स्त्री जन्मा..

नेट वरूननवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इच्छाच संपली आहे. कोणालाच मेसेजेस , इ मेल्स पाठवले नाहीत. उगीच कुठेतरी खुपल्या सारखं होतंय.  कारण दामिनी!   दिवसभर दामिनीच्या सपोर्ट साठी बरेच लोकं मेणबत्त्या घेऊन टिव्हीवर दिसत होते.  टॉकिंग हेड्स टीव्ही वर बडबड करत होते. काही सो कॉल्ड एक्स्पर्ट तर टिव्ही वर म्हणत होता की स्त्रियांनी पर्स मधे मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा म्हणजे कोणी हल्ला केल्यास प्रतिकार करता येईल. हे असे मूर्खासारखे विचार मांडणारे वैचारिक षंढ  कसे काय टिव्ही वर येतात कोण जाणे! त्यांची बडबड ऐकून तर   अजूनच संताप येत होता.

माझ्या मनात विचार आला, समजा एखाद्या मुलीने चाकू पर्स मधे ठेवला, आणि जर गुंडाने   तोच चाकू हिसकावून   प्रहार केला  तर? आणि मिरचीची पूड पण त्या मुलीच्या हातून हिसकावून तिच्यावरच वापर केला तर? अगदी सहज शक्य आहे की नाही?उगीच टिव्ही वर आलो म्हणून काही पण बडबड करायची?

गुंडांच्या हातून वाचायचे असेल तर रिव्हॉल्वर हेच एक साधन उपयोगी पडु शकते. आणि आपल्याकडे तर लायसन्स मिळणे दुरापास्त आहे.आणि जरी समजा लायसन्स मिळाले तरी पण रिव्हाल्वर वापरण्याची हिंम्मत तरी व्हायला हवी ना? असो..

खरंच काय करता येऊ शकेल? एक उपाय सुचतोय, जितके व्हिव्हिआयपी आहेत,त्या  नेत्यांच्या मुला, मुलीं सकट घरच्या सगळ्याच लोकांना ! अगदी  यांच्या घरात  जितके लोकं आहेत, त्या सगळ्यांना झेड सिक्युरिटी दिल्या गेलेली असते. तसेच सिनेमाचे हिरो हिरोईन्स- त्यांना   ला पण फुकट मधे झेड सिक्युरिटी देण्यात येते- म्हणे त्यांच्या जिवाला धोका आहे म्हणून! या सगळ्यांची सिक्युरिटी काढून घेतली तरी    लाखो सिक्युरिटी चे लोकं मोकळे होतील, की ज्यांना सामान्य जनतेसाठी वापरली जाऊ शकते. हे सगळे धनदांडगे नेते आणि सिनेमाची धेंडं स्वतःच्या पैशाने सिक्युरिटी विकत घेऊ शकतात हे अगदी कोणीही मान्य करेल- पण लोकशाही मधे  …………….   असो, दुसरी गोष्ट म्हणजे  बलात्काराला शिक्षा ही कडक द्यायला हवी, सध्या कायद्याने या गुन्ह्यासाठी फारच कमी शिक्षा दिल्या जाते. खाली दिलेला लेख वाचा-लिंक खाली दिलेली आहे .

आज सकाळी साधारण एक वर्षापूर्वी लिहिलेला हा लेख पुन्हा वाचला. एका बलात्काराविषयीचा हा लेख ११ डिसेंबर 20११ रोजी लिहिला होता. 

