कार्पोरेट वर्ल्ड..

corporateहल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान   ऐकलेल्या काही   गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात.

तर अशीच ही एक गोष्ट, मला आवडलेली आणि लक्षात राहिलेली , तशी ही गोष्ट सांगितल्या गेली होती वेगळ्याच संदर्भात, पण मला मात्र लक्षात राहिली ती वेगळ्याच संदर्भात .जपान मधे सुशी नावाचा एक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे असे.  हा पदार्थ बनवण्यासाठी एकदम ताजे फडफडीत मासे वापरले जातात.  कच्चे  मासे  असल्याने, ते अगदी ताजे असणे महत्त्वाचे असते. प्रत्येक बोटीवर पकडलेले मासे ठेवण्यासाठी एक जागा असते. मासेमारी साठी जातांना त्या रिकाम्या जागेत बर्फ भरून नेला  जातो आणि त्या बर्फात ठेऊन मासे आणले तर तर मासे डिकंपोझ होत नाहीत, म्हणून बर्फात ठेऊन आणण्याची  पद्धत आहे.

तर एका जपानी कोळ्य़ाने आपला सेल वाढवण्यासाठी एक युक्ती केली. समुद्रावर जातांना इतर कोळी बर्फाच्या लाद्या  भरून न्यायचे  त्याने तीच जागा मॉडीफाय करून त्या जागी  पाणी भरून त्या पाण्यामध्ये पकडलेले मासे ठेऊन आणणे सुरु केले. माशांना पुरेशी हवा मिळावी म्हणून  ती पण सोय केली.  समुद्र किनाऱ्यावर पोहोचे पर्यंत ते सगळे मासे अगदी संथ पणे पडून रहायचे पाण्यात पण  जिवंत रहायचे. जिवंत माशांना नक्कीच जास्त पैसे मिळायचे .

पण….. एका पंचतारांकित हॉटेल मधल्या  शेफ ने कम्प्लेंट केली या माशांची चव काही फार चांगली लागत नाही. मासे जरी जिवंत असले तरीही ते मेल्यातच जमा आहेत. अजिबात काही अ‍ॅक्टिव्हिटी नाही , काही नाही त्या मुळे त्यांच्या जिवंत पणाला पण काही अर्थ नाही. सुशी मधे काही खास चांगली चव लागत नाही या माशांची! त्या कोळ्य़ाच्या मनात विचार आला की  आता काय करावं?

त्याने एक नवीन युक्ती शोधून काढली, मासे पकडल्यावर त्याने त्या माशांच्या टाकी मधे एक  बेबी शार्क पण टाकला.   त्या शार्क ने आपल्या सवयी प्रमाणे त्या टाकी मधे पण  इकडून तिकडे पोहोणे आणि  मासे खाणे सुरु केले, आणि त्या बरोबर टाकी मधल्या माशां मधे हालचाल सुरु झाली, ते इकडून तिकडे पोहायला लागले, आणि खूप अ‍ॅक्टिव्ह झाले. बेबी शार्क ने काही मासे जरी खाल्ले तरी पण   समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर जे मासे होते बोटी मधे शिल्लक होते ते एकदम अ‍ॅक्टीव्ह , अगदी ’फुल ऑफ लाइफ” होते, आणि ते अगदी त्या पंचतारांकित हॉटेल ला  हव्या असलेल्या क्वॉलिटी चे होते. कोळ्याला पण खूप चांगला भाव मिळाल्या त्याच्या माशांना.

झालं संपली गोष्ट!

मॉरल ऑफ द स्टॊरी :- एक शार्क  त्या पाण्याच्या टाकीत सोडल्याबरोबर  सगळे मासे अ‍ॅक्टिव्ह झाले 🙂

आजकालच्या कार्पोरेट लाइफ मधे पण असंच सुरु असतं नाही का? . कुठलीही कंपनी घ्या, शार्क च्या जागी “एच आर”, आणि माशांच्या जागी इतर एम्प्लॉइ कन्सिडर करा- आणि हो, तो शेफ  म्हणजे मॅनेजमेंट बरं का.  आणि पुन्हा एकदा वर लिहिलेली कथा  वाचून काढा-    🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
Aside | This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड, Uncategorized and tagged , , , , . Bookmark the permalink.

40 Responses to कार्पोरेट वर्ल्ड..

 1. सागर says:

  गोष्ट आवडली

 2. Chinmay says:

  हाहा! जबरदस्त analogy आहे ही! पण बॉस मोठा शार्क का एच. आर जास्त मोठा/भीतीदायक शार्क? मी अगदी ६ महिनेच नोकरी केली आहे, त्यामुळे एच.आर शी कॅम्पस interview आणि resignation letter देण्याशिवाय जास्त भेट झाली नाहीये! पण बॉस मात्र खऱ्या अर्थी शार्क होता. बेकार पळवायचा, आणि ५.४५ ची कंपनी बस असली की बरोबर ५.३५-५.४७ येऊन गप्पा मारायचा! 😛

  • बॉस पेक्षा एच आर.. कारण तो नोकरी वरून काढून टाकण्यास कