११०१००० आभार..

११०००००, 1100000, eleven lakhs, visitors, eleven lakh visitors, blog, marathi, mahendra kulkarniकाल ब्लॉग चा हिट्स चा आकडा अकरा लाखावर जाऊन पोहोचला. पोस्टची सुरुवात सगळ्या वाचकांचे आभार मानून करायची, की पोस्ट पूर्ण केल्यावर आभार मानायचे हेच ठरत नव्हते. शेवटी काय वाटेल ते पद्धतीने  जसे जसे मनात विचार येतील तसे तसे लिहायचे हे नक्की केले. वाचकांच्या हिट्स ची संख्या पाहिल्यावर निश्चितच आनंद झाला.

अगदी सुरुवातीलाच सांगतो, की कुठलाही ब्लॉग सुरु रहाण्यासाठी, किंवा त्या ब्लॉगरचा उत्साह टिकून रहाण्यासाठी वाचकांची  खूप गरज आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया तर ब्लॉगर्स साठी एक प्रकारचे टॉनिक असते.  मला एक मित्र परवा विचारत होता, की मी ब्लॉग वर लिहीणे कधी बंद करणार? माझे उत्तर होते, की लोकांच्या प्रतिक्रिया  येणे बंद झाले की – माझा ब्लॉग बंद होणार !  🙂  इतकी वर्ष उत्साह टिकून रहायला या वाचकांच्या प्रतिक्रिया कारणीभूत आहेत.

चार वर्षापूर्वी १७ जानेवारी २००९ तारखेला पहिले पोस्ट लिहितांना  खरंच आपण इतके वर्ष लिहीणे सुरु ठेऊ असे कधीच वाटले नव्हते.  मी स्वतः आरंभशूर !   कुठल्याही गोष्टीचा फार लवकर कंटाळा येतो मला. मग ते ~फेसबुक असो ,किंवा इतर कुठलीही सोशल साईट असो. माझ्या सारख्या  लिखाणाशी कुठलाही संबंध नसलेल्या, मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या जीवनातल्या घटना, सामाजिक जीवनावरचे त्याचे भाष्य , कोणाला वाचायला आवडतील असे पण कधीच वाटले नव्हते. पण एकदा ब्लॉग वर लिहीणे सुरू केले, आणि लोकांच्या  प्रतिक्रिया  पण यायला लागल्या,  आणि मग  कॉन्फिडन्स वाढला, एक लक्षात आलं, की आपणही लिहू शकतो..म्हणजे अगदीच  काही अगदीच वाईट लिहत नाही  आपण! 🙂

जेंव्हा ब्लॉग सुरु केला, तेंव्हा दोन गोष्टी  ठरवल्या होत्या, त्या म्हणजे जे काही लिहायचे ते स्वतःशी प्रामाणिक राहून,  आपण जसे आहोत तसेच ब्लॉग वर लिहायचे, उगीच भोंदूपणा करायचा नाही. नसलेले गुण स्वतःला चिकटवून घ्यायचे नाहीत. मी जेंव्हा ब्लॉग लिहीणे सुरु केले होते, तेंव्हा प्रस्थापित असलेले मराठी  ब्लॉगर साहित्यिक स्वरुपात काही तरी उच्च दर्जाचे लिखाण करण्याचा वाटेने प्रयत्न करतांना दिसायचे, आणि त्या मुळे लिखाणात ही बरेचदा कृत्रिम पणा जाणवायची  वाचतांना!  ती पुस्तकातल्या सारखी छापील खिळे असलेली भाषा , वाचतांना मला खूप  अवघडल्यासारखे वाटायचे, तेंव्हा वाटले, की इतर  लोकांना पण असंच वाटत असेल का?  आणि मी स्वतः अगदी सहज सोप्या भाषेत लिहीण्याचे ठरवले. थोडी सोपी भाषा वापरली, तर? आणि काय वाटेल ते चा जन्म झाला. आपण  मनापासून लिहिले, की ते दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहचते – हा माझा अनुभव आहे- त्या साठी फार कठीण  भाषा हवी असे नाही, तर  मला असे वाटते की बरेचदा कठीण भाषा दुरावा पण निर्माण करते- वाचक आणि लेखकामध्ये. लेखक जर  वाचकांशी   कनेक्ट होऊ शकत नसेल तर त्या लिखाणाला काही फारसा अर्थ उरत नाही .