स्त्रियांचे शोषण तर युगानुयुगे चालत आलेले आहे, कधी प्रेमाने, तर कधी धाकाने. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही स्त्री पुरुष संबंध ( ऑफिस, घर, बाहेर, कुठेही) जेंव्हा रेफर केले जातात, तेंव्हा ते केवळ सेक्स्युअल रेफरन्स मधे असतात.  ऑफिस मधे जेंव्हा बरोबरच्या  स्त्री कलिग बद्दल  तिच्या अपरोक्ष बोलले जाते तेंव्हा अशा लूज कॉमेंट्स नक्कीच पास केल्या जातात. जेंव्हा पुरुष स्त्री ला म्हणतो ,की माझे तुझ्यावर प्रेम आहे – याचा गर्भितार्थ म्हणजे  “आय वॉंट टू स्लिप विथ यु” हा असतो , पण जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आय लव्ह यु म्हणते, तेंव्हा  तिचा उद्देश हा भावनिक गुंतवणूक  हा असतो. कदाचित पुरुष ही गोष्ट सहज मान्य करणार नाहीत, पण हीच खरी गोष्ट आहे. एक युगानुयुगे चालत आलेले सत्य हे पण आहे, जर कधी   भांडण झालेच तर  ते संपवायला, स्त्री ला प्रेमाचा मार्ग दोन पायातून शोधावा लागतो.   असो.. मन विषण्ण झाले आहे.  जास्त लिहत नाही. इथेच संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

42 Responses to स्त्री जन्मा..

 1. rajeev says:

  one can have a revalver mirchi puud, chaku…but can she have atime to drag that and use it?
  Accept the fact of life…80 % people. .male think of sex for 80 % of time they are awake…dont protest…. i dont say that but yhe frauid has proved that. empty mind is dev
  ils ( sex) work shop.

  • राजीव,
   अगदी हेच म्हणतो. अरे हिम्मत तर व्हायला हवी ना. फक्त एक वेळ गन असेल तर शक्य आहे – फक्त ट्रिगर दाबणे..

 2. मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर…
  मन खंबीर करण्याशिवाय कोणताही पर्याय फालतू ठरतो… आणि तेच चीनमध्ये लहान मुले वापरून प्रायोगिक तत्वावर करू पहातात…

 3. mazejag says:

  Kaka, wen a girl says those words it means a whole world lies in dat boy…..see aaj vacha futley hya goshtila karan hyat mothyachi karti involve nahit, asti tar…..aso dusra vishay aahe ha….dombivalich prakaran paha….kuthe chaliye sanskriti….prakaran pudhe yethet he imp…..galchepi basss zali ata….mazya eka maitrini sobat lagna nantar sasryakadun asa prasang udbhalvla hota….nashib nokrich natak karun to thet maheri pochli ani nantar 2 nandana dekhil vachvla…..itka vichitra…..

  • डोंबीवली चे प्रकरण वाचल्यावर खरंच माणसातली माणूसकी संपली आहे, आणि तो जनावर झालाय हे लक्षात आलं. समाज कुठे जातोय हेच कळत नाही.

 4. दामिनी
  हे नाव सतत डोळ्यासमोर येत होते. नववर्षाचे स्वागत अजिबात करावेसे वाटले नाही.
  मागच्या वर्षी मी केट व माझी मेव्हणी व आईबाबा ह्यांनी राजस्थान ते आग्रा ,दिल्ली असा दोन आठवड्यांचा प्रवास केला , त्याबद्दल सविस्तर अनुदिनी मध्ये लिहित आहे.
  पण परदेशी युवतींच्या वर बलात्कार होण्याचे भारतात प्रमाण ह्या भागात जास्त असल्याने हि खाजगी टूर आम्ही एका अनामिक दडपणाखाली काढली.
  भारतीय उज्जल , अर्वाचीन संस्कृतीचे नाव ऐकून अनेक परदेशी पर्यटक भारतात येतात.
  अनेक जण एकट्याने प्रवास करतात, त्यांचा गैरफायदा घेणारे , अंगचटीला जाणारे अनेक स्थानिक एक भारतीय म्हणून पाहून मला शरम वाटली.
  केट सध्या गर्भवती असून फेब्रुवारी ची डेट आहे.
  येथे गर्भजल चाचणी ला बंदी नसल्याने म्हणजे येथे भ्रूण हत्या अशी संकल्पना अस्तित्वात नसल्याने आम्ही येथे ती केली आणि
  होणारे बाळ मुलगी असल्याचे आढळून आले.
  मला खूप आनंद होत आहे , आम्ही भारतात नाही आहोत,

  • निनाद,
   मनःपूर्वक अभिनंदन! बाबा होणार तर! ग्रेट न्युज..
   अरे गेले तीन दिवस एका मिटींगची तयारी करत होतो, म्हणून नेट वर नव्हतो, म्हणून उत्तरास उशीर होतोय.

