या वाक्यांवर माझा विश्वास नाही..

खोटारडे कुठले..

सगळी कडे खोटे पणा भरलाय नुसता..हे चित्र पहा..

इतकी खोटी कारणं देतोय…तुम्हाला कुठलं लागू होतं ते पहा..
१) एच आर नवीन जॉइन होणाऱ्या कॅन्डीडेट ला  :- आमच्या कंपनीत काम करायला तुम्हाला खूप आवडेल 🙂 इथलं वातावरण अगदी मनमिळाऊ आहे, लोकं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेऊन आहेत.बिचिंग, लेगपुलींग, पॉलीटिक्स अजिबात नाही  !
२)बायको नवऱ्याला :-  प्रसंग असा की नवरा  फिरायला निघण्यासाठी  तयार होऊन बसलेला आहे तेंव्हा आतून आवाज येतो, हो…….. हो… मी आलेच दोन मिनिटात.. !
३)  छे.. अजिबात लठ्ठ दिसत नाहीस तू.
४) मी तुम्हाला मदत करायला निवडणूक लढवतो आहे.
५) मित्र:-अरे मी दिले नाही तुला पैसे परत अ्जून?? च्यायला,  बघ विसरूनच गेलो, मला वाटलं की मी परत केले पैसे  तुला.
६)   मी तुझे पैसे पुढल्या रविवारी नक्की देईन बघ! तुला आठवण करून देण्याची वेळच येऊ देणार नाही मी.
७)  पार्टी नंतर :-  इतका कधीच टाईट झालो नव्हतो यार.. थोडी जास्तच झाली आज.  पण आजची ही पहिलीच वेळ  बरं का, आपलं असं होण्याची. 🙂
८)   या पुढे पुन्हा नाही पिणार इतकी 🙂
९)  नकॊ..तुला ते वापरायची  त्याची गरज नाही, ” पिल” घेतली आहे मी
१०)  मी फार   लठ्ठ दिसते का या ड्रेस मधे??, उत्तर :- छे, अजिबात नाही…
११) जूनी मैत्रीण भेटली की :- अगं अजिबात बदलली नाहीस बघ तू. अगदी २० वर्षाची असतांना दिसायची ना , तश्शीच दिसतेस अगदी.
१२)   माझ्या बायकोचा शिपी :- मॅडम ब्लाऊज / ड्रेस नक्की देतो बघा उद्या सोमवारी.
१३) नेता इलेक्शन पूर्वी मतांचा जोगवा मागताना:- मी वचन देतो , की मी निवडून आल्यावर….
१४) तुला काय म्हणायचे आहे ते मला अजिबात समजलेले नाही. ( बायको जेंव्हा चिडते तेंव्हा )
१५) माझ्या मैत्रिणी असल्या तरी माझ्या बायकोचा त्यावर  काही आक्षेप नसतो
१६) माझे मित्र असले तरी माझ्या नवऱ्याचा काही आक्षेप नसतो.
१७) माझ्या मित्राने/ मैत्रिणीने रात्री फोन केला तरी बायको/ नवरा गैर समज करून घेत नाही.
१८) आय एम सॉरी, मला काही बोलायचा अधिकार नाही,  पण मला असं वाटतं की….
१९)  एक नेता:-मराठी लोकांना अधिकार मिळायलाच हवा.
२०) मी हे तुझ्या भल्यासाठीच  सांगतोय/ सांगते आहे..
२१) एक जाहिरात :- व्यायाम न करता वजन कमी करा. एक महिन्यात दहा किलो पेक्षा जास्त  🙂
२२) “ओके.. मी तुला फोन करतोच एक पंधरा मिनिटानंतर”
२३) आय डिडन्ट डू इट! ( हे कशा बद्दल ते सांगायलाच हवे का?)
२४) ५० टक्के डिस्काउंट सेल*   कंडिशन्स अप्लाय (???  )
२५) तुमचा फोन होल्ड ठेवण्यात आलेला आहे, लवकरच आमचे कस्टमर केअर प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील. आणि पाच मिनिटे होल्ड केल्यानंतर.. ” सॉरी, आमचे सगळे कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्ह व्यस्त असल्याने आता तुमचा फोन घेऊ शकत नाही, क्षमस्व!”
२६) बायको चिडलेली असताना आणि    असतांना  विचारले , ” तुला काय झालंय?” उत्तर असतं काही नाही!
२७)  आता नवीन आणि सुधारित, मोठ्या पॅक मधे. ( खरी गोष्ट ,  आधी १०० ग्राम चं पॅक ८० ग्राम केलं असते, आणि फक्त पॅकिंग चं डिझाइन बदललेले असते)
२८) अरे मी सिगरेट तर कधी पण सोडू शकतो. माझा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा आहे. आताच  म्हणजे सहा महिन्यापूर्वी एक महिन्यासाठी सोडली होती. 🙂
२९) लोरिअल चं क्रिम वापरल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातात.
