शेअर टॅक्सी कशासाठी असते??
प्रश्न वाचून आश्चर्य वाटते का? ठीक आहे दुसरा प्रश्न, जर दादर ते सिद्धीविनायक हे अंतर मिटर टॅक्सी ने जाण्यासाठी २० रुपये होत असतील , तर शेअर टॅक्सी मधे प्रत्येकी किती रुपये द्यावे लागतील?? जर तुमचे उत्तर पाच रुपये असेल तर ते पूर्णपणे चूक आहे. प्रत्येकी – १० रुपये – म्हणजे एकंदरीत ४० रुपये टॅक्सीवाला द्यावे लागतात. हे दर कोणी बरं ठरवले असतील? सांगतो पुढे वाचा…
बरं प्री पेड टॅक्सी कशासाठी असते? जर तुम्ही सर्व सामान्यांना टॅक्सीवाले लुटतात, त्रास देतात, तुमच्या बरोबर यायला जवळच्या अंतराला नाही म्हणतात म्हणून तुमच्यासाठी केलेली ती एक सोय आहे असे वाटते का तुम्हाला?जर असे असेल तर तुम्ही अजूनही स्वप्नाच्या दुनियेत वावरता असे म्हणावे लागेल.
लोकांचा कळवळा आला आहे असे दाखवून आरटीओ आणि टॅक्सी युनीयनच्या संगनमताने हे प्रिपेड टॅक्सी चे खूळ लोकांच्या माथी मारण्यात आले.
जेंव्हा ही प्री पेड सेवा(???) सुरु झाली तेंव्हा पेपर मधे पण मोठी बातमी आली होती, त्या मधे पण या प्रकाराचे खूप कौतूक केले गेले होते, असंही लिहून आलं होतं की आता हे काळी पिवळी टॅक्सीवाले एअरपोर्ट वर आलेल्या लोकांना लुबाडू शकणार नाहीत. टॅक्सीचे पैसे एअरपोर्टवरच द्यायचे, आणि एक पावती मिळेल ती इच्छित स्थळी पोहोचल्यावर त्या टॅक्सीवाल्याला द्यायची. आणि त्याच दिवसापासून फक्त प्रिपेड टॅक्सी च एअरपोर्ट वरून मिळेल असाही फतवा काढण्यात आला होता. या पुढे एअरपोर्ट वरून मीटर टॅक्सी बंद करण्यात आल्याचे कळवले होते त्या फतव्यात.
म्हणे टॅक्सीवाले लोकांना लुबाडतात , त्रास देतात म्हणून प्रिपेड टॅक्सी हा प्रकार सुरु केला आहे- पण खरंच असं आहे का? पूर्वी एअरपोर्ट वर उतरल्यावर काळी पिवळी टॅक्सी घेतली की साधारण पणे ११० ते १२० रुपयात मालाड पर्यंत पोहोचता यायचं. पण हे प्रिपेड सुरु झाल्याबरोबर ३४० उपये मोजावे लागतात. बरं समजा तुम्ही फ्लिट टॅक्सी घेतली( मेरू कॅब वगैरे) तर पहिल्या किमी अंतराला २८ रुपये, आणि मालाड पर्यंत ३३० ते ३८० रुपये ( हे त्या टॅफिक वर अवलंबून असते) होतात. तसेच हे फ्लिट टॅक्सी वाले पण एअरपोर्ट टॅक्स च्या नावे ३० रुपये एक्स्ट्रा वसूल करतात ते वेगळेच..
प्रिपेड टॅक्सी बुक केल्यावर, जर अंतर चार किमी च्या वर असेल तर १० रुपये सर्व्हीस चार्जेस द्यावा लागतो – आता तुम्ही टॅक्सीचे भाडे देत आहात, तेंव्हा हे कसले सर्व्हिस चार्जेस? सरकारी बाबू लोकांच्या हातातच तर सगळी सत्ता असते, त्यांनी एकदा सही केली , आणि साहेबाचा “ईंट्रेस्ट” कव्हर केला की साहेब समोर आलेल्या कुठल्याही पेपर वर सही करतोच आहे झालं, त्यामुळे जेंवहा हे दर पत्रक बनवले गेले, तेंव्हाच या दहा रुपयांचा समावेश केला गेला आहे, आणि आरटीओ ने पण त्याला आक्षेप घेतलेला नाही ही एक खास बात.! ही रॅन्सम ची अमाऊंट आहे असे समजा.