दुसरी गोष्ट  जी मला एक वर्षानंतर लक्षात आली,  ती म्हणजे  कधीही आपले पोस्ट प्रेडिक्टेबल किंवा टाइपकास्ट होऊ द्यायचे नाही. एक पोस्ट झाले, की दुसरे  पोस्ट त्याच प्रकारचे न लिहिता, एकदम वेगळ्याच विषयावरचे लिहायचे . एकाच विषयाला वाहिलेले ब्लॉग काही दिवसानंतर कंटाळवाणे होतात असा माझा अनुभव आहे. एक खूप छान विनोदी ब्लॉग  होता, पण केवळ तीच ती पात्रं, आणि एकाच पठडीतले विनोद घेऊन लिहित राहिल्याने हल्ली फार  कंटाळवाणा झालाय. अहो जेवणात नुसती भाजी पोळी  किंवा आमटी भात असून चालत नाही, सोबत चटणी, कोशिंबीर, लोणचं, आणि पापड वगैरे पण हवाच, आणि शेवटी स्विट डीश असेल तर  अजूनच उत्तम! ब्लॉगिंगचं पण तसेच आहे-वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी   विषयांचे व्हेरिएशन्स आवश्यक आहे.

ह्या ब्लॉगिंग ने बरेच कुठलाही स्वार्थ नसलेल्या नवीन मित्र मैत्रिणी दिल्या आहेत. भारतात आल्यावर आवर्जून फोन करणारे आणि प्रत्यक्षात भेटणारे बरेच परदेशी रहाणारे ब्लॉगर्स आहेत, इथे भारतातच असणारे काही मराठी ब्लॉगर्स तर नेहेमीच भेटत असतात . ब्लॉगर्स मिट च्या निमित्याने बऱ्याच  ( १२० लोकं आले होते पहिल्या ब्लॉगर्स मिटला) ब्लॉगर्सशी प्रत्यक्ष भेट पण झालेली आहे.  काही कटू प्रसंगही ओढवले या चार वर्षात  (कुठले ते लिहत नाही ), पण ते केवळ बोटावर मोजण्य़ा इतकेच!

मला आता  चार वर्षानंतर ब्लॉगिंग कडून काय हवंय़? काहीच नको.. मला फक्त माझं मन मोकळं करायचं आहे. मला या ब्लॉगिंग कडून काही फारशा अपेक्षा नाहीत, जाहिराती , उत्पन्न, वगैरे काही नकोय या मधून. मला फक्त मन मोकळं करण्यासाठी एक स्थान हवंय, आपलं हक्काचं!

आजपर्यंत ६४० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. अर्थात केवळ ६४० पोस्ट्स  मधे माझे आयुष्य समावले आहे असे नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्या काही वर्षानंतर लिहीन म्हणतोय. नोकरी संपल्यावर कार्पोरेट वर्ल्ड वर एखादे पुस्तक लिहायची इच्छा आहे. गेल्या ३० एक वर्षात कार्पोरेट वर्ल्ड चे बदलते रंग मी अनुभवले आहेत.स्वार्थ, बॅकस्टॅबिंग, मैत्री, करप्शन, आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचे बदलते स्वभाव, बदलती समीकरणे , आणि त्यावर अवलंबून असलेली  कार्पोरेट कल्चरची पोकळ मैत्री – अशा असंख्य गोष्टींवर लिहायचे आहे. पण ते सगळे नोकरी संपल्यावर. मी जे काही अनुभवले आहे ते अगदी जसेच्या तसे जरी लिहिले तरी एक ६०० पानांची कादंबरी सहज होऊ शकेल. पण ते  काम सगळं   रिटायरमेंट नंतर.