३०) हॉर्लिक्स घेणाऱ्या मुलांची वाढ बोर्नव्हिटा घेणाऱ्या मुलांपेक्षा दुप्पट होते.. ( लवकरच १२ फुटाची मुलं दिसायला लागायला हवी आता.)
३१) लग्नापूर्वी गर्लफ्रेंड ला :- मला तुझ्या बद्दल जसे वाटते, तसे कोणा बद्दल कधीच वाटले नाही.तुझं मन इतकं छान आहे, की मी तुझ्याकडे आकर्षित झालोय.
३२) माझ्या जिवनात आलेली तू पहिलीच मुलगी/मुलगा आहेस .
३३)तुझे डोळे जगात सगळ्यात सुंदर आहेत. ( प्रत्येकाने हा डायलॉग वापरलेला असतोच – काय खरं की नाही?)
३४)तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याशी कधी तरी खोटं बोलेन का?
३५)  लग्नापूर्वी:-फार तर फार एक किंवा दोन बिअर घेतो मी.  तशी ड्रिंक्सची मला फारशी आवड नाही.
३६)  बायको:-  तू लग्नाचा वाढदिवस विसरलास तरी मला राग आलेला नाही.
३७)  एक्स समोर आल्यावर :-माझं लग्न तुझ्याशी व्हायला हवं होतं .
३८) साहेब मिटींग मधे आहेत, त्यांना फोन देता येऊ शकत नाही.
३९) चॅट रुम  प्रोफाईल :- ६ फुट ६ इंच उंची, अ‍ॅथलेटीक बॉडी, ८० किलॊ वजन , वय २५ आणि फोटो सलमानचा. किंवा मुलगी असेल तर, ५ फुट ९ इंच उंची, गोरा रंग, लांब केस, सुंदर चेहेरा, वय १९ -२०आणि फोटो एखाद्या नटीचा.
४०) बस्स.. काही नको, फक्त एक ग्लास पाणी चालेल.. ( मनातून तर असतं की या उन्हात मस्त सरबत वगैरे दिलं तरी चालेल)
४१) मी माहेरीच निघून जाते बघ आता.. मग बस एकटा ! (वाट पहात रहा, कधीच जाणार नाही ती 🙂 )
४२) त्या सुंदर मुलीच्या  एक्स चित्राच्या लिंक वर मी  कधीच क्लिक केले नाही.
४३) मी आज पर्यंत कधीच अ‍ॅडल्ट साईट पाहिलेली नाही.
४४) मला तिचा स्वभाव जास्त आवडला म्हणून लग्न  केलं. शारिरीक आकर्षण नाही    ( खरंच?? )
४५) मला बरं वाटत नाही,  म्हणून मला सुटी हवी आहे.
४६) मला तुझ्याशी फक्त मैत्रीच करायची आहे, फक्त मैत्री ..
४७) मी ड्राइव्ह करतोय, नंतर बोलू आपण.
४८) मी मिटींग मधे आहे , नंतर करतो फोन ( हे बरेचदा खरं पण असू शकतं),
४९) आय डोन्ट मीन इट!
५०)  आय मिस यू,आय लव्ह यू, 🙂
५१) माझं पूर्वी कधीच कोणावर प्रेम नव्हतं, अगदी एकतर्फी पण नाही . तूच पहिली/ पहिला आहेस बघ.
५२) बायकोला लग्नापूर्वी :- आय प्रॉमीस.. नक्की बदलेन  माझी “ही” ( ही म्हणजे कुठली तरी तिला न आवडणारी) सवय मी.
५३)स्त्रियांचे नेहेमीचे वाक्य :-  माझं वजन, वय,  ………… इतकं आहे.
५४) बायको नवऱ्याला :- हा ड्रेस मी सेल मधे घेतलाय, चक्क ७० टक्के डिस्काउंट होता .
५५) मला तुझा तो इ मेल मिळाला नाही, बहुतेक स्पॅम मधे गेला असेल, नाही तर मी नक्कीच रिल्पाय केला असता.
५६) पैशाचा प्रश्न नाही, प्रिन्सिपल चा आहे !
५७) सगळ्यात मोठं अ्सत्य- जेंव्हा तुम्ही एखादे सॉफ्ट्वेअर लोड करता तेंव्हा एका बॉक्स ला क्लिक करता त्यावर लिहिलं असतं ”  आय हॅव रीड अ‍ॅंड अ‍ॅग्रीड द    टर्म्स अ‍ॅंड कंडीशन्स”
५८) मला तुझ्या शिवाय इतर कुठल्याही मुली बद्दल/ मुला बद्दल तसं फिलिंग वाटलं नव्हतं
५९) ब्रेकप च्या वेळेस. तू फार चांगली आहेस, तुला माझ्यापेक्षा जास्त चांगला मुलगा मिळायला हवा. ( जेंडर प्रमाणे वाक्य बदला )
६०) मी अगदी मनापासून सिरियसली बोलतोय.. अगदी खरंच सांगतो, तुझा विश्वास का बसत नाही?
६१) मी तुला काय करायचं हे सांगायची माझी इच्छा नाही, पण ——– तू असं का करत नाहीस?
६२) ट्रस्ट मी 🙂 पोहो्चतोच मी १५ मिनिटात.. प्लिज वाट पहा थोडी.
६३) बस झाले की आता, किती लिहायचं मी एकट्यानेच? तुम्हाला अजून काही माहिती असतील तर तुम्ही लिहा की खाली कॉमेंट्स मधे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

55 Responses to या वाक्यांवर माझा विश्वास नाही..

 1. Chinmay says:

  haha!! ek number post ahe!! 1st agdi 100 takke lagu!!! 6 mahinyat nokri sodun dili ti!! 😀

  • चिन्मय,
   प्रत्येकाचीच तशीअवस्था होत असते, फक्त काही लोकं अ‍ॅडजस्ट करून घेतात.

   • Chinmay says:

    6 mahine kela adjust karaycha prayatna… mhana nantar better opportunity milali! 😀

    ek rahilay… “Amchyaveli he asla navhta” punyat hamkhaas aikayla milta…

    • हा हा हा.. हे वाक्य मी वापरायचं टाळतो नेहेमी 🙂 पुणेच कशाला, आमचे बाबा पण म्हणायचे नेहेमी.

     • Chinmay says:

      मी कॉलेजमध्ये असताना आई/बाबांना सांगायचो- “मी कॉम्प्युटरवर आभ्यास करायला बसतोय” त्यांचा या वाक्यावर अजूनही विश्वास नाहीये!

      • चिन्मय,
       अरे फेसबुक वर मुलगी असते, आणि जेंव्हा सांगते की अभ्यासाचं बोलते आहे तेंव्हा माझा पण विश्वास बसत नाही:)

 2. Tanvi says:

  🙂 🙂

 3. Abhay Mudholkar says:

  एकच विचारतो या सर्व वाक्यांपैकी तुम्हाला कुठल्या वाक्यांची गरज पडली किंवा तुम्ही वापरलीत?
  तुम्ही हा मोठा वाक्यांचा (खऱ्या (??) आणि खोट्या) साठा एकत्र केला आहे. उत्कृष्ट! तोड नाही! या पुढे काहीही बोलता येत नाहि.
  अभय मुधोळकर

  • अभय,
   बरीच वाक्य मी पण वापरलेली आहेत, आणि ऐकलेली पण आहेत. खोटी आहे असे म्हणत नाही, पण ” माझा मात्र अजिबात विश्वास बसत नाही ” हे पण तितकंच खरं.

 4. Nitin says:

  हा हा हा !!!!!!
  अगदी खरं.

