गुजगोष्टी हा शब्द जरा नवीन वाटत असेल, कारण हल्ली हा शब्द फारसा वापरात नसतो,पण पूर्वीच्या काळी मात्र हा शब्द भरपूर वापरला जायचा. एकत्र कुटुंबात मुलगी लग्न होऊन आली, की मग हातावरच्या मेंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच घरातल्या कामामधे गुंतून जावे लागायचे. दळण, कांडण, वडिलधाऱ्या आजारी लोकांची सेवा, आणि दिवसभर घरातल्या मोठ्या बायकांच्या हाताखाली काम केल्यावर मग रात्री सगळं आवरून झोपायला गेल्यावरच नवऱ्याला भेटायला चान्स मिळायचा.
त्या काळी दिवसभर नवरा नजरेसमोर जरी दिसला, तरीही त्याच्याबरोबर घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तीं समोर बोलणे म्हणजे वडिलधाऱ्यांचा अपमान/ उद्धटपणा समजले जायचे, त्यामुळे नवरा समोर दिसला तरीही नजर खाली घालून हलकेच एखादा तिरपा कटाक्ष.. बस्स .. ह्यातच काय तो रोमान्स वगैरे काय ते समजा. सारखे एकमेकांशी बोलण्याची इच्छा होणे अगदी साहजिकच नाही का? पण तशी संधी मिळणे दुरापास्त असायचे, आणि म्हणूनच मग रात्र झाली की मग नवऱ्याच्या कानाशी गुजगोष्टी करण्याची संधी बायको सोडत नसे.
तर या गुजगोष्टी कशा असतात? विनोद म्हणून वाचाल तर विनोदी, नाही तर जीवनाचे सार सांगणारा हा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तो खाली देतोय.
भ्रतारेसी भार्या बोले गुजगोष्टी- मन ऐसी कष्टी नाही दुजी,
अखंड तुमचे धंद्यावरी मन, माझे तो हेळण करती सर्व.
जोडितसा तुम्ही, खाती येरे चौरे, माझी तर पोरे हळहळती,
तुमची व्याली माझी डाई हो पेटली, सदा दुष्ट बोली सोसवेना,
दुष्ट वृत्ती नंदुली सदा द्वेश करी , नांदो मी संसती कोणामुखे
भावा दीर काही, धड ना हो बोले, नांदो कुणा खाले कैसी आता
माझ्या अंगेसंगे तुम्हासी विश्रांती, मग धडगती नाही तुमची
वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण देते आता
तुका म्हणे जाला कामाचा अंकीत, सांगे मनोगत तैसा वर्ते
ह्या अभंगात बघा, ही स्त्री नवऱ्याला कशी काय आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करते ते , खूप उत्कृष्ट पणे सांगितलेले आहे. ती स्त्री पण खूप हुशार आहे, सुरुवातीला नवऱ्याचे आपल्या बोलण्याकडे लक्ष वेधले जावे म्हणून आधी त्याच्या कामाची तारीफ करते आहे. ते ऐकल्यावर मग त्याच्याकडे घरातल्या कामाची/त्रासाची जंत्री वाचून दाखवते. म्हणते, की सासुरवास, जाऊबाई, नणंद, सासूबाई सगळे जण मला बोलतात, नणंद तर नाक मुरडते, भावा -दीरांना तर बोलावेसे पण वाटत नाही माझ्याशी – आणि तुम्ही! तुम्हाला तर माझ्याकडे बघायला पण वेळ नाही! नंतर शेवटी हळूच आपल्या मनातला खरा विचार समोर आणते, म्हणते, आपल्याला जर सुखाने संसार करायचा असेल तर वेगळं राहिले पाहिजे. जेंव्हा नवरा अजिबात काही बधत नाही हे लक्षात आल्यावर मग ती मात्र आपले शेवटचे ठेवणीतले अस्त्र काढते, आणि म्हणते, ” मी जीव देईन आता, जर वेगळं झालं नाही तर!”
सुरुवाती- लाडीगोडी, नंतर – तक्रार, शेवटी – धमकी! किती हुशार आहे ती स्त्री नाही का? इतका वेळ नवरा शांतपणे ऐकत असतो, पण आता मात्र कामातूर झालेला तो नवरा कसेही करून तिला खुष करण्यासाठी कोणकोणती आश्वासने देतो ते तुकोबारायांनी एका अभंगात लिहून ठेवलेले आहे- तो खाली देतोय अभंग….
