…. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम!

 

ओल्डमंक

एक दिवस रात्री फेसबुक वर स्टेटस अपडेट केले, ” प्रेइंग विथ ओल्डमंक “….  आणि त्यावर बऱ्याच कॉमेंट्स आल्या.. लक्षात आलं , की ओल्डमंक बरोबर लॉयल असणारे आपल्या सारखे बरेच लोकं आहेत, की जे ओल्डमंक चे नाव जरी वाचले  तरी नॉस्टेल्जिक होतात.

आता नवीन वर्ष आलंय जवळ. सगळ्यांचेच काही ना काहीतरी प्रोग्राम्स असतीलच. आमचे पण असायचे. बहुतेक आम्ही सगळे मित्र एकत्र भेटून  ओल्डमंक   बरोबर एंजॉय करायचो. इतकी वर्ष झाली तरीही  ओल्ड मंक आजही माझा आवडता ब्रॅंड आहे. एखाद्या पार्टी मधे   स्कॉच आणि ओल्डमंक असली   तर  मी ओल्डमंक प्रिफर करतो. माझ्या मते या  जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे  ओल्डमंक पिणारे आणि दुसरे म्हणजे ओल्डमंक  न पिणारे! दोन ओल्डमंक पिणारे एकदम घनिष्ट मित्र होऊ शकतात हा माझा अनुभव आहे. कारण कधी पण बार मधे गेले, की काय मागवायचं या बद्दल विचार करायची वेळच पडत नाही-न मेन्यु कार्ड न पहाता, ओल्डमंक विथ सोडा अ‍ॅंड आइस  ही ऑर्डर दिली जाते.

ओल्डमंक ची ओळख तशी लहानपणीच  झाली. काकाच्या कपाटात   ओल्डमंक ची बाटली असायची, आणि त्याबद्दल एक वेगळंच कुतूहल असायचं. काय  असेल बरं त्या मधे? शेवटी एक दिवस  मी आणि विनयने त्यातली थोडी झाकणात घेऊन  चाखून पाहिलीच आणि   चव तर खूपच आवडली  . नंतर हळू हळू झाकणाचा पेग झाला, आणि जेवढी लेव्हल कमी गेली असेल, तेवढे पाणी……………असो..

जेंव्हा नवीन नवीन नोकरी लागली होती, तेंव्हा बहुतेक दर बुधवारी रात्री  मित्रांसोबत  बैठक व्हायची. जास्त पैसे नसायचे, आणि कमी पैशात मिळणारी व्हिस्की घेतली, की दुसऱ्या दिवशी डोकं चढणे हे नक्कीच ! व्हिस्की उगीच सोफिस्टिकेटेड ड्रिंक वाटायची मला. जेंव्हा व्हिस्की मधला फोलपणा लक्षात आला, तेंव्हा अगदी कॉलेजच्या दिवसापासून साथ देणारी ओल्डमंक पुन्हा आठवली, आणि तिची साथ काही सुटली नाही. सुरुवातीला नोकरी लागल्यावर व्हिस्की , जिन, व्होडका   ह्या फॅन्सी  ड्रिंक्स  चा प्रयत्न नक्कीच केला होता, पण  फारशी कधी पचनी पडली नाही. स्कॉच परवडायची नाही, आणि मॅक डॉवेल, ओसी, एसीने, हॅंगओव्हर यायचा, तेंव्हा  लक्षात आले की ओल्डमंक ला पर्याय नाही- ओल्डमंक इज द बेस्ट!

कॉलेज मधे असतांना आउट ऑफ कम्प्ल्शन ओल्डमॉंक सुरु केली , कारण थोडी जास्त जरी झाली, तरीही दुसऱ्या दिवशी डोकं दुखणे किंवा हॅंग ओव्हर हा प्रकार कधीच होत नसे. इतक्या वर्षानंतरही  केवळ हेच कारण आहे, की आजही माझी फेवरेट रम ओल्डमंक आहे, बरोबरचे मित्र जरी बकार्डी व्हाईट /रेड  घेत असले, तरी पण मी अजूनही ओल्डमंक शी प्रामाणिक आहे.  ओल्डमंक सोड्या बरोबर घेतांना मला जी किंचित व्हॅनिला एसेन्स ची चव,आणि थोडीशी  गोड चव  असते, ती  खूप आवडते.  इतर कुठल्याही रम मध्ये  हा फ्लेवर नाही.  मॅक डी  कधी तरी ओल्ड मंक नव्हती म्हणून कॉम्प्रोमाईज म्हणून ट्राय करतो, पण चव अजिबात आवडत नाही मला.

