भाजपा मधे आणीबाणी?

 भारतीय जनता पक्षा मधे आज सकाळपासून आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. या आणीबाणी मुळे कोणीही कार्यकर्ता, किंवा सह नेता हा  इतर नेत्यांवर काहीही आरोप करू शकणार नाही,आणि जर कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला  पक्षातून काढून टाकण्यात येईल असा संदेश   जेठमलानी यांना पक्षातून काढून टाकून  दिलेला आहे असे आज सकाळी  वाचलेल्या  बातमी वरून लक्षात आले. 

असे वाचण्यात आले आहे की, राम जेठमलानी यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. हे वाचल्यावर पहिला विचार मनात आला, की भाजपा आणि कॉंग्रेस मधे काय  फरक राहिला  आहे? ज्या प्रमाणे कॉंग्रेस मधे कोणी इंदिरा गांधींच्या विरुद्ध बोलले की त्याची गच्छंती व्हायची, त्याच प्रमाणे भाजपा मधे पण कोणी ” त्यांच्या” विरुद्ध काही बोलले की त्याला वाटाण्याच्या अक्षता देणे  सुरु झालेले आहे.

जेठमलानी यांचा गुन्हा काय ? तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्या विरुद्ध केलेले विधान. आजच्या लोकशाही च्या युगातही  भाजपा मध्ये  अशी हुकूमशाही सुरु झालेली आहे. स्वतःची चामडी वाचवण्यासाठी हे केविलवाणे प्रयत्न  पाहून वाईट वाटले. जेठमलानी यांना काढल्याने  नुकसान भाजपाचे झालेले आहे हे नक्की!

भाजपाचे  एक  नेता ( मुद्दाम नाव देत नाही,  🙂  , तसेही वाचक सुज्ञ आहेतच समजून घेतीलच तो कोण आहे ते )   सारखे कोणावर ना कोणावर तरी अब्रूनुकसानीचा दावा करीतच असतो. स्वतः घाण करून ठेवायची, आणि मग कोणी बोट दाखवलं की कांगावा करायचा, माझी अब्रू   गेली म्हणून, आणि दावा ठोकायचा अब्रूनुकसानीचा  ! खरंच यांची अब्रू  अशी चव्हाट्यावर का बरं ठेवली असते हो, की कोणी पण येता जाता सारखा नुकसान करत  असतो..

या संदर्भात मला चैतन्य कुंटे याची आठवण झाली. या ब्लॉगर वर पण बरखा दत्त ने काही कोटी रुपयांचा दावा केला होता. २६/११ च्या दिवशी बरखा दत्तने बातम्या देतांना  ’काय सांगावे”आणि’ काय सांगू नये” या बद्दल अजिबात विधी निषेध न बाळगल्याने, त्यांच्या लाइव्ह बातम्यांमुळे अतिरेक्यांना खूप फायदा झाला होता, असे काहीसे त्याचे पोस्ट होते. असो.. नंतर  बरखाने त्याच्यावर केस केली होती.  यावर एक लेख पूर्वी लि्हला होता.

एखाद्यावर वरच्या श्रेणीच्या  नेत्यावर सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी पेपर मधे झाल्यावर, त्याचे उत्तर न देता, किंवा त्या नेत्याचा राजीनामा न घेता,  किंवा चौकशीला सामोरा न जाता,  सरळ ज्याने आरोप केला आहे, त्याला पक्षातून काढून, मुस्कटदाबी करायची हा प्रकार  भाजपा मधे सुरु झालेला  आहे आणि  ही भाजपाची नवीन संस्कृती पाहून फार वाईट वाटलं.

श्री राम जेठमलानी यांना काढून टाकणे म्हणजे पक्षांतर्गत आणीबाणी लागू करण्यासारखेच आहे.भाजपाने आपली प्रतिमा  ” अ पार्टी विथ अ डिफरन्स ” म्हणून तयार केली होती. कॉंग्रेसच्या राज्यात चालणारा भ्रष्टाचार मिटवणारा पक्ष, स्वच्छ राजकारण देऊ तर ते आम्हीच,  अशी स्वतःची प्रतिमा तयार करण्यात हा पक्ष कोणे एके काळी कदाचित यशस्वी पण झाला होता, पण आज जी काही या पक्षाची अवस्था झालेली आहे  ते पाहून ,   एके काळचा या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून,खरंच शरमेने मान खाली घालायची वेळ आलेली आहे हे नक्की!

ते चैतन्य कुंटेचे पोस्ट इथे वाचू शकता..

आता एकच प्रश्न आहे, तो म्हणजे जर कॉ्ग्रेस नाही, भाजपा नाही, तर मग कोणाला मतदान करायचे हा प्रश्न सामान्य जनतेला नक्की पडेल.

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

25 Responses to भाजपा मधे आणीबाणी?

 1. कसाबचा मुद्दा आणि भाजपाने स्वत:ची केलेली काशी या मुळे पुन्हा कॉँग्रेसच ‘हात मारेल’ असे दिसते. त्यात भाजपकडे मोदी सोडले तर एक ही लिडर दिसत नाही ;-(

  • सिद्धार्थ

   कोणीही आलं तरी मला काही बरं वाईट वाटण्याचा प्रश्न नाही. मी हल्ली जाम वैतागलोय या नेत्यांवर, आणि ह्या घाणेरड्या राजकारणांवर..

 2. hasa leko says:

  Apan blogger lokkani janjagaran karun swatha paksha kadhla tar?

  • हा हा हा. क्या बात है.. मस्त आयडीया आहे ही.. 🙂

   • धमाल कल्पना
    हेरंभ आपला पक्ष प्रवक्ता
    त्याची समस्त ब्लॉगर परिवार माझे बंधू ,भगिनी मानण्याची विचारसरणी ह्या पदाला
    पोषक आहे.
    नाहीतरी प्रत्येक पक्षाला परदेशातील कनेक्शन लागते,किंवा असा आरोप झाल्याशिवाय
    पक्षाचे स्टेटस वाढत नाही.
    माझ्या शहरापासून स्विस बेंक फक्त ३ तासावर असल्याने
    पक्षाचा निधी मी सांभाळेल , मेनेज करेल ( कसेही )

 3. Manasi says:

  आणखी एक मुद्दा म्हणजे केजरीवाल यांचा पक्षही भाजपचीच मते खाणार आहे! आता जर मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले तरच भाजपला आशा आहे, अन्यथा कठीण आहे.

 4. राम जेठमलानी यांचे निलंबन हे पक्षशिस्तीसाठी आवश्यक होते. त्यांना आपले मुद्दे पक्षांतर्गतही मांडता आले असते मात्र वारंवार त्यांनी पक्ष चौकटीचा भंग केला. त्यांना जर खरेच पक्षातील भ्रष्टाचाराची चीड असेल तर त्यांनी भाजपने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा देऊ पक्ष त्याग करावयाचा होता. मात्र त्यांनी असे काही केले नाही. अशा प्रकारे वारंवार वादग्रस्त विधाने करत त्यांनी पक्षातील गटबाजीला बळ दिले होते. मला भाजपमधील भ्रष्टाचाराचे समर्थन अजिबात करावयाचे नाही. पण राम जेठमलानी यांचा पुळका यावा अशी काहीही परिस्थिती नाही. त्यामुळे जेठमलानी यांचे निलंबन ही आणीबाणी नाही तर पक्षशिस्तीसाठी आवश्यक गोष्ट आहे.

  • ओंकार
   पक्ष शिस्त म्हणजे नेमकं काय? भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्याला पाठीशी घालणे, त्या बद्दल न बोलणे,- असे नसून शिस्त कायम रहावी म्हणून या नेत्यांअर कारवाई करण्याचे सुरु करा ही मागणी करणे हे होय. पक्षांतर्गत मुद्दे मांडल्यावर पण काहीच अ‍ॅक्शन घेतली गेलेली नव्हती ही गोष्ट जाहीर आहे.

   पैसे एका नेत्याने खाल्ले म्हणून जेठमलानी यांनी राजीनामा देणे कितपत योग्य आहे? राजीनामा दिल्याने काही फारसे मिळाले नसते. जेठमलानीवर पैसे खाल्याचे आरोप असते तर त्यांचा राजीनामा मागणे अपेक्शित होते. या उलट जर भाजपा कार्यकारणीने निर्णय घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गडकरींना पाठीशी घालण्याचे धोरण अवलंबले नसते, आणि त्यांचा राजीनामा घेतला असता, तर ते जास्त योग्य ठरले असते. पण तसे न करता, सरळ सरळ भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांची पाठराखण करणे सुरु केले आहे .
   कोणी तोंड उघडले की कर अब्रूनुकसानीचा दावा! अशी किती लोकांचे तोंडं बंद करू शकणार आहेत हे लोकं?

   मुळात गटबाजी का सुरु झाली हे पहाणे जास्त योग्य ठरेल. काही लोकं म्हणतात, की भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांनी राजीनामा द्यावा, आणि काही लोकं त्यांची पाठराखण करताहेत. म्हणजे गटबाजी सुरु होण्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता. जर पक्षकार्यकारीणीने वेळीच अ‍ॅक्षन घेतली असती तर ही वेळ आलीच नसती.

