मराठी ब्लॉगर्सचे प्रकार ..

Bloggers-Mind-Logoगेली चार एक वर्ष ब्लॉगिंग करतोय आणि ह्या काळात बऱ्याच लेखकांचे ब्लॉग वाचण्यात आले. सुरुवातीला खूप आवडणारे ब्लॉग कालांतराने अपडेट्स न होत राहिल्याने विसरले गेले, आणि नवीन ब्लॉगर्स लिहिते झाले.   या ब्लॉग मधे  बऱ्याच  प्रकारचे ब्लॉग दिसून येतात. ब्लॉग चे प्रकार म्हणण्यापेक्षा याला ब्लॉगर्स चे प्रकार म्हणता येईल.

१) पहिला म्हणजे   कवी  ब्लॉगर्स.    हे ब्लॉगर्स डोक्यात कविता तयार झाली की सरळ आधी आपल्या ब्लॉग  वर पोस्ट करतात.   स्वरचित कविता एकत्र रहाव्या, आणि कोणीतरी वाचाव्या  म्हणून हा ब्लॉग बनवला जातो. परंतू, जरी कोणी वाचला   नाही  तरीही या प्रकारच्या ब्लॉगर ला  काही फरक पडत नाही. कविता बहूतेक मी, तू , ती , प्रेम , या विषयावरच्या असतात.

२) दुसरा ब्लॉगरचा प्रकार म्हणजे, इतरांच्या कवितांचे किंवा लेखाचे संग्रह . अशा ब्लॉग वर इतर लेखकांचे आवडलेले लेख , मग ते पेपर मधे आलेले असो, किंवा एखाद्या ब्लॉग वर त्यांचे संग्रह  केलेले असते. या मधे केवळ चांगले ( म्हणजे त्या ब्लॉगर ला आवडलेले )लेख मित्र मंडळी बरोबर शेअर करणे हाच उद्देश असतो.

३) तिसरा प्रकार  म्हणजे    कॉपी पेस्ट ब्लॉगर्स  . जे काही चांगले दिसेल ते आपल्या ब्लॉगवर  पोस्ट करत असतात.वृत्तपत्रातील एखादी बातमी , किंवा एखाद्या ब्लॉग वरचा लेख , आपल्या ब्लॉग वर चिकटवतात. अर्थात त्या  लेखाखाली त्या पेपरची लिंक देणे सोईस्कर पणे विसरतात. 🙂 जर एखाद्या वाचकाने ह्यांची चोरी उघडकीस आणली, आणि कॉमेंट दिली, तर ती कॉमेंट प्रसिद्ध   करित नाहीत.

४) काही ब्लॉगर्स सकाळी उठले की आज ब्लॉग वर काय टाकायचं ह्याचा विचार करत असतात,कधी एकदा पोस्ट टाकतो असं यांना होत असतं, मग हे लोकं अगदी जे काही मनात येईल ते पोस्ट करतात. सकाळचा रिक्षावाल्या सोबतचा अनुभव, किंवा सकाळच्या चहा मधे साखर कमी पडली , आणि मग साखर कमी खाणे कसे चांगले ?वगैरे वगैरे प्रकारच्या पोस्ट्स यांच्या ब्लॉग वर पहायला मिळतात.

५) पाचवा प्रकार म्हणजे विकिपीडिया वर दिलेली इंग्रजी माहिती मराठी मधे पोस्ट करणारे. भरपूर माहिती असलेले पोस्ट्स असतात अशा लोकांचे, आणि सगळी माहिती घेतली असते विकिपीडियावरून. या लोकांनी हीच माहिती ब्लॉग वर टाकण्यापेक्षा मराठी विकिपीडिया वर पोस्ट केली तर ………..

६) सहावा प्रकार  म्हणजे, पत्रकार ब्लॉगर्स , जे फक्त आपल्या बातम्या किंवा मते ब्लॉग वर पोस्ट करतात – आणि बातम्या किंवा त्यांची मतं पण अशी की जी त्यांच्या पेपरच्या मता विरुद्ध आहे अशी.. पत्रकारितेत  स्वतःचे खरे विचार छापणे शक्य नसते, म्हणून हे पत्रकार आपले खरे विचार आपल्या ब्लॉग वर पोस्ट करत असतात.

