ब्लॅकबेरी वापरत असाल तर…

bbपरवा एक फोन आला होता, एक स्त्री होती, म्हणाली की मी दिल्लीहून बोलते आहे, आणि तुम्ही रोहन ला ओळखता का?  हा प्रश्न अगदी साधा सरळ वाटतो. होय, ओळखतो असे उत्तर दिल्यावर , ती बाई म्हणाली की  ” रोहन वर एक फोर्जरी चा गुन्हा दाखल झालेला आहे, आणि विटनेस म्हणून तुमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला आता दिल्ली कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील. लगेच लक्षात आलं, की हा फ्रॉड फोन आहे आणि सरळ फोन कट केला. पहिले काम केले ते रोहनला मेल पाठवला, आणि त्याचे उत्तर अर्थातच अपेक्षित होतं, ती बाई फ्रॉड आहे, तिने बऱ्याच लोकांना असे फोन केले आहेत, तेंव्हा लक्ष देऊ नकोस.

हे कसं काय झालं असावं? एक म्हणजे हरवलेला फोन कोणाच्या तरी हाती लागला असेल का?

मोबाइल फोन हरवणे म्हणजे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तसाही मोबाईल आल्यापासून आपली स्मरणशक्ती कमी झाल्याचे मला जाणवते. पूर्वी आपण डायरी मधे नंबर पाहून मग तो डायल करायचो, त्या मुळे नंबर्स लक्षात रहायचे, पण हल्ली आपण मोबाइल मधे केवळ नाव पाहून डायल करतो त्यामुळे नंबर वाचायचे कामच पडत नाही- आणि हेच कारण असावे बहुतेक , नंबर्स लक्षात न रहाण्याचे.

मोबाईल चोरीला जाणे हे दुःस्वप्न मी बरेचदा अनुभवले आहे. अगदी पहिल्यांदा मोबाईल जेंव्हा हरवला होता, तेंव्हा तर सगळे नंबर्स पण गेले होते, आणि मग एक – एक करून पुन्हा सगळे नंबर्स जमा करायला खूप त्रास झाला. त्यातही काही महत्त्वाच्या संपर्काचे नंबर्स तर पुन्हा मिळूच शकले नाहीत.सुरुवातीच्या काळात मोबाईल चा आकार खूप मोठा होता आणि तो कम्प्युटरला कनेक्ट केला जाऊ शकत नव्हता. त्या मुळे मोबाईल  हरवला की सगळा डेटा  पण जायचा. कॅमेरा नसल्याने फोटो वगैरे दुसऱ्याच्या हाती लागण्याची भिती नसायची.

हजार एक फोन नंबर्स, तेवढेच इ मेल अ‍ॅड्रेसेस , डेबिट कार्डचे पास कोड्स, काही पासवर्ड्स,  वाढदिवस, काही महत्त्वाच्या घटना  वगैरे सेल फोन वर सेव्ह करून ठेवायची सवय मला आहे- आणि बहुतेक सगळ्यांनाच असते.  पण जर कधी मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर  हा सगळा डेटा जर एखाद्या गैर व्यक्तीच्या हाती लागला तर ?

सिंबियन फोन नंतर आलेल्या अ‍ॅंड्रॉइड फोन ने मात्र  हा प्रॉब्लेम बराच प्रॉब्लेम कमी झालेला आहे. फोन हा कॉम्प्युटरला कनेक्ट केला जाऊ शकल्याने सगळ्या फोन नंबर्स चा वगैरे बॅक अप फोन वर घेऊन ठेवता येऊ शकतो. आणि जरी फोन हरवला तरी हा सगळा डेटा पुन्हा कम्प्युटर वरून नवीन सेल फोन वर टाकला जाऊ शकतो. पण त्या चोरीला गेलेल्या मोबाइल वरचा डेटा  त्या चोराच्या हाती लागला असेल त्याचे काय? 😦 मी मात्र सिंबियन फोन वरून सरळ ब्लॅक बेरी वर गेलो.

नुकताच माझा ब्लॅक बेरी बोल्ड चोरीला गेला, आणि नंतर मी नवीन फोन घेऊन, ब्लॅकबेरी प्रोटेक्ट   वरून सगळे नंबर्स,  डेटा डाउनलोड करून पुन्हा फोन  वापरणे सुरु पण केले. जुन्या फोन  बद्दल तर मी विसरून पण गेलो होतो.

ब्लॅक बेरी वर ब्लॅक बेरी प्रोटेक्ट म्हणून एक फ्री सर्व्हीस आहे. तुम्ही आपल्या फोन वर हे ऍप्लिकेशन डाउन लोड केले की तुमच्या फोन वरचा सगळा डेटा ब्लॅक बेरीच्या सर्व्हर वर बॅक अप घेऊन ठेवता येतो. आणि जेंव्हा तुम्ही नवीन ब्लॅक बेरी विकत घेता, तेंव्हा तो डेटा लोड करता येतो. तीन वर्ष हे ऍप्लिकेशन माझ्या फोन वर आहे, आणि मला याचा फक्त एवढाच उपयोग माहिती होता. पण हेच ऍप्लिकेशन वापरून तुम्ही तुमचा फोन रिमोट लॉक करू शकता, आणि तुमच्या  ब्लॅकबेरी वर तुम्ही सेव्ह करून ठेवलेले सगळे नंबर्स, आणि इतर डेटा पण पुसून टाकू शकता ह्या गोष्टींची कल्पना पण नव्हती.माझ्या प्रमाणेच बऱ्याच लोकांना हे माहिती नसावे म्हणून ही पोस्ट लि्हीली आहे.