सकाळी उठोनी वेगळा निघेन, वाहतो तुझी आण निश्चयेसी
वेगळे निघता, घडीन दोर चुडा, तू तर माझा जोडा जन्मवरी
ताईत साखळी गळाची दुलडी, बाजूबंद जोडी हातसर
वेणीचे ते नग सर्वही करीन, नको धरू शीण मनी काही,
नेसाया साडी सेलारी चुनडी, अंगीची काचोळी जाळिया फुले
तू तर माझी जन्माची साथीदार आहेस, मी उद्या सकाळी उठलो की तुला निरनिराळे अलंकार , सोन्याची बांगडी, बाजूबंद, हात सर , वेणीचे दागीने, सेलोरी चुनरी ( कदाचित त्या काळच्या साडीचे नाव असावे) घेऊन देईन. आता इतकी आश्वासने दिल्यावर ती पाघळली नसेल तरच नवल. म्हणूनच शेवटचे वाक्य म्हणजे तुकोबा म्हणतात,
तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासवे धाव घेतलीसे.
मला वाटतं की हे उपहासात्मक रुपक वापरले आहे इथे. संसारात गुंतलेल्या माणसाची अशीच अवस्था होत असते. “रांडेने केला गाढव, “या चरणात, विनोद, उपहास भरलेला आहे .
तर इथे गुजगोष्टी फक्त नवराबायकोच्या नसतात , तर त्या दोन स्त्रियांच्या पण असू शकतात. दोन (गडणी – मला वाटते गडी म्हणजे पुरुष म्हणून गडणी हा शब्द स्त्रियांसाठी वापरला असावा )समदुःखी स्त्रिया आपली करूण कहाणी एकमेकींना सांगून स्वतःचे दुःख हलके करू पहाताहेत. तो अभंग असा आहे..
होनवर तीजवर दोघी त्या गडणी, अखंड कहाणी संसाराची,
माझा पती बहू लहानची आहे, खेळावया जाय पोरासवे,
माझे दुःख जरी ऐकशील सई, म्हातारा तो बाई खोकतसे,
वेळे सांजवरी बाहेरी तो राहे, वाट मी वो पाहे सेजेवरी.
पूर्व पुण्याई माझी नाही बाई नीट, बहू होती कष्ट सांगो बाई
जवळ मी जाते, अंगा अंग लावू, नेदी जवळ येऊ कंटाळतो.
केवळ सहा ओळींचा हा अभंग समाजाला अभिप्रेत असलेल्या स्त्री पुरुषांमधील संबंधांवर उजेड टाकतोय- कसा ते बघा. बाल विवाह, बाल जरठ विवाह , हे त्याकाळी अगदी कॉमन होते. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य स्त्री ला कधीच नसायचे. मग वडील म्हणतील त्या बिजवर, तिजवराला माळ घालायची आणि पुढे मग जे काही होतंय ते केवळ “पूर्वसुकृताचा ठेवा” म्हणून मान्य करतांना दोन्ही स्त्रिया दिसतात. अभंग खूपच सोपा आहे, म्हणून जास्त विश्लेषण करत नाही. असो.होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रारब्धाला दोष द्यायचा ही मनोवृत्ती मनाला खूप चटका लावून जाते हे मात्र नक्की.
गुजगोष्टींच्या हलक्या फुलक्या पोस्ट ला इतक्या सिरियस वळणावर नेऊन संपवायचे नव्हते, पण, जीवनाचा तो पण एक भाग आहेच, तेंव्हा टाळता येत नाही हे नक्की.आजकालच्या दिवसात गुजगोष्टी एकत्र कुटुंबपद्धती सोबत तशा संपल्यातच जमा झालेल्या आहेत , कारण समाजात मोकळे पणा आलाय हल्लीच्या काळात.बायकोला नवऱ्याशी बोलायला रात्र होण्याची वाट पहावी लागत नाही 🙂 तरी पण आजही ह्या अभंगात जे काही दिलेले आहे, ते लागू पडते . खूप दिवसांपासून ठरवले आहे की एकदा तुकारामाची गाथा वाचायची म्हणून . बघू या कधी जमतं ते.,
गुज्गीष्टी छ्ग्ल्या आहेत पोष्ट आवडली .
