डिप्रेशन

नुकतीच  आशा भोसले च्या मुलीची आणि नंतर यशवंत कुलकर्णीच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि  नंतर पहिले काम केले, ते म्हणजे त्याचा पूर्ण ब्लॉग वाचून काढला. वाचतांना सारखे जाणवत होते, की हा माणूस खूप हुशार आहे, पण मानसिक दृष्ट्या खचलेला आहे. त्याच्या ब्लॉग वर बऱ्याच लेखातून  त्याचे डिप्रेशन जाणवले.

खूप टेन्शन येतं बरेचदा. कामाचं , परीक्षेचं,  प्रमोशन न मिळण्याचं,  गर्ल फ्रेंड ने लग्नाला नाही म्हणणे,   कॅंपस मधे सिलेक्शन न होणे , कॉलेज मधे जातांना पांढऱ्या शर्ट वर डाग तर पडणार नाही अशा कुठल्याही फालतू गोष्टीमुळे येणारे टेन्शन त्रासदायक तर असतेच पण  या मुळे बरेचदा मानसिक दौर्बल्य पण येऊ शकते .

जरी टेन्शन येणं ही एक सामान्य गोष्ट असली, तरी त्या मधून येणाऱ्या औदासीन्याच्या  भावनेतून    बाहेर निघता यायलाच हवं.टेन्शन आलं की काय करायचं? आणि त्यातून बाहेर कसे पडायचे ह्या साठी प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. काही लोकं सिगरेट शिलगावतात, काही तंबाखू, तर कोणी चहाचा कप घेऊन मन रमवायचा प्रयत्न करतात, आणि काही लोकांचे पाय बार कडे वळतात, दोन पेग घेऊन आत्माराम थंड करून घरी जातात. हे सगळं केल्यामुळे टेन्शन कमी होतं की नाही , हा प्रश्न अलहिदा, पण लोकं असं वागतात हे नक्की.

लग्नापूर्वी मी एकटा असतांना टेन्शन आलं , की थंडगार पाण्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ करून,  एखादा टि शर्ट चढवून आणि बाइक वर बसून एक लांब रपेट मारून यायचो.   तसं म्हंटलं तर  अर्धा तास रपेट मारून आलो,  नाक्यावरच्या चहाच्या टपरीवर चहा घेत  उभे राहून, येणाऱ्या जाणाऱ्या सुंदर मुली  न्याहाळणं ह्या पेक्षा  डिप्रेशन मधून बाहेर निघण्यासाठी  दुसरे काही केले जाऊ शकते यावर माझा विश्वास नव्हता.  कधी तरी शहराबाहेर हायवे वर लांब रपेट मारणे.. १०० च्या स्पिड ने, डोक्यावर हेल्मेट नाही, केस मस्त उडताहेत, गॉगल ला चुकवून डोळ्यांना झॊंबणारा गार वारा… 🙂  मनाला डिप्रेशन मधून कधी बाहेर काढतो ते  लक्षातही ये्त  नाही.

लग्नानंतर  मात्र हा प्रकार पूर्णपणे थांबला, बाहेर निघालो, की बायको पण सोबत, ” थांबा, मी पण चलते” म्हणून तयार व्हायची, आणि मग  ५० च्या स्पिडने  लहानशी चक्कर, एखाद्या आइस्क्रीम पार्लरला भेट आणि बस.. ईट्स डन!

मुलं झाली की मग तर सगळ्याच गोष्टी  बदलतात. मुलांसोबत खेळणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. आपली मुलं झाल्यावर तर  ऑफिसमधून घरी आल्यावर मुलींशी खेळण्यात वेळ कसा जायचा हे समजायचं पण नाही. शाश्वत जगातील सगळ्या विवंचना, मुलींच्या एका स्मित हास्यात  विसरायला व्हायच्या.

पण…मुलं मोठी झाल्यावर घरी आल्यावर मुलं नजरेला पडणे मुश्किल व्हायचं. बहुतेक वेळा ते आपापल्या मित्रांशी खेळण्यासाठी कॉलनीतल्या ग्राउंड वर गेलेले असायचे, किंवा अभ्यास करण्यात मग्न असायचे.  फिरायला जाणे पण  सहज शक्य होत नसे, कारण घरची कामं असल्याने बायको , आणि खेळायचे असल्याने मुली तयार नसायच्या. नवीन काही तरी उपाय शोधणे आवश्यक होते.

-वर दिलेल्या गोष्टी सारख्या करता येतीलच असे नाही, म्हणून मग डिप्रेशन मधून बाहेर पडायला स्वतःच काही नवीन प्रकार शोधून काढले.  औदासिन्य आले की सर्वप्रथम  हे सगळे प्रकार करून पहायला हरकत नाही.

-दिर्घ श्वासोच्छ्वास करणे  हा उपाय सगळे योगा वाले सुचवतात. पाच मिनिटे असे केल्यास बराचसा मोकळेपणा वाटतो असे म्हणतात. मला काही फारसा फरक पडत नाही या मुळे!

-तुम्ही जे काम करीत आहात, ते एकदम बंद करा , आणि दुसरे काही तरी करणे सुरु करा. मग ते एखाद्या मित्राला फोन करणे, मैत्रिणीबरोबर संध्याकाळची भेट ठरवणे, कट्टा गॅंग बरोबर एखादं गेटटूगेदर ठेवणे असे काही पण असू शकते.

अगदी काहीही न करणे हा पण एक उपाय बरेचदा मी करतो. थंडी असेल तर मस्त पैकी ब्लॅंकेट मधे गुरफटून एखादे पुस्तक वाचत बसणे ,मस्त उपाय आहे.

-पायात रेबॉक किंवा नायके चढवा, आणि निरुद्देश फिरणे सुरु करा. तुमच्या बिल्डींग मधून बाहेर पड्ल्या बरोबर जो कोणी समोर येईल त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करा. शेजारचा कोणी समोर दिसलाच, तर पाच मिनिटे उगाच काही तरी गप्पा मारा, आणि शेवटी काहीच न ठरवता, केवळ रस्त्याने गर्दीचा भाग होऊन कुठे तरी चालत जाणे  करून पहा.

-सृष्टीसौंदर्य न्याहाळत जाणॆ. हे जरी या कॉंक्रिट जंगलात शक्य नसले, तरी पण इतर ” प्रेक्षणीय” गोष्टी  🙂  बऱ्याच असतात, जर  लग्न झालेलं नसेल तर  चांगली ’ स्थळं ” असतातच, त्यांचा शोध घ्या.

:-आइस्क्रीम, चाट, वगैरे गोष्टी जर आवडत असतील तर उठा, आणि त्या भैय्या कडे जाऊन या. आवडीची वस्तू खायला मिळाली की बराच शांत होतो मी स्वतः.

-घराजवळ बगिचा असेल तर बगिचा मधे चालत जा. नुसते बगिचा मधे  बसलो, तरी पण छान वाटते. एखादी गोष्टीचे रुपांतर बीजांकुर  पासून तर फुला- फळापर्यंत झालेले पहाणे हा पण एक मस्त अनुभव असतो.