पद्धत सोपी आहे, ह्या  लिंक वर जाऊन तुमचा ब्लॅकबेरी  आयडी  ने लॉग इन  करा, तुम्हाला  पाच ऑप्शन्स दिसतील, तुम्हाला हव्या त्या ऑप्शन वर क्लिक करा..

१)तुमच्या फोन चे लोकेशन  दाखवण्यासाठी पहिला ऑप्शन आहे.  जर फोन सुरु झाला असेल तर तो फोन कुठे आहे  हे तुमच्या कम्प्युटर वर दिसते.

२) दुसरा ऑप्शन, जर तुमचा फोन सायलेंट मोड मधे असेल  आणि सापडत नसेल तर इथून तुम्ही त्या फोन ला रिंग देऊ शकतात. सायलेंट मोड मधे पण रिंग वाजेल.

३)तसेच  जर समजा तुमचा फोन हरवला असेल आणि जर लॉक केलेला असेल तर तुम्ही त्याच्या लॉक असलेल्या स्क्रिन वर एक मेसेज पाठवू शकता- म्हणजे ज्याला तो सापडला असेल तो माणूस तुम्हाला कॉंटक्ट करू शकतो..

४) फोन पासवर्ड ने लॉक करू शकता.

५) फोन वर असलेला सगळा डेटा पुसून टाकू शकता.

हे सगळं करून शेवटी काय मिळतं? तर  तुमचा डेटा पण कोणाच्या हाती लागला नाही याची खात्री आणि तुमचा चोरीला गेला फोन दुसरा कोणी वापरू शकणार नाही याचे मानसिक समाधान!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to ब्लॅकबेरी वापरत असाल तर…

 1. Wipe Device नंतर Successfully Deleted all data असा मेसेज मिळालेला दिसत नाही ह्याचा अर्थ तुमचा फोन कोणाच्या तरी ताब्यात आहे… ताबडतोब चौकीत हजर व्हा…!!! 🙂

  • वर दिलेले चित्र माझ्या सध्याच्या मोबाइलचे आहे, म्हणून ते वाईप करून पाहिले नाही. पण जूना फोन वाईप केलाय.. पूर्वी मी बोल्ड २ वापरायचो. 🙂

 2. ब्लॅकबेरीची पिन आणि हँडग्रेनेडची पीन ह्यात नक्की फरक तो काय असतो ते अजून कळले नाही, “द सेंट ऑफ अ वूमन” मध्ये त्याचा रेफरन्स आहे…

  • वाह, काय आठवण करून दिलीत, अल पचीनो चा माझा फेवरेट सिनेमा 🙂 शेवट बाकी हिंदी सिनेमा सारखा केलाय .

 3. काळबादेवी says:

  आम्ही सध्या त्याच यंत्राचे मालक आहोत…

  • यंत्र नक्कीच चांगले आहे, मला तर याची सवय झाली आहे , दुसरा कुठला प्रकार सध्या तरी वापरायची इच्छा नाही .

 4. Tanvi says:

  महेंद्रजी अमितला देतेय हा लेख वाचायला….

  • तन्वी,
   नक्की दे.. ही माहिती खरंच खूप उपयुक्त आहे. मला पण माहिती नव्हती या बद्दल, म्हणून तर हे पोस्ट लिहिले आहे.

 5. काळबादेवी says:

  जनरली असे पेस्की काँल्स आपण कापायचे नसतात शांतपणे त्यांना फ़ोन खाली ठेवणे भाग पाडायचे असते, कारण दॅट इज “ते”. म्हणजे ते आपल्यास मिळते जे आपल्याकडे “नसते”

 6. ni3more says:

  ek dum masta upyukta mahiti dili ahet kaka tumhi

 7. Amit says:

  Really Informative, I am using BB for last 1 year but was not aware of this… Thank you for Sharing Mahendraji…

  • अमित
   आधी फोन वर प्रोटेक्ट इन्स्टॉल केलेले आहे की नाही ते पाहून घे- जर नसेल तर ते आधी इन्स्टॉल करावे लागेल.

   • विनाउप४ says:

    आधी फोन (माफ करा हँडसेट असेच म्हणायचे आहे आम्हांस) आपलाच आहे ह्याची खात्री करा मगच उप४ सुरु करा…

 8. अभिषेक says:

  नवीन माहिती… अशा काही ऑप्शन साठी तरी आता ‘काळ्या बोरां’ वर टीका बंद!

  • अभिषेक
   हा फोन म्हणजे गळ आहे, जसा मासा गळाला लागला की सुटू शकत नाही, तसेच ब्लॅकबेरी पण सुटणॆ अवघडच आहे . सवय होते एखाद्या गोष्टीची, आणि मग इतर काही नकोसे वाटते.