७)सातवा प्रकार म्हणजे,   सो कॉल्ड उच्चभ्रू ब्लॉगर्स, त्यांना वाटते की आपण अगम्य, कोणाला न समजणारे,  लिहिले की आपले लेखन फार उच्च दर्जाचे होते. मग हे ब्लॉगर्स आधी साधारण मराठी मधे पोस्ट लिहितात, नंतर त्यातले सगळे साधे साधे शब्द काढून त्या ऐवजी खूप कठीण अगम्य शब्द टाकून पोस्ट शक्यतो क्लिष्ट करण्याचा प्रयत्न करतात,  आणि मग शेवटी पोस्ट आपल्या ब्लॉग वर टाकतात.   स्वतःला वरच्या दर्जाचे समजल्यामुळे इतरांच्या फालतू ब्लॉग वर कॉमेंट्स देणे यांना कमीपणाचे वाटते.

८) आठवा प्रकार  म्हणजे कथा   लिहिणारे ब्लॉगर्स.  हे ब्लॉगर्स नियमित पणे  फक्त कथा लिहत असतात.

९) नऊवा प्रकार म्हणजे,  ट्रान्सलेशन मास्टर्स ,इंग्रजी कथा- कादंबऱ्यांचे ( बहुतेक वेळेस जेम्स हेडली चेसच्या – कारण या कथांमधे पात्र संख्या कमी असते, त्यामुळे मराठी मधे लिहीणे सोपे होते)  मराठी कादंबरी मधे, धारावाहिक म्हणून  रुपांतर करतात. एकदा एखादी कादंबरी घेतली की पुढचे दोन तीन महिने काय लिहावे याचा प्रश्न नसतो. जितके जास्त भाग, तितके जास्त पेज हिट्स… 😀

१०) दहावा प्रकार म्हणजे, हे ब्लॉगर्स सठी सहामाशी लिहणारे, म्हणजे यांच्या लेखनाची फ्रिक्वेन्सी फार कमी असते. ब्लॉग वर जास्त लिहीणे म्हणजे यांना कमीपणाचे वाटते.  लिहिण्यापूर्वी हे लोकं खूप विचार करत बसतात, काय लिहायचं आहे, हे ठरवायलाच यांना काही महिने लागतात, एकदा ठरले की मग त्यावर सगळी माहिती गोळा करतात बसतात. लेख कन्सिव्ह होणं, आणि प्रत्यक्षात ब्लॉग वर पडणं या मधे बरेचदा दोन एक महिने पण लागून जातात. यांची पोस्ट पब्लिश होण्यापूर्वी ड्राफ्ट मधे कमीत कमी दोन- तीन  महिने तरी असते, आणि दहा वेळेस तरी अपडेट केली ( बदलली ) जाते.

११) अकरावा प्रकार म्हणजे,    ट्रेकर ब्लॉगर्स. ह्या लोकांची एक सवय असते. एकदा पाऊस पडला, आणि ट्रेकिंगचा सिझन सुरु झाला, की ह्यांचा ब्लॉग पण सुरु होतो.  कुठेही ट्रेक ला जाऊन आले की मग यांच्या ब्लॉग वर उत्कृष्ट फोटो, माहिती वाचायला मिळते. बहुतेक ब्लॉगर्स हे आयटी इंजिनीअर्स, कम्प्युटर इंजिनिअर्स आणि  फोटोग्राफीची आवड असणारे असतात.  यांच्याकडे अती उच्च प्रतीचा डिएसएलार असतो आणि फोटो काढण्याची कला पण यांनी डेव्हलप केलेली असते. यांचे ब्लॉग खरोखर दॄष्टीसौख्य देणारे असतात. हे ब्लॉगर्स  फक्त ट्रेकिंगच्या काळातच अ‍ॅक्टीव्ह होतात, आणि इतर काळ सुप्तावस्थेत असतात.

१२) बारावा प्रकार म्हणजे,  माहितीपूर्ण लेख  लिहणारे ब्लॉगर्स,  जे काही वाचलेले असते ते सगळे आपल्या ब्लॉग वर लिहून काढतात. माहिती, माहिती आणि फक्त माहिती असणारे  रटाळ लिखाण, ज्या मधे काहीही पर्सनलाइझ्ड  टच नाही असे लिखाण. या  लिखाणामुळे यांचा वाचक लवकरच कंटाळतात आणि ब्लॉग वर जाणे बंद करतो.

—यांच्या मधेच काही माहितीपूर्ण ब्लॉग लिहणारे खूप उत्कृष्ट ब्लॉग लिहीतात, आणि त्यांच्या लेखाचा दर्जा पण फार चांगला असतो आणि केवळ त्यामुळे  त्यांच्या लेखांची वाचक नेहेमीच वाट पहात असतात..