-तुम्ही जर एखादी गोष्ट केलेली असेल की जिच्यामुळे तुम्हाला गिल्टी वाटत असेल, (जसे एखाद्या प्रिय व्यक्तीशी खोटे बोलणे),  तर तो गिल्ट मनातून काढून टाका.  गिल्ट ही कोळ्यांच्या जाळ्या सारखी असते, एकदा तुम्ही त्यात अडकला, की त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.

-फोटोग्राफी ,ट्रेकिंग, वाचन, पेंटींग, पतंग उडवणे, वगैरे कुठला तरी छंद जोपासा. जास्त डिप्रेशन आले की छंद हा एक मस्त विरंगुळा होऊ शकतो. मी लहान असतांना तास  अन तास गच्चीवर पतंग उडवत बसायचो. एखादे म्युझिकल वाद्य वाजवणे, खेळ  किंवा इतर काही छंद असू शकतात. जिग सॉ पझल हजार पिसेसचे घेऊन या , मस्त वेळ जातो  🙂  शांत जागी बसून मेडीटेशन करणे , किंवा सेक्स हा पण उपाय आहे.

-गरम बोर्नव्हिटाचा ग्लास  संपवून मस्त पैकी झोप काढा. जस्ट रिलॅक्स! आवडीचे संगीत ऐकणे हा पण मस्त उपाय आहे. शक्यतो हेडफोन लावून  गाणी ऐकल्यास लवकर आराम  मिळतो. शक्यतो क्लासिकल संगीत जास्त बरे वाटते अशा वेळेस!

-आपल्याला स्ट्रेस जास्त येण्याचे कारण म्हणजे फायनान्स. आपल्या कुटुंबीयांची काळजी प्रत्येकालाच असते, कधी तरी एकदम आपल्याला जाणीव होते की आपण काहीच करून ठेवलेले नाही. हल्ली पूर्वी प्रमाणे  लोकांना पेन्शन पण नसते, त्यामुळे आपल्या अपरोक्ष आपल्या कुटुंबाचे कसे होईल? ह्या गोष्टी  मुळे डिप्रेशन  येण्याचे प्रमाण फार जास्त आहे. यावर उपाय म्हणजे फायनान्शिअल प्लानिंग व्यवस्थित करून ठेवणे. टर्म पॉलिसी, ज्या मधे कमी इन्स्टॉलमेंट आणि जास्त रिस्क कव्हर असते ती काढणे. एफ डी वगैरे , इनव्हेस्टमेंट प्लानिंग करणे ..

-आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे काही तरी लिहा. जे काही मनात येईल ते लिहून काढा, एखादी खास वही, किंवा ऑन लाइन ब्लॉग तयार करा, की ज्यावर तुम्ही आपले मन मोकळे करू शकाल. मनात जे काह येइल ते लिहिलं की मानसिक त्राण कमी होतो, हे मी स्वतः अनुभवले आहे. ज्या गोष्टी कोणाशीच बोलता येत नाहीत, पण मनात येत असतात, आणि मग त्यांच्यामुळेच तुम्हाला डिप्रेशन येत असते. लिहून काढणे हा एक मस्त उपाय आहे- स्वतः अनुभवलेला.

-असं म्हणतात, की जर एखादा माणूस कायम सिरियस राहिला, स्वतः कधी काही एंजॉय केले  नाही, कायम कुठल्यातरी “अमूर्ताच्या शोधात” गुरफटला गेला तर तो स्वतःच्या नकळत वेडा ( सिझोफ्रेनिक ) होऊ शकतो. अशी मानसिक अवस्था आली की आत्महत्येचे विचार मनात येणे सुरु होते. म्हणून हे प्रकर्षाने टाळा.

-दिवसभरात , स्वतः साठी कमीत कमी एक तास काढून ठेवा. तो तुमचा स्वतःचा स्वतःसाठी दिलेला वेळ असेल. स्वतः बरोबर रहा- बी विथ युवरसेल्फ.’पॉझिटिव्ह थिंकींग” सुरु करा.

-इंटरनेट मुळे आपले घराबाहेर पडणे बरेच कमी झालेले आहे. स्वतः भोवती एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम तयार करा. त्या मधे , पत्नी, मुलं, मित्र, मैत्रिणी, शेजारी, असे अनेक लोकं असू द्या. जितके जास्त लोकं तुमच्या सपोर्ट सिस्टीम मधे, तितके सहज पणे तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर पडू शकता. दिवसभरात थोडा तरी वेळ काढा, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती सोबत घालण्यासाठी. शक्यतो  औदासिन्याच्या अवस्थेत एकटे रहाणे टाळा.

-प्रत्येकाच्याच दृष्टीने डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचे उपाय वेगवेगळे असू शकतात. या साठी कुठलाच  असा  फॉर्म्युला नाही,  स्वतःला  कुठला उपाय सुट होतो ते स्वतःच शोधायचे असते.  आणि हो, डॉक्टरांना जाऊन भेटल्यास ते काही औषधं देतात, ती  घेतल्यावर पण आराम पडतो. तेंव्हा वरच्या पैकी कुठलाही उपाय करा , पण डॉक्टरला भेटणे मस्ट  आहे हे लक्षात ठेवा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

104 Responses to डिप्रेशन

 1. Dr. Abhishek Mule says:

  अरे एक लिहायचे राहिले महेंद्र कुलकर्णी यांचा ब्लॉग वाचा टेन्शन गुल !!!

  • डॉ. अभिषेक
   ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूवक आभार..

  • shashank bobhate says:

   Sir,me shashank sadhya me MPSC cha abhys kartoy, 2mahinyapasun mla kuthli bimari lagli ahe ji 3 4 diwasani maza confidance low hto ani achanak mla sarw sampl asch watt me swthla bhrpur step up karnyacha prytn krto pn 3 diwas 4diwas zale ki khachun jato ani abhyas sodun dto.ani mag manat khup khup wait gosti yetat,suside wagere.me ashewichr mnat ale tr swthla sawrto ani punha abhyasala lagto pn punha 3 4 diwas zale ki tasach…..may karw sucht nhiye tumacha blog wachla thod free watl thanks sir……kay karu tumhi mla thod sanga

  • prakash says:

   i have lot of tension in my regular life, so please tell me some one how to control me myself.

 2. ruchira says:

  Kaka lekh as usual mastch… Ek gosht aahe manat.. Kadachit majhya vayachya baryach lokanchya manat asel… Aamhi lok gharapasun lamb rahto(job/collg) tyamule ghari aalyavar rikhampan.. An mag nakalat tyach tya goshtincha vichar… Aai babana sangav tar te dur ghar tension ghetat tehi aamhala aavdat nahi… Javalche frnds kuthetari durchya deshat… Kahi goshti nustya fonevar hot nahi… An offc frnds madhe politics itk asat ki tyanchyashi itk manatl nahich bolta yet… Ashyaveli kharach kay karav nahi kalat…hya manasthitit ekat rahu naye manya pan kitihi bhatkun aal tari punha tya rikamya gharakade yen garjechch…

  • ्रुचिरा
   काल पासून या कॉमेंट वर विचार करत होतो, कारण माझी मुलगी पण यावर्षी बिई ला आहे, तिला पण अशाच मनःस्थितीतून जावे लागेल ही गोष्टच मला डिस्टर्ब करून गेली. पुढल्या वर्षी नोकरी निमित्य तिला पण बाहेर जावे लागेलच….
   मला वाटतं, की मनात जे काही असेल ते आई वडिलांसोबत शेअर करणे जास्त योग्य ठरेल. त्यांना त्रास होईल ही भावना मनातून काढून टाक. जर बोलल्याने, मन मोकळे केल्याने शांत वाटत असे्ल तर त्यांना होणारा त्रास क्षम्य आहे !