 5. Piyu says:

  दोन गोंडस मुलींचा बाबा म्हणून तुमच्या मनात जे काही उसळले असेल ते समजू शकते काका..

  शक्य असेल तर इथली चर्चा वाचा…

  http://www.maayboli.com/node/39946

  http://www.maayboli.com/node/39716

  • ्पियू
   गेले तीन दिवस जाम वाट लागली होती. अजीबात येणे झाले नाही नेट वर.. आज पहातो .. आभार.

 6. hasa leko says:

  kaka
  majhya comment cha raag nakki yeil ,pan ratri 11:30 la ti mulgi mitrabarobar kay exam cha paper dyala jat hoti ka,tichya palkanchi pan chuk ahe,7 chya aat gharata nahi kele tyanni

  • मुलींना हल्ली कॉलेज , क्लासेस मुळे रात्री पर्यंत बाहेर रहावे लागते. सकाळी दहा ते सहा कॉलेज केल्यावर नंतर सात ते दहा क्लासेस असतात. माझी मुलगी पण क्लासेसला जायची आणि रात्री साडे दहा वाजता परत यायची घरी- अर्थात बरोबर मित्र मैत्रीणी असायचे.
   एखादी मुलगी मित्राबरोबर बाहेर फिरते म्हणजे ती वाईट चालीची असे होत नाही, हीच मानसिकता बदलली गेलि पाहिजे.

 7. hasa leko says:

  jya lokani he kele te tar manus navte he manya ,ekhda durbal asla ki lok asech kartata

 8. Tejas Shah says:

  Speechless… :(. Agdi manatale lihle aahe. Doke sunn zale aahe incident zalyapasun.
  And one small correction – I think there is typo mistake in previous blog link
  Instead of 11 Dec 1911, should be 11 Dec 2011

 9. Kanchan S says:

  Ya incidence nantar evde andolane zhali..taripan kay pharak padla..
  ajunahi ya asha ghatnan chi news roz ekayla milte..
  tehi delhi madhech
  Khupch chid yete ase eklyawar
  damini la hospital madhe bhetun alyawar S G tar smile deun saglyana haat dakhawat hoti
  ya melyana kay pharak padto

  • कांचन,
   स्त्री ला मान द्यायचा असतो ही शिकवण दिल्या गेली, तर हे असे गुन्हे कमी होतील. नाही तर करोडे मेणबत्या पेटवून पण काही होणार नाही.

 10. काका… या विषयावर इतकं ऐकलंय आणि वाचलंय ह्या काही दिवसांत ना कि मन खरंच विषण्ण झालंय या विचाराने कि ज्या मुलीसोबत हे घडलंय तीच्या घरातल्यांना आणि काय वाटत असेल जेव्हा हे साले सो कॉल्ड एक्स्पर्ट जे झालं त्यात त्या मुलीची हि कशी चूक होती.. तिने त्यावेळी काय करायला हवं होतं….. या वर वाद घालतात…!!!
  स्त्रियांनीही लूज कॉमेंट्स Lightly घेऊ नयेत सुरुवात अशा छोट्या गोष्टींनी होते आणि नंतर माज वाढतो असल्या ‘भ’…चा!!! जिथे वाटेल कि अतिरेक होतोय, तिथेच अडवा.. शक्य असेल तिथे थोबाडात वाजवा.. समोरच्याला ‘कळेल’ अशा भाषेत समजवा..!!
  स्त्रियांवरील अत्याचार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे.. सग्गळ्यात कठोर शासन आणि सर्वांना समान न्याय…! नुसती फाशी ही खूप कमी शिक्षा आहे ह्या हरामखोरांसाठी!! जनजागृती – मूल्यशिक्षण याने समाजाचा स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल पण तोपर्यंत यासार्वांवर आळा घालण्याचा हाच एकमेव मार्ग…!
  बाकी दोन गोष्टी वरच्या लेखातल्या नाही पटल्या…
  १. जेंव्हा पुरुष स्त्री ला म्हणतो ,की माझे तुझ्यावर प्रेम आहे – याचा गर्भितार्थ म्हणजे “आय वॉंट टू स्लिप विथ यु” हा असतो , पण जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आय लव्ह यु म्हणते, तेंव्हा तिचा उद्देश हा भावनिक गुंतवणूक हा असतो.
  २. जर कधी भांडण झालेच तर ते संपवायला, स्त्री ला प्रेमाचा मार्ग दोन पायातून शोधावा लागतो.
  अगदीच.. Judgemental वाटले.. वरचे दोन statements..!!