१३) तेरावा प्रकार म्हणजे ,  “स्वतःला “एलिट समजणारे” ब्लॉगर्स, या ब्लॉगर्स च्या दृष्टीने इतर सगळे ब्लॉगर्स हे कनिष्ठ दर्जाचे, आणि त्यांचे ब्लॉग हे वाचनीय नाहीत असे असतात, ( आणि तरीही हे लोक इतरांचे ब्लॉग नेहेमी वाचत असतात- इनव्हिजीबल मोड मधे ). ह्या ब्लॉगर्स चे ब्लॉग पण तुमच्या आमच्या सारख्या “सर्वसामान्य निर्बुद्ध” लोकांना वाचण्यासाठी उघडे ठेवलेले नसतात. ह्यांच्या कंपू मधले केवळ सात आठ लोकं ते ब्लॉग वाचू शकतात. या लोकांना असे वाटत असते की आपला ब्लॉग केवळ निमंत्रितांसाठी ओपन ठेवल्याने त्याची युएसपी वाढते, पण माझ्या मते प्रत्यक्षात यांचा ब्लॉग जरी उघडा ठेवला, तरीही  कोणी वाचणार नाही  किंवा कोणी त्याला कवडीचीही किंमत देणार  नाही , म्हणून हे लोकं आपला ब्लॉग बंद कुलुपात ठेवतात ,आणि स्वतःचे समाधान करून घेतात की “आपण फार उच्च दर्जाचे – एलीट ब्लॉगर आहोत” असा. हे ब्लॉगर्स कधीच कोणाच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया देत नाहीत, कोणाला प्रतिक्रिया देणे हे कमीपणाचे आहे असा यांचा समज असावा का?? असू दे .. आपल्याला काय करायचंय?

आणि हो , काही एलीट ब्लॉगर्स चे ब्लॉग ओपन आहेत सगळ्यांना वाचण्यासाठी. पण ते  ” फक्त  “दुसरे एलिट ब्लॉगर्स वाचतात आणि प्रतिक्रिया देतात.

१४) चौदावा प्रकार म्हणजे , लेखकांचे साहित्य एकत्र करणारा ब्लॉगर, एखाद्या मोठ्या  लेखकांच्या साहित्यावर प्रेम करणारा हा ब्लॉगर , त्यांचे साहित्य, कथाकथन, फोटो, आयुष्यातले प्रसंग कुठेही छापुन आले की  पुन्हा  आपल्या ब्लॉग वर पोस्ट करत असतो.

१५ )पंधरावा प्रकार म्हणजे, ज्योतिष शास्त्राधारावर,  ब्लॉग. या मधे बरेच ब्लॉगर्स लिहित असतात, पण धोंडॊपंतांचा ब्लॉग वरच्या लेव्हलचा म्हणजे नंबर एक चा मानला जातो. पत्रिकांचे व्यवस्थित केलेले विश्लेषण आणि इतर लोकांचे अनुभव त्यांच्या ब्लॉग वर वाचायला मिळतात.

१६) सोळावा प्रकार म्हणजे,  टेक्निकल ब्लॉग, हे ब्लॉगर्स आपल्या ब्लॉग  वर एखादे नावीन  मार्केटला आले की त्या गॅजेट्सची माहिती आपल्या ब्लॉग वर टाकत असतात. मग नवीन कम्प्युटर्स, सेल फोन्स, टॅबलेट्स वगैरे वगैरे सगळ्या वस्तूंचा  रिव्ह्य़ु  आपल्या ब्लॉग वर ते करत असतात.  आता इतकी माहिती लिहण्यासाठी ह्या  लोकांनी या सगळ्या गोष्टी वापरल्या असतीलच असा वाचकांचा गैरसमज होत असल्यास त्यांचा काय दोष?

१७) सतरावा प्रकार म्हणजे , जातीयवादी लिखाण करणारे ब्लॉगर्स . हे लोकं आपल्या ब्लॉग वर फक्त जातीयवादी लिखाण करतात. संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले ह्यांच्या नावाच सढळ वापर करून आपली पोळी भाजून घेण्याकडे या ब्लॉगर्स चा कल असतो. असे लिखाण करून एखाद्या जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना भडकवणे, किंवा त्यांचा पाठिंबा प्राप्त करून आपले नेते पद सिद्ध करण्याकडे हे ब्लॉग चा उपयोग करून घेतात. केवळ तिरस्कार तिरस्कार आणि केवळ तिरस्कारच या ब्लॉगर्स च्या मनात भरलेला असतो , ह्याची जाणीव यांचे लेख वाचतांना होत असते. यांचा वाचक वर्ग पण त्यांच्याच मनोवृत्तीचा असतो.

