हसू..

“साब, हसो .. छे बार हो गया, आप बराबर नई हसता है,  मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका”

त्याने ऑर्डर सोडली. आमच्या लग्नाचा विसावा  (की तेविसाव्या? जाऊ द्या, काय फरक पडतो?) वाढदिवस असावा, आम्ही सगळे म्हणजे मी, सौ, आणि मुली फोटॊ स्टूडीओ मधे फोटॊ काढायला गेलो होतो.  फोटोग्राफर इतका फास्ट होता, की इस्माईल प्लिज, म्हणायचा आणि दुसऱ्याच क्षणी क्लिक करायचा. त्याने इस्माईल प्लिज म्हटल्याबरोबर बायको आणि मुलींच्या चेहेऱ्यावर एकदम हुकुमी हास्य यायचं,  पण मला काही हसणे जमत नव्हते. मी त्याला म्हणत होतो, की अरे बाबा, इस्माइ बोलने के बाद मुझे थोडा टैम तो दो हसनेके लिये.. पण  चार पाच वेळ फोटो काढल्यावर पण त्याला काही माझं’ इस्माईल कॅप्चर करता आलं नाही..

हसू येणे हे असेच असते, जेंव्हा यायचं असेल तेंव्हा  तुमच्या नकळत येते, अगदी विनाकारण पण येते , आणि नसेल यायचे तर, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही  येत नाही . एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या बॉस समोर बसले असता, तेंव्हा अचानक एखादा जुनी घटना आठवते, आणि नकळत हसू फुटतं . बॉस काहीतरी कामाचं खूप महत्त्वाचं सांगत असतो, आणि तेंव्हा तुमच्या चेहेऱ्यावर हसू पाहिलं, की त्याची जाम चिडचिड होते, ’व्हाट्स फनी? लेट मी नो, आय विल आल्सो लाफ” हा डायलॉग प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधी तरी ऐकला असतो.

जेंव्हा हसू येतं तेंव्हा अगदी धबधब्यासारखं खो खो करत येतं, कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीही ओठावरचे हसू काही थांबत नाही. ओठ बंद केल्यावर,   तुमचे सगळे शरीर  गदा गदा हलत हसत असते. त्यातल्या त्यात डोळे तर खूप मिश्किल असतात, एकदा हसायला लागले, की ओठ बंद केल्यावर पण हसत असतात, हसणारे डोळे इतके काही सांगून जातात की ज्या साठी लाखो शब्दंही पुरेसे पडणार नाहीत.

हसणारे डोळे म्हणजे? आठवा, तुमचे लग्न झाल्यावर तुम्ही आजीला जेंव्हा पहिला नमस्कार करायला जाता तेंव्हाचे तिच्या डोळ्यातले हसू, किंवा जेंव्हा तुम्ही एखादी परीक्षा पास होता, कॅंपस मधे सिलेक्ट होता , तेंव्हा तुमच्या आईवडिलांच्या   डॊळ्यात  उमटलेले हसू आठवून पहा त्या डोळ्यांमध्ये हसू असतं, आणि सोबतच गर्व पण असतो – आपल्या मुला, मुली बद्दलचा! हे सगळं आठवा  मग मी काय म्हणतोय ते लक्षात येइल.

’अमेरिकाज फनिएस्ट व्हिडीओ” नावाचा एक कार्यक्रम सौ. खूप आवडीने पहाते. त्या मधे ’फन” म्हणजे काय असतं? तर  धडपडणे. सारखे कोणीतरी काही तरी करतांना पडत असतात, आणि त्याचे लहान लहान व्हिडीओ असतात. बरेचदा अगदी तीन चार वर्षाचं मुल सायकल वरून अगदी उलटसुलट पडतं आणि त्या मागे रेकॉर्डेड हसू ऐकवतात, आणि हा असा व्हिडिओ फनी व्हिडीओ म्हणून पोस्ट केलेला असतो. मला स्वतःला ते व्हिडीओ पाहून अजिबात हसू येत नाही, तर मनात ” अरेरे.. किती लागलं असेल बिचाऱ्याला हा विचार येतो.  कोणी कशावर हसायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

त्याच कार्यक्रमात , लग्नाच्या व्हिडीओ मधे नवऱ्या बायकोने एकमेकांना केक (ने) भरवणे ( शब्दशः अर्थ घ्या, चेहेऱ्यावर केक ने लेप देणे )  व्हिडीओ पण नेहेमीच दाखवतात.  त्याच्या लग्नात केक हा केवळ  नवरा नवरी ने एकमेकांच्या चेहेऱ्यावर माखण्य़ा साठी बनवतात का? हा प्रश्न नेहेमी पडतो मला. मानवी स्वभाव आहे झालं, हसू येतं ते दुसऱ्याच्या फजितीवर.