सरते शेवटी पुन्हा एकदा सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार मानून हे पोस्ट संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , . Bookmark the permalink.

56 Responses to ११०१००० आभार..

 1. Ketan says:

  CONGRATS Fantastic!!!!!!!!!!!!!!!!!!

 2. अभिनंदन काका….. 🙂 🙂

  समस्त मराठी ब्लॉग विश्वासाठी तुमचा ब्लॉग प्रेरणादायी आहे. त्यामुळे तुमचा लिखाणातील उत्साह कधीही कमी होऊ देऊ नका आणि काय वाटेल ते इथे नियमितपणे येत राहू देत. आम्ही वाट बघत आहोतच 🙂 🙂

  • सुहास
   धन्यवाद.. नियमीत पण लिहीणे शक्य होत नाही, मग कोणाचे मेल, फोन आले की पुन्हा ब्लॉग पुनरुज्जिवित होतो.

 3. वाह वा अभिनंदन !

  • सागर
   धन्यवाद! मिलियन हिट्स चे पोस्ट लिहायचे राहून गेले, म्हणून पुन्हा तीन महिने थांबावे लागले.हे आजचे पोस्ट लिहायला.

 4. Santosh Kudtarkar says:

  Keep it going Kakasaheb!!!
  Hardik Abhinandan!!! 🙂 🙂

 5. abhishekshinde007 says:

  जे बाऽऽऽऽत!

 6. खूप खूप अभिनंदन महेंद्र 🙂
  तुझ्या लेखाशी पूर्णत: सहमत !! जितकं साधं, सोपं लिखाण तितकं ते थेट पोचतं. उगाच आव आणून लिहिलेलं काही दिवस चालेल पण जास्त दिवस लेखकालाही झेपत नाही.
  तू लिहिता रहा……..सुरेख लिहितोस 🙂

  • जयश्री
   अगदी खरं. कॉमेंट वाचल्याबरोबर डोळ्यासमोर दोन ब्लॉग आले , आव आणून लिहिलेले ! 🙂

 7. काका सर्व प्रथम अभिनंदन
  आपल्या ब्लॉग च्या थीम मुळे मला ब्लॉग लिहिण्याची प्रेरणा मिळाली ,
  मागे लिहिले होते तेच पुन्हा लिहितो.
  काय वाट्टेल ते मी पंचतारांकित ह्या लेबल अंतर्गत लिहितो.
  वाचकांचा प्रतिसाद म्हणाल तर तुमचा सरळ साधा , स्पष्टवक्तेपणा व सतत परिचित ,अपरिचित ब्लॉगर ला मदत करण्याची वृत्ती पाहता
  ब्लॉग विश्वातील तुम्ही दबंग व्यक्तिमत्त्व आहात.
  तुमचा तुमच्या वाचकांची असलेल्या रेपोशी अजून समर्पक उपमा सापडली नाही.
  वाचकांचे प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचे असतात.
  माझ्या मते
  ह्या आभासी जगतात आपण जे खरडतो त्याला वाचकांनी प्रतिसादाची मोहर उमटवली कि ते लेखन होते.
  लिहित राहा ,
  आम्ही वाचत राहू.

  • निनाद,
   नवीन ब्लॉगर्स ला मदत करणे हे तर प्रत्येकच जुन्या ब्लॉगरचे काम आहे. त्यात काही विशेष नाही .
   आणि प्रतिसाद देणे तर खूपच महत्त्वाचे असते. एखादा माणूस वेळ काढून तुमच्या ब्लॉग वर जर प्रतिक्रिया लिहित असेल तर , त्याची नोंद ही ब्लॉगर ने घेतलीच पाहिजे. काही वर्षापूर्वी मी , भाग्यश्री, दिपक भुंगा, अपर्णा,रोहन, तन्वी वगैरे सगळ्यांनी मिळून ब्लॉगर्स एटीकेट्स नावाचा लेख लिहिला होता . तो वाचला असेलच.