१८) अठरावा प्रकार म्हणजे केवळ पाक क्रियांचा ब्लॉग. बहुतेक वेळा रेसिपी मुद्दाम करून मग ट्राईड अ‍ॅंड टॆस्टेड अशी झाली  की करतांना फोटो  सहीत   ब्लॉग वर पोस्ट केली जाते. काही स्त्री ब्लॉगर्स ,  ज्यांचे ब्लॉग  पाक क्रियेला वाहिलेले नाही  त्या पण आपल्या ब्लॉग वर, फॉर अ चेंज म्हणून  एखादी रेसिपी, किंवा हस्तकला  पोस्ट करत असतात.

१९) एकोणीसवा प्रकार म्हणजे चित्रपट समीक्षक ब्लॉगर . हे  ब्लॉगर केवळ चित्रपट समीक्षा करत असतात. मग भारतातील हिंदी, मराठी, इंग्रजी किंवा अगदी फ्रेंच सिनेमाचे परीक्षण पण यांच्या ब्लॉग वर पहायला मिळते.

२०) विसावा प्रकार म्हणजे राजकीय  ब्लॉगर्स. हे एखाद्या पक्षाच्या विचारधारेशी बांधलेले असतात, आणि त्या पक्षाला सपोर्ट करत असतात.

२१) एकविसावा प्रकार म्हणजे माझ्या सारखे ब्लॉगर्स , समोर जे काही दिसेल त्यावर लिहणारे. प्रवासाला गेले, तर प्रवास वर्णन, राजकीय़, सामाजिक, खादाडी, विनोदी अगदी कुठलाही विषय वर्ज नसतो. यांच्या ब्लॉगला   साहित्यिक व्हॅल्यु अजिबात नसते, पण तरीही हे लोकं मात्र न चुकता आपले लेख पोस्ट करत असतात.

एक बाकी खरं , की वर दिलेल्या प्रत्येक ब्लॉगर चा स्वतःचा एक वेगळा वाचक वर्ग असतो. त्यांना क्रिटीसाइझ करणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांचं लिहिलेलं आवडलं नाही तर त्यांना समज देणारा.. आणि हा असा वाचक वर्ग आहे म्हणूनच   ब्लॉग   आहेत..

सगळे ब्लॉगर्स हा लेख  वाचून आपण कुठल्या प्रकारात मोडतो ह्याचा विचार नक्कीच करतील , पण मित्रांनो, हे पोस्ट जास्त सिरियसली घेऊ नका.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in इतर. and tagged , , . Bookmark the permalink.

73 Responses to मराठी ब्लॉगर्सचे प्रकार ..

 1. ruchira2702 says:

  हा हा हा… हसुन हसुन पोट दुखायला लागलं अन प्रत्येक प्रकारासोबत किमान दोन-तीन ब्लोग तरि डोळ्यासमोर तरळुन गेले… मस्तच

  • रुचीरा
   प्रत्येक प्रकारच्या ब्लॉग ची लिंक देणार होतो. पण नंतर राहू दिलं.. 🙂 उगीच कोणावर टिका करण्याचा मला काय अधिकार हा विचार मनात आला, आणि लेख एकदम सौम्य केला.

 2. झकास
  फारच सौम्य भाषेत तुम्ही ही ब्लॉगर गटांचे वर्गीकरण बोलीभाषेत पंचनामा केलात.
  आम्ही तुमच्यासारखे वाट्टेल ते पंचतारांकित सदराखाली देतो.
  म्हणजे मद्य तेच फक्त बाटली उंची आणी विदेशी ,

  ह्यात सर्व गटात अनिवासी ब्लॉगर असा एक प्रकार असू शकतो ,
  मराठी भाषेला ,मातीला मुकलेल्या पैलतीरी ब्लॉगर लोकांचे सुद्धा वर्गीकरण होऊ शकते , त्यांच्यात आणि मराठीमधील प्रख्यात साहित्यिकांच्या मध्ये एक साम्य असते.

  मराठीतील आघाडीच्या व प्रतिष्ठित साहित्यिकांची मुले परदेशात असतात तसे अनिवासी ह्यांची मुलेच काय ते खुद परदेशी असतात.
  एक फरक एवढाच आहे की ते ह्या निवासी साहित्यिकांच्या सारखी मराठी वाचवा ,जगवा अश्या घोषणाबाजी करत नाहीत.

