इफ यू आर होमोसिपियन, मिन्स यू आर अ लायर

micro compiledतुम्ही कोणाशी तरी बोलताय, काही तरी महत्त्वाचं सांगताय, पण समोरचा माणूस तुमचे बोलणे किती सिरियसली घेतोय ? त्याला राग तर येत नाही ना? की त्याला आवडतंय आपलं बोलणं? हे असे प्रश्न नेहेमीच डोक्यात येत असतात . याचं उत्तर मिळालं असतं तर? असं म्हणतात, की प्रत्येक माणूस दर दहा मिनिटात एकदा तरी खोटं बोलतोच. असं म्हणतात, की ” मस्जिद मे बैठके पिने दो, नही तो वो जगह बताओ, जहा खुदा ना हो” अगदी त्याच धर्तीवर ,  “मला खॊटं न बोलणारा माणूस दाखवा  किंवा सगळेच खोटं  बोलतात हे मान्य करा असं म्हणावसे वाटतंय”.

इंग्लिश टिव्ही सिरीज पहाणे हा माझा छंद आहे. सध्या तर रिकामा वेळ असला की कुठली तरी एखादी  सिरीज टोरंट वरून डाउन लोड करून पहात असतो मी . काही वर्षापूर्वी  ’लाय टू मी’ ही टिव्ही सिरीज सुरु झाली होती .  मला मनापासून आवडलेल्या  टिव्ही सिरीज पैकी ही एक . टिव्ही सिरीज आवडायचे कारण तरी काय बरं असेल? कशावर  सिरीज आहे ही?  तुम्ही कोणीही असा, हाऊस वाईफ, विद्यार्थी, किंवा टेररिस्ट, तुमच्या रिअ‍ॅक्शन्स, किंवा चेहऱ्यावरचे मायक्रो एक्स्प्रेशन्स  अगदी सारखेच असतात- ही ह्या सिरीज ची थिम आहे.

सुरुवातीला  म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी जेंव्हा मी पहिला सिझन डाउनलोड करून पाहिला, तेंव्हा  सौ. बरोबर गप्पा मारतांना या सिरीज बद्दल बोललो, तर ती म्हणाली, की कदाचित हे सगळं काल्पनिक असेल, हे काही शक्य असेल असे मला वाटत नाही, किंवा हे जरी शास्त्र असेल तरी पण इतकं सोपं नसावं -कसल्या शास्त्राबद्दल लिहितोय मी इथे?

या टिव्ही सिरीजचा हिरो म्हणजे डॉ. कॅल लाइटमन! ह्याचे काम  म्हणजे  कोण खोटं बोलतोय ते केवळ बॉडी लॅंग्वेज वरून ओळखायचे. . एखादी व्यक्ती तुम्हाला काही तरी सांगते आहे, आणि तुम्ही ते ऐकत असतांना तुमहाला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे भाव तुम्ही तुमच्या नकळत चेहेऱ्यावर मायक्रो एक्स्प्रेशन्स मधे दाखवत असता, आणी त्यावर तुमचा काहीच कंट्रोल नसतो, हे मूळ तत्त्व आहे या सिरीजचे. तुम्ही जेंव्हा खोटं बोलता, खरं बोलता, घृणा वाटते, प्रेम वाटते ,भीती वाटते, तेंव्हा हे सगळे भाव तुमच्या नकळत तुमच्या चेहेऱ्यावर क्षणभरासाठी का होईना,  दिसून येतात, कदाचित तुम्ही स्वतःला सावरून चेहेरा निर्विकार कराल, पण  तुमच्या मनातले खरे भाव हे अगदी काही सेकंदासाठी  तरी  तुमच्या कंट्रोल मधे नसतात.  या मायक्रो एक्स्प्रेशन्सचा आधार घेऊन कॅल लाइटमन हा गुन्हे शोधण्य़ा साठी ह्युमन लाय डिटेक्टर चं काम करत असतो.