   • ruchira says:

    Barobar aahe kaka.. Bolan hotach aai babanshi. Sanvad matr tutlay thoda… To punha jodu… Aani kaka aho kahi kalji karu naka porichi… He aajubajuch jag jitk tras det titkch sambhalunhi ghet… Manus mhanun hech ghadvat… So dnt wry at all…

   • mahendrajee, aapan jevhaan aapalyaa mulaambaddal kalajee karato tevhaan koNaachaa salla nako asato,tari maajhyaa naateechyaa anubhavaavarun sangato,mulee aivadilaaMpaasun laaMb geli,kee tee aapale man mokaLe karaayalaa dusare paryaay shodhataat.tyaaMchyaa pankhaat ekatyaane uDaNyaachee takad yete.aapan kaalajee kelyaane koNchach prashNa sutat naahe.Relax

    • काका,
     छान लिहिलंत.. कळतं पण वळत नाही असे झाले आहे मा्झे. पहिली गोष्ट म्हणजे मुलं मोठी झाली आहेत हेच मान्य करावेसेव ाटत नाही , एकदा ही गोष्ट मान्य केली की सोपं आहे सगळं

 3. SnehaL says:

  दिवसभरात , स्वतः साठी कमीत कमी एक तास काढून ठेवा. तो तुमचा स्वतःचा स्वतःसाठी दिलेला वेळ असेल. स्वतः बरोबर रहा- ब विथ युवरसेल्फ.’पॉझिटिव्ह थिंकीं” सुरु करा.

  खर आहे..स्वत:साठी वेळ काढ़ायलाच हवा.. 🙂 🙂

  • स्नेहल
   स्वतःसाठी वेळ काढणं पुरुषांना एक वेळ शक्य होतं, पण स्त्रियांना फार कठीण! पण तरीही वेळ काढायचा प्रयत्न करायला हरकत नाही.

 4. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या मनाला छळत असतात ह्यावेळी…. 😦

  यशवंत तर इतका हुशार पत्रकार होता…. पण शेवटी शेवटी तो …… असो, अश्यावेळी कोणाकडे बोलणे मन मोकळे करणे सर्वोत्तम उपाय वाटतो…..

  • सुहास

   मी राज शी कालच बोललो. एक शाउट बॉक्स सारखी साईट सुरु कर, किंवा एखादा खास विभाग मिम मधे, जिथे स्वतःचे नाव न देता मनातले विचार पोस्ट करता येतील अशी सोय करता येईल तर पहा म्हंटलं आहे, बघू या राज काय करतो ते.

   • arunaerande says:

    अशी साईट करता येते? पण खरंच बराच उपओग होईल. लोक मनातले सांगायाअ घाबरतात, कारण कोण काय म्हणेल याची भीती असते. असू नये पण असते.

    • होय, करता येते, राज जैन बरोबर बराच वेळ बोलणं झालं होतं, तो म्हणाला की लवकरच काही तरी करू म्हणून.

     • Abhay Mudholkar says:

      राज जेव्हा अशी site सुरु करेल तेव्हा तुमच्या blog वर त्याचा पत्ता द्या किंवा जमेल तर अशा site ची नीट जाहिरात करावी म्हणजे गरज असलेल्या लोकांना उपयोग होईल.
      लेख खूपच छान आहे आणि अतिशय वेळेवर लिहिलेला आहे. मनापासून धन्यवाद!
      अभय

      • अभय
       नक्की.. 🙂 बहूतेक या पंधरा एक दिवसात सुरु होईल.

       • raj jain says:

        मी यावर विचार करतो आहे, २-३ मित्रांशी बोलून आपण एक प्लेटफॉर्म नक्की उभा करू येथे आपल्या मनातील आपल्याला हवे तसे व्यक्त करून इतरांचे मत जाणून घेता येईल.

        • राज,
         माझ्या मनात असा एखादा प्लॅटफॉर्म असावा असे वाटते, की जिथे जाऊन स्वतःचे नाव वगैरे न देता तुम्ही आपले विचार मांडू शकता यायला हवे. सोशल साईट्स वर जसे मिम वगैरे बरेच लोकं असतात, पण केवळ आपल्या लाजे मुळे आपले प्र~ऒब्लेम्स लोकांना सांगत नाहीत. जर नाव उघड न होता लिहिता येत असेल तर मन मोकळे करणे जास्त सोपे होईल.

 5. Anagha says:

  अशा घटना ऐकल्या की मला वेगळेच प्रश्न पडतात…..की या लोकांच्या आजूबाजूच्या, जवळच्या कोणाच्याच कसे हे लक्षात येत नाही? माणसाच्या वागणुकीत थोडे तरी डिप्रेशनच्या साइन्स दिसत असतील ना? कुठे तरी बोलताना ही माणसे काहीतरी मनातले विचार बोलून दाखवत असतील का? लोकांच्या लक्षात येते पण ते दुर्लक्ष करतात की आजकाल इतक्या सूक्ष्म बदलांना लक्षात घेण्याइतका नाही?

  खात्रीने मी असे सांगू शकते की स्वत:वर जर अशी वेळ आली तर निराशेच्या गर्तेतून मी स्वत:ला नक्कीच बाहेर काढू शकेन, पण सभोवतालच्या लोकांपैकी जर कोणाला यापासून परावृत्त करायचे तर ते लक्षात आले पाहिजे ना?

  • अनघा

   अगदी बरोबर- डीप्रेशन च्या साईन्स नक्की दिसतात, पण त्या इतक्या मायक्रो लेव्हलला असतात की सहज पण सामान्य माणसाला ओळखता येणे अशक्य होते.. ते टिव्ही सिरियल पाहिले आहे का? लाय टू मी नावाचे. पहिला सिझन अप्रतीम आहे. चेहेऱ्यावरचे मायक्रो एक्स्प्रे्शन्स वाचण्याबद्दलची सिरीज आहे ती. पाहिलेली नसेल तर नक्की पहा. मी त्यावर पण एक लेख लिहायचं ठरवलंय.. पण राहून गेलं.

 6. mazejag says:

  Kaka, Dipak ne eka post madhe swatachach awaj mobile madhe record karaycha hya baddal lihile hote…aplya manatlya khasam khas mansachi marleya gappa…arthat hi vyakti aplya ayushyatun khup lamb geleli aste, pan best friend kiwa Ex wagaire …ani parat to awaj head phone war aikat rahaicha…mast idea….it works ha….kiwa mothmothyane gani mhanichi……nirasha aste kaka saglyanach…mage mi mhatlyapramane “Tata memorial” madhe don taas jaun ya…mag samjel…”Duniya me kitna gam hein aur mera kitna kam….” ayushyabhar purtil ani urtil suddha he don taas…..