   • काका मी जेव्हा नुकताच ब्लॉग सुरु केला होता तेव्हा तुम्हाला सल्ला , मदत मागितली होती. तुमच्याकडून मला सलील , कांचन , भुंगा ही नाव कळली. व त्यांच्याकडून मदत ,सल्ला सुद्धा वेळोवेळी मिळाला.
    आता जेव्हा मी चेहरा पुस्तकावर माझ्या मित्राला एखाद्या कम्युनिटी मध्ये चांगले लिखाण करतांना पाहतो तेव्हा ह्या लिखाणाचा संग्रह राहावा व त्याला एक व्यासपीठ मिळावे म्हणून ब्लॉग सुरु करण्यास सांगतो , व कितीतरी जण मला ब्लॉग सुरु करण्यासंबंधी मदत मागतात.
    अश्यासाठी तुमचा हा लेख , कांचन व सलीलच्या, भुंगा ब्लॉग ची लिंक असा एक सेट तयार केला आहे. इच्छुक व्यक्तींना ती मी फोरवर्ड करतो जेणेकरून त्यांना ब्लॉग म्हणजे काय ह्यांची प्राथमिक माहिती मिळते.

 8. Anand Namjoshi says:

  Congrats !!
  Nice blog 🙂

 9. हार्दिक अभिनंदन !!!!!

 10. अकरा लाख च्या वर भेटी खर च खूप अभिनंदन !

  1,1.2013 साल साल 2013 पूर्ण साल साठि सर्व शुभेच्छा !

 11. Manish says:

  Hello Boss,
  Namaskar. Are Ajun only 640 posts zalya aahet. It means ajun only 64 aahes. Centuray karaychi aahe ki nahi. Atapasun hassh-hossh kartahat. anyway hi post & OLD MONK chi post ekdum best. Stay uptil century.
  Manish

 12. Suhas Adhav says:

  conratulations 🙂
  me etarahi kahi marathi blogs pan tumcha blog mala kharokhar hatke ani chan vatla
  ek goshta ji mala tumchya likhana vishai far aavadte ti mhanje pramanik pana….
  swata badal sudha tumhi nehmi khara aahe tech lihita etarlok kay vichar kartil hyachi parva na karta 🙂
  blog madhye tumhi vegvegle vishay chan prakare mandta
  so 10 on 10 🙂

 13. AaKa says:

  Are waa pustak yenar tar… Changalich khabar aahe hi.. 🙂

  Baki 11L sathi Abhinandan kaka…

 14. Manasi says:

  Congrats! Keep writing like this!

 15. प्रामाणिकपणे सांगायचं तर तुमच्या ब्लॉगहिट्स, पोस्ट्स बद्दल मला आता आश्चर्य वाटत नाही. :)) simply coz u deserve it :D.. एका मराठी ब्लॉगला ११ लाख हिट्स ही खरोखर अभिमानाची बाब आहे. अर्थात तुमचं लिखाणातलं सातत्य वाखाणण्याजोगं आहे हे तर निर्विवादच 🙂

  मनःपूर्वक आभार आणि ११ कोटी साठी खूप खूप शुभेच्छा

  • हेरंब
   धन्यवाद. एक गम्मत सांगतो, आज धन्यवाद लिहितांना पण सारखे वाचावे….. आठवतंय. “त्याच्या” शेवटच्या लेखात याने जे लिहिले आहे ते वाचून वाट्ते की त्याच्या दूष्टीने लोकांचे आभार मानणे बरोबर नाही.. लिंक वाचली मी आज, ( गेले चार महिने अजिबात पहातही नव्हतो त्या सदराकडे 🙂 काल तू लिंक पाठवली म्हणून वाचण्यात आला तो लेख . असो..