समजा, तुमच्याकडे एक बॅग असेल तर ती फ्री, आणि नंतरच्या प्रत्येक एक्स्ट्रा बॅग साठी दहा रुपये द्यायचे- आता हे का ? तुम्ही पूर्ण टॅक्सी भाड्याने घेतल्यावर, त्या मधे चार माणसं बसतील किंवा एक माणूस आणि तीन बॅगा बसतील , हा त्या भाड्याने घेणाऱ्याचा प्रश्न आहे, त्यासाठी हे एक्स्ट्रा पैसे का म्हणून द्यायचे? जर हे लोकं एक माणूस आणि तीन बॅग असतील तर जसे जास्त पैसे मागतात, तसेच जर चार च्या ऐवजी एक माणूस प्रवास करणार असेल तर कमी पैसे घेतील का? हा बाळबोध प्रश्न मनात आला तरी दाबून टाका, कारण याचं उत्तर तुम्हाला आवडणारं नसेल.
ह्या वरून एक दिसून येते की आरटीओ आणि टॅक्सीचालक संघटनांनी सामान्य प्रवाशांची लूट चालवलेली आहे, आणि या विरुद्ध आवाज उठवायला कोणीच तयार नाही , कारण या युनियन पण मनसे, शिवसेना, भाजपा,कॉंग्रेस यात सामील आहेत. म्हणजे या सगळ्याच पक्षांचा या अशा प्रवाशांना लुट मारीस मान्यता आहे असे समजण्यास हरकत नाही.
मला एक समजत नाही, एअरपोर्ट वर मीटर टॅक्सी बंद करून ह्या प्रिपेड टॅक्सी घेणे कम्पल्सरी का बरं केले गेले असावे? नक्कीच या मधे कोणाचा तरी आर्थिक “आनंद “दडलेला आहे हे सांगायला कोणी जोतिषी नको. हा असा निर्णय घेण्यामागे, मागे कोणा कोणाचे/ किती लोकांचे हात ओले केले गेले असावे? असे विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. आता तर , आरटीओ ने परमिशन दिली की तुम्ही असे अव्वाच्या सव्वा रेट लावा, आणि लोकांना लुटा!
प्रिपेड टॅक्सी सुरु करण्यात काही हरकत राहिली नसती, जर …… हे चार्जेस मिटर टॅक्सी प्रमाणे असते तर! पण तसे नाही. साधारण सहा महिन्यापूर्वी एकदा दादर स्टेशनला उभा असताना प्रिपेड टॅक्सीच्या बोर्ड चा फोटो काढला होता, आणि तेंव्हाच हे पोस्ट लिहीणार होतो, पण कंटाळा केला. आज तोच फोटो इथे पोस्ट करतोय, आणि आता नुकतेच टॅक्सी चे भाव वाढल्यावर नवीन याच ठिकाणी नवीन बोर्ड लावण्यात आलेला हे, त्याचाही फोटो इथे लावतोय. भाववाढ किती टक्के झाली आहे हे तुम्ही पहात तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

हा नवीन बोर्ड. कालच काढलेला फोटॊ आहे हा. सरकारने पेट्रोलचे भाव वाढवले की, टॅक्सी वाले पण आपला भाव वाढवण्याचा दावा करतात- “जरी टॅक्सी या पेट्रोल वर नाही तर, गॅसवर चालत असल्या तरीही..” फोटोवर क्लिक करा म्हणजे दर वाचता येतील
शेवटी काय तर आपण सगळे षंढ आहोत. सरकार , आपल्याला या पैसे खाणाऱ्या विभागाच्या मदतीने कायदेशीर पणे लुबाडते आहे, आणि आपण निमुटपणे मुग गिळून गप्प बसलेलो आहोत. दुर्दैवाने, सगळे राजकीय पक्ष या मध्ये सामील आहेतच ! जेंव्हा सरकारच कायदेशीर मार्गाने जनतेला लुबाडण्याचा परवाना देते, तेंव्हा सामान्य जनतेने काय करायचे?