पहिल्या  सिझन मधे कॅल लाइटमॅन चेहेऱ्या वरच्या बारीक अगदी लहान म्हणजे   मायक्रो एक्स्प्रेशनचे   विश्लेषण   करून दाखवतो  . त्याने   केलेले     ऍनॅलिसिस इतके साधे सरळ आणि सोपे आहे की   तो सिझन  संपे पर्यंत आपणही    आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहेऱ्या वर येणाऱ्या मायक्रो एक्स्प्रेशन्स कडे लक्ष देऊन   समोरची   व्यक्ती   खरं बोलते आहे की  खोटं?   हे शोधण्याचा प्रयत्न करू लागतो .  इतरांचे फेसबुक वरचे वगैरे  फोटो पाहिल्यावर त्यातले खरे भाव काय आहेत ? समोरचा माणूस खरंच आनंदी आहे  की उगीच हसतोय ? याचा अंदाज बांधणे सुरु होते.

कॅल लाइटमॅन चा   डाय हार्ड फॅन झालोय मी. ह्या सिरीज चे आज पर्यन्त तीन सिझन झाले आहेत- सगळॆ टोरंट वर उपलब्ध आहेत. तिन्ही सिझन्स नक्कीच छान आहेत, पण पहिला सिझन मात्र एकदम मेस्मराइझ करून टाकणारा आहे.

डॉ. कॅल लाइटमॅन हे पात्र अगदी आपल्यातलंच वाटावं, इतकं साधं सरळ दाखवलं आहे . असा कोणीतरी असायलाच हवा की  ज्यावरून ही सिरीज तयार केली आहे असे वाटत होते, म्हणून नेट वर शोधले, तर  खरोखरच  ’पॉल एकमॅन’ नावाचा एक माणूस सापडला. पॉल चे काही व्हिडीओज नेट वर आहेत, पण त्या पेक्षा कॅल जास्त जवळचा वाटला मला.

इथे  वर जे  काही चित्र देतोय, नेट वरून घेतलेले , त्या वरून हे अ‍ॅनॅलिसीस कसे करायचे याचा अंदाज येईल. तरी  थोडी  माहिती खाली देतोय.

चूक मान्य करणे. गिल्टी चेहेरा. कदाचित व्यक्ती बोलणार नाही, पण असा चेहेरा दिसला की गिल्टी आहे हे मान्य केले आहे असे समजा.

चूक मान्य करणे. गिल्टी चेहेरा. कदाचित व्यक्ती बोलणार नाही, पण असा चेहेरा दिसला की गिल्टी आहे हे मान्य केले आहे असे समजा.

ही सिरीज पहातांना काही खास क्यु   लक्षात आले. म्हणजे जर एखादा माणूस तुमच्याशी बोलतांना नजरेला नजर   भिडवून बोलत असेल ( विनाकारण) तर नक्की समजा की तो खोटं बोलतोय.  त्याचं विनाकारण नजरेला नजर भिडवणे हे केवळ तो जे खोटं बोलतोय त्यावर तुमचा किती विश्वास आहे हे पहाण्यासाठी असते.

एखादी गोष्ट सांगतांना किंवा ऐकतांना समोरच्या माणसाच्या कपाळावर दोन उभ्या  आठ्या दिसल्या तर त्याचा अर्थ म्हणजे त्या समोरच्या  व्यक्तीला चिंता वाटते आहे .

लज्जा.. शेम..

लज्जा.. शेम..

समोरच्या व्यक्तीच्या कपाळावर  आडव्या आठ्या  पडल्या   आणि त्याने डोक्याला/कपाळाला हात लावत असेल तर   शेम- लज्जा दर्शवते. बिल क्लिंटन हीच पोज घेऊन बसला होता मोनिका लेवेन्स्की च्या केस च्या वेळेस. 🙂

जेंव्हा अगदी मनापासून आणि खरं खरं कोणी हसतो तेंव्हा डोळ्याखाली किंचित सुरकुत्या पडतात,  याचे कारण म्हणजे गालाचा उंचवटा  ( चिक बोन)थोडा वर उचलला जातो, पण हेच जर फेक स्माइल  असेल तर त्या सुरकुत्या दिसत नाहीत.