  • प्रसाद
   अरे अगदी पाच मिनिटात पोस्ट टाइप केली आहे. लिहितांना जे काही मला वाटलं ते लिहित गेलो .
   सामाजिक जडणघडण तयार होते ती शाळॆत. तेंव्हा शाळेपासूनच या विषयाचे ज्ञान द्यायला हवे हे गुरु चे मत एकदम मान्य आहे मला.

 11. aruna says:

  प्रसाद,महेन्द्र म्हणतात ते बरोबर आहे. जर तुम्ही बागेत बसून म्हातार्‍यांच्या गप्पा ऐकल्य तर सहज प्रत्यय येईल. वाढत्या वयाने काहीहीवैचारिक प्रगल्भता आलेली नसते.
  खास करून उत्तर भारतातील बहुते पुरुषांची मानसिकता अजूनही स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू एव्हढीच असते. आणि तिच्या विचातांना, पावित्र्याला वगैरे काहीही किंमत नसते. मी उत्तरेत वास्तव्य केलेले आहे. म्हणून खात्रीने सांगू शकते.,
  पोलिसांना त्यांचे खरे काम करायला मोकळे ठेवायला पाहिजे. गुंडांना कसले संरक्षण देतात!
  आणि हो, या गुन्ह्याला कठॊर शिक्षाच पाहिजे.असे मला ही वाटते.

 12. गुरु says:

  एकाच पांचालीच ५ पांडवांशी विवाहबद्ध होणं….. युधिष्ठीराच बेलाशक बायको पणाला लावणे , हे इंद्रप्रस्थी-हस्तिनापुरी चाळे (वाचा हरियाणवी चाळे) त्या क्षेत्रांत पर्पेच्युवल असावेत की काय असं वाटायला लागलंय आताशा!!!!!!….. कारण काल्पनिक कथांचा सोर्स पण कुठंतरी खराच असतो नाही का… असो…. विषय गंभीर आहे विषयाला अनुसरुन मला काही मुद्दे मांडायचे आहेत ते मांडतो
  वर कोणीतरी मुलींबद्दल आपल्या समाजाचा दृष्टीकोण बदलावा व तादानुषंघाने ज्या सुधारणा करता येतील त्या क्रमप्राप्त करणे आहे असे मत मांडले आहे, मी त्याला अंशतः सपोर्ट करतो, अंशतः इतक्यासाठीच की एकट्या तेवढ्यानेच काही होणार नाही असं वाटतंय, प्रोअ‍ॅक्टीव्ह अन रीअ‍ॅक्टीव्ह असे दोन अप्रोचेस असतात गुन्ह्यांकडे बघायचे, त्यांचे विष्लेषण करायचे…. बलात्कारांच्या ह्या विकृतींना अ‍ॅड्रेस करायचे असले तर ह्या दोन्ही फ्रंट्स वर काम होणे क्रमप्राप्त आहे