जर समजा राहूल गांधी किंवा सोनिया गांधी केळाच्या साला वरून घसरून पडले, तर त्यांना कोणी हसणार नाही, तर खरंच काही लागलं का म्हणून काळजी करतील. या जगाचा हा नियमच आहे, कमकुवत माणसाला हसा, त्याची टिंगल टवाळी करा.. कारण बिचारा करून करून करेल तरी काय? पडला तर धडपडत उठेल, केविलवाणा हसेल आणि दुःखाच्या कळा मनातल्या मनात जिरवत  लाजे खातर तुमच्या नजरा चुकवत समोरून निघून जाईल.   पण हसू हे असंच असतं, जेंव्हा येतं तेंव्हा येतच असतंम- कमकुवत माणसाची फजिती पाहून तर  जास्त येतं.

हे हसू येणं पण मोठं विचित्र असतं, बरेचदा एखाद्याने काही सांगणे सुरु केले की ओठाच्या कोपऱ्यातून अपमानकारक ( कंटेम्प्ट) हास्य पण बरेचदा दिसते.त्याचा अर्थ असतो , मला माहिती आहे , की तू मूर्ख आहेस! पण यातली गम्मत अशी की, समोरच्या माणसाला ते लक्षात येत नाही, आणि तो आपण सांगितलेल्या गोष्टीवर दुसरा माणूस हसला म्हणून खूश होतो.

कधी हसावे आणि कधी नाही , याला पण काही नियम नाहीत, पण तरीही समजा असते, तर ते कसे असते याची उदाहरणं समोर देतोय.  जसे  तुमच्या हातात सोलले संत्रे   आणि समोरच्या  माणसाच्या हातात ” संत्र्याची साल “असेल तेंव्हा हसू नये, कटींग करायला बसले आहात, न्हावी कानामागचे केस वस्तऱ्याने साफ करतोय तेंव्हा , बॉस ची काही चूक झाली असेल तेंव्हा,  तुमच्या कडे सुटे पैसे नसताना कंडक्टर कडे पाहून, शाळेत सर शिकवत असतांना सरांच्या शर्टची बटन्स खाली वर लागलेली असताना, गर्ल फ्रेंड सोबत असेल, तुम्ही पिझा खायला गेला आहात, आणि तिच्या ओठाच्या दोन्ही कोपऱ्यात चिझ /केचप लागलेले असते तेंव्हा, तिला कधी शिंक आली, आणि तिने रुमालाने नाक पुसण्या आधी तुम्हाला तिचे नाक दिसले तरीही ते  पाहून कधीच हसू नये.अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ” बायकोचे चुकले असतांना, आणि तुम्ही तिची चूक पकडली असतांना तर अजिबात हसू नये!”

चक्रधरांच्या एका कविते मधे त्यांनी असे लिहिले आहे ..
ये हसीं एक चमत्कार है,
चेहेरे के भूगोल मे
होठोंके विभिन्न कोणीय प्रसार है!
पिताजी हसें तो फटकार है,
मां हसे तो प्यार है,
बिबी हसे तो पुरस्कार है,
पती हसे तो बेकार है,
उधार देने वाला हसे तो इन्कार है,
लेने वाला हसे तो उसकी हार है,
दुश्मन हसें तो कटार है
पागल हसे तो विकार है,
व्हिलन हसे तो हाहाकार है,
पडोसी हसे तो प्रहार है,
दुकानदार हसे तो भार है,
हिरो  हसे तो झंकार है,
हिरोइन हसे तो बहार है,
प्रेमिका हसे तो इजहार है,
प्रेमी हसे तो फुहार है,
ओ हसिं,
“तू धन्य है! तुझे धिक्कार है’
क्योंकी जहा नहीं आनी चाहिये
वहा आनेमे देर नहीं लगाती है,
एक पल मे महाभारत कराती है!

या जगात हसणं सगळ्यात महत्त्वाचे आहे, तुम्ही हसायला लागला की  ते संसर्गजन्य असल्याने तुमच्या संपर्कात येणारे सगळे  हसू लागतात.   स्वतःवर केलेले हास्य हे नेहेमीच सगळ्यांना हसवते.

असं म्हणतात की मानवाला हसू येतं, आणि  जनावराला नाही. एवढाच काय तो दोघांमधे फरक आहे. म्हणजे च याचा अर्थ हा की, जो हसत नाही तो जनावरासारखाच  आहे.