श्रीकांत
मनःपूर्वक आभार.
kaka
gela to kal
aaj kal bayko direct tu mahnun ullekh karte teva jiv dyavwasa watato
🙂 पण तुकाराम महाराजांनी जे ४०० वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे, ते आजही लागू पडते, यातच त्यांच्या लिखाणाचे यश . मानवी स्वभाव उत्कृष्ट पणे समजून लिहिलेले सगळे अभंग आहेत त्यांचे.
https://code.google.com/p/tukaram/
lok kharach aplya bahsesathi khup mehnat ghet ahet\
पण अजून काही अपलोड केले गेलेले दिसत नाही. 🙂 एकच पान आहे फक्त. ज्ञानेश्वरी आहे विकिवर.
https://code.google.com/p/tukaram/downloads/detail?name=tukaram_text.zip&can=2&q=
download karun bagha
mala khup sapadle
गुजगोष्टी या शब्दावरून आपण काही लिहिले आहे, असा समज करून वाचायला गेलो तर आपण संत तुकाराम यांच्या रचनेचा (हल्लीच्या भाषेत ) धांडोळा घेतलाय. आवडला आपला हा प्रयत्न. आणखी बारकाईने वाचीन म्हणतो.
मंगेश नाबर
मंगेश
बरेच दिवसापासून ही नोंद कागदावर रेंगाळत पडली होती , ती आज नेट वर टाकली. तुकाराम महाराजांचे स्त्री विषयक विचार जरी वाचले, तर आजच्या सगळ्या स्त्री संघटना खवळून ऊठतील अशी परीस्थिती आहे त्या बद्दलचे अभंग पण लिहून ठेवलेले आहेत, पुढे मागे कधीतरी ब्लॉग वर टाकीन.. धन्यवाद.
taka
amhi tumchya pathishi ahot
धन्यवाद..
वा …. सकाळी सकाळी मस्त निरुपण वाचायला मिळाले…… कुलकर्णी महाराज की जय. 😉
पुंडलीक वरद….
धन्यवाद..
khupach chhaan
दिनेश
धन्यवाद.
best likhan….
गणेश
आभार!
Kaka post mastch… Aajchya jamanyat pan hotat ho gujgoshti… Kadachit madhyam badalal asel..
गुजगोष्टी हा शब्द…”गुंजन ” अर्थात बारीक, कीनर्या आवाजात लाडाने सांगणे/ मागणे ह्या अर्थी आहे…
राजीव,
नाही रे. तसे नाही, दोन स्त्रियांमधे पण होऊ शकतात, कान गोष्टी म्हण हवं तर..
गुजगोष्टी पोस्टआवडली.
श्रीकांत
आभार
Kaka…Gadni ha shabd maitrin asa aahe…mala 10th la ek abhang hota tuyat aalela ha shabd aahe….ani…te gan atavt…jayshree gadkaranch..:.maltachya malyamandi…patach pani jaat….tyathi ha shabd aahe….baki tukobanche abhang mhanje sansaratun parmarth sadha ashi skivan detat….mazi aaji mast vishleshan kari…..Kale baba mhanun amche ek watchman hote tyani so. Pujechya veli far sundar pravachan dile hote.gathewar…santwani kharach marg dakhwat aste
खरंच खूप सुंदर अभंग आहेत. काही अभंग नोट करून ठेवले आहेत, त्यांचे स्त्री विषयक विचार.. लवकरच पोस्ट करतो.
kaka f b werna gayb zalat kee kay?
तीन महिने झाले बंद केलाय अकाउंट.. सुरु करीन लवकरच.. 🙂
me tar ha shabda pahilyandach aaikla
marathi meadium madhye shikun suddha ha shabda kadhi aaiknyat navta …may be majha vachan farach kami aahe 😛
kharach tukobanche abhanga aajahi kiti upaukta aahet 🙂
अरे खूप जूना शब्द आहे हा. पण हल्ली वापरात नसल्याने माहिती नसेल. असे अनेक शब्द मला आठवतात, जसे गरम पाण्यात विसण घालणे ( म्हणजे आंघोळीच्या गरम पाण्यात थंड पाणी घालून ते पुरेसे थंड करणॆ, वगैरे..)
Ya abhasu likhan pravasala shubhecha. SALAM,GREAT
मनःपूर्वक आभार.
तुकरामांच्या बायकाविषयींच्या अभंगाची वाट पाहते.!(स्वतः शोधायचा कंटाळा!)
इ मेल करतो लवकरच..
chan ahe hi post tumchi…………..