 16. arunaerande says:

  मनापासून अभिनंदन. नव्या वर्षाची सुरुवात छान होते आहे. लवकर्च १०००चा टप्पा गाठाल ही शुभ्च्छा. तशी मी पण मी हेरंबशी एकदम सहमत आहे. सर्वच बाबतीत. म्हणुन पुन्हा तेच लिहीत नाही. तुमची आगे-कूच अशीच दौडत राहो.

 17. Anagha says:

  मन:पूर्वक अभिनंदन!!! 🙂
  मनातलं काय वाटेल ते सरळ, सोपं आणि तरीही वाचणाऱ्याच्या मनाला जाऊन भिडेल असे कसे लिहावे, लेखनात वैविध्य किती आणि कसे असावे याचा आदर्श पाठ आहे तुमचा हा ब्लॉग. येत्या वर्षात १००० चा टप्पा गाठण्यासाठी तसेच नवीन अनेक शुभेच्छा!

  • अनघा,
   धन्यवाद. माझ्या ब्लॉग लिहीण्यामागचं सिक्रेट वर लिहून टाकलंय मी या लेखात. प्रत्येक लेख काही तरी वेगळ्या विषयावर लिहायचा हे.

 18. अभिनंदन काका आणि खूप खूप शुभेच्छा.

 19. Yogesh says:

  काका , मन:पूर्वक अभिनंदन!!! आणि खूप खूप शुभेच्छा.
  प्रत्युत्तर

 20. Vinod Shirsath says:

  अभिनंदन महेंद्र जी ……
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
  विनोद शिरसाठ

 21. shradha kulkarni says:

  Kaka,
  Pratham hardik abhinandan, 11 lakh hits baddal.
  Tumhi blog vishvat role model ahat he nishchit. Mala tumachyashi pratyksha boloyala nakki avadel. 🙂

  • श्रद्धा
   हो.. भेटू या की. त्यात काय एवढं ? एखादी ब्लॉगर्स मिट करावी लागेल पुन्हा. गेल्या दोन वर्षात ब्लॉगर्स मिट झालेली नाही.

 22. bhanasa says:

  महेंद्र, सर्वप्रथम तुझे मन:पूर्वक अभिनंदन! अरे इतक्या सातत्याने व अगदी जे मनात येईल ते प्रामाणिकपणे लिहीतोस नं तू की असे प्रेम मिळणारच की. 🙂 लिहीत राहा व इतरांनाही प्रेरणा देत राहा. नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!

 23. Tanvi says:

  >>>मला आता चार वर्षानंतर ब्लॉगिंग कडून काय हवंय़? काहीच नको.. मला फक्त माझं मन मोकळं करायचं आहे. मला या ब्लॉगिंग कडून काही फारशा अपेक्षा नाहीत, जाहिराती , उत्पन्न, वगैरे काही नकोय या मधून. मला फक्त मन मोकळं करण्यासाठी एक स्थान हवंय, आपलं हक्काचं! ….. बास अगदी… u said it महेंद्रजी 🙂

  खूप खूप अभिनंदन…. आणि खरच u really deserve it !
  लिहीत रहा असेच मनापासून! आम्ही वाचत होतो आणि वाचत रहाणार….

 24. Raghu says:

  अभिनंदन काका… 🙂

 25. Amar says:

  Keep it up Kaka! Khupach chagle vichar aahet tumche! Marathi madhe bloging phar
  kami hote ase vatte.. kahi chagle blog recommend karal tar bare hoeil.. Arthath tumach
  blog vachtch rahin mhana…

 26. Sandip Joshi says:

  kaka
  11 lakh hits chya 11 lakh shubhechha!
  apale lekhan amhala asech vachavayas milo.

 27. महेश कुलकर्णी says:

  मनापासून अभिनंदन.लिखाणलिहीत रहा असेच मनापासून! आम्ही वाचत होतो आणि वाचत रहाणार….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s