  रिलेशन मेंटेन करायचं?    मला तर वाटतं की ’बाबा जोक्स’ किंवा ’ बाबा इंटरफरन्स’  हेच एक उत्तर आहे .

बाबा जोक्स म्हणजे  ते  आयडियली कसे असायला हवे ?  कम्पल्सरीली ते दोन प्रकारचे असायला हवेत, पहिला गोष्ट म्हणजे ते अजिबात फनी नसावे , आणि दुसरी गोष्ट म्हणजे, समजा,  जरी थोडे फार फनी असले, तरीही पुन्हा पुन्हा सांगितल्यावर  ते एकदम इरीटेट करणारे असायला हवे, आणि मुलांनी  ” बाबा, आता बास करा हो…” असं म्हणायला हवे. असं झालं की तुम्ही जिंकलात, मुलांशी संवाद साधायचा चान्स मिळतो.

मुलांना वाटत असतं की आपल्या बाबांना काही समजत नाही -ते हे विसरले असतात की बाबा पण आपल्या वयातुन गेलेले आहेत, त्यांचे पण मित्र, मैत्रिणी होत्या, पण त्यांच्या दृष्टीने तुम्ही एकदम बावळट – गेल्या जमान्यातले  असता. त्यांचं आपलं वेगळं विश्व असतं, त्या मधे ’ आई-बाबांचं’ स्थान वेगळ्या लेव्हलवर , आणि बाहेरच्या मित्रांचे स्थान वेगळ्या लेव्हलवर असतं,  दोन्ही अगदी वॉटर टाइट कम्पार्टमेंट असतात.ही गोष्ट एकदा समजून घेतली की सगळं काही सोपं होतं.

कधी तरी  बाबाजोक्स मारत राहिले, की बाबांना काही फारसं समजत नाही हे अधोरेखित होतं, आणि मुलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्हाला समजावणे/शिकवणे  सुरु करतात, ” अहो बाबा, आता तुमच्या वेळ सारखं नसतं”  जग बदललंय हो! असे काहीसे ऐकावे  लागते, पण त्या निमित्याने का होईना पण तुमच्याशी मुलं गप्पा मारणे सुरु करतात हे ही नसे थोडके.

बाबा जोक्स/इंटरफरन्स  म्हणजे बघा, जेंव्हा एखादा टिव्ही वरचा हिंदी कार्यक्रम सुरु असतो, तेंव्हा दुसऱ्याच एखाद्या सिरियल मधल्या  पात्राबद्दल किंवा प्रसंगाबद्दल विचारून , का गं, हे तेच सिरियल आहे ना? – की ज्या मधे …………….. असे विचारले की,  ” नाही हो, ते वेगळं, आणि टीव्हीचा आवाज म्युट करून  तुम्हाला ब्रीफ केले जाते. कार्टून सिरियल्स सुरु असतांना त्या खास चिरक्या आवाजात डब केलेल्या कार्टून प्रमाणे आवाज काढणे, मुलं जी सिरियल पहात असतील त्यातल्या सारखे मान वेळावून बोलणाऱ्या हिरोला  चिमणा,  जास्त बेढब आवाज असलेल्याला बेडूक,  किडूक, त्यांच्या आवडीची  हिरोईन टिव्ही वर आली की  काय गं,  ” आपल्या घरची भांडे घासणारी पण अशीच दिसते की नाही?” अशा कॉमेंट्स केल्या की आपोआप वादविवाद  सुरु होतात. वादविवाद असो, किंवा गप्पा असो तुमचा उद्देश आहे मुलांशी इंटरअ‍ॅक्ट करण्याचा तो पूर्ण होतो.

घरात असतांना उगाच स्वतःशी काहीतरी पुटपुटणे सुरु  केले ,की  कोणी  तरी काय पुटपुटताय ? म्हणून विचारणार हे नक्की   !विचारले की काय झाले? की मग काय करणार जर कोणी बोलायला नसेल तर हीच तर एक बेस्ट कम्युनिकेशन ची पद्धत आहे.  असं म्हटलं की आपोआपच कोणीतरी गप्पा सुरु करतं. अशा अनेक गोष्टी आहेत संवाद सुरु करण्यासाठी, त्यांचा वापर केलात तर मुलांशी संवाद सुरु होईल, नाही तर कुटुंबातले सगळे जण टीव्ही पहात जेवणं उरकून आपापल्या फेसबुक अकाउंट वरच अपडेट्स करत बसतील.