 9. bhanasa says:

  गेल्या मायदेशाच्या भेटीत माझा ब्लॅकबेरी चोरीला गेला ( नेमका माझ्या वादिलाच 😦 त्यामुळे अनेक गोंधळ झाले ते वेगळेच… 😦 ) त्यावेळी पोलिस कंप्लेंट सोपस्कार पार पडल्यावर सिमकार्ड लॉक केले पण इतके प्रचंड नंबर्स आणि अनेक नोट्स सेव्ह केलेल्या… फार भीती वाटू लागलेली. पण करते काय. महेंद्र, हे माहित असते त्यावेळी तर किती उपयोग झाला असता रे मला. असो. आता कळलेय हेही महत्वाचे आहेच. अर्थात अशी वेळ पुन्हा येऊ नये. पण दुर्दैवाने आल्यास… 😀

  धन्यू रे! 🙂

  • भाग्यश्री,
   अजूनही ते करता येऊ शकेल- जर फोन वर ब्लॅकबेरी प्रोटेक्ट डाउन लोड करून ठेवले असेल तर.. एकदा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे? कमीत कमी सगळा डेटा तरी पुसुन टाकता येऊ शकेल.

 10. Nitin says:

  उपयोगी माहिती.
  धन्यवाद

 11. suhas adhav says:

  vaparala nahi kadhi me……pan tumhi dileli mahiti adgi upaukta aahe 🙂

  • सुहास
   बऱ्याच लोकांना माहित नाही म्हणूनच हे पोस्ट लिहिले. पण यातली ती मोबाईल वरचा डेटा पुसुन टाकण्याची जी पद्धत आहे ती एकदम बेस्ट! प्रेमातच पडलोय मी या फिचर मुळे ब्लॅक बेरीच्या.

   • suhas adhav says:

    ekda professional life suru jhala ki blackberry vaprun baghu..tevha jasta upyogi tharel 🙂
    aata aapla andriod best

    • बरोबर. पण ब्लॅकबेरी मी फक्त मेल साठीच वापरतो, आणि ते अ‍ॅप्लिकेशन हल्ली इतर फोन मधे पण सुरु झाल्याने ब्लॅकबेरी चं महत्व संपल्यातच जमा आहे, म्हणजे एक्स्ल्युझिव्हनेस गेलाय. तरी पण आमच्या सारखे डायहार्ड फॅन्स आहेतच या फोनचे.:)

 12. pranita says:

  वा खूपच छान samsung ला जर का अशी facility असती तर खूप चांगल झाल असत……

  • प्रतिमा
   ओपन सोअर्स प्लॅटफॉर्म असल्याने तसे अ‍ॅप्लिकेशन डेव्हलप होणे सहज शक्य आहे. येईल लवकरच .

 13. श्री मार्गदशन केंद्र , कोकर्डा says:

  काय, तुमच्या post मी तुमच्या नावानिशी माझ्या fb च्या page वर टाकू शकतो ??
  काही post चा माझ्या मित्रांना फायदा होऊ शकतो !!

  • ब्लॉग वर स्वागत.. अवश्य़ टाकू शकता, माझी काहीच हरकत नाही. या पेज वर खाली फेसबुक शेअर चा पर्याय दिलेला आहेच.

 14. Prasad says:

  aaaaayala mala mahitich navhata hya yantrabarobar he sudha yeta.. at akalala ki mahinyache 399 rupade ka ghetat he….. Masta information kaka

  • प्रसाद
   फक्त एवढाच फायदा आहे, बाकी काही नाही> जे काही ब्लॅक बेरी वर आहे ते गुगल फोन वर पण आहे अव्हेलेबल.

 15. Sameer gaikwad says:

  Bara he sagale features symbian phone madhe sudha hote……
  Tya sathi black berry ghyachi garaj navati

  • samir
   nahi, hi facility dusarya kuthalyahi phone var nahi.

   • Sybian var third party antivirus madhun ha feature bhetato ani android madhe ha feature inbuilt ahe……..

    Symbian var even Kaspersky sarkhya antivirus madhun sudha ha feature bhetato….. Ani adhi sudha bhetat hota…….
    Android madhe avast mobile security madhun he sagale features free bhetatat…… 🙂

    • समीर,
     ह्या सगळ्या गोष्टी कोणालाच माहिती नाहीत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, जर फोन हरवला, तर सिंबियन किंवा अ‍ॅंड्राइड फोन वर पण फोन वरची माहिती ( फोन नंबर वगैरे) पुसुन ट्काणे शक्य आहे.. कृपया इथे कॉमेंट मधे सविस्तर लिह्ल्यास इतरांनाही फायदा होईल.

     • SAMEER says:

      mazya symbian cellphone madhe mi he sagale features kaspersky antivirus madhun use karayacho

      tya nantar aata Sony Xperia ION madhe hech features Avast Mobile Security madhun use kartoy free of cost………

      Symbian ani android sathi ase security features asalele barech app aaplyala Google Play or Nokia App store madhe search karun miltil

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s