खोटं बोलणे, स्वतः  जे बोलतोय त्यावर विश्वास नसणे

खोटं बोलणे, स्वतः जे बोलतोय त्यावर विश्वास नसणे

जर एखादी व्यक्ती बोलतांना माउथ श्रग ( मराठी मधे काय म्हणतात याला? चंबू करणॆ?) करत असेल तर तो नक्की खोटं बोलतोय असं समजा. स्वतःच्या शब्दावर अजिबात  विश्वास नसणारी व्यक्तीचे पण असेच हावभाव दिसून येतात.

तोंड वाकडे करणे म्हणण्यापेक्षा ओठाचा एका बाजूचा कोपरा वाकडा करणे, हे असे बहुतेक कोणी समोरची व्यक्ती जे काही सांगते आहे, ते पटत नसेल तर , पण त्याला तुम्ही ते सांगू शकत नसाल तर केले जाते. थोडक्यात समोरचा माणूस मूर्ख आहे    अशी भावना दर्शवणे. समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही तरी सांगितले, आणि ते खोटे निघाले, की हा  असा चेहेरा केला जातो
.
बोलता बोलता मानेला/कानाला/गळ्याला  हात लावणे हे खोटे बोलण्याचे लक्षण आहे.

घृणा

घृणा

दुःखी व्यक्ती तर अगदी सहज ओळखता येते. डोळ्याच्या पापण्या किंचीत जड झालेल्या, ओठ किंचित उतरल्यासारखे दिसतात अशा व्यक्तीचे.

बरेचदा तुम्ही एखादी  उत्कंठावर्धक गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगता, पण तिला खरंच आश्चर्य वाटल असेल तर त्या व्यक्तीच्या भुवया किंचित उचलल्या जातील, ओठ विलग झालेले, आणि डोळे विस्फारलेले दिसतील.

घाबरणे:-भुवया उंचावलेल्या , पण चेहेरा हसरा, डोळे डायेलेट झालेले.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घॄणा, ही भावना दिसायला खूप सोपी असते, चेहेऱ्यावर क्षणभरच येऊन लगेच नाहीशी होऊ शकते. ओठाचा कडेने चेहेरा वाकडा होणे, बस मधे एखादा पुरुष स्त्री च्या जवळ जवळ करायला लागला की हे असे भाव नेहेमीच दिसतात .

हे सगळं विश्लेषण एका टिव्ही सिरीज वर केलंय. आता एखाद्या सिरीज वर का विश्वास ठेवावा? तर  याचे कारण म्हणजे  कॅल लाइटमन हे पात्र एका खऱ्या व्यक्तीरेखेवरून बेतलेले आहे. त्याचे नाव आहे ’पॉल एकमॅ”! हे शास्त्र खरे आहे की नाही हे माहिती नाही, पण ही टिव्ही सिरीज मात्र एकदम अफलातून आहे, आणि माझे अंदाज तर हल्ली अगदी बरोबर निघतात. मस्ट ्वॉच धिस! तर चला डाउनलोड सुरु  करा लवकर. या पूर्वी पण एक लेख लिहिला होता बॉडी लॅंग्वेज वर.. तो इथे आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , . Bookmark the permalink.

34 Responses to इफ यू आर होमोसिपियन, मिन्स यू आर अ लायर

 1. bageshrik says:

  kaka links dya naa series download karayala. mala lokanche nirikshan karayala aavadate aani aata he mahiti barich upyogi padanar aahe mala 🙂

 2. anuvina says:

  किती हे विश्लेषण ….. फेस रीडिंग करते का भाऊ तुमी?