आज जर तुम्ही २५ शी मधे असाल, तर बघा, तुमच्या लक्षात येईल, तुमचे आई सोबत जास्त  जवळचे संबंध आहेत वडिलांपेक्षा. वडिलांना काही सांगायचं तर आईच्या माध्यमातून सांगायची पद्धत होती की नाही तुमची?? आपल्या मुलांच्या बाबतीत असे होऊ नये याची काळजी आपणच घ्ययाला हवी.

बाबा जोक्स मधे तुम्ही एक्सपर्ट झाले  आहात का? हे कसे ओळखायचे? सोप्पं आहे, फक्त घरी म्हणायचं, एक जोक सांगतो, ऐका………. आणि हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनी एकसूरात ” नाहीssssssss” म्हंटले की समजा तुम्ही बाबा जोक्स मधे एक्सपर्ट झालात.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

51 Responses to बाबा जोक्स

 1. Piyu says:

  टायपो: बाबा आल्यावर घरी जर आई असेल त्यांच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहून….

 2. Guru says:

  आमचे बाबा मुळात स्पोर्ट्समन….. अन अतिशय दिलखुलास….. आमच्याच पिढीच्या भाषेत बोलायचे झाले तर “कुल”… पण का तर काय माहिती काका मुलां बद्दल तरी एक सांगतो एका विशिष्ट वया नंतर मुलाचे (तरुण झाल्यावर) बाबाशी बोलणे कमीच होते,…………. बाबा जोक्स!!! हम्म्म्म आता कळले करीना पायल्यावर पण तीर्थरुप “ही सुष्मिता काय?” अशी पृच्छा का करतात ते!!!!!!!…… 😀 😀 😀

  • गुरु
   अरे ते बोलणं कमी होतं, कारण विषय सापडत नाही बोलायला म्हणून !हे असे बाबा जोक्स उपयोगी पडतात बोलण्यासाठी विषय निर्माण करायला. 🙂

 3. Piyu says:

  थोडस कसं झालाय ना काका.. आताच्या बाबांना मुलांकडून आजूबाजूला दिसते तशी किंवा चित्रपटात दाखवतात तशी फ्रेण्डली पण ट्रीटमेंट हवी असते आणि पूर्वीच्या काळी त्यांना त्यांच्या वडिलांचा धाक वाटायचा किंवा ते (बाबालोक) जसे त्यांच्या वडिलांच्या आज्ञेत राहिले तसं पण आठवत असत/ हव असत…

  एकीकडे मुलांनी आपल्याला मित्र मानायला हव असत.. आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या शब्दाला खूप मान दिला पाहिजे अस पण वाटत असत..

  म्हणजे कस.. कि मुलाने जर ह्यांना फेसबुक वर add केल..तर त्यांनी त्यात आनंद मानवा न.. पण तुम्ही म्हणता तस “आणि त्यांचे मित्र कोण वगैरे गोष्टींवर लक्ष देऊन त्यांच्या आयुष्यात नको तितका इंटरेस्ट घेतात”. मुलांना ह्याला add का केलास.. तो कोण आहे? ह्याला डिलीट कर.. इत्यादी सांगतात..

  मग मुलांना वाटते कि बाबांची आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठीची हि नवी युक्ती आहे.. मित्रत्वाच्या नावाखाली पुन्हा हक्कच गाजव्ताहेत.. टीनएज मध्ये असतांना अस वाटण्याच प्रमाण खूप असत… ते चूक कि बरोबर हा वेगळा मुद्दा आहे आणि ते व्यक्ती आणि प्रसंगानुरूप ठरत.

  एकदा अस झाल.. तर मुल काही तुमच्यावर परत विश्वास टाकत नाही.. तुम्ही तो गमावता..

  अर्थात हे सार्वत्रिक असेलच अस नाही.. पण अस झालेलं मी पाहिलं आहे.. माझ्या स्वत:च्याच बाबांच्या बाबतीत काही अंशी अनुभवलं देखील आहे.