 5. SnehaL says:

  ४१) मी माहेरीच निघून जाते बघ आता.. मग बस एकटा ! (वाट पहात रहा, कधीच जाणार नाही ती )

 6. Amit says:

  ३२) माझ्या जिवनात आलेली तू पहिलीच मुलगी/मुलगा आहेस :

  हे आयुष्यात जितक्यांदा बोलल्या जात, त्या पैकी एकदा तरी, म्हणजे, पहिल्यांद(च) खरं असतं.. 🙂

 7. SnehaL says:

  हे सगळ्यात मस्त 😀 😀 😀 😀 😀

 8. अभिषेक says:

  हल्लीच्या, टीव्ही वरील सगळ्या मालिका आणि जाहिराती ह्या विश्वास नसण्याच्या सदरात येतील…

 9. महेंद्रजी ,एकसे एक …फुल टू फट्याक…. 🙂 🙂 🙂

 10. suhas adhav says:

  majhya 3rd yearchya group member cha he ek masta reason hota siran sathi project dakhavta na….
  ” sir kya bolu kalltak connectivity ho raha tha aaj pata nahi q run nahi hora ha” 😛
  nashib majha BE madhye aasa chukun pan honar nahi …
  college madhye mam ne uthavla ans sangay la ki
  ” mam i was absent for last lect …i was not well ” 😛

 11. Manasi says:

  masta! khupach comprehensive collection aahe.

 12. दर वर्षा दोन वर्षांनी राजीनामा देताना

  “Resigning from the post of xyz to pursue better career opportunity” 😉

 13. anuvina says:

  अश्याच वाक्यांचा “तपास चालू आहे” 😉

 14. bolMJ says:

  जबरी कलेक्शन आहे राव तुमचे…

 15. Prachi says:

  मस्तच…. अजून एक – मैत्रिणी काही सिक्रेट शेअर करताना – “फक्त तुलाच सांगतीये, अजून कोणाला सांगू नकोस…. ” 😛

 16. हा हा हा..दुसरं सोडून सगळी पटताहेत… 😉

 17. काका माझा तर काही शब्दांवर अजिबात विश्वास नाही आहे ,
  राजकारणी , त्यांची निवडणुकीच्या काळातील वचने, अमन की आशा
  पंचवार्षिक योजना , हिंसा विरहीत निवडणुका
  शब्दांची सुद्धा बरीच मोठी यादी होऊ शकते,
  आता आमच्या नावाच्या मतितार्थ पहा,
  एन आर आय
  नॉन रिलायबल इंडियन किंवा इडियट
  कसेही

 18. rahul mane says:

  this is called positive thinking 🙂

 19. हा हा हा … मेलो हसून हसून फुटलो 🙂 🙂

  माझ्याकडून थोडी भर

  १) राजकारणी लोकांच्या तोंडून निवडणुकीच्यावेळी आलेला प्रत्येक शब्द…
  २) काम आवडत नसून देखील काम सोडून न जाणारी मंडळी जी सारखी बोलत असतात … डोक्याला शॉट लागलाय रे. जातोच मी (हे कधी कधी खरं असू शकतं म्हणा 😀 )
  ३) म्यानेजर झाल्यावर माझ्या टीममधल्या जवळजवळ सगळ्यांच्या घरी काहीनाकाही अपघात किंवा कोणाचा मृत्यू
  ४) (माझ्या म्यानेजरला मी दिलेली कारणे) अरे टीमचा डेटा कधीचाच रेडी आहे, पण थोडा अपडेट करायचा आहे म्हणून नाही पाठवला 😉

  इत्यादी इत्यादी 🙂 🙂

 20. sandip joshi says:

  मी तुमचा निरोप पोहोचवीन.

 21. chandrashekhar says:

  good, better, best. these r t dgrees. isn’t it? but above all this is excellence & this article is one of them.goodgoing, I read ur articles regularly but this 2 nd or 3 rd comment on ur article.. I am of the opinion urs is one of t bet blog in Marathi. All t best.

  • चंद्रशेखर,
   ब्लॉग वर स्वागत, तुमच्या सारख्या लोकांच्या प्रोत्साहनानेच हा ब्लॉग गेली चार वर्ष सुरु आहे.
   मनःपूर्वक आभार.

 22. Harshal says:

  संध्याकाळी ऑफिस मधून निघताना बॉस बोलावतो आणि बोलतो एवढ काम करून जा फक्त १ ० मिनिट लागतील.

  सगळ्यांच्या बाबतीत होत हे. १ ० मिनिट बोललं कि समजून जावं.

 23. Popat Chavan says:

  tari mi mhanalo hotoch

 24. Popat says:

  प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची जाहिरात – ” हाऊसफुल गर्दीत सुरु”, ” प्रचंड गर्दीचा दुसरा, तिसरा,…….आठवडा”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s