 3. Tanuja says:

  एकदम भारी आहात हं …………..
  चांगली चांगली माहिती गोळा करून देता …
  नक्की download करेल

 4. Prachi says:

  एकदम बरोबर वाटलं निरीक्षण… आणि भारतीय व्यक्तींच्या बाबतीत पण हे लागू होतंय असं वाटलं ……

  • प्राची
   जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या बाबतित हे लागू होतं. भावना सगळ्यांच्या सारख्याच असतात.

 5. greenmang0 says:

  फारच छान, नक्की download करेन

 6. aruna says:

  मी सुद्धा ती सेरिअल पाहते आणि त्यात सांगितलेले आडाख पटतात पण. नजरेला नजर देऊन बोलणे सरळ असेल तर ते खरे असते. जे बोलतांना नजर चुकवतात त्यांच्या मनात कहीतरी काळे बेरे असण्याची शक्यता असते.
  पण तुमचा रिसर्च भारी आहे. आणि फोटो पण.

  • अरुणा
   सध्या फॉक्स वर सिझन ३ सुरु आहे, 🙂 तो पण फॉलो करतोय. पण सिझन दोन पासून त्यांनी अ‍ॅनॅलिसिस करून दाखवणे बंद केले आहे. तसा तो पण ठिक आहे, पण सिझन १ ला पर्याय नाही.

 7. ruchira says:

  Aaplyahi nakalat aapan aajibajuchya lokanch nirikshan karatch asto… Kadhi kadhi aaplyala have te arth hi kadhto lokanchya haavbhavache.. Ho n? Hi series baghayla maja yenar as disatay te hyamulech… Mast post kaka

  • रुचिरा
   करमणूक प्रधान सिरीज आहे ही. डाउनलोड करणे सुरु कर लवकर. 🙂 नाही तर ऑन लाइन पहाण्यासाठी लिंक पण दिलेली आहे.

 8. Anagha says:

  मला पण हा सीझन नक्की बघायला आवडेल. सध्या मी दोन प्रकारची माणसे जवळून पहाते आहे एक म्हणजे खोटे बोलणारी आणि दुसरी खोटे आणि ते देखील अतिशयोक्ती करत बोलणारी. आजकाल अशी माणसे कधी खरे आणि कधी खोटे बोलतात ते बरेच वेळा मला बरोब्बर कळते. कधी कधी माझी करमणूक होते, पण कधी प्रचंड चीड येते.

  • अनघा,
   एका रिसर्च प्रमाणे प्रत्येक माणूस दहा मिनिटात एकदा तरी खोटं बोलतोच. म्हणूनच ह्या पोस्टचं हेडींग दिलंय ते! ही सिरीज २००९ मधे आली होती, मी पाहिली २०१० -११ मधे. सुरुवातीला स्टार वर्ल्ड वर यायची , या गोष्टींकडे एक अभ्यास म्हणून पाहिलं , तरी नेहेमीच्या संपर्कातले लोकं किती खोटं बोलतात हे लक्षात येईल.

 9. Pallavi says:

  I am sharing it!!

 10. Ki$HoR says:

  kaka psychology pan avadate ka tumhala????????

 11. bhanasa says:

  माझी आवडती सिरीयल. एकदा का पाहायला सुरवात केली की अक्षरश: भारलेपण येते. ’ कॅल ’ ची समोरच्याच्या मनाचा वेध घेण्याची हातोटी, देहबोली, सगळेच इतके विलक्षण दाखवले आहे की आपण पूर्णपणे गुंतून जातो. टिम रॉथ ने कॅलचे काम कमाल केलेय. नकळत आपणही आपल्या अवतीभोवती वावरणार्‍या लोकांच्या मनाचा शोध घेऊ लागतो. आपण एकदा यावर बोललोही होतो. 🙂

  तुझ्या या मस्त पोस्टमुळे अनेकजण ही सिरीयल पहायला व नंतर स्वत:ही त्याचा पडताळा पहायला उत्सुक होतीलच. मला खात्री आहे. 🙂