  • अश्विनी
   बरेच प्रकार आहेत . दिपकचे ते पोस्ट वाचले होते मी पण.
   टाटा मेमोरिअल चे पेशंट पाहिले की स्वतः बद्दलच्या कम्प्लेंट्स करणे बंद होते आपले. माझा पण अनुभव आहे हा.

 7. madhuri says:

  malasudha halli depression saarkhe waatat rahaate. kaaran ek samasya sutat naahi toparyant dusri hazar. tyaat office madhe politics. mag gharchyaa vivanchanemadhun vel kaadhun jara shivsena shaka kinwa itar karyakramala jaat rahate. tevdhech man ramte.

  • माधुरी
   हे सगळे उपाय वरवरचे असतात. डॉक्टर कडे जाणॆ अवश्यक आहेच. काही गोळ्या घेतल्या की एकदम आराम वाटतो. ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी अजिबात नाही .

 8. Prachi says:

  काका मस्त!! मी पण खूप दिवस या विषयावर लिहीन म्हणत होते पण नाही जमल… खरच आहे we must take out some time for ourselves.

  • प्राची
   बरेच विषय असे मनात घोळत असतात, इतरही काही मुद्दे सुटले असतीलच.. ते कव्हर करु शकतेस..

 9. Vidya says:

  Mahendra ji, I liked this post. Depression seems to be a big issue these days. But when you have family around you, thats one of the big relief and the hobby is a big help to get out of it. Thoughts nicely put.
  -vidya.

  • विद्या
   अगदी खरं आहे. डिप्रेशन जर एखाद्याला आले असेल तर ते सहज पणे लक्षातही येऊ शकत नाही. फक्त नवरा- बायको मात्र एकमेकांना अगदी न बोलता पण समजू शकतात. ( लग्नाला २५ वर्ष झाली , म्हणून अधिकारवाणीने सांगू शकतो )
   प्रशन फक्त तेंव्हाच येतो, तेंव्हा दोघेही एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाहीत तेंव्हा!

 10. krushna palwe says:

  tension ghyaycha ki nahi te aaplyavr depend asta ani te kiti ghyayacha te sudha mhanun aadhi swatachyach manachi bandhani ashaprakare karaychi ki konte hi tension aaplyala hatbal karu shakat nahi

  • कृष्णा
   डिप्रेशन ही एक मानसिक अवस्था आहे, आणि त्यावर औषधं उपलब्ध आहेत, ही गोष्ट आपण मान्य करायलाच हवी.

   डिप्रेशन हे घेण्याची किंवा टाळण्याची गोष्ट नाही. ते आपोआपच येत असतं, फक्त त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे आपल्या हाती असते.

 11. ताणतणाव हे माझ्या आयुष्याचा नेहमीच अविभाज्य भाग आहेत:
  पण स्वतःच्या जीवनासाठी पराकोटीची आसक्ती असल्याने चुकूनही स्वतःला संपविण्याचा विचार मनात आला नाही:
  वाचन व लिखाण ह्यातून वाट काढत गेलो:
  तुम्ही सुचविलेल्या ताणतणावास दूर करण्याच्या उपाययोजना आवडल्या:
  त्यातील सपोर्ट सिस्टीम ची कल्पना आवडली:
  म्युनिक मध्ये इतके तब्बल दीड वर्ष मित्रांच्या शिवाय घालवले:
  आता परत आभासी जगतातून वास्तविक जीवनात पुनरागमन करण्याचे ठरवले आहे:

  • निनाद,
   एकटेपणा, आपली कोणालाच गरज नाही असे वाटणे, किंवा कोणीतरी दुर्लक्ष करतोय ही भावना आली की डिप्रेशनची सुरुवात.
   म्युनिकला तू एकट्याने दिड वर्ष काढले………… बापरे! नुसत्या कल्पनेनेच शहारा आला अंगावर! ग्रेट आहेस बाबा तू!

   • ह्या दीड वर्षात प्रत्यक्ष समोरासमोर मराठी माणसाशी दिलखुलास मराठीत बोलणे झाले नाही ह्याचे वैषम्य वाटते.
    भारतात बोलणे होत असते ,
    पण ट्रेन मध्ये एकेदिवशी केट सोबत जात असतांना अचानक पाठच्या सीट वरून मराठी शब्द एकू यायला लागले . कोणतीतरी मोबाईल वरून घरच्यांशी बोलत होता.
    मी श्वानासारखे कान टवकारून मराठी शब्द कानात साठवून घेत होतो.
    कामावर एवढ्या युरोपियन भाषा ऐकतो ,पण मराठीच्या अभावाने नैराश्य येते , लंडन व अबुधाबी म्हणजे एका हाकेवर २० ते २५ जणांचा ( ओला )कट्टा सहज जमायचा.
    गेले ते दिवस ,उरल्या फक्त आठवणी.

 12. shailesh Joshi says:

  महेंद्रजी खरच छान आणि सहजसुंदर सोपा लेख..मस्त

 13. ganesh says:

  mala depression ale tar mi matra, mahendra kulkarni sarancha blog vachato…….then just feel relax….

 14. kharch tumi chaan lihita sir.
  thank you
  pramod

 15. Shweta Kale says:

  Mitra, pustake, tv serial, chitrapat, music, Chhand aaplyala kahi kaLasathi depressionpasun dur thevnyat sath deu shakatat. Pan jevha aapla mansik aadhar kamkuvat hoto. Mhanaje apan jya lokanvar vishwas thevto tech lok jevha aaplyala samjhun ghet nahit. TyaveLi depression madhun baher padne khoop kathin hote.
  Tumhi sangitlele sarv upay nishchitach changle aahet aani support system majbut asne he garjeche aahe. Mala jyaveli depressive vatate tyaveli mi music aikte aani lagech relax vatate.
  Tumcha blog nehmipramanech chhan jhala aahe. Tumche likhan avadale mhanoon junya post vachat asate. Tumchya likhanatun khoop kahi shikta yete.
  Thanks for giving positive spirit of living life.

  • श्वेता
   सपोर्ट सिस्टींम सगळ्यात जास्त महत्त्वाची. तुम्ही जितके जास्त सपोर्ट्स तयार ठेवाल, तेवढे या डीप्रेशन मधून बाहेर पडणॆ सोपे जाते.
   जास्त त्रास होत असेल तर, डॉक्टर मस्ट!

 16. ni3more says:

  kaka good afternoon. kaka nehami pramane nice artical i like that.aani kashe aahat kaka tumhi. maji site paha me hi post takale ahet kahi http://bedhundhmanachilahar.blogspot.in

 17. arunaerande says:

  खूप मोठा फेर-फटका नैराश्य घालवायला उपयोगी ठरतो. तुम्ही म्हणता तसे वेगाने रपेट केली तर लवकर फायदा होतो. कधी कधी अशावेळी पुस्तक वाचनावर लक्ष लागत नाही. कोणी आपल्याशी बोलू नये असे पण वाटू शकते. यावर फिरणे, निरर्थक विनोदी टीवी सीरियल पाहणी(रडकी नाही) हा पण उपाय असू शकतो. पण आवडते माणूस नुसते शांत्पणे जवळ बसले तर फारच उत्तम.सध्या ब्लोग वाचणे हा नैराश्यावर उत्तम उतारा आहे.
  हे सर्व असले तरि लवकरात लवकर नैराश्याचे कारण शोधून ते दूर करणे आवश्यक आहे.

