एका स्वप्नाची गोष्ट..

politician-350_052812014256अहो, चहा घेता ना? म्हणून सीमा वहिनींनी चहाचा कप घेऊन राजा भाऊंना आवाज दिला. रात्री उशीरापर्यंत पुस्तक वाचत बसले होते, त्यामुळे अंमळ जास्तच झोप लागलेली दिसत होती. राजा भाऊंच्या चेहेऱ्यावर झोपेत पण हसू दिसतं होतं.डोळ्याची बुब्बुळं पापण्यांच्या खाली गर्र गर्र फिरत होती. बहुतेक कुठलं तरी  स्वप्न पडलं होतं ते! काहीतरी गमतीशीर असावे, कारण चेहऱ्यावरचे हसू दिसत होते.

स्मिता वहिनींनी हातातला कप टिपॉय वर ठेवला ,आणि राजा भाऊंच्या शिल्लक असलेल्या केसावरून हात फिरवला, आणि काय आश्चर्य, अहो सीमा वहिनी चक्क स्वप्नात शिरल्या राजा भाऊंच्या!.  क्षणभर त्यांना पण काही समजलं नव्हतं, पण समोरचं राजा भाऊंचं स्वप्न त्या पण पाहू लागल्या.   नवऱ्याच्या स्वप्नात जायचं भाग्य कुठल्या स्त्रीला लाभत का? पण सीमा वहिनींना ते लाभलं होतं, म्हणून त्या पण खूप खूष होत्या.

राजाभाऊ  मुलाखत देत होते.  तयार होते. एका मोठ्या पेपरचा पत्रकार मुलाखत घेण्यास आलेला दिसत  होता. राजा भाऊंच्या अंगावर  परीट घडीचे कडक स्टार्च केलेले कपडे, डोक्यावर पक्षाची ट्रेडमार्क टोपी , समोर उघडलेला लॅपटॉप, टेबल वर चहाचा कप, अ‍ॅशट्रे मधे जळणारी अर्धी सिगरेट ( अरे.. सिगरेट कधी काय सुरु केली ??  नाही.. स्वप्न आहे हे चालू दे.. सीमा वहिनीनी स्वतःलाच बजावले ) हे असं सगळं  म्हणजे लॅपटॉ वगैरे समोर असला, की आपलं खूप इम्प्रेशन पडतं असा समज होता नेताजींचा.अरे हे काय? सीमा वहीनी एकदम आश्चर्याने ओरडल्या- राजाभाऊ नेते कसे काय झालेत? स्वप्न आहे ना, चालायचंच, अगदी राजा भाऊंच्या मांडीवर त्यांची आवडती हिरोईन  जेनिफर अ‍ॅनस्टन ( फ्रेंड्स मधली हो, तीच ती ब्रॅड पिट ची एक बायको  ) जरी बसलेली दिसली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. शेवटी काय, स्वप्नच आहे ना?? म्हणून त्यांनी पण स्वप्न एंजॉय करणं सुरु केलं.

नेताजी बोलू लागले,  समोरचा पत्रकार टिपण घेत होता. नेताजी म्हणाले, मी नॉन स्टॉप बोलणार आहे,   कॉलेज मधे असल्यापासूनच राजकारणात खेचल्या गेलो- आणि कसे.. त्याची पण एक गंमतच आहे!  तर काय झालं , की मी एका मुलीच्या प्रेमात पडलो,  चांगलं वर्षभर नेकिंग सुरु होतं, लोकांना असंही वाटायला लागलं होतं की तिच्याशीच मी लग्न करणार, पण तसे होणॆ नव्हते .

एक दिवस कॉलेजच्या कॅन्टीन मधे बसलेलो असतांना एक सुंदर मुलगी एफई ला आलेली दिसली,   आणि मग मी  पाहिल्या  बरोबर तिच्या प्रेमात पडलो. पहिल्या मैत्रिणीला  सोडून दुसरीच्या मागे लागलो. तिच्याशी लवकरच  मैत्री झाली, आणि लवकरच ती   पण माझ्या प्रेमात पडली.

हे सगळं पाहिल्यावर , की हा साला, दिसायला सुमार असलेला राजाभाऊ, कशा काय सुंदर मुलींना गटवतो, म्हणून  कॉलेज मधली इतर मुलं माझ्या कडे सल्ला मागायला येऊ  लागले. आता मी काय लव्हगुरु वगैरे नव्हतो, पण तरीही आपल्या कडून जेवढी मदत करता येईल तेवढी लोकांना करायचो. एक नवीन क्लब सुरु केला , ” बर्ड कॅप्चरर्स”  नावाच !   सर्वानुमते क्लबचा प्रेसिडेंट मीच निवडल्या गेलो .  तर  ही माझी पहिली लिडरगीरी.  या नेतागिरी मुळे सगळीकडे नाव फेमस झाले होते.  अहो इतके, की अगदी कॉलेज मधले अविवाहित लेक्चरर्स पण माझ्याकडून टिप्स मागायला यायचे . दिवस मस्त चालले होते ,  नेतागिरी अंगात भिनली होती.

