गडकरी आणि मोदी

मा. गो . वैद्य जेंव्हा तरूण भारतचे संपादक होते, तेंव्हापासून त्यांचे लेख वाचतच आम्ही लहानाचे मोठे  झालो.  वैचारिक  लिखाणात बाबुजींचा हात कोणी धरू शकत नव्हता. बाबुजी रा.स्व. संघाचे कट्टर पुरस्कर्ते , पण नुकताच त्यांनी लिहिलेला नितीन गडकरी यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून लिहिलेला लेख वाचल्यावर  धक्काच बसला.  एखाद्या विचाराने परिपक्व असलेल्या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या आरोपात लिप्त असलेल्या नेत्याला वाचवण्यासाठी  दुसऱ्या एखाद्या नेत्यावर नावानिशी आरोप करणे  पूर्ण पणे चुकीचे आहे.

आजही सामान्य माणसाला विचारले की मोदी आणि गडकरी यांच्यामध्ये भ्रष्ट कोण? तर लोकं काय उत्तर देतील याची जाणीव बहुतेक बाबुजींना  नसावी . ”  नरेंद्र मोदी यांना काय वाटले असावे ,ही गोष्ट पण बाबुजींनी स्वतःच लिहून टाकली आहे. एखाद्याला बदनाम करायचे असेल तर ” त्याला असे वाटले असेल…  असे म्हणून काहीही लिहिले तरी चालते..! तो लेख  इथे पहा. ( ह्याच लेखावर सध्या सगळीकडे सध्या चर्चा सुरु आहेत)

नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधे केलेले काम पहाता, त्यांना पंतप्रधान म्हणून जरी चान्स दिला गेला तरी त्यात काही गैर नाही.सध्याच्या परिस्थिती मधे भाजपा मधे केवळ एकच असा माणूस दिसतोय   की ज्याची पात्रता पंतप्रधान होण्य़ाच्या योग्यतेचा आहे.

बाबुजींचा हा लेख वाचतांना त्यांच्या मनात हा लेख लिहत असतांना नितीन गडकरी यांना वाचवायचे आहे हे धोरण पक्के ठरवून लिहिलेला हा लेख वाटत होता. या पूर्वी सुद्धा त्यांनी   एक लेख लिहिला होता, त्या मधे रॉबर्ट वढेरा आणि गडकरी यांच्यावरच्या आरोपांची तुलना करीत वढेरा यांना जास्त झुकते माप दिले जात असल्याचा आरोप केला होता.  वढेरा याला वेगळा मापदंड का ? हा आरोप करून लोकांचे  गडकरींच्या वर असलेल्या आरोपांच्या कडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडण्याचा  केविलवाणा प्रयत्न वाटत होता.  थोडक्यात बाबुजींनी गडकरींचे वकीलपत्र घेतले की काय अशी शंका येत होती ते दोन्ही लेख वाचतांना.

रास्वसं चे स्वय़ंसेवक आणि भाजपा चे कार्यकर्ते या पैकी आपण कोण आहोत हे नीट न समजल्याने असा वैचारिक गोंधळ  बऱ्याच लोकांचा झालेला दिसतो. प्रसंगी आपण संघाचे स्वयंसेवक आहोत हे विसरून भाजपाची भाट गिरी करतांना बरेच स्वयंसेवक दिसतात.प्रसंगी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या  राजकारण्यांची पाठराखण करणे यातही काही कमीपणा न वाटणे , हे पाहिल्यावर संघाचे संस्कार कमी पडले की काय अशी शंका येते.

गडकरी यांना वाचवण्यासाठी मोदी यांच्यावर केलेला आरोप वाचल्यावर , लोकं म्हातारपणी रिटायर   केले  जातात हे  योग्यच आहे,  याची खात्री पटली.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , . Bookmark the permalink.

2 Responses to गडकरी आणि मोदी

  1. siddharam says:

    m g vaidya yanni swatachya laukikala sajese likhan karayala pahije ase watate… bhashy wachun malahi khup wayeet watale hote. dhanyawad mahendra g.

    • मी लहान असतांना मागो तभा नागपूरचे संपादक होते. लहानपणापासून त्यांचे लेख वाचत आलोय. काही समजत नसतांना पण आधी संपादकीय वाचायची सवय होती मला ( अजूनही आहे, पेपर हातात पडला, की आधी संपादकीय वाचतो )
      मला वाटतं वय झालंय, आणि मेन स्ट्रिम मधून बाहेर पडल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, म्हणून लक्ष वेधुन घ्यायला असे काही करत असावेत ते!

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s