  • निनाद,
   सौम्य भाषा मुद्दाम वापरली.सगळे ब्लॉगर्स आपले मित्रच आहेत, तेंव्हा सहज करमणूक म्हणून लेख लिहिलाय हा.
   परदेशी ब्लॉगर्स पण या वरच्याच प्रकारात मोजले आहेत , मुद्दाम वेगळा वर्ग करता आला असता 🙂

   • Vidya says:

    Yes, Pardeshi bloggers have their own type I feel. We are always nostalgic about the things in India and have emptiness in life and have too many complex issues that come from too much comfort. 🙂
    -Vidya.

    • विद्या,
     परदेशी राहिले की असे एकटेपणा वाटणे, देशभक्ती, रसिकता जपणे अपरिहार्य आहे असे वाटणे, आणि त्यातून ब्लॉगिंग सुरु होणे असेही होते बरेचदा. भारतात असतांना ज्या गोष्टींकडे कधी चुकुनही लक्ष दिलेले नसते, तेच फार हवे हवेसे वाटू लागते, आणि एकटेपणा.. तो तर सदान कदा खायला उठलेला असतो.

 3. arunaerande says:

  काही माझ्यासारखे, चांगले चांगले ब्लो‘ग वाचून प्रतिक्रिया देणारे पण असतात,. आपल्यला सुचलेलं दुसर्‍याने किती समर्पक्पणे मांडले आहे याचे कौतुक करतात.

  • अरुणा

   तुमच्यासारख्या दर्दी वाचकांमुळेच तर ब्लॉगिंग सुरु आहे. जर कोणी वाचणारंच नसतं तर कोणी लिहिलं असतं का? अजिबात नाही!

 4. Tanvi says:

  >>>>एक बाकी खरं , की वर दिलेल्या प्रत्येक ब्लॉगर चा स्वतःचा एक वेगळा वाचक वर्ग असतो. त्यांना क्रिटीसाइझ करणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांचं लिहिलेलं आवडलं नाही तर त्यांना समज देणारा.. आणि हा असा वाचक वर्ग आहे म्हणूनच ब्लॉग आहेत.. +++++ 🙂

  • तन्वी
   सगळ्या लेखातलं ते वरचं वाक्यच काही व्हॅल्यु अ‍ॅड करणारे.. बाकी लेख काय वाटेल ते.. 🙂

 5. मंदार says:

  🙂 hahaha

  माझ्यासारखे प्रतीक्रीयेपुरते ब्लॉगर किंवा (wanna be bloggers) नाहीत का यात?
  इतक्या सहज पणे आणि प्रचंड वाचनीय स्वरुपात लिहिणे महाअवघड गोष्ट आहे.
  थोडा काही कधी मी पण प्रयत्न करतो लिहिण्याचा पण मनासारखे नाही वाटले कधीच म्हणून लगेच इरेज करून टाकतो,असे ४ ५ दा झालंय,काय माहिती कधी जमेल मनासारखे लिहायला…

  • मंदार
   प्रतिक्रियेपुरते ब्लॉगर्स पुढे ब्लॉगींग करू शकतात. लिहायची सवय झाली की ब्लॉग लिहीणं काही कठीण नाही..जसे जमेल तसे पोस्ट करत जा. हळू हळू लिखाणाचा फिल येतो, आणि जमतं मग सगळं काही आपोआप.

 6. Aditya Patil says:

  छान! आवडला ब्लॉग

  ह्याची एक अजून बाजू आहे. तो म्हणजे प्रस्थापित किंवा नवोदित. प्रस्थापित हे लोकांनी उचलून धरलेले ब्लॉगर्स कारण त्यांना लोकांना काय आवडते याची नाडी समजलेली असते. नवोदित हे प्रस्थापित बनण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात! किती काळ प्रयत्न करावा ह्या बाबतची प्रत्येक नवोदिताची चिकाटी वेगवेगळी असते!

  • आदित्य
   ब्लॉग वर स्वागत. प्रस्थापित ब्लॉगर होण्यासाठी स्वतःला जे आवडेल ते लिहीणे सुरु केले की झाले. मनापासून लिहिले , की ते बरोबर लोकांच्या मनापर्यंत पोहोचते.
   नवोदितांनी फक्त पेशन्स ठेवून नियमीत लेखन केले की झाले., वाचक आपोआपच येतात वाचायला. 🙂

 7. bageshrik says:

  He post mala sagalyat jast aavadali.
  To Ruchira: अन प्रत्येक प्रकारासोबत किमान दोन-तीन ब्लोग तरि डोळ्यासमोर तरळुन गेले… मस्तच- +1
  aani kaka tumhala +100.