  • अरुणा
   हा मुद्दा खरोखरच खूप महत्त्वाचा वाटतो. आशाभोसले च्या मुलीला कसली कमी होती? पैसा होता, सगळं काही होतं, पण तिचा संसार काही टीकू शकला नाही, लवकरच डिव्होर्स झाला, आणि ती डिप्रेशन मधे गेली. या पूर्वी पण एकदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. केवळ पैसा, स्टॅबिलिटी, प्रसिद्धी सगळं आहे म्हणून डीप्रेशन येणार नाही असे नाही. ह्याच गोष्टी मुळे हा लेख लिहायला प्रव्रुत्त झालो होतो.

 18. मंदार says:

  आवडला टेन्शन घेणे म्हणजे आजचा क्षण खराब करणे.टेन्शन ने त्या पलीकडे काहीही होत नाही ….

  दुर्दैवाने काही ठिकाणी टेन्शन देणे अभिमानास्पद वाटते ( विरू सहस्त्रबुद्धे 🙂 आमचे कॉलेज पण अपवाद नाही ,मागच्याच वर्षी एका मुलाने आत्महत्या केली होती..
  त्यावेळेला खरच बोलावेसे वाटत होते मास्तर लोकांना ,काय करायचं ते करा ना, फेल करायचं तर फेल करा..पण उगाच रोज उठून तुला फेल करीन अशी धमकी दिल्याने काय होणार? मुळे ५ -६ महिने घरी जात नाहीत ..सुट्टीच्या वेळेला भारपूर कामे टाकायची ….
  त्यावेळी या विषयावर खूप चर्चा झाली पण कॉलेज ने बातमी पूर्ण पणे दाबून टाकली आम्ही होस्टेलच होतो….

  पण त्यानंतर टेन्शन घेणे पूर्णपणे सोडले
  task oriented न राहता रिझल्ट oriented राहिले की टेन्शन आलेच, त्या पेक्षा हातात आहे ते काम करावे आणि आनंद घ्यावा

  • मंदार
   हा वेगळा अ‍ॅंगल आहे या गोष्टीकडे पहाण्याचा. माझ्या पण लक्षात आलं नव्हतं.
   कॉलेज मधे तर चार वर्ष नुसती वाट लागते, मी फक्त सबमिशन, प्लेसमेंट हे दोनच मुद्दे घेतले होते.
   इंटरनल च्या मार्क्स मुळे आणि ऑटोनोमस कॉलेज मुळे हा प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे असे वाटते.

 19. anuvina says:

  मला तरी आठवत नाही की मला डिप्रेशन वगैरे प्रकार केंव्हा आले होते. पण मी घडून गेलेल्या घटनांचा जास्त विचार नाही करत. म्हणतात ना “ठेविले अनंते तैसे ची रहावे” तसा काहीसा विचित्र स्वभाव. स्वतःची चुकी असेल तर माफी मागची पण लाज नाही किंवा कुणीछळ केला तर उगाच राग धरण्याची पण वृत्ती नाही. विधिलिखित चुकणार नाही आणि घडायचे घडल्याशिवाय थांबणार नाही असा विचार करत प्रत्येक क्षण माझ्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो.
  कधी मानसिक तणावाचे प्रसंग आलेच तर दुसऱ्या गोष्टीत मन रमवायचा प्रयत्न करतो. आणि अजून पर्यंत तरी या बाबतीत यशस्वी झालो आहे.
  बाकी आपण उपाय मस्त दिले आहेत.

  • आनंद,
   अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या डिप्रेशन चं एक असतं, बरेचदा, ज्याचा ताबा घेतं त्याला पण समजत नाही, आपण यात गुंतलोय ते.
   काळजी पूर्वक रहाणे एवढेच आपल्या हाती असते.

 20. Pramod Mama says:

  महेंद्र काका ,
  गरिबांना मध्यम वर्गीयांना टे न्शन घेणें , परवडतं नाही
  रोजचे जीवन जगणे त्यांना अवघड असते , त्या मुळे असले नखरे त्यांना जमत नाही
  मी खूप उदा हरणे पा हि ली आ हे त ,
  जरुरी पेक्षा जास्त मान , संपत्ती ,आद र ,अधि का र ,रूप व गै रे सहज मि ळा ले की हे सर्व सुरु होतात
  वा र क री ,शेतकरी ,मजूर , कामगार,ग्रू हि णी ,अंध लोक , ह्या लोकांची परमेश्वरावर पूर्ण विश्वास असल्याने व जगण्यासाठी सतत काबाडकष्ट करत असल्याने त्यांना डिप्रेशन येत नाही आणि हे लोक सतत आनंदी स्वभावाचे असतात .कोणची ही गोष्ट “इद न मम ” ने विचार करतात म्हणून ते सुखी असतात . सुख , आनंद , संकट आणि दुख परमेश्वरा वर सोपवल्याने आम्ही सर्व नेहमी डिप्रेशनच्या बाहेर असतो तुम्ही पण सुखाने राहा . तुम्ही काही आणले नाही आणि तुम्ही काही नेणार नाही बस हे लक्षात ठे वा आणि आनंदात राहा . वासुदेव हरी पांडुरंग हरी
  Sometimes, our “problems” seem to be as big as the shadows…but they are little. Isn’t it ?

  Pramod Mama

  • प्रमोद मामा,
   अहो विदर्भातले शेतकरी आहेत ना, पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणारे. दररोज एक दोन तरी असतातच..

 21. Anand Namjoshi says:

  Hello,
  Roj sandhyakali kamit kami ek taas GYM la jave, saglyat mast. Kahi stress nahi ki ektepana.
  GYM madhy vel kasa jaato kalat nahi with your workout and Friends.

  Regards,
  Anand Namjoshi

 22. hasa leko says:

  kaka
  kalpesh kadun hi ashaa navti,tyala personali olkhat hoto,

  aso, http://whatiswrongwith.me/ he site pan kamala yeu shakte bagha

  • नाही, ही साईट काही मला फारशी आवडली नाही. मिमराठी, मिसळपाव सारख्या साईट बद्दल बोलतोय. इथे तुम्ही लिहिलेले पोस्ट किती लोकं पहातील ही शंकाच आहे मला.

   • hasa leko says:

    comment mi fakt tumchyasathi lihile ahe kaka

    tumhi fb account delete kele ahe,blogging thambwayche pan mhanat ahat

    on serious note ase karu naka,already barech marathi lok / sites/ prakalp mi hya varshi majhya dolyani band padlele baghtle ahe

 23. महेंद्र……नेहेमीप्रमाणे सुरेख लिहिलं आहेस. आजचा अतिशय ज्वलंत विषय.
  आजकालच्या इतक्या पराकोटीची स्पर्धा असणाऱ्या जगात आपल्या मुलांना जे हवं ते मिळालं नाही, लायकी असून सुद्धा मनासारखी नोकरी, छोकरी, पैसा नाही मिळाला की डिप्रेशन येतं. तू सुचवलेले सगळेच उपाय मनापासून पटले. बेसिकली संवाद सगळ्यात जास्त महत्वाचा. तो योग्य माणसाशी झाला की असे विचार मनातून झटकता येतात.