कसं कोणास ठाऊक, पण  नशिबाचे खेळ बघा, ज्या मुलीच्या प्रेमात पडलो, तिच्याशीच लग्न करावे लागले ( आता का करावे लागले, ते तुम्ही समजून घ्या) . लग्न झालं आणि प्रेयसी जेंव्हा  बायको झाली, तेंव्हा तिचे वागणे एकदम बदलले.तुझ्या साठी काही पण करीन म्हणणारी, कधी तुला उशीरा आलास तरी का उशीर झाला विचारणार नाही म्हणणारी, मित्रांसोबत कट्टा करायला पण कधी आक्षेप घेणार नाही म्हणणारी,  एकदम  बदलली, आणि आमचे मित्र, कट्टा, गपा, ट्रेकिंग सगळं काही बंद पडलं. पत्नी वास सुरु झाला होता माझा. नेताजी डोळ्यांच्या कडा पुसत म्हणाले.

या अशा मानसिक त्रासा  मुळे जीव वैतागला होता. एक दिवस बार मधे बसलो होतो, तर तिथे आपल्यासारखेच समदुःखी दहा बारा मित्रं भेटले, सगळ्यांची दुःख सारखीच होती- सगळेच पत्नी पिडीत! एक आयडीया सुचली,  एक क्लब का सुरु करू नये पत्नी पिडीतांचा? अशा तऱ्हेने   ” पत्नी पिडीत क्लब” ची स्थापना झाली.  एकदा हा क्लब सुरु झाला, आणि हजारो . लाखो लोकं याचे मेंबर झाले.  एखाद्याला बायकोने मारले, की तो माझ्या कडे यायचा, मग माझ्या पेपर मधल्या मित्रांना विनंती करून त्याची बातमी छापून आणायचो पेपर मधे, मोर्चा न्यायचा त्याच्या घरावर . असं होता होता ,माझं नाव पण  एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नियमित पणे पेपर मधे यायला लागलं.  तशी लोकांना मदत पण तर होत होतीच, पण सोबतच आपलंही नाव मोठं होत होतं. ह्या पत्नी पिडित क्लब मुळे बायको पण जरा सांभाळून वागायला लागली हा सगळ्यात मोठा फायदा.

आता हे पण दिवस तसे बरेच जात होते. लवकरच कॉर्पोरेशनची निवडणूक  आली , आणि एकदिवस आमच्या भागातल्या एमएलए ने बोलावणे पाठवले आम्हाला. भेटायला गेल्यावर नेताजी म्हणाले, आता कार्पोरेशन निवडणूक आहे, तुम्ही लढवणार का? राजाभाऊ बोलत होते, अगदी नॉन स्टॉप, म्हणाले, का नाही? अवश्य उभा राहीन मी, तसाही इंजिनिअर होऊन असा कितीसा पैसा मिळणार आहे? त्या पेक्षा हे बरं. आणि आम्ही ती निवडणूक जिंकली.

“आता कार्पोरेशन च्या निवडणुकीचे ठीक आहे , पण तुम्ही एकदम एमएलए साठी कसे काय उभे राहिलात?” पत्रकाराने विचारले.

राजाभाऊ म्हणाले, “अहो काय झालं, एकदा रविवारचा दिवस होता, बायको माहेरी गेली होती, मग उगाच काहीतरी टाइम पास करायचा म्हणून फिरत होतो. तर एके ठिकाणी एक रांग दिसली, ती रांग सिनेमाची रांग असेल म्हणून  रांगेत उभे राहिलो, आणि नंतर जेंव्हा आमचा नंबर आला, तेंव्हा समजलं, की सत्ताधारी पक्षाची लोकसभेच्या इलेक्शन तिकीट वाटपाची रांग होती !  आता  मला तिकीट  मिळालं, म्हणून इलेक्शन लढलो, आणि निवडून पण आलो-  नशीबाचा खेळ आहे सगळा.”

तो पत्रकार म्हणाला, आता मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, अगदी अजिबात विचार न करता उत्तर द्यायचं.. पहिला प्रश्न, इलेक्शन पूर्वी तुम्ही खूप कोमल होते, अगदी  फुला सारखे  मुलायम बोलायचे, तुमच्या आवाजात अगदी मध टपकायचं.. आणि एकदा निवडून आल्यावर मात्र तुम्ही अगदी दगडा प्रमाणे कठॊर  झालात असे का??

राजाभाऊ म्हणाले, ” अहो इलेक्शन पूर्वी लोकांना फुलं गोळा करून त्याच्या माळा करायच्या असतात, म्हणून आम्ही तसे नरम, मुलायम, फुलासारखे होतो, पण एकदा निवडून आल्यावर मात्र  “त्याच लोकांना ” दगडच लागतो – पूजा करायला!” म्हणून आम्ही दगड बनतो.