 8. स्नेहल says:

  बाप रे इतके प्रकार आहेत का? मस्तच मला माहित नव्हते………:) 😀

 9. hasa leko says:

  kaka
  Kahi bloggers adsense sarkhya jahiurati laun paise kamavnyastahi blog kartata,content kami ani jahirati jast,ashya bloggers che pan taka na rao

  • जाहिराती करून पैसे कमावणारे मराठीमधे फार नाहीत.. 🙂 फक्त एक दोन प्रोफे्शनल ब्लॉगर्स मला माहिती आहेत. 🙂 तरी पण तो एक प्रकार नक्की होऊ शकतो.

 10. anuvina says:

  नेहेमी प्रमाणेच “काय वाट्टेल ते” आणि वाचनीय. पण साहेब या मुळे थोडा घोटाळा झालाय. जरा सांगाल का माझा नंबर कुठला ते? लई कन्फुज करून टाकलंयसा.

 11. सुंदर .
  म्हणजे मी १ आणि ११ नंबर मध्ये येतोय 🙂

 12. Kanchan S says:

  Ultimate!!

 13. chetan says:

  हा हा हा

 14. aniket says:

  You forgot Automotive blog. They keep writing about Automobiles which has huge fan following. Blog is the way to express yourself. SO nothing wrong about writing anything what he or she thinks.
  Anyways your blogs are always good. Keep writing.

  • अनिकेत
   फक्त मराठी ब्लॉग कन्सिडर केले होते म्हणून ते सुटले. मराठी मधे अजून तरी कोणी ऑटॊमोबाईल ब्लॉगर नाही .

 15. ह्म्म …… 🙂
  महेंद्र….. आता तू विचार करण्यास भाग पाडलंस 😉
  कशाला उगीच वर्गवारी केलीस……. छान शांतपणे ” काय वाटेल ते” लिहित होते रे ….. आता प्रत्येक पोस्ट टाकतांना आपण कुठल्या वर्गात “मोडणार”(?) हा विचार मनात नक्की येणार 🙂

  • जयश्री
   हा हा हा.. खरं तर बहूतेक ब्लॉगर्स हल्ली काय वाटॆल ते कॅटॅगरी मधे मोडायला लागले आहेत हल्ली. आणि कुठलीही कॅटॅगरी चांगली किंवा वाईट म्हटलेले नाही 🙂 तेंव्हा चिल, आणी कर एखादं मस्त पोस्ट!

 16. काका,

  अजून एक category 🙂 ज्यांना आत्मविश्वास कमी असतो म्हणून ब्लोग्स publically publish न करणरे. पण ते एलिट bloggers खचितच नसतात. Trust me.

  भक्ती

  • भक्ती
   माझं पण तेच मत आहे. हे लोकं स्वतःला फार वरच्या दर्जाचे समजतात, आणि त्यांचा समज करून द्यायला त्यांचा कंपू असतोच. अगदी सुरुवातीला यांच्याबद्दल एक आदरयुक्त रिस्पेक्ट वाटायचा. आपल्याला तसं लिहिता येत नाही, हा न्युनगंड पण असायचाच. नंतर लक्षात आलं, की हे सगळे फारच उथळ आहेत.बेस्ट वे, दुर्लक्ष करणे:) आणि तेच करतोय सध्या तरी.

 17. Aparna says:

  पोस्ट आवडण्यात आली आहे काका….मागे एकदा वाचकांचे प्रकार लिहिले होते त्याची आठवण झाली.
  बाकी एवढ्या एकवीस जाती असतील असा खरंच विचार केला नव्हता..
  काही जातींचं तुमचं वर्णन एकदम लोळमलोळीयुक्त आहे….:) प्रकार नववा आणि तेरावा…खासच….:D

  • अपर्णा,
   वाचकांचे प्रकार लिहिले होते मी?? शोधतो आता कुठेआहेत ते. हल्ली पूर्वी काय काय लिहिलंय ते आठवत पण नाही.:) सगळेच प्रकार आपल्या नेहेमीच्या पहाण्यातले आहेत. सगळ्यांच्या लिंक देण्याचा मोह होत होता, पण आवरला 🙂

 18. हाहाहा.. अपर्णा+१.. नववा आणि तेरावा भन्नाट प्रकार आहे !

 19. हा हा हा …. प्रकार ९ आणि १३ माहित आहेत..