  १.रिअ‍ॅक्टीव्ह(हे कमी कालावधीत इंप्लीमेंटेशन साठीचे उपाय)
  कायदे कठोर करणे, ह्यात तालिबानी शिक्षा कितपत सक्सेसफुल असतील ह्या बाबतीत मी पण जरा साशंकच आहे पण दुसरे एक हत्यार आपल्या समाजाच्या अंगळवाणी पडले आहे प्राचीन काळा पासुन, दुर्दैवाने!!!! ते हत्यार जातीवादाचंच हत्यार होतं अन अजुनही तुरळक ठीकाणी आहेच… ते हत्यार म्हणजे “बहिष्कार” अथवा “वाळीत” टाकणे…. हेच जर आधुनिक प्रोसीजरल कायद्याचे अधिष्ठान वापरुन इंप्लिमेंट केले तर, कारण बलात्कारी माणुस जितका गुन्हेगार तितकंच गुन्हेगार त्याचं कुटुंब जे त्याला संस्कार देवुच शकलेलं नाही (कसं हे मी पुढे २ नंबरात विस्ताराने सांगतो)….तर हा जो बहिष्कार असेल तो “सीआरपीसी” मधे अंतर्भुत असावा, ह्या बहिष्काराला एक सरकारी मान्यता असावी, ज्या गावाचा तो बलात्कारी
  आहे तिथल्या गावने त्यांच्या परीवाराशी “रोटी-बेटी” व्यवहार तर सोडावाच (जसे प्राचीन जातीयवादी व्यवस्थेत होत असे) पण ह्याच्या पुढे जावुन मुळात सरकार ने एक करावे ह्या मंडळींची सिटीझनशीपच काढुन घ्यावी असे केले तर हे लोक मुळात भारतीय नागरीक म्हणुनच गणले जाणार नाहीत अन त्यामुळे आपोआप घटनादत्त मुलभूत अधिकार अन इतर प्रोटेक्टीव्ह लॉज च्या पलिकडे जाऊन त्या गुन्हेगारांना कडक शासन होईल , तसंही आपला नागरीक नसला तरी आपल्या भूमीवर धरला ह्या सबबीवर तर “कोर्ट ऑफ लॉ” मधे त्याला आपल्या संविधाना नुसार प्रॉसिक्युट करता येतेच येते.परीवारीक बहिष्कारामधे सरकारी कामे होणार नाही, रेशन वर धान्य मिळणार नाही, सब्सिडीज कॅन्सल कराव्यात (आता सब्सिडी डायरेक्ट बँक खात्यांत जमा करायचं म्हणतात म्हणजे एका विशिष्ठ परीवाराच्या सब्सिडीज लॉक करणे सहजी शक्य असावे), त्यांना जमीन -स्थावर खरेदी विक्री करता येणार नाही, जर असा परीवार कुठल्या तरी धरण प्रकल्पात प्रकल्पग्रस्त वगैरे असला तर त्याला कुठल्याही प्रकारचे लँड एक्वीझिशन चे काँपेन्सेशन मिळणार नाही इत्यादी इत्यादी तरतुदी ह्या कायद्यात करता येऊ शकतील (महसुल विषयी इतका अभ्यास नसले कारणाने अन वेळे आभावी जास्त लांबण मी इथे लावत नाही)