कोणाचं हसू कशात, तर कोणाचं कशात! नेत्यांचे हासू असतं ते पैशाच्या खोक्यात, बाळाचे हसू , आईच्या ओठात, विद्यार्थ्याचे हसू, केटी न लागल्याच्या रिझल्ट मधे, बायकोचे हसु नवऱ्याच्या पाकिटात, नवऱ्याचे हसू बायकोच्या हसण्यात! आणि हो मंत्र्यांचे हसू, केजरीवालच्या हातात!

 

 

 

 

(चक्रधर यांच्या कवितेवर.)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

21 Responses to हसू..

 1. suhas adhav says:

  post ekdam mastach jhalay…superlike ….. khup bore jhalelo sakal pasun abhyasane …..dil khush hogaya 🙂
  majhya barober shalet aasta na jhalay aasa …..kadhi nahi to masti karnara me nemka haslo jorane marathichya tasala …..aata aathavla tari hasu yeta ……sir etke chidle ki agdi palakana bhetayla bolavla 😛
  majhya babana sangitla me khara ka haslo te …pan aata siranach kay sangu ki ka haslo 😀 😀

  • अरे मी तर एकदा एका ट्रेनिंग सेमिनार मधे हसलो होतो 🙂 प्रत्येकाच्याच बाबतीत कधी न कधी तरी हे घडतच असतं.

 2. >> मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका”

  Reminded me of Chandler-Monica episode :))))

 3. arunaerande says:

  कधी कधी आपण मस्त subtle comment टाकतो, माहीत असून की ती समोरच्याच्या डोक्यावरून जाणारे, आणि स्वतःशीच हसतो. त्याला वाटते आपल्याला वेड लगलेय. आपण काहीतरीच बरळतोय! मग आणखी मजा येते. (to confuse the other person)
  पण असे कधी तरीच करावे. आणि बायको/नवर्‍याबरोबर कधीही करू नये.
  i also agree with you abou the funny videos. i do not find them funny at all and most of them seem contrived too.especially the ones with the animals and babies or small children.

  • अरुणा
   बरेचदा मुद्दाम कठीण शब्द वापरून एखादा इ मेल लिहायचा, किंवा मिटींग मधे मुद्दाम एखादा ( आधिपासून ठरवून शोधलेला शब्द ) वापरायचा आणि सगळ्यांचे चेहेरे बघायचे, अर्थ तर समजलेला नसतो, पण तसं दाखवता येत नाही .. मजा येते.

 4. ni3more says:

  kaka very nice artical ha nehami pramane kaka दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

 5. hasa leko says:

  AAJCHYA DHAKADHAKICHYA JIVNAT HASNE KHUP MAHATWACHE AHE,PAN APAN CHANCE GAHALVTO

  • चार क्षण हसण्याचे नक्कीच हवे असतात , ते शोधायचं काम आपलं आपल्याला स्वतःलाच करावे लागते.

 6. greenmang0 says:

  ….जर समजा राहूल गांधी किंवा सोनिया गांधी केळाच्या साला वरून घसरून पडले, तर त्यांना कोणी हसणार नाही….

  I doubt that. 😛

  चक्रधरांची कविता फारच छान आहे.

 7. वाह… लेख मस्तच, पण ती कविता जास्त आवडली. चक्रधरांच्या कविता प्रचंड बोलक्या असतात !!

 8. surajmukhi says:

  हुकमी हसू आणता येईल पण त्यात तो आनंद नसेल. कितीतरी वेळा आपण एकटे असताना काहितरी आठवून जे हसू येते ते खरेच थांबवता थांबवत नाही. बाकी राहुल गांधी किंवा सोनिया खरेच माझ्यासमोर घसरुन पडले तर हसू दाबण्याचा प्रयत्न करुनही ते फिसकन बाहेर येईलच… 😀 😀

  लेख मस्त झालाय!

 9. pranita says:

  khupch chan….. mala khup avadal… follow nakki karen me….

 10. Sandip Joshi says:

  महेंद्र काका,
  आजकाल खदखदून, खुसुखुसु, फिसकन, मंदस्मित, गडगडाटी असे विविध हास्याचे क्षण या दगदगीच्या,तणावाच्या काळात निघून चालले आहेत. काका, एकच प्रश्न विचारावासा वाटतो, काही वर्षांनी माणूस यापैकी निश्चित एका तरी पद्धतीने नीट हसू शकेल काय?

  • संदीप
   अगदी खरं. हसू येण्यावर पण टॅक्स लावलाय का सरकारने अशी परिस्थिती झालेली आहे.

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s