Mumbait je TAXI’cha tech pratap punyat riksha walyanche… Agadi same to same. Apan shandh ahot hech khara…
श्रद्धा,
इथे हा लेख लिहीण्याचा उद्देश म्हणजे आरटीओ चा या लुटमारीतला सहभाग दाखवणे हा आहे.
आरटीओ च्या परवानगीने केला जाणारी लुटमार पाहिली की खरंच पुर्वीचाच प्रकार बरा होता म्हणायची वेळ येते.
इतकी लुट होतेय , जिथे आपण सामान्य जनता २०००० आपल्या परिवार बरोबर राहू शकतो तिथे प्रत्येकी २०००० (कमीत कमी) कमावण्याची वेळ आली आहे, इतकी मोठी जनसंख्या आणि प्रत्येक गोष्टीत टॅक्स? कुठे आहे हा पैसा? काय चालले आहे? रिक्षा CNG वर चालते आणि पेट्रोल दर वाढीवर रिक्षा चे दर कसे वाढू शकतात? २४ – २८ रुपये दर KM अशी काय सेवा देतात हे टॅक्सीवाले?
स्नेहल
सरकारी लोकं एकदा खायला लागले की मग सामान्यांचं मरणच आहे.. आरटीओ ने हे रेट कसे काय ठरवले ? या मागचं लॉजिक काय हे सांगायलाच हवे. दादर ते मालाड पूर्वी २३० रुपये व्हायचे ते हल्ली ४४५ होतात.. शंभरटक्के रेट जास्त का म्हणून मान्य केला आरटीओने प्रिपेड साठी?हा प्रश्न आहेच.
Tari mumbai pune madhe ok ahe
jar tumhi tourist placeme madhe jaal tar rikshwowale 1 km che 50 rs ghetata
dagdapeksha weet mau
इतके नाही हो.. मी सगळ्या भारतात नेहेमी फिरत असतो, पण मुंबई पुणे नागपूर इतके रेट कुठेच नाहीत.
Mi Noida,hyderbad,jaipur etc thikani bgahtla
bahutek majha chera tasa ahe mhanun jast sangatta
hya links bagha
http://www.consumercourt.in/auto-rickshaw/87302-no-meter-installation-auto-rickshaws-ghazia.html
http://www.consumercourt.in/auto-rickshaw/87940-autos-loot-hyderabad.html
kaka nehami pramane uttam lekh
्नितीन
बरेच दिवसापासून डोक्यात हा विषय होता. तो लेख आत्ता लिहिला गेलाय.
त्या बोर्डाचा झालेला मराठी ते इंग्लिश प्रवास ह्या भाडेवाढीच समर्थन करतो का? अर्थात सामान्यांनी विमानाचा आणि मग टॅक्सी चा पण प्रवास करू नये, वेळ काळ काही असली तरी… बाकी ३२ अधिक रुपडे रोज कमावणारा इथे गरीब नाही, आणि हाच सत्कार समजून सरकार दरबारी बोलण्याचा त्याला काही अधिकारही नाही…. इथे कमेंट खरडणे आणि त्या टॅक्सी चा वापर टाळण्याशिवाय मी सध्या काही करू शकतो असे मला वाटत नाही… लोकशाही म्हणून वाटाण्याच्या अक्षता कपाळी आल्या आहेत, हे अगदी संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेब(चालू काळाप्रमाणे लावाव लागत हल्ली) असते तरी त्यांना बोलावून दाखवलं असत (जुने नेते बरे असावेत ह्या धारणेणे तेवढी हिम्मत केली असती, अन्यथा आज तोंड उघडल तर ते कायमच उघड रहाण्याचा धोका फार)
हे बाकी पटलं.. ” (जुने नेते बरे असावेत ह्या धारणेणे तेवढी हिम्मत केली असती, अन्यथा आज तोंड उघडल तर ते कायमच उघड रहाण्याचा धोका फार)”
जुने, नवे, या पार्टीचे, त्या पाटीचे आता उडदामाजी काय निवडावे?