  • पियू
   मुलीवर बरेचदा विश्वास असतो, पण काळजी जास्त असते. अशा वेळी मग विश्वासावर काळजी कुरघोडी करते, आणि तू म्हणालीस तसे प्रसंग उद्भवतात.मुलांनी आपलं ऐकावं असं वाटण्याचं कारण आपण चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, तेंव्हा त्याचं काही चुकत असेल तर सांगायचा आपला हक्क आहे ही जाणीव आहे . त्यावर काहीच उपाय नाही, मानवी स्वभाव आहे तो!

 4. Suhas Adhav says:

  generation gap thoda far padtoch ………
  tumhi jo privacy cha mudda mandlat to hi agdi patla mala…..majhe baba sudha kadhi majhya mitra maitrinichyat jasta dhavla- dhaval karat nahi…….. baba jar space det aastil tar mulana-hi vata ki babancha aaplyavar vishwas aahe ani mag mula sudha to kayam thevaysathi swatachya vagnyavar laksha thevtat…..
  majhe baba police aahet tyamule jasta vel te aamchyat nastat …….pan jevdha vel aastat aamchyat tevha agdi mitra sarkhe aastat ……arthat baba mhanla ki ” BABA JOKES ” yenarch
  pan tyat pan ek maja aastech na ……

  tumhi jo scene post madhye mention kelay shaharuk khan vala to ” kuch kuch hota hai” hya chitrapatat aahe aasa mala vata …not for sure
  pan overall post ekdam massta aahe 🙂 mala pan majhya babanchya “baba jokes cha anubhav aahech

  • सुहास
   तो सिनेमा १४ वर्षापूर्वी पाहिला होता, त्यामुळे नाव विसरलो होतो.:)
   एक वेळ मुलांना स्पेस देणं सोपं असतं, पण मुलींच्या बाबतीत त्या साठी वडिलांच १०० टक्के विश्वास असायला हवा. किती वेळ बरोबर घालवता या पेक्षा तो कसा असतो हे जास्त महत्त्वाचे. क्वॉलिटी टाइम जास्त महत्वाचा.मला पण गेली कित्येक वर्ष कामानिमित्य सारखे टूर ला जावे लागते, पण जितका वेळ घरी असतो तितका वेळ कसा चांगला घालवता येईल हे पहात असतो.

 5. Tanvi says:

  बरं झालं तुम्ही फेबूवर नाही आता…. काय वाटेल ते सुरू झालं आणि मला माहिती असलेलं ब्लॉगिंग सुरू झाल्यामूळे माहेरी आल्यासारखं वाटतय !! 🙂
  आजच दुपारी माझ्या बाबांना स्काईपवर जोकबद्द्ल रागावत होते आणि ते मनापासून हसत होते माझा ओरडा खाऊन… 🙂
  तेव्हा पोस्ट ’समजली’… आवडली…. पटली….. ’काय वाटेल ते’
  — हे एका बाबांची मुलगी आणि एका मुलीची आई या नात्याने !!! 🙂

  • तन्वी,
   फेसबुक वर नसल्याने बराच वेळ असतो लिहायला, वाचायला हे नक्की. पण सगळ्या मित्रांपासून तुटल्यासारखं पण वाटतं. असो.. शेवटी काय, बाबा जोक्स रॉक्स!

 6. hahahaha… aamache baba pn baba jokes ya category madhale aahet. maja yete asa pappa jokes marayala lagale ki.. even te itaki comedy karatat ki hasun hasun pot dukhate aamache. mg aamhi mhanto baba bas aata.. 🙂 thanks kaka 🙂

  • बागेश्री
   बरेच दिवसांनी कॉमेंट दिली. हे पिजे फक्त इंटरअ‍ॅक्शन वाढवण्यासाठी असतात, नाही तर मुलांशी बोलणं कसं सुरु व्हायचं?