तेवढ्यात त्यांचे धाकटे कन्यारत्न ओरडत आले, ” अई, डबा दे, शाळेची वेळ झाली, आणि  त्याच क्षणीच सीमा वहिनी स्वप्नातून बाहेर पडल्या ” आणि राजाभाऊंना गदागदा हलवून ऊठवत , जोरात ओरडल्या, ” अहो, ऑफिसला जायचय ना? आणि डोळे चोळत उठलेल्या राजाभाऊंच्या हाती चहाचा कप  दिला, राजाभाऊ पण तो पत्रकार कुठे दिसतोय ते शोधत बसले होते, आणि  वास्तवात परत येण्याचा प्रयत्न करत होते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , , . Bookmark the permalink.

28 Responses to एका स्वप्नाची गोष्ट..

 1. arunaerande says:

  स्वप्नरंजन किती छान असते नाही?

  • होय ना.. खरंच स्वप्न पडलं होतं असं 🙂 थोडं रिफाइन्ड केलंय म्हणा, पण खरं स्वप्न आहे हे..

 2. हा हा हा … मस्त !!

  पुढल्यावेळी राजाभाऊंची राजकीय वाटचाल दिसू देत स्वप्नात 😉

 3. नारायण मूर्ती म्हणतात, ”स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात आणा”. ही स्वप्ने दिवास्वप्ने नसतात तर व्यावहारिक जगाच्या नियमांचा अभ्यास करून मांडलेली भावी योजना, नियोजन, कठोर परिश्रमांचा पाठपुरावा व आराखडा असतात.

  तेव्हा
  आम आदमी कि आम पार्टी

  राजां भाऊ आगे बढो ,हम आपके साथ हे
  और याद रखना
  स्विस बेंक ,हमारे घर के पास हे.

  • तसाही स्विस बॅंकेत एक अकाउंट उघडला होताच अंबानी सोबत झुरीचला गेलो होतो तेंव्हा 🙂 तरी पण तुझ्या घराजवळच्य बँकेतही उघडायला काही हरकत नाही . आणि ही स्वप्न फक्त स्वप्नच असतात सामान्य माणसांसाठी 🙂 वास्तवात त्यांचं काही खरंहोण्य़ाची शक्यता लाखात एक असते.

 4. Tanvi says:

  🙂 🙂

  >>>पुढल्यावेळी राजाभाऊंची राजकीय वाटचाल दिसू देत स्वप्नात 😉 ++ 🙂

  • तन्वी,
   स्वप्न हे स्वप्नातच बरं वाटतं. वास्तव आणि स्वप्न एकच झालं तर ……. .. विचार करतोय काय होईल याचा. 🙂

 5. hasa leko says:

  नवऱ्याच्या स्वप्नात जायचं भाग्य कुठल्या स्त्रीला लाभत का?

  para stree la :p

 6. Kanchan S says:

  Swapn Chan Rangavlay!!!!

  • कांचन,
   शेवटी मध्यमवर्गीय माणूस दुसरं काय करू शकतो? जे मनात असतं कुठेतरी दडलेलं , तेच स्वप्नात पहात असतो.

 7. suhas adhav says:

  nehmisarkhach uttam post 🙂
  kharach swapna kiti vichitra aastat na …… pan he aasa swapnat jaychi shakti jar kharach aasti tar kay maja aali aasti 😛
  kalpana chan aahe tumchi 🙂

 8. महेश कुलकर्णी says:

  स्वप्नाच्या पलीकडे,——————-मस्त,

 9. महेंद्र कुलकर्णी हे नेता झाले तर ? …. मला वाटत या प्रश्नाचं उत्तर महेंद्रच चांगलं देतील …!

 10. dinesh says:

  Mahendraji, baryach diwsat blog lihla naahi, itkya divsancha gap ka aahe.

  • दिनेश
   सध्या जरा कामात व्यस्त असल्याने नेट वर फारसा नाही. मन्थ एंड संपल्यावर पुन्हा येईन ब्लॉग वर.. 🙂 धन्यवाद.

 11. Anand Namjoshi says:

  Khup Divas jhale navin post nahi aali, Awaiting your next post 🙂

  Regards,
  Anand Namjoshi

  • सध्या डिसेंबर एंड, म्हणजे क्वॉर्टर एंड असल्याने थोडा कामात व्यस्त आहे. आज पण सुटी असूनही भोपाळला कामानिमित्य आलोय. बहूतेक एक तारखेनंतरच पुन्हा नेटव वर येईन.

 12. BADRI says:

  मला स्वप्न पहायला खूप आवडतात.

 13. shubhalaxmi says:

  hello kaka….. chan post hoti..
  tumhi neta zalat tr……… tumhi bhashan chan kral..::-) bye tc

 14. खुप छान आहे कॅालेज चे दिवस अाठवले

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s