  २.प्रोअ‍ॅक्टीव्ह (हे उपाय करुन रिझल्ट्स यायला कमीत कमी २० वर्षांचा कालावधी)
  प्रोअ‍ॅक्टीव्ह उपाय हे जास्तकरुन मानशास्त्रीय असतात असं माझं एक निरिक्षण आहे , मुलतः गुन्हे घडतात का ह्याचे विष्लेषण अन त्या मुळांवर घाव असा काहीसा अप्रोच असतो, आता बलात्काराचे गुन्हे घडतात का ?? ह्याचे पण एक विष्लेषण आहे…. पुरुषी अथवा मेल शॉवेनिस्टीक मानसिकता, ती का डेव्हलप झाली ?? प्राचीनकाळापासुन भारतीय समाज कृषी अन एकसंधता नसल्यामुळे युद्धक समाज आहे, साहाजिकच शरीर सामर्थ्याचा भांडवल म्हणुन उपयोग हा ओघाने आलाच त्याच ओघात हे पण कळले की पुरुषांना समाजात महत्तम स्थान का मिळाले असावे, आजकाल इंटलेक्ट रिलेटेड स्किल्स मधे स्त्रीयांना मिळालेला वाव अन त्यातुन आलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी अगदी शारीरीक कष्टांच्या क्षेत्रांत सुद्धा मिळवलेलं यश, हा फिनोमीना आपल्या समाजाला फारच नवा आहे तरीही आपल्या समाजाने तो ब-या पैकी पचवला आहे (अगदीच तालिबानी नाही आहोत आपण्)तरीही भारतात एकाच वेळी पाषाणयुग (अंदमानातले जारवा आदिमजन) ते स्पेस एज (मुंबई) सगळे टाईम फेजेस एकत्र नांदत असतात अन हे फेजेस् जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा जन्माला येतात असले विकृत गुन्हे… तो बलात्कारी अजुनही मध्ययुगीन राजे- वाडेहुडे – तलवारी- असहाय राणी इत्यादी संस्कार घेऊनच मोठा झालाय अन एका मोठ्या शहरात कामाला आलाय, इथे मुली बोल्ड आहे कॉन्फिडंट आहेत नोक-या करतात पण त्याच्यालेखी ते चुक आहे मुलीची पायरी वेगळी माझी वेगळी हेच तो मानत आलाय, हेच त्याला शिकवलंय , म्हणुन बस मधे लिफ्ट दिल्यावर फक्त तिच्या बॉयफ्रेंड ने तिच्या छेडखानीचा विरोध केला म्हणुन तो त्याला मारत होता, हिचा गुन्हा हा की हिने ” जनानी होत हुए मर्दों के लडाई मे जबान चलाई” म्हणुन तिला शिक्षा करायची म्हणत हा भयावह प्रकार झाला!!! म्हणुनच तिला अन तिच्या मित्राला मारहाण करुन फेकुन देण्यात आले. हे झाले विष्लेषण आता वळतो इलाजा कडे.
  इथे मी पण मान्य करतो की मानसिकता बदलणे हे घरच्या संस्कारांवरच अवलंबुन असेल, मुळात आपण किती खोलवर पुरुषसत्ताक आहोत हे पाहीले तरी मला अंतरबाह्य हादरायला झाले, एक “अ‍ॅक्स” चा डिओ मारला की १५ पोरी एका गड्याच्या अंगचटीला येतात म्हणजे तो १५ पोरी फिरवतो हे आपल्याला सहज वाटतंय, पण ते जर फक्त “फेयर अँड लव्हली” लावुन एक पोरगी आत्मविश्वासाने १५ पोरांसोबत बाईक वर फिरते आहे असे दृष्य दाखवले तर?? ते प्रोड्क्ट खपायचं सोडा आपण ते किती सहज सहन करु हा एक प्रामाणिकपणे विचार करण्याचा मुद्दा, आपण जसे नंबर ऑफ ऑटोमोबिल्स /१००० पर्सन्स मोजतो तसेच आपण नंबर ऑफ गर्ल्स /१००० मेल्स मोजतो!!! का?? असं का असावं बरं ?? मुलींच “कोमोडेटायझेशन” नाही वाटत हे ?? का आपण नंबर ऑफ बॉईज/१००० गर्ल्स काढत नाही तिथे तर असंतुलित सेक्स रेशो अजुन भडकपणे दिसुन येईलच नाही का??….मुलग्याने लहानपणी बापाला खेळणे फेकुन मारले तर “आमचा टायगर लैच तापट आहे भाई” असे हसत आपल्या मित्राला सांगणारा बाप( आता असे लाड केल्याने पोरांत हिंसा अन गुन्हे वाढीला लागतातच का हा एक अजुन संशोधनाचा मुद्दा) पोरीने साधा हट्ट केला तरी का भडकत असेल?? आता ह्यातुन इलाज काढायचे म्हणजे किती वेळ किती वेगळे संस्कार स्वतः आईबापांचे असावेत हे इमॅजिन करुन पहा तेव्हा मी वर बोललेली २० वर्षं सहज हिशेबात बसतील !!! तर इलाज हे काहीसे असे असावेत