 7. vaidehee says:

  “त्यांचं आपलं वेगळं विश्व असतं, त्या मधे ’ आई-बाबांचं’ स्थान वेगळ्या लेव्हलवर , आणि बाहेरच्या मित्रांचे स्थान वेगळ्या लेव्हलवर असतं, दोन्ही अगदी वॉटर टाइट कम्पार्टमेंट असतात.ही गोष्ट एकदा समजून घेतली की सगळं काही सोपं होतं”
  आवडेश … 🙂

 8. falguni says:

  mazhi mulagi ya babat khup luky aahe.Papa rojach mulila khup hasawatat..tichyashi khup friendly rahatat..school cha gappa sangat asatana te doghe kup gappa martat ani amipan amchya balpanachya gamti jamti sangun tila pan ami bolt karto mag tyawr ti khup prashan vicharte ani mag apsukhach amch communication wadhat..so ata ti amchi balmaytrin zhali aahe … chhan na!

  • फाल्गुनी,
   संवाद नेहेमीसाठी रहायला हवा . एकदा १४-१५ वय झालं, की मुलींच्या मित्र मै्त्रीणी वगैरे असणारच, तेंव्हा मग त्यांना मित्र जास्त जवळचे वाटू लागतात, आणि संवाद कमी होतो. हा माझा अनुभव आहे. अशा वेळी मग असे काहीतरी भंकस जोक्स मारले की थोड्याफार गप्पा होतात मुलांशी 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

 9. ni3more says:

  ekdum rawas ahe artical kaka tumche me hi tasach karato ekhadhi gostha sangaychi asel babana tar aaichya dware sagnato ti

 10. ni3more says:

  ho kaka samjale mala tumhala kay bolayche ahe mastach post ahe tumchi hi

 11. ruchira2702 says:

  Thanks kaka… Barech divsaat babanshi gappa nai zalyat… Jaaniv zali…. Te tar baba jokes marnarch.. Pratisaad matr dyaylach havay…

  • रुचिरा
   🙂 नक्कीच प्रतिसाद द्यायला हवा. ते जोक्स केवळ तुमच्याशी इंटरअ‍ॅक्ट करण्यासाठी सुरुवात म्हणून वापरले जातात. 🙂 धन्यवाद.

 12. Sarika Patil says:

  Khupach chan. Hi gosht sagalya baba lokana kalali pahije… Facebook, mobile ya goshti shivay hi khup important gosti ahet jya miss hotayat. Dev karo ani mazya navryala hi gost lavkar janavo… Aso kaka, tumhi great ahat ho… kasal bhari lihita… kiti chotya vatanarya goshti ahet pan far valuable ahet…..

  • सारिका
   ब्लॉग वर स्वागत . स्वतःच्या मुलींशी संवाद कमी होतोय, ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली म्हणून इथे पोस्ट लिहिली. काहीतरी करून मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न असतो हा . 🙂

 13. PG says:

  dil to pagal hai >> kuch kuch hota hai 🙂

 14. kay kaka fb deactivate ?

 15. काका.. छान.. अप्रतिम…. आवडेश……!!! 🙂

 16. साधना परांजपे. says:

  खरे आहे तुमचे म्हणणे. मुला-मुलींचे आणि अर्थात खास करून मुलींचे आई शी असणारे नाते वेगळेच असते. आणि ये नाते दोन्ही व्यक्तींच्या स्वभावाने खुलत असते, त्यात वेगळी रंगत ,मजा येत असते. आणि आई ची शीतल अशी माया आणि वडिलांचे काळजी पोटी असणारे प्रेम जगाच्या पाठीवर कुठेही मिळणे शक्य च नाही. मुळात मागच्या पिढीत आई शक्यतोवर नोकरदार वर्गात येत नसे, गृहिणी च असे(खास करून माध्यम वर्गात), त्यामुळे आई च्या सहवास चा ;लाभ जास्त प्रमाणात मिळत असे.

  • साधना
   दोन पिढ्यांमध्ये बराच फरक पडलेला आहे हे नक्की. मागच्या पिढी मधल्या काही चुकीच्या गोष्टी त्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा लेख. एकदा संवाद सुरु झाला की वेगळीच अटॅचमेंट निर्माण होते , म्हणुन संवाद सुरु होणे जास्त महत्वाचे. त्या साठी काय काय केलं जाऊ शकते, ह्याचे उत्तर प्रत्येकाच्या दॄष्टीने वेगवेगळे असू शकेल.