  • जयश्री,
   संवाद…. तेच म्हणतोय, मग तो वाद -संवाद असला तरी हरकत नाही- पण इंटरअ‍ॅक्शन हवीच! मुलांना मोकळे पणाने बोलले पाहिजे आपल्याशी असे मला नेहेमीच वाटत असते. बाबा जोक्स हा लेख पण याच विषयाशी संबंधीत होता 🙂

 24. raj jain says:

  डिप्रेशन ही अवस्था खूपच वाईट असते. येथे जीवनाच्या शाळेत पास-नापास होण्याचा प्रश्न असतो, तेव्हा गरज असते ती संवादाची. जर आपली अडचण आपले प्रश्न कोणासमोर मांडू शकलो तर मनाला परत एक उभारी मिळते. ती व्यक्ती तुमची अडचण दूर करेल न करेल पण तुम्हाला प्रोत्साहन देईल तुमच्या मनातील वाईट विचार आश्वासक बोलण्यामुळे नाहीसे होती.. यासाठी संवाद महत्त्वाचा.
  कल्पेश असो किंवा यशवंत यांनी आपल्या जवळपासच्या व्यक्तीबरोबर, मित्राबरोबर अडचण शेअर केली असेल किंवा नसेल पण याव्यक्तीचे जवळचे जे कोणी असतील ते त्यांची ती अवस्था जोखण्याबाबत अयशस्वी ठरले हे नक्की.

  • राज
   व्हर्च्युअल आयुष्यामुळे आपण आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या बिल्डींग मधे रहाणाऱ्या लोकांशी संबंध नसतात, कोणी खरे मित्र नसतात, की ज्यांच्याबरोबर जाऊन गप्पा मारत बसता येईल, आयुष्य एकदम बदलून गेले आहे हल्ली इटरनेट मुळे. व्हर्च्युअल आयुष्यात आपण आपले प्रॉब्लेम कोणाला सांगितले तर लोकं खिल्ली उडवतात, मस्करी करतात, म्हणून ~ऒन लाइन मित्रांशी पण मोकळं बोललं जात नसावं !

 25. Kanchan S says:

  Kharch khup chan lekh ahe..

 26. Sagar says:

  काका मस्त वाटलं हि पोस्ट वाचून , मला बराच उपयोग होईल ह्या सर्व टिप्सचा, बाकी नेहमी प्रमाणे पोस्ट मस्तच झालीये .. 🙂

  • सागर,
   धन्यवाद.. मोकळेपणाने बोला, डॉक्टर ला भेटा ही गोष्ट लक्षात ठेवावी लोकांनी एवढीच इच्छा!

  • arunaerande says:

   महेन्द्र,
   आणखी एक गोष्ट आजच्या युवा पीढी बाबत काळजी देणारी आहे. आई-वडील दोघेही नोकरीत असतात. पैसा भरपूर असतो आणि बहुधा एक नाहीतर दोन अपत्ये.ही तशी एकटीच वाढतात. त्यांना मिळून मिसळून रहयची सवय नसते. भावना शेयर कायला आई-वडीलांना वेळही नसतो आणि एनर्जी पण नसते. क्वलिटी टाईम, पुरेसे लक्ष देता येत नसल्याची भावना ई. मुळे मुलांचे पैशाने अवाजवी लाड होतात. हव्या त्या आणि अधिक गोष्टी न मागता मिळत जातात. त्याची सवय होते आणि मग पुढे आयुष्याला तोंड देतांना अडचणी आल्या तर कित्येकदा तर त्यांचा सामना करता येत नाही. they juct cannot cope. then the frustration. they are not geared to stuggle, fight for what they want! i feel that this problem needs to be tackled from the beginning.

 27. Pankaj Z says:

  डिप्रेशनमध्ये आपण जातोय का, चाललोय का याचा सुगावा सगळ्यात आधी स्वतःला लागतो. वेळीच स्वतः त्यावर उपाय करायला पाहिजे. आवडता छंद, भटकंती किंवा सगळे विचार कागदावर खरडून ते जाळून टाकणे अशा उपायांचा नक्की फायदा होतो. शिवाय आसपासच्या जवळच्या व्यक्तींनीही जागरुक राहून आपल्या प्रियजनांच्या स्वभावात होणारे बदल नीट न्याहाळून वेळीच ऍंटिसिपेट करायला हवेत, अर्थात त्यासाठी संवेदनशील मन आवश्यक आहे आणि प्रत्येकास तसे मन विकसित करता यायला हवे.

  • पंकज
   बरेचदा लहान लहान इन्डीकेशन दिले जातात. पण ते लक्षात घेतले जात नाहीत . लाय टु मी चा पहिला सिझन पहिला का? नसेल तर नक्की पहा. मायक्रो एक्स्प्रेशन्स बद्दल बरीच माहिती दिलेली आहे त्या मधे.

 28. Guru says:

  <<<<<>>>>>>>

  arrrrrrrrrrrrrr, ऐसा भी रहता क्या!!!! अभी मेक्को शादी का विषय निकला घरपे की टेन्षन अन डीप्रेशन आयेंगा बावा!!!!…. बीना बाईकचा मी??? म्हणजे….. बीना गोपीचा मुरलीवाला…… बीन सरसोंच्या शेताचा शारुक!!!!…..

  (आगाऊपणाचे पण सच्चे काही बोल खाली देतो काका…. वुईथ युवर पर्मिट अझ्युम्ड!!)
  ऑन अ सिरियस नोट एक गोष्ट सांगु काका???…. बघा मी आज तरुण आहे कट थ्रोट कॉंपिटीशन च्या जमान्यात मी एका भयानक अश्या परिक्षेत पास झालोय पण मला सुद्धा इतिहास आहेच, पाच वर्षं लागली फ़क्त बीएस्सी व्हायला बारक्या भावाचे शाळकरी मित्र कॉलेज फ़्रेंड्स आहेत माझे!!!!…. कधी तरी “लो” फ़िल करायचो अन डीप्रेस नाही झालो…. ह्याचा अर्थ मी कोडगा होतो का?? नाही… मुळीच नाही,,,,, दोन फ़ंडे क्लियर असावेत
  १. ज्या मुद्द्यात तुम्ही विचार करुन फ़रक पडतो त्याचा विचार करा अन फ़रकासाठी हातपाय हलवा
  २.ज्याच्यात तुम्ही झा* विचार करुन झा* काही फ़रक पडत नाही अश्या मुद्द्यावर डीप्रेस होऊन वेळ अन आयुष्याचं सौंदर्य वाया घालवणं हा तद्दन मुर्खपणा आहे!!!!!

  वर कोणीतरी “जीम” बद्दल बोललंय!! ११११००००० % अग्रीड!!!!!…. फ़ार मस्त असर पडतो व्यायामाचा!!!…… स्ट्रगलर्स असाल तर मनाला तजेला देणारी ५-५० इन्स्पीरेशनल गाणी (रामरक्षा ते मेटालिका कायपण चालेल) सतत मोबाईल नाहीतर आयपॉड वर ठेवणे हा पण एक इलाज आहे!!!!!!