  प्रकार २ मध्ये एक सेकंडरी प्रकार… इतरांचे लेख टाकून जाहिराती लावून पैसे छापणारे 😉

  • सुहास
   सगळेच प्रकार आपल्या माहिती मधले आहेत. 🙂 अरे इतकं वैविध्य आहे म्हणून तर मराठी ब्लॉग विश्व बाळसं धरतंय 🙂

 20. Shweta Kale says:

  Itar marathi blog vachat nasalyamuLe blogche itke prakar mahit navhate. Lekh vachun maja aali. Tumcha blog matra niymitpane vachate. Engineer asunahi tumche marathi likhan apratim aahe. Mala vatate tumchyakade likhanachi naisargik pratibha aahe. Nidan aamchyasarkhya vachakankarita tari tumcha blog akhand chalu rahava hi sadichchha karan aamha vachakansathi tumhi blogsamrat aahat.

  • श्वेता
   इतकी तारीफ केली की मला आता हरबऱ्याच्या झाडाची फांदी मोडेल असं वाटतंय..
   एक आतली गोष्ट सांगू का ? बहूतेक ७० टक्के ब्लॉगर्स हे इंजिनिअर आहेत , त्यातल्या त्यात जास्त आयटी/ किंवा कम्प्युटर वाले 🙂
   माझे पण सुरुवातीचे लेख पहा , भरपूर इंग्रजी शब्द वापरायचो मी, पण नंतर मात्र हळू हळू सरावाने मराठी जमायला लागलं. चार वर्ष ब्लॉगिंग , आणि ते पण नियमीत करतोय, उत्साह शिल्लक आहे अजून तरी.. 🙂

 21. Manasi says:

  मस्त जमलाय लेख!
  Elite Bloggers चे ब्लॉग वाचण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण ते डोक्यावरुन जातात, काहीही कळत नाही- मराठीत असूनही!
  पुलंनी या अशा लेखकांची खूप खिल्ली उडवली आहे (नानू सरंजामे वगैरे). ही अगम्य लेखन लिहिणाऱ्यांची जमात अजूनही शाबूत आहे आणि ब्लॉग लिहिते आहे याचं कौतुक वाटतं!

  • मानसी,
   हे सो कॉल्ड एलिट ब्लॉगर्स , माझ्या पण डोक्यात जातात. हल्ली दुर्लक्ष करतो, आणि त्या ब्लॉग वर जाणे पण थांबवले आहे. तसाही मला फक्त ललित लेखन जास्त आवडतं. कथा, कादंबऱ्या वाचण्याचा आणि तो ही इन्स्टॉलमेंट मधे – माझा पिंड नाही. इन्स्टॉलमेंट मधे कथा मह्णजे , आज एक घास खायचा, दोन दिवसानंतर दुसरा, आणि मग चार दिवसानी पाणी प्यायचं, पोट कधी भरेल ???.. सगळी मजा निघून जाते कथेमधली.असो.

 22. अमित आरोसकर says:

  काका
  एक मोठठा ब्लोगरचा वर्ग म्हणजे शेयरबाजार वाले. आपल्या मनाला येईल ते लिहितात परत त्याचा फॉलोअप नसतोच

  • अमित
   शेअर बाजारवाल्यांना कोणी सिरियसली घेत नाही :)ते आपले जे वाटेल ते लिहितात, आणि कोणीवाचलं तरी ठिक, नाही तरी ठिक असा त्यांचा बाणा असतो.

 23. Dipak Warade says:

  I am vbig fan of yours :)thanks

 24. Sanjivani says:

  हा , हा , हा …
  हा विषय तुम्हीच लिहू शकता

  • संजिवनी
   धन्यवाद. मला ११ नंबर आणि १३ नंबर बद्दल लिहायचं होतं, म्हणून हे पोस्ट लिहायला घेतले.

 25. आमच्या निषेधाचीही नोंद घ्या…
  http://majhyamanatalekahee.blogspot.in/2010/08/blog-post_22.html
  तसं तुमचं ब्लॉग वाचन माझ्याहून जास्त आहे, त्यामुळे इतके सगळे प्रकार मी वाचले नसले तरी फक्त ऐकूनच होतो यांच्याबद्दल.
  २१ माझा आवडता अंक आहे. त्यामुळे मी २१ व्याच गटात आहे. लिखाणात सातत्य नाही एवढेच.

  • सागर
   वाचला 🙂 अरे ते वर्ड व्हेरीफेकशन काढून टाक.. कॉमेंट देतांना खूप त्रास होतो, एक तर ते चित्र दिसत नाही, आकडे चुकले की कॉमेंट पब्लिश होत नाही..
   दुसरे.. लेख छान लिहिला आहे..