  १. शिक्षण विस्तार.
  २. घरुनच मुलांना लिंगभेद न पाळण्याचे शिक्षण देणे
  ३. सर्वात महत्वाचे किशोरवयीन मुलांना -मुलींना सक्तीचे लैंगिक शिक्षण देणे!!!!, हे सहज एका मित्राला बोललो तर तो “आता काय १४-१५ च्या पोरा पोरींना सुहागराती वर्णन करुन सांगायच्या काय भडव्या ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ” असे म्हणाला!!!….. २ पोरांचा बाप असलेल्या ह्या मित्रालाच त्याही एका मल्टीनॅशनलात काम करुन आधुनिकतेचा आव आणणार ह्या माणसाला “लैंगिक शिक्षण” अन “लैंगिक अनुभव कथन” ह्यातला फरक कळत नसेल तर आपल्याला “प्रोअ‍ॅक्टीव्ह फ्रंट” वर किती काम करायला लागणार आहे हे फक्त इमॅजीन करा!!!!, पण ते करावे तर लागणारच आहे…. कारण कसंय न जरा वातावरण हलकं करायचं म्हणुन “रसेल पीटर्स” च्याच वाक्यांत सांगायचे झाले तर “दिज इंडीयन गाईज आर रियली वियर्ड , दे नेव्हर टॉक ऑफ सेक्स , दे नेव्हर डिस्कस इट अँड येट आर वर्ल्ड्स सेकंड मोस्ट पॉप्युलस फ्रिक्स!!!!!”

  (प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशित केला गेला आहे……)

  • गुरु,
   तू जे आज रिअ‍ॅक्टीव अ‍ॅप्रोच म्हणतोस, ते ताबडतोब अमलात आणले गेले पाहिजे . ही आजची काळाची गरज आहे.

   आणि प्रोअ‍ॅक्टीव्ह अमलात येई पर्यंत.. किती काळ लागेल हे समजत नाही.

 13. bhanasa says:

  इतक्या भयंकर घटनेनंतरही याची पुनरावृत्ती रोजच सुरू आहे. ही आंदोलने, निषेध, मेणबत्तीमोर्चे यासारख्या कृतींचा परिणाम होणारी ही मने नाहीत. इथे हवी भयंकर शिक्षा. जिच्या नुसत्या आठवणीने गात्रे थिजायला हवीत. पण आपल्याकडे हे होणार आहे थोडेच. लोकं काय थोडे दिवस शोष पडेस्तो बोंबलतील आणि मार्गाला लागतील… 😦 😦

  • भाग्यश्री
   अगदी मनातले बोललीस. शिक्षा किती आणि कशी दिली जाते, ते मागच्या लेखात लिह्लेले आहे. अहो सहा हजार दंड बलात्कार केला म्हणून?? छेः.. काहीच्या काही कायदे आहेत आपले.

 14. Suhas Adhav says:

  mala kuthe tari vatat hota tumhi hya vishayavar lihinar……
  tumhi revolver cha ullekh kelat …jasa chaku hiskaun gheta yeto tasa he sudha hiskaun ghena kahi kathin nasta aasha naradhaman sathi……
  garaj aahe ti purshanche drushtikon ani vichar badalnyachi….
  hyana fashi dena hi far choti shiksha aahe …….hyana fakta te talibani jashe shiksha detat na tich dyayla havi
  khup sarya goshti aahet jya aasha prakarana karni bhut aahet jasaki aapne hindi chitrapat ,internet cha youtube Chanel mhana …etki karna sapadtil ki ek post hoel tyavar…
  majha aasa mat aahe mulini self defense (karate or kungfu) aasa kahi tari nakii “”manapasun”” shikava
  swata sathi tari… me majhya bahinila shikwayla ghetla hota… ethe lokana shikau shakto aapan …pan te mhantat na gharchya docter cha gun yet nahi tasach jhala 😛
  mhanun mhanla mana pasun shikla tar fayda aahe martial arts cha 🙂