माझे  काही सोफिस्टिकेटेड ( व्हिस्की घेणारे) मित्र ओल्डमंक ला “घोड्य़ांना पाजायचे  ड्रिंक” म्हणतात, पण त्याने  आम्हाला काही फरक पडत नाही 🙂

ओल्डमंक मधे कोला वगैरे टाकणे म्हणजे ओल्डमंक च्या ओरिजिनल चवी बरोबर प्रतारणा करणे आहे हे माझे मत , पण माझे मित्र मात्र कोल्या शिवाय ओल्डमंकचा विचारही करू शकत नव्हते. ओल्ड मंक मला  किंचित लिंबू पिळून ’ऑन द रॉक्स’ किंवा विथ फूल सोडा  आवडते.  कोला घालून रम घेतली की तिची ‘किक’ लवकर लागते, याचे कारण कोला मधे असलेली साखर. साखरे मुळे अल्कोहोल रक्तामध्ये लवकर भिनते ( म्हणजे चढते), असे रम+कोला घेणाऱ्या मित्रांचे मत आहे.

कॉलेजच्या दिवसात काही जरी झालं, तरी सब मर्ज की एक दवा, ओल्डमंक हे ब्रिद वाक्य होते. सर्दी , स्टफ नोज,  खोकला, किंचित ताप वाटणे, पोट खराब असणे,  तर ओल्डमंक मधे दोन चमचे मध, गरम पाणी , किंचित लिंबू घेतले की हमखास बरे वाटते अशी माझी खात्री होती. मग बहुतेक वेळा मध नसल्याने, फक्त गरम पाणी आणि ओल्डमंक ला दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टरच्या “फी ” च्या पैशात ओल्डमंक ची ’चपटी’ मिळायची तेंव्हा ! खरं सांगतो,लग्न होई पर्यंत  मी कधीच डॉक्टर कडे गेलो नाही सर्दी , खोकला ताप या साठी.

असो, तर मंडळी ही ओल्डमंक बहुतेक सगळ्याच इंजिनीअर्सची आवडती.  मला वाटतं की   इंजिनीअर्स परदेशात गेल्यावर ओल्डमंक मिस करतात. माझा एक मावसभाऊ सिंगापूरला होता तो   नेहेमी,  भारतातून  कोणी येतंय ते पहातच असयचा. इथे आल्यावर सांगायचा की ओल्डमंक च्या चवीशी साधर्म्य असणारी रम शोधणे हाच त्याचा छंद झाला होता.  इथून कोणी जाणार असला की त्याच्यासोबत  ओल्ड मंक आणि पार्लेजी पाठव म्हणायचा!  चहात बुडवून खायला पार्ले जी ,ओल्ड मंक , आणि चितळ्यांची बाकरवडी ह्या गोष्टींना अजिबात काहीच पर्याय नाही हे त्याचे स्पष्ट मत होते, आणि त्याच्याशी मी पण सहमत आहेच.