 26. bhanasa says:

  हाहा… एकदम मस्त वर्गवारी! आवडेश! ७ व १३ वा प्रकार जबराच, :D. मला २१वा भावतो. 🙂

  तीनचार वेळा वाचला लेख आणि कॉमेंट्सही. मजा आली. बाकी ’ व्यक्ती तितक्या प्रकृती ’ ! !

  • श्री,
   धन्यवाद. गेले तीन दिवस सारझा मिटींग मधे बिझी असल्याने नेट वर नव्हतोच. म्हणून उत्त्तराला वेळ लागतोय.
   किती ब्लॉगर्स ओळखले??

 27. Vinayak Belapure says:

  मस्त वर्गीकरण
  महेंद्र तुमच्या ब्लॉगला साहित्यिक मूल्य नाही असे भले तुम्हाला वाटो.
  पण मला वाचायला आवडतो.

  • धन्यवाद. अहो तुमच्या सारख्या उत्साह वाढवणाऱ्या लोकांमुळेच तर ब्लॉग सुरु आहे. नाही तर लोकसत्ताच्या अभिजीत ताम्हणे सारख्यांबी तर जाहीर उद्धार केला होता आमचा.
   असो.पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

 28. . says:

  काका ब्लॉगर्सच्या लिंक्स द्या तरच खरी मजा येईल. वर्गीकरण बिनधास्त केलेले बाकी आवडले..

  • जास्त पर्सनलाइझ्ड अटॅक करायला मी काही अभिजीत ताम्हणे नाही 🙂 आणि हा लेख लोकसत्ता मधे पण येणार नाही .
   सगळे ब्लॉग तुमच्या लक्षात येतील, काही अवघड नाही.
   समझने वाले को इशारा काफी होता है म्हणतात 🙂 आणि मरठी ब्लॉग वाचक तेवढा समजदार आहेच..

 29. Manisha says:

  मी ब्लॉगर प्रकार दहा! खुप काही डोक्यात घोळत असते, पण प्रत्यक्ष ब्लॉगवर काहीच उमटत नाही… (ड्राफ्ट मध्ये खरंच पोस्ट आहे. 🙂 ) कमीपणा लिहायचा नाही वाटत , पण ब्लॉगर म्हणुन घ्यायला मात्र वाटतो. काय आहे कि आमचे लिखाण आमचे मित्रच तर वाचणार याची खात्री असते 🙂 …. आता मात्र प्रयत्नपुर्वक लवकर पोस्ट लिहणार…

  • मनिषा,
   लिहीतांना लोकांना काय आवडेल ह्याचा विचार न करता, स्वतःला काय आवडेल ते लिहीत जायचे. माझ्या पण बऱ्याच पोस्ट मनातआले म्हणून लिहिले अशा आहेत. पोस्ट लिहायला फार तर एक दोन तास द्यायचे आणि झालं की पब्लिश करून टाकायचं झालं!
   लिहित रहा.. हात लिहिता ठेवला की आपोआपच सुचत जाते नवीन काही तरी.. :).

 30. मस्त लिहिलार लेख छान वर्गिकरण केलत छान वाटलं
  काहीजण म्हणतात की माझा ब्लॉग १२,१६ च्या प्रकारात् येतो तर काहींचं म्हणन आहे की १७ व्या प्रकारात येतो
  पण खरं कोण जाणुन घेत नाही ना .

  • धाकलं पाटील,
   ब्लॉग वर स्वागत, आणि कुठल्याही प्रकारात मोडला तरी काय फरक पडतो. शेवटी ब्लॉगर म्हणजे ब्लॉगरच!

 31. Sandip Joshi says:

  Mahendra ji !
  maza numbar 2 madhe samavesh hotoy.

 32. Harshal says:

  हो खरच पटलं. मी त्यापैकी काहीसा १ ० व्या प्रकारात येतो. कमीपणाचे नाही वाटत पण फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे . काय लिहावे हा प्रश्नच पडतो . 🙂

  • हर्षल,
   ब्लॉगिंग हे स्वतःला एक्स्प्रेस करण्यासाठी असतं, कोणी दररोज लिहीण्य़ाचा प्रयत्न करतात काही लोक कधी तरी. त्यात कमीपणा कसला? प्रत्येकाची स्टाइल आहे ती. मी पण नियमीत पणे महिन्यात दोन – तीन पोस्ट टाकतो.

 33. सौ. विजयता मकरंद कुलकर्णी says:

  भारीच

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s