पण अपण खरेच षंढ झाले आहोत. सगळे अन्याय मुखाट्याने सहन करतो, ’काय करणार?’ असे म्हणत!
एखादा शिखंडी निघेल याची वाट पहातोय.. नाही तर एखादा कृष्ण पुन्हा यायला हवा, आपल्या हाती हत्यारं उचलण्यास भाग पाडणारा…
बापरे…सॉलिडच आहे..
काका, हा पण एक छुपा घोटाळा असणार असं दिसतंय…आणि सगळ्यांनी सलोख्याने केल्यामुळे बहुदा बाहेरही यायचा नाही…तुमच्याकडे दोन्ही फ़ोटो असल्याने तर भाडेवाढ जास्तच जाणवतेय…
अपर्णा,
सुरुवातीला म्हणजे जेंव्हा हा बोर्ड पहिल्यांदा लागला होता, तेंव्हा दादर ते मालाड २२०-२३० रु व्ह्यायचे. पण या प्रिपेड मधे तेंव्हा पण ३६० रु दर होता.. आता तर चारशेच्या वर आहे.
चोर शिपाई एकत्र झाले की कायदेशीर चोरी करता येते…
>> चोर शिपाई एकत्र झाले की कायदेशीर चोरी करता येते.
Exactly. वाहतुक असो प्रॉपर्टी असो किंवा रोजचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर. सगळीकडे कायदेशीर लूट आहे. हवे तर घ्या नायतर जा xxxxत असा सरळ सरळ संदेश आहे.
सिद्धार्थ,
आपण शेवटी हतबल होतो, आणि या सगळ्या गोष्टींना टाळता येत नाही, म्हणून मान्य करतो.
काका अगदी मनातील विचार मांडले .
जर्मनी वरून येतांना मी केट आणि आधी माझी मेव्हणी , सासू जेव्हा मुंबईला येतो. तेव्हा मला आणायला प्रचंड गोतावळा विमानतळावर येतो , मग टेक्सी करणे ओघाने आले.
समोर लुटमार चालली आहे हे दिसून काहीही करता येत नाही ,
आणि परत ही लोक बक्षिशी मिळाल्याची सुद्धा वाट पाहतात.
त्यात केट त्यांना टीप किती द्यावी असा प्रश्न विचारते .
डोक फिरते असा प्रकार पाहून
एक वेळ टॅक्सीवाल्याने फ्सवण्याचा प्रयत्न केला तर ते समजू शकतो. पण ह्या सरकारी फसवणूकीचा मनःस्ताप जास्त होतो. चालायचंच.. कधी कधी मला नक्षलवादी का अजूनही तग धरून आहेत याची कारणं अशीच असावी असे वाटते.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी airport वर उतरलं कि पोर्टर पासून security वाल्यांपर्यंत सगळे dollar मध्ये charge करतात. मग आम्ही मागे का? असा विचार केला असेल RTO ने आणि सरळ पन्नासचा गुणाकार केला.
भक्ती
अगदी खरं आहे.. आपण सगळ्या गोष्टी सहजपणेमान्य करतो ना, म्हणूनच यांचं फावतं.
दिल्लीत प्रिपेड रिक्शा- टॅक्सी चा प्लान सक्सेस असल्याचे ऐकीवात आहे काका, काही कल्पना आहे का काका?? काय प्लान आहे कसा अन का सक्सेस आहे वगैरे… ???
गुरु
दिल्ली मधे तसेही टॅक्सी वाले जास्त लुटतात, म्हणून हे प्रिपेड त्यातल्या त्यात बरे म्हणायचे. इतर ठिकाणी तर नुसती बोंब आहे, जे मनाला वाटेल ते सांगतात आणि पैसे घेतात.