  • सुहास
   रिव्हॉल्वर घेऊन केवळ क्लिक करणे शक्य आहे.. फक्त तिने रोखून धरून त्या माणसाला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो हिसकावून घेऊ शकतो. सेल्फ डिफेन्स शिकाणे वगैरे शक्य होत नाही, कारण हल्लीचा शाळा कॉलेजचा अभ्यास, क्लासेस या मधेच सगळा वेळ जातो.

 15. अगदी देव दानवांच्या काळापासून स्त्री ही भोग्य वस्तू म्हणून मानल्या गेलीये आणि आजतागायत त्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाहीये. जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती राहणार तोपर्यंत असंच होत राहणार….हे अतिशय व्यथेने म्हणावं लागतंय 😦

  • जयश्री

   कायद्याची भिती संपली आहे ,म्हणून सगळे सुरु आहे. एकदा चांगले कडक कायदे केले, फाशी वगैरे देण्याची सुरुवात केली की आपोआपच जरब बसेल..

 16. Sundeep says:

  “जेंव्हा पुरुष स्त्री ला म्हणतो ,की माझे तुझ्यावर प्रेम आहे – याचा गर्भितार्थ म्हणजे “आय वॉंट टू स्लिप विथ यु” हा असतो , पण जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आय लव्ह यु म्हणते, तेंव्हा तिचा उद्देश हा भावनिक गुंतवणूक हा असतो.”
  I disagree with the above comment. I don’t understand, why always women get to be the higher moral authority.

 17. hasaleko says:

  http://online3.esakal.com/esakal/20130107/5401194962162806365.htm
  kaka
  hya mansala phoidle pahije ,hyacha address milele ka ?

 18. मालोजीराव says:

  बलात्काराचे प्रमाण लाखामागे मोजल्यास दिल्ली ४.५,मुंबई ३.७ तर पुणे २ च्या आसपास आहे.हीच आकडेवारी शिकलेल्या आणि कायदा आपल्या तुलनेत ठीकठाक असलेल्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मध्ये २३ तर हॉलीवूडस्थित असलेल्या लॉस एंजलीस मध्ये तब्बल २७.५० आहे.त्यामुळे शिक्षण आणि बलात्कार यांचा काहीच संबंध नाही असे दिसतंय.
  तसंच मुलींच्या कपड्यांवरून बर्याच जणांनी आक्षेप घेतला पण ६ महिन्याच्या मुलीपासून १० वर्षांच्या मुलींवर हि रोज बलात्काराच्या घटना घडत आहेत.या मुलींना तर कपडे म्हणजे काय याचीच पूर्ण जाणीव नसते हि गोष्ट आक्षेप घेणारे लक्षात घेत नाहीत.
  हि पण गोष्ट मान्य कि कमी कपडे घालणाऱ्या तरुण मुलींकडे बहुतांश लोक She’s Available,She’s may be escort or CG अश्या नजरेनेही पाहतात.

  • मालोजीराव.

   कोणी कमी कपडे घातले म्हणून बलात्कार, असे म्हंटले, तर खेड्यामधे सध्या सगळ्यात जास्त होत आहेत. मला वाटतं एखादी मुलगी एकटी सापडली की पुरुषातला श्वापद जागा होतो, आणि मग बलात्कार होतो.

 19. rajendra gaikwad says:

  mahendra; mala tar ekch watate ki jo kuni ase karel tyaa police madhe ndeta direct fasavar latkavla pahije…….ekda tari sarkarne ashi shiksha keli na tar mag dusara kuni as karaychi himmatch karnar nahi

  • राजेंद्र
   खरं आहे हो, अहो इतके चुकीचे कायदे आहेत की बलात्कार करणारा तर ९० टक्के वेळा सुटतोच.

Leave a Reply to hasaleko Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s