  जीव देण्याइतका चवन्नीछाप कलेजा असला तर वेगळ्या वाटा चोखाळु नयेत हा माझा त्यातल्यात्यात हार्ष सल्ला आहे काका!!!…. वेगळे काही करायचे तर पेन्स पण वेगळे असतात अन ते कोणाशीच कंपेर करता येत नसतात काहीतरी वेगळे करण्यात पडायच्या आधी हा विचार स्पष्ट हवा, हात पाय लटपटले तर सरळ सरधोपट मार्गाने आयुष्य जगायची लाज ती कसली हो???…. जगणे महत्वाचे असते!!!!! (मला आत्मघात करणारांचा प्रचंड तिटकारा आहे काका म्हणुन इच्छा नसतानाही हा एक विचार थोडा हार्ष असला तरी मांडतोय, भीडभाड न ठेवता!)

  • Suyog says:

   Dear Kaka, after this your article I read almost everything from Yashwant Kulkarni’s blog. And frankly to say I found him extreamly intelligent & spiritually inclined person. I donot agree with you that his writing depected him under any kind of depression. Will you provide me any further inforamtion about Yashwant. I found his blog more readable, versatile & artuculative than almost all blogs I have ever read including yours. Donot mind it pls. I am perplexed why he commited suicide. there may be other personal reasons for this incident. Such a sensitive & uplifted spiritual person should not end his life like this.

   • सुयोग
    जे लोकं मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात,तेच या अध्यात्माच्या मागे लागतात किंवा गुंडागर्दी करतात. शारिरीक ताकद असेल , ब~कग्राउंड तसा असेल तर गुंडागर्दी केली जाते, पण सुशिक्षीत आणि संस्कारी मुलगा मात्र अध्यात्म, आणि अज्ञात वगैरे च्या जाळ्यात सापडतो..

    वयाच्या २४ व्या वर्षी जर मुलींकडे न पहाता, अघोर विद्या, आणि कृष्ण्मुर्ती सारख्यांच्या मागे लागणे हेच मानसिक दुर्बलतेचे लक्षण दाखवते. ज्या वयात जे हवं असतं, तेच करायला हवं. जेंव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या कुठल्यातरी पेचात अडकले असता , आणि काही मार्ग सुचत नाही, तेंव्हाच तुम्ही तीन गोष्टी करता, एक म्हणजे ज्योतिषया कडे जाऊन विचारता, दोन म्हणजे देवाला नवस बोलतात, तीन म्हणजे अज्ञाताचा शोध घेता. याच्या बाबतीत , ह्याने जोतिषी टाळला, सुरुवातीला रजनीशांच्या मागे होता, नंतर कृष्ण्मुर्ती, नंतर अघोरी साधून. त्याची ती पोस्ट वाचली का, साधू देहत्याग करतो त्याचे इंडीकेशन देतो ती? त्यावरून काय वाटतं? पूर्णपणे मनाचा तोल ढळलेला दिसतो.

    त्याच्या काही पोस्ट मधे नैराश्य पूर्ण पणे दिसून येते. एकदा तो म्हणतो, ” जर कृष्णमुर्ती समजले नाही, तर झाडाला दोरी बांधून टांगुन घेण्याव्यतिरिक्त ( गळ्याभोवती) काही पर्याय नाही.. असो. पण एक खरं तो हुशार होता यात काही संशय नाही. कालच एक लेख वाचला, त्यात दिलं होतं, की ज्याचा आयक्यु जास्त असतो, तो लवकर सिझोफ्रेनिक होऊ शकतो.. ह्याच्या बाबतीत पण तसंच काहीसं झालं असाव>

  • गुरु
   क्या बात है.. कन्फेशन ऑफ गुरु …:)
   इतकाच पॉझिटीव्ह दृश्टीकोन आयुष्यात नेहेमीसाठी रहायाला हवा.. 🙂

   • arunaerande says:

    सुयोग
    I.Q. जास्त असेल तर मानूस थोडा एकांगी असतो हे खरे आहे. पण तो जगाचे भान ठेवू शकतो. कमकुवत मनाचा माणूस alternative आधार शोधत असतो. बहुतेक तो ज्योतिष किंवा कुठला तरी गुरू पकडतो. बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणे. पण म्हणून आध्यात्माकडे वळणारे सगळे लोक मनाने कमकुवत असतात असे नाही. अशा लोकांना पण मन खंबीर असणे जरूरीचे असते. पण कमकुवत मनाच्या मणसाला नैराश्य लवकर येते, आणि त्याला समजून घेणारा, आधार देणारा योग्य माणूस मिळाला नाही तत तो निराशेच्या गर्तेत घरंगळत जातो.
    महेंद्र, आपली मुले आपल्या संसृतीत वाढलेली असतात. ती सर्व प्रकारचे प्रोब्लेम्स फस करायला समर्थ असतात. आणि त्यांना हा ही विश्वास असतो की ‘माझे आई-वडील नेहेमी माझ्या पाठीशी आहेत.’ काळजी नको
    Have faith in your upbringing.

    . have faith in your upbringing.

 29. काका.. सर्वात महत्वाचं म्हणजे.. स्वतासाठी आणि स्वकीयांसाठी वेळ काढणं आणि योग्य व्यक्तीशी योग्यवेळी संवाद साधणं….. एकदा मनमोकळेपणाने सगळं बोलून टाकलं कि गोष्टी खरंच सोप्प्या होतात… अत्लेअस्त मनात अडकून बसलेल्या प्रश्नांना मोकळीक मिळते..असा माझा अनुभव आहे….. पण आजच्या काळात खंत हीच आहे कि लोकांना स्वतासाठीही वेळ नाही…….आणि ईसोलतिओन मुळे मनावर दडपण येतं! आयुष्य खूप सोप्पं आणि सरळ असतं त्याला आपण उगाच कॉम्प्लीकॅतेद बनवतो….असं फेबु वर कुठेतरी वाचलेलं आठवतंय… आता पटलं ते… बाकी लेख.. उत्तम… पु.ले.शु. 🙂

  • कुठे तरी सपोर्ट सिस्टीम पाहिजे .मग सगळे प्रॉब्लेम्स सुटतात.