   दुसरी गोष्ट भाजपाने खासदारकी दिली ती त्यांच्या कर्तुत्त्वावर . त्याचा आणी गडकरींच्या वरच्या आरोपाचा काय संबंध? आरोप गडकरींवर आहेत, तेंव्हा राजीनामा त्यांनी द्यायला हवा, जो पर्यंत सिबीआय ची इन्व्कायरी पुर्ण होत नाही, तो पर्यंत त्यांनी त्या पदापासून दूर राहिले असते, तर पक्ष प्रतीमा सुधारली असती.

   आता पहा,यशवंत सिन्हाला पण काढतील हे लोकं. पार्टी विथ् डिफरंस नाही, तर पार्टी हू सपोर्ट करप्शन असा नारा राहिल पढल्या निवडणूकीत.

   • खरे सांगायचे तर
    काँग्रेस पक्षात मनमोहन सारखे आपापल्या शेतातील दादा मंडळी निवडून त्यांना पक्षात स्थान दिले, व त्याच्या अनुरूप मंत्रिपद दिली.
    पण प्रत्यक्षात ह्या लोकांनी देशाची सेवा सनदी चाकर म्हणून उत्कृष्ट केली. मात्र पक्षात त्यांचे स्थान व वैयक्तिक मते नेहमीच दुय्यम राहिली,
    भाजपने जसवंत सिंग व जेठमलानी असा प्रयोग करून पहिला.
    मात्र ह्या लोकांना मनमोहन बनता आले नाही तेव्हा गच्छंती अटळ होती.

 5. Abhay Mudholkar says:

  मला वाटले होते कि तुम्ही आज सचिन तेंडूलकर बद्दल लिहाल. कारण त्याची फलंदाजी सुद्धा तशी “वाखाणण्यासारखी” चालली आहे. असो. भाजप बद्दल तुम्ही हा लेख लिहून कारण नसताना या पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना महत्व देताय असे वाटते. या सर्व लोकांना जाणते समोर आणून **** वर फटके दिले पाहिजेत. माहित नाही केजरीवाल काय करेल. तसेच न शिकलेल्या नेत्यांचे लांगुलचालन करून कॉंग्रेस पक्ष सुद्धा नालायकी करत आहे. मी फार लिहित नाही. हा विषय तसा फार मोठा आणि क्लिष्ट आहे.
  तुमचा लेख छान आहे.

  अभय मुधोळकर

  • अभय
   क्रिकेट माझा फारसा आवडीचा विषय नाही, पण हा विषय मात्र गेले दोन तिन दिवस डॊक्यात थैमान घालत होता म्हणून हा लेख. 🙂

 6. आणी बाणी
  असेकाही मला वाटत नाही.
  आजकाल प्रत्येक पक्षात नेत्यांचे पक्षापेक्षा आपण आपली वैयक्तिक मते ,महत्त्वाकांक्षा ,इगो मोठे झाले आहेत. ह्याला कोणीतरी आवर घातला पाहिजे.
  ह्या बाबतीत कम्युनिस्ट लोकांना जरी माझे वैचारिक मतभेद असले तरी मानले पाहिजे.
  पोलादी भिंतीआड सगळे काही घडते ,बिघडते पण असे सार्वजनिक जीवनात एकमेकांवर शिंतोडे उडवून तमाशा नाही करत.
  भाजपाच्या ह्या निर्णयाने पक्षातील बंडोबा काहीकाळ शांत बसतील.
  गडकरी फुल फॉर्मात आहेत.
  चून चून के ……
  मराठी गडी दिल्लीत मुरतोय
  नितीश बाबू तेथे पाकिस्तानात तर मोदी साहेब व त्यांची हिंदुत्ववादी छबी
  अश्यावेळी एकीकडे उद्योगपती व एकीकडे ज्यू राष्ट्रात जाऊन तेथील शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना देण्याची मनीषा धरणारे गडकरी ह्यांना पंत पंतप्रधानपदी बसण्याची संधी आहे .व आपल्या अधिकारांचा वापर करून ती पूर्ण करण्यात काय गैर आहे
  असो
  येथे
  मात्र कुलकर्णींज विथ डिफरन्सेस झाले आहे.

  • निनाद,
   मित्रा,फारच स्वप्नांच्या देशात वावरतो आहेस.. 🙂

   “नेत्यांचे” पक्षापेक्षा आपण मोठे असणे हे फिलींग होते,”
   म्हणूनच यशवंत सिन्हा आणि जेठमलानी बोलले असावे असे वाटते. भाजपा म्हणजे प्रमोद महाजन, भाजपा म्हणजे गडकरी असं काहीसं हल्ली समजलं जातं. प्रत्यक्षात तसं नाही.. पक्शःअ नेहेमीच मोठा असतो …

 7. arunaerande says:

  खरे तर मल वटते की स्व्तःच्या मागचा ससेमिरा टाळण्यासाठी कॊग्रेसप्ने गडकरींच्या मागे हे भूत लावून दिले. आता एव्हढे मोठे राजकारणी असूनही जर त्यांना हे समजत नसेल की आपसात भांडून फक्त शत्रूचाच फायदा होतो, तर ते किती लायक आहेत फा!