 17. बाबा जोक्स ही संकल्पना आवडली.
  परदेशातही मुलींचे वडलांच्या सोबत नाते मित्रत्वाचे असते.
  आणि विश्वासाचे
  ह्याचा मला स्वतःला अनुभव आहे.

 18. मुलं-मुली वयात आली की आपल्या आई-वडिलांना काही कळत नाही, त्यांचे विचार जुनाट आहेत असे वाटणे साहजिक आहे. मुलांचे जग या काही वर्षात बरेच बदलते, सवयी बदलतात. त्यानुसार आई-वडिलांनी अधिक मित्रत्वाच्या नात्याने त्यांना मार्गदर्शन करायला हवे. वाईट सवयींना नावे ठेवताना चांगल्या गुणांचे कौतुक पण करायला हवे.
  माझ्या काही मित्रांचे आई-वडील फेसबुकवर त्यांचे मित्र आहेत पण त्यांचे नाते मोकळेपणाचे असल्याने त्यांच्यापासून लपवून काही करण्याची मुलांना गरजच पडत नाही. प्रत्येकानेच काळानुसार बदलायला हवे.

  • सागर
   मोकळेपणा ही फार रिलेटिव्ह टर्म आहे. नेमकं काय म्हणायचं आहे मोकळे पणा म्हणजे. इंग्रजी मधे एक म्हण आहे, ” युवर फ्रिडम एंड्स , व्हेअर युवर नोझ बिगिन्स” ती आठवली.

 19. ह्म्म्म…….. महेंद्र छान लिहिलं आहेस.
  तू जे म्हणतो आहेस ते काही वर्ष आधीपर्यंत लागू होत होतं. पण आजकाल मुलांना आपले आई बाबा अपडेटेड असावेत असं वाटतं. कोलावेरी, गंगनम स्टाईल वगैरे माहित असायला हवं असतं. तरच त्यावर चर्चा किंवा संवाद होऊ शकतो. त्यांचा वेग, पेस आपल्यापेक्षा फारच जास्त असतो. त्यामुळे त्याची बरोबरी करणं शक्यच नसतं. अशा वेळी थोडा कमीपणा घेऊन त्यांच्याकडून काही गोष्टी समजावून घेताना मज्जा येते. मोठेपणाने आपलीच चिमुरडी जेव्हा आपल्याला काही समजावतात ना …………तेव्हा खूप छान वाटतं 🙂

  • जयश्री
   अगदी खरं आहे. कसंही करून काहीतरी संवाद साधावा असे वाटत असते आपल्याला, आणि त्या साठी काहीही करायला तयार असतो आपण. . बरेचदा माहिती असलेल्या गोष्टी पण माहिती नाही असे दाखवतो, कारण त्यांनी काही तरी बोलांवं अशी आपली इच्छा असते. काही तरी विषय हवा असतो.. बस्स.बरेचदा विषय नसला की असे पिजे उपयोगी पडतात.

 20. Manisha says:

  अस होतय खरं…. माझ्या बाबतीत “आई जोक्स” … कारण मुलाशी संवाद साधण्यासाठी असे सिली जोक्स करावे लागतात. माझी आई मला बऱ्याच वेळा ओरडते, तु अशी पोरकट वागतेस , तो तुला मान देणार नाही. खरं सांगु, मला वडिलकिचा मान मिळण्यापेक्षा ,त्याला भावनिक आधारची गरज भासेल तेव्हा त्याचं माझ्या जवळ बिनधास्त येणं महत्वाचं वाटतं

  • मनिषा
   ब्लॉग वर स्वागत..
   “,त्याला भावनिक आधारची गरज भासेल तेव्हा त्याचं माझ्या जवळ बिनधास्त येणं महत्वाचं वाटतं” हे अगदी खरं. त्या साठी कमीत कमी संवाद तरी असायलाच हवा, तरच मुलं जवळ येतील..

 21. अरेच्या….. मी टाकलेली कमेंट ……..कुठे गेली ??

 22. Ki$HoR says:

  khup diwasanantar etaka changala lekh vachanyasathi milala. aata mala parat bhet dyavi lagel ya website la.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s