  • होय .. आठवतं मला. 🙂 खरंच ,मला पण खूप आवडलेली सिरीज आहे ही. शक्य झालं तर हेडफोन लावून पहायची , मजा येते.
   सध्या भारतात फॉक्स वर सिझन ३ सुरु आहे, पुन्हा पहातोय:)

 12. हि मालिका पहिली पाहिजे.
  आमच्या पंचतारांकित शेत्रात तर जगभरातील विविध शेत्रातील मान्यवर येतात ,
  देहबोलीच्या भाषेवर आम्हाला थोडेफार प्रशिक्षण दिले आहे , पण नुसत्या चेहेऱ्याच्या
  हाव भाव पाहून खरे खोटे समजणे म्हणजे धमाल आहे ,
  पोकर खेळणाऱ्या लोकांसाठी उत्तम आहे.
  सी सिरीज नक्की पहिली जाईल ,
  पण मला डाऊनलोड प्रकार आवडत नाही
  ऑन लाईन पाहण्यात मजा असते , म्हणजे रात गई, बात गई
  फक्त हि धारावाहिक मी एकट्याने गुपचूप पाहीन
  केट सोबत पाहण्याची रिस्क मी घेणार नाही ,
  आपल्या बायकोला आपण खोटे बोलत आहोत हे कळत असेल ह्या कल्पनेने
  मला येथे जर्मनीत भर हिमवर्षावात घामटा निघाला.

  • निनाद
   अरे वर लिंक दिलेली आहे ऑन लाइन अव्हेलेबल असलेली.जितक्या मित्रांना रेकमंड केली सगळ्यांना आवडली आहे , तुला पण नक्की आवडेल. 🙂

 13. पहिला सिझन अत्युच्च आहे.

 14. उत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक
  मेजवानी देत राहा.

  माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!

  InfoBulb : Knowledge Is Supreme – इन्फोबल्ब : ज्ञान हेच सर्वोच्च आहे

  http://www.Infobulb.Blogspot.Com

 15. विनाउप४ says:

  “यू आर अ लायर” असे लिहिताना झालेली चूक अजून सापडलेली दिसत नाही…
  खरंच तुम्हांस “यू आर अ लॉयर” असेच संबोधायचे असणार…!!!
  कित्ती उलट-सुलट चर्चा झालीये कोणीही “मुद्रित शोधन” न केल्याने…
  केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे…

 16. काका, छान पोस्ट आहे…२४ आणि प्रिझन ब्रेक नंतर कुठल्याही सिरीज सुरू केल्या नाहीत..सिनेमेपण एका बैठकीत पाहणं होत नाही पण तरी या सिरिजचा निदान पहिला सिजन पाहायला हवा असं तुमच्या पोस्टवरून वाटतंय 🙂

  • अपर्णा,
   खरं आहे, मुलं लहान असली की वेळ कसा मिळू शकतो? माझं पण हल्ली बरंच कमी झालंय सिरीज पहाणं. फक्त ग्रेज अ‍ॅनाटोमी पहातो रोज न चुकता 🙂

   • हो ते तर आहेच…२४ आणि प्रिझन ब्रेक सुद्धा आई-बाबा इथे होते तेव्हा पाहिले…
    आता तर तुम्ही मुलांनाही भेटलात त्यामुळे तुमचं वाक्य जास्त रिलेट होतंय.. 😉

 17. SURAJ MOHITE says:

  सर, लेख छान लिहिला आहे. तुमचा ब्लॉग एकदम झकास आहे
  एक विनंती आहे काही चांगल्या ( तुमच्यासारख्या ) अन्य काही ब्लॉगर्स चे ब्लॉग सांगाल का ?

  • सुरज
   बरेच ब्लॉग आहेत. याच ब्लॉग वर खाली काही ब्लॉग च्या लिंक्स दिलेल्या आहेत. तसेच मराठी ब्लॉगर्सचे पेज पण आहे .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s