ओल्डमंक ची एक ओल्डमंक च्या आकाराची बाटली पण मध्यंतरी मिळायची . ती रिकामी बाटली पण बऱ्याच लोकांच्या घरात दिसायची शोकेस मधे, पण आम्ही मात्र कायम ’चपटी’ च घ्यायचो विकत.आणि तसेच एक  ओल्डमंक रिझर्व नावाची १२ वर्ष मॅच्युअर केलेली प्रीमियम रम   पण मार्केट मधे लॉंच केली होती, पण आमच्यासारखे लोकं मूळ ब्रॅंड सोबतच प्रामाणिक राहिले .  आमच्या लहानपणी सगळ्यांच्याच घरात मनी प्लांट लावण्याची फॅशन आली होती. बहुसंख्य घरात ओल्डमंक रमच्या बाटली मधेच हे मनीप्लांट लावलेले दिसायचे. या प्लांट साठी तरी या बाटलीला खूप मागणी असायची. आता गेले ते दिवस! हल्ली मनीप्लांट लावण्यात  लोकांचा इंटरेस्ट संपलाय आणि आमच्यासारखे काही खास दर्दी लोकंच ओल्डमंक शी प्रामाणिक आहेत. आजही एक मित्र आणि मी  ओल्डमंक बरोबर प्रेअर करत बसलोय भोपाळ मधे.

 

मित्र म्हणतो, अरे ओल्डमंक ला  बहुतेक कोणी वाली रहाणार नाही, त्यावर माझं उत्तर होतं, ” जो पर्यंत इंजिनिअरींग कॉलेजेस आहेत तो पर्यंत ओल्डमंकला मरण नाही.. काळजी करू नकोस..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , . Bookmark the permalink.

59 Responses to …. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम!

 1. ruchira says:

  Ha majha prant nasla tari tumcha pramanikpana/eknishthpana aavdla kaka… 🙂

  • रुचिरा
   जुने दिवस आठवले 🙂 काल भोपाळला एक जुना मित्र भेटला होता आणि हे पोस्ट झाले तयार 🙂

 2. mandar17390 says:

  zakaas!!!!!!!!!

  सर्दी , स्टफ नोज, खोकला, किंचित ताप वाटणे, पोट खराब असणे, तर ओल्डमंक मधे दोन चमचे मध, गरम पाणी , किंचित लिंबू घेतले की हमखास बरे वाटते
  हे खरंय??????ब्रांडी बद्दल ऐकलंय कि सर्दी साठी बरे असते म्हणून ..

  • मंदार,

   ते दिवस वेगळे होते, प्रत्येक गोष्टीवर एकच उपाय असे म्हंटले की तेवढेच कारण ्मिळायचे. हे फक्त कारण तयार करण्य़ासाठी असायचे.

 3. anuvina says:

  ऑन द रॉक्स काय वाट्टेल ते … काही व्यसनं सुरवात करायची तर त्यांचे ब्रांड ठरलेले आहेत. दारू ओल्डमंक, सिगरेट नेव्हीकट, तंबाखू सातारी किंवा पंढरपुरी ई. तुमच्या या ओल्डमंक मुळे पंचमढीला चमच्यातून घेतलेली ओल्डमंक आठवली आणि पुढे पुढे या चमच्याचा आकार वाढत वाढत पेग पर्यंत गेला. 😉

 4. anuvina says:

  >>”खरं सांगतो,लग्न होई पर्यंत मी कधीच डॉक्टर कडे गेलो नाही सर्दी , खोकला ताप या साठी”
  आणि लग्न झाल्यावर???? काय काका अर्धवट माहिती देता तुम्ही … 😉

  • लग्न झाल्यावर ( आणि ते पण २५ वर्ष) हिम्मत होऊ शकते का असं काही करायची? मुकाट्याने कफ सिरप आणि क्रोसिन घेतो बापडा 🙂

   • anuvina says:

    छे …. काहीतरीच …. सरळ द्राक्षासव घेतोय सांगून १ पेग सारायचा. 😉

    • कसं शक्य आहे? हल्ली ३ विरुद्ध १ चा मुकाबला असतो 🙂

     • shekhar gore says:

      मी तर लग्न झाल्यावर हनीमुन्मधेच बायकोला सांगुन टाकलं होतं की माझं पहिलं लग्नं ओल्ड मंक शी झालेलं आहे, त्या मुळे तु तिच्याशी भांडण करु नकोस. तिला प्रथम पत्नीचा मान दे,. आणि तिनेही ते मानले आणि आजही आमचा संसार सुखाने सुरु आहे. महिन्यातुन एक दोनदाच मी आणि ओल्ड मंक घरीच एकमेकां बरोबर बसतो आणि बायको नं २ काहीबाही त्या बरोबर खायला करुन देते.
      माझं तर असं मत आहे की स्कॉच सुद्धा झक मारते ओल्ड मंक समोर. आणि तिचा एक गुणधर्म फारच चांगला आहे. जेव्हढी घेतली तेव्हढीच चढते ! व्हिस्की सारखं नाही. मैफिलीतुन उठुन बाहेर येउन गाडीच्या दरवाजाला चावी लावली की जाणवते की जरा जास्तच झाली आहे !

 5. मी आपला दुसऱ्या प्रकारात म्हणजे ओल्डमंक न पिणाऱ्या प्रकारात मोडतो, पण तुम्ही एकदम सेंटी झालेला दिसताय ओल्डमंकसाठी. एकदम दिलसे लेख लिहिलाय. बघूया एकदा ट्राय नक्कीच करेन तुमच्यासोबत 🙂 🙂

  • सुहास
   सेंटी झालो ते मित्रामुळे. एक जूना मित्र भेटला खूप दिवसांनी, आणि मग जुन्या आठवणी काढत बसलो होतो कॉलेजच्या दिवसांच्या.. तो गेल्यावर मोजून २० मिनिटात खरडले हे पोस्ट.

 6. mazejag says:

  Agreed to Suhas kaka….eka jaroor try karu….aplya Govyat…lol

 7. Meena Thayalan says:

  Suhas,
  mi mazya Engeener (2) mulanchi Aai ahe, tumche kai vattel te nehmi vachte karan te mazya E-mail var yete mhanun.
  Pan aabhimanane sangte ki maza 1 hi mulga aajun tari kadhihi daru mag tyanche kitihi mothe brand name aasot pyaylele nahit, tyana 1 mul zalele ahe tari. mala ya daru, wine all goshtincha titkara ahe, nahi patat hi gosht, kharach yachya shivay aayusha jagtach yenar nahi ka? aarthat enjoyment chi pratekachi vyaakhya n rit vegli aaste, pan tula Kaka mhannarya chi hi mi Kaku hou shaken (vay varshe 56) aajibat avdle nahi pramanik mhanun sudhya he pradrshan nahi bhavle, Soory
  Meena Thayalan

  • मीना

   जगात कुठल्याच स्त्री ला ( गोवा सोडून ) ड्रिंकस आवडत नाहीत . कदाचित आजकाल हे माझे मत जुने वाटत असेल, पण…

   ब्लॉग काय वाटेल ते असल्याने, स्वतःशी प्रामाणिक राहून मी लिहितो. जसा मी आहे , तसाच ब्लॉग वर पण लिहतो. सोशल ड्रिंकींग योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही विचारात ्घेतला लिहितांना, अगदी सहज पणे काय मनात आले ते खरडले आहे.

 8. Atul Ranade says:

  दोन
  ओल्डमंक पिणारे एकदम घनिष्ट मित्र होऊ
  शकतात हा माझा अनुभव आहे. कारण कधी पण
  बार मधे गेले, की काय मागवायचं या बद्दल
  विचार करायची वेळच पडत नाही-न मेन्यु कार्ड
  न पहाता, ओल्डमंक विथ सोडा अॅंड आइस
  ही ऑर्डर दिली जाते.

  Ekdam Sahamat.

  • अतूल
   🙂 धन्यवाद.. अरे आजही ओल्डमंक घेऊन बसलो की कॉलेजचे दिवस आठवतात . कॉलेजमधला मित्र भेटला की हमखास… :

 9. suhas adhav says:

  general knowledge madhye bhar padli majhya 😛
  aaj pariyant college madhlya kahi mandalin kadun “chivas,fule ” aashi nava aaikli hoti.
  ekda nepal madhye camp nimita gelo aastana room mate barober mojun ek jhakan pilo aasel
  doctor brandy cha heat sathi …
  pan jhala ultach sakali pot kharab ani varun ekdiwas training cha absent…
  etka kadu lagla …mhanla lok paise deun he ka vikat ghetat 😛
  god ani vanilla sarkhi test hard drink madhye 1st time aaiktoy 🙂