   • sandip mohite says:

    Lekha chaan hota. Mi sudha majhya family la sodun ithe south africa la rahto. Khup vait vatte kadhi kadhi karan ithe indian kon nahi. Majhe sudha just april la lagna jhale aahe. Ti sudha tithe mumbai la aahe khup miss karto tila sudha. Pan te mhantat na ki aayushyat sarv easily nahi milat. Ek marathi song aahe ” Dis jatil dis yetil bhog saral sukh yeil”

 30. sandip mohite says:

  Kharach khup chaan hota…mi sudha majhya family pasun lamb rahto…south africa la tya mule kadhi kadhi dipression yete. Majhe sudha just april la lagna jhale aahe. Majhi bayko sudha majhya pasun lamb rahte.khup vait vatte kadhi kadhi ektepana vatto khup. Pan kai karnar aayushyat sarvach goshti easily nahi milat na. Ek marathi song aahe te aikle ki jara bare vatte. “Dis jatil dis yetil bhog saral sukh yeil”…….lekh khup chaan jhala

 31. r.k. gore says:

  kharach tumache he lekha vachlyanantar khup bare watate

 32. arunaerande says:

  एक गंमत म्हणून सांगते. नवीन लग्न होऊन मी दिल्लीला गेले. सगळीकडे सरदारजी आणि पंजाबी लोक. कोणी मराठी बोलणारे नाही. माझे यजमान सकाळी ८ वाजता जायचे ते संध्याकाळी ७.३० /८ लच परत. वेड लागायची पाळी आली होती. एकदा बजारात भाजी घेतांना एक मराठी जोडपे दिसले, पण ते दोघे कशावरून तरी भांडत होते. मी तरी त्यांच्याशी बोलायल जणार तर माझ्या नवर्‍याने मला अडवले! बरोबरच होते ते, पण मी पण हट्टाला पेटले. आम्ही दोघांनी रात्री ९ च्या सुमाराला, त्यांचा पाठलाग केला. म्हणजे मीच. पण नाईलजाने का होईना, माझे यजमान माझ्या मागे मागे आले. शेवटी ते लोक घरात गेल्यावर मी त्यांच्या घराची बेल दाबली. आम्ही आत गेलो. मराठीत बोलायला मिळाल्याचा मला इतका आनंद झाला होता की त्यामधे ते त्यांचे भांडन वगैरे पण विसरून गेले!
  अर्थात नंतर आम्ही खूप चांगली दोस्त झालो. पण पहिली भेट आठवून सगळे माझी खूप थट्टा करायचे!

  • खरं आहे.. एकटेपणा असला की कोणीही चालतं. गप्पा मारायला कोणी असलं की खूप बरं वाटतं.
   आम्ही दहा एक वर्ष एकत्र कुटुंबात रहात होतो, त्यामुळे एकटेपणा कधी मिळालाच नाही 🙂

 33. suhas adhav says:

  masta topic var lekh lihilat nehmi-sarkha masta aahe 🙂
  depression aashi goshta aahe na ki
  ekda aapan tya phase madhun baher padlo ki aasa vata kay faltu goshtisathi aapan etka vichar kela
  kadhi kadhi jasta vichar karnach aaplyala hya phase madhye gheun yeta ….. pan jevha aapan tya phase madhye aasto tevha suchat nahi kahi
  kahi goshti share kelyane bara vata pan jyachya barober share karto ti vyakti kon aahe he pan matter karta 😛 aai-baba, siblings ani ekdam khas friends barober share karnach safe 😛

  • अगदी बरोबर… एकटेपणा टाळला की बराच फायदा होतो. शक्यतो आई बाबांसोबत मोकळेपणाने बोलले तर त्याचा फायदाच होतो.

 34. vishal chandale says:

  Mahendra sir, tumche tension kami karnyache upay phar aavadale. Will try to use next time.
  thanks.

 35. sanjeev says:

  दुर्दैवाची गोस्ट म्हणजे मानस रोग डोक्टर सुधा या बाबत अतिशय उदास असतात, पुणे येथील लक्ष्मी रोड वरील डॉक्टर कांसुलिंग मधे चक्क झोपले पण पैसे माञ पूण॔घेतले.

  • संजीव
   एखादा दुसरा चांगला सायकोलॉजिस्ट पहा. स्वतःच्या प्रोफेशन शी प्रमाणिक असणारा..

 36. siddhesh says:

  pan jya mulana ai vadil kadhi samjun ghet nay tyanche kai. ai baba sikalele pan mulana fhakt abhyas kela ka eavdhech vicharyache ani jar mulane nai mhantale tar dapkavayche.mulan samor daru pitat ai la maharan ani ghanerdya shivya ashyani tar changalya mulanchi vat lagate.lokana tamasha dakhavane ai vadalana avadate pan tyacha mulanvar kai parinam hot ahe yacha te kadhich vichar karat nahit..ji mule nashib van astat jyana ai vadalilanchya ruchat chaingale mitra miltat.mulana gharche vatavaran kharab banavate ashya veli kai kele payje please help…….

  • सिद्धेश
   नक्कीच काही तरी प्रॉब्लेम असावा. कारण कुठल्याही वडिलांना मुलगा मोठा व्हावा, चांगला शिकावा असे वाटत असते. जनरेशन गॅप मुळे काय बोलावं हे समजत नाही, मग फक्त काय ? अभ्यास काय म्हणतो? असे प्रश्न विचारले जात असावे. दारू पिणे एक व्यसन म्हणून तर निश्चितच वाईट आहे. पण जर एखाद्या वेळेस कंपनी मधे पार्टी मधे वगैरे घेणे क्षम्य समजले जाऊ शकते.

   दारू पिणे दररोज असते की कधी तरी?? जर कधी तरी असेल तर त्याचे कारण ऑफिस मधे काही प्र~ऒब्लेम , नोकरी च्या संदर्भात जर काही इशू असु शकतात. असे प्रॉब्लेम घरी बायको , मुलां बरोबर शेअर करणे कधी पण चांगले. बाहेरच्या लोकांशी भांडणं झाली ( ऑफिस मधे बॉस बरोबर वगैरे, जिथे तुम्हाला काही बोलता येत नाही आणि अपमानाचे घोट मुकाट्याने गिळून गप्प असावे लागते) की मग त्यांचा राग मनात भरलेला असतो. एखादी लहानशी गोष्ट जरी मनासारखी झाली नाही, की मग त्या रागाचा विस्फोट होऊन बायको मुलांवर हात उचलणे, मारहाण करणे असा होऊ शकतो. खरंच नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे एकदा समोर बसून विचारले तर? अर्थात त्यांचा मुड पाहून>.

   पण जर दररोज नियमीत पिण्याची सवय असेल तर मात्र काळजी करण्याचे कारण आहे.

 37. Jayshree says:

  mala pan watat ki je kahi manat yeil te patapat manachay baher takawe pan tas hot nahi apale vichar konala sangata yet nahit pan mala ek sawai ahe mi maze man eka wahit utrun mokale karate je kahi manat yeil te me taya wahit lihat aste mag thod thik watat pan parat manat vichar yetcha rahata mala as watat ki sagal tention che vihar sampun mokal jagawe pan bhutkalat asha ghatna zalaya ahet ki mala maze vichar kami kartch yet nahit as watat ki he sagal sodun kute tari shant rahawe na thithe bhutkal aset na pudil aushya …………………..

 38. reshma gore says:

  mala wachun kup chan lihal ahe …………
  tymule maan halk jhyalasarakhe watate

 39. narendra says:

  sir mazya manat khupach bhayanak vichar yetat.pawitra natyatil wyaktibaddal ashlil wichar manat yetat.he thambawnyasathi kahi marg sanga.

 40. Somnath says:

  Sir mi khup sadha mulga ahe Mi sadhya eka companit job karto ghar chalvinyasathi.
  pan mala maj career banvaych ahe ani te kashat banwaych te pan mala mahit ahe
  pan mi te karu shakat nahi karan tyasathi mala job sodva lagel ani mi tas kel tar mi ghar kase chalvu ha prashn mala padto ani mag mi depression madhye jato mala kay karav kalt nahi
  please mala help kara ani sanga mi kay karu

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s