  • अरुणा
   तसे नसावे, जी काही माहिती पेपर मधे प्रसिद् झाली आहे ती वाचून आणि पुरावे पाहून माझी खात्री पटली आहे, की या मधे बराच आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे.
   अशा लोकांना बाजूला काढून नरेंद्र मोदी सारख्यांना चान्स द्यायला हवा. नाही तर पार्टी विथ नो डिफरन्स असा काहीसा प्रकार होईल

 8. amol says:

  हि गोष्ट जरी मान्य आहे कि भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहे पण कॉंग्रेस इतका नक्कीच नाही…कॉंग्रेस समोर भाजप म्हणजे “दगडापेक्षा वीट मऊ…”. आपण जे पर्याय समोर आहे त्यातूनच निवड केली आहे….म्हणजे कॉंग्रेस इतका जास्त प्रमाणत भ्रष्टाचारी आहे ते चालत पण मग दुसरा पक्ष पूर्ण धुतल्या तांदळासारखा हवा तरच सत्ताबदल करणार नाहीतर नाही…असा करून कस चालेल…हे म्हणजे “खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी…”

  • अमोल,
   भ्रष्टाचार आहे की नाही हा मुद्दा नाही. तो तर सगळीकडेच आहे.
   पण आपणच जर भ्रष्टाचार रहाणारच असे समजून वागणार असलो तर खरंच पुढे काय होईल ते सांगता येत नाही.

   नरेंद्र मोदी सारखे लोकं आहेत ना, भ्रष्टाचारी नसलेले…. त्यांना चान्स द्यायला हवा..

 9. संकेत says:

  इथल्या चर्चे मध्ये एक मुद्दा miss होतोय. जेठमलानीना निलंबित करण्यामागे केवळ पक्शाध्याक्षांवर केलेल्या टीकेपेक्षा आणखीही एक महत्वाचा मुद्दा कारणीभूत आहे. कोन्ग्रेस ने तडकाफडकी CBI च्या संचालकपदी रणजीत सिन्हा यांना आणून बसवले. या कृतीचे कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. (कदाचित नवे CBI संचालक हे कोन्ग्रेस बद्दल soft corner असणारे किंवा सोनिया कोन्ग्रेस च्या “हो” ला “हो” म्हणणारे असतील. गड्कारींवरील आरोप पुराव्यांसहीत कोर्टामध्ये मांडून भाजपला दबावाखाली आणणे हा हेतू या बदलीमागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही) या मुद्द्यावरून भाजपने कोन्ग्रेस वर टीका केली होती आणि सरकारला अडचणीत आणण्याची आणाखी एक संधी अशा अपेक्षेने भाजपवाले या मुद्द्याकडे पाहत होते. पण राम जेठमलानींनी या बदलीच्या मुद्द्यावर कोन्ग्रेसचे जाहीर समर्थन केल्यामुळे भाजप च्या हातून ही संधी जवळ-जवळ गेल्यातच जमा आहे. लक्षात घ्या,जेठमलानीनच्या या कोन्ग्रेस धार्जिण्या वक्तव्या नंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे, गडकरींवरील टीकेनंतर लगेच नाही.

  • संकेत,
   प्रत्येक प्रॉब्लेमचे उत्तर शोधण्यासाठी केवळ एकच उपाय युगानुयुगे चालत आलेला आहे, तो म्हणजे बुद्धीवंतांचे बंड! असे बंड झाले की ते जर दडपून टाकले गेले, तर तो प्रश्न केवळ काही काळासाठी दाबल्या जातो.
   दुसरी गोष्ट म्हणजे, आपला आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. आता हेच पहा , समाज एखादी व्यक्ती चोर आहे हे मान्य करायलाच तयार नसतो, आणि त्या व्यक्तीची पाठराखण करत असतो . अगदी ढळढळीत पुरावे दिसले तरी पण त्यावर विश्वास ठेवण्या पेक्षा, त्या विरुद्ध विचार करून मनाला समजवण्याचा प्रयत्न करतो.
   भाजपाने, गडकरीला निलंनबित करणे आवश्य़क होते, तसे न करता, त्याचि पाठराखण करून स्वतःच खड्ड्यात उडीमारली आहे असे वाटते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s