  • सुहास
   व्हनिला चा इसेन्स म्हणजे गोड चव नाही .. शब्दात सांगता येत नाही, रम चा ओरिजिनल फ्लेवर विथ अ लाइनिंग ऑफ व्हॅनिला असे स्वरूप असते .
   लोकं का विकत घेतात पैसे देऊन? हा बाकी प्रश््नच आहे.. एक पोस्ट लिहिन यावर 🙂

  • fule nahi FUEL asel….. 😉

   लोकं का विकत घेतात पैसे देऊन ?? … काय वाटेल ते……..

   mi fukat ghaayla tayar ahe… koni detch nahi…. :/

 10. arunaerande says:

  i have to take your word for this!:)
  पण मग ओल्ड मंक नाही तर मैIत्र नाही असं नाहीना?

 11. Mahesh says:

  Old Monk + cola or just Rum-cola was the most popular drink in the hostel. Heywards or Cannon 10000 mixed with old monk was a variation. These are a few among many things that I miss about India….

  • अगदी अगदी.. ओल्डमंक शिवाय दुसरा कुठलाही ब्रांड वापरणे कमीपणाचे समजले जायचे होस्टेलवर. 🙂 आता झाली त्याला ३५ वर्ष.. पण अजूनही फारसा बदल झाला असेल असे वाटत नाही.

 12. Anand Namjoshi says:

  Old Monk pilyananter dusri pyavishi nahi vatat kadhi.
  old mon always best and no hang over as well..

 13. इंजिनियर झाले पण अजून तरी अनुभव नाही… पण मित्रांकडून बरेच ऐकले आहे… 🙂 .. ( जगाला काय वाटेल त्या पेक्षा स्वतः शी प्रामाणिक राहून लिहिलेले मला खरच भावते.. ) ..

 14. Amar says:

  Purvi khuph Daru pyayacho.. Pan Singapore la job laglya pasoon bandh kel pin… Pan tumchya postne college che divas aadhavle…
  Mast maja aali vachun

  • अमर,
   ब्लॉग वर स्वागत. मला कुठलीच सवय नाही, पण या कॉमेंट मुळे सवयींवर एक लेख नक्की होऊ शकतो हे लक्षात आलं.

 15. एकदम ‘आऊट ऑफ सिल्याबस’ पोस्ट असल्याने काय कमेंटू ते कळत नाहीये 🙂

 16. Ki$HoR says:

  aaj pahilyanda kingfisher ghetali pan parat ghawi ase vatale nahi kaka

 17. काका
  हॉटेल व्यवस्थापन शिकत असल्याने वय वर्ष १८ ते २० च्या काळात थिअरी ला प्रात्यक्षिक ची जोड म्हणून जीन रम वोडका विस्की आणि बियर ह्या सर्वांचे प्राशन करणे ओघाने आले.
  ह्यात रम चा अपवाद वगळता भारतीय ब्रांड चे बाकीचे सर्व अत्यंत निकृष्ट दर्जाचे मद्य आहेत हे माझे व्यावसायिक मत आहे.
  रम बकार्डी ची असल्यास ठीक किंवा डार्क मध्ये ओल्ड मोन्क
  बाकीचे सर्व आपला दाढीवाला बुआ परदेशातून मळी विकत आणतो व तिच्यावर थातूर माथुर प्रक्रिया करून आपल्याला विकतो म्हणूनच जर जास्त झाली की हमखास सर दर्द मिळतो ,
  आता विमान कंपनी मुळे त्याला त्यांच्या घराचे सोने विकावे लागले.
  हे पाहून बरे वाटले.
  मी सुद्धा भारतात असतांना टिपिकल मध्यमवर्गीय विचार करून शक्यतो ओल्ड मग प्यायचो ते मला आवडते म्हणून नाही तर दुसर्‍या दिवशी डोक्याला कटकट नको म्हणून
  आता आमची कारकिर्द बार टेंडर म्हणून सुरु झाली
  त्यामुळे आईला जशी सर्व मुले सारखी तशी मला सर्व मद्य.
  आमचा पारशी सर नेहमी आम्हाला सांगायचा
  कमी प्या पण चांगली प्या
  तुमची पोस्ट पाहून कॉलेज चे दिवस आठवले , माझ्या अभियांत्रिकी शिकणाऱ्या मित्राच्या घरी एकदा गेलो होतो तेव्हा त्यांच्या खत्रूड आजोबांनी मी काय शिकतो हे विचारून मग आज काय शिकला असा प्रश्न विचारला
  मी सहज उत्तर दिले
  रम
  रम कशी बनते ,हे शिकलो.

 18. Raghu says:

  Kaka, nehami pramane mast lekh.. Mag aapan kadhi basayach ?? 🙂

 19. गुरु says:

  वाह काका वाह!!!!!! जियो!!!! ओल्ड मॉंक ला आमच्या जॉरगॉन मध्ये “ऑफ़िसर्स ड्रिंक” असंही म्हणतात रात्री २ पेग सरस ओढले तरी सकाळी बिगुल संपायच्या आतच माणुस सहज परेड ग्राऊंड ला हज्जर राहु शकतो ह्याच्यामुळे…… क्या बात है काका!!! ओल्ड मॉंक च्या आठवणी!!!!….. गोव्याला गेलो होतो ख्रिसमस च्या दरम्यान अजुनपण तिथे एक ६० मि.ली पेग ३० रुपयांचाच आहे (तिच्यायला खरंच स्वर्ग!!!!)
  आमचा एक मित्र एम.एस करायसाठी म्हणुन यु.एस ला गेला होता, तो सांगतो तिकडे फ़ारच कमी स्टेट्स मधले फ़ारच कमी रिटेलर्स ओल्ड मॉंक प्रोव्हाईड करतात, सो तो म्हणाला की यांक्स जर सगळ्यात जास्त स्मगलिंग करत असतील इंटर यु.एस तर ते ओल्ड मॉंक चे आहे!!!!…. यु.एस ची जॅक डॅनियल्स मिळावी म्हणुन आपण जीव टाकत असतो अन ती माणसं ओल्ड मॉंक मिळावी म्हणुन!!!!!

 20. लक्ष्मीकांत says:

  महेंद्र,
  जशी तुम्ही चपटी घेता तसा आम्ही ओल्ड मंक चा नारळ घेतो.
  ओल्ड मंक ची पूर्ण बाटली नारळा सारखी वाटते.

  सध्या मी तुमच्या ब्लॉगवरचे जुने लेख वाचतोय.
  खूप मोठा खजानाच सापडला आहे मला.

  • लक्ष्मीकांत,
   ती जाहिरात आठवली धर्मेंद्र ची , ” खूब जमेगी , जब मिल बैठेंगे हम दिवाने.. ” मला वाटतं बीपी ची जाहिरात होती ती.
   नारळ :- लोल मॅक्स.. नवीन शब्द :० धन्यवाद.

 21. tejali says:

  kaka.. sarv bhawana same pinch.. only replace rum wid scotch:P…. lok ugach nahi nahi te mix karun original flavour ghalwun takatat n apaman kartat:(

 22. Prashant Pawar - Surat says:

  Dear Sir

  Gujarat madhe ashi tar daru bandhi aahe mhanun ek mitra military madhe aahe tyacha jawal xxx rum magavito. jashe tumhi old monk shi pramanik aahat tasa me xxx. but i thing is sure that rum is rum.

 23. Dinesh says:

  mast lekh juna asala tari Mahendra saheb tumche sagale lekh me vachalet
  Khupach chaan likhan karta .. ani jar old monk + soda asel tar goshtach nyari…. Dinesh Pawar
  Guhagar , Ratnagiri, RGPPL Power Project.

  • दिनेश
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार. 🙂 तुमच्या सारखे वाचक आहेत म्हणून तर ब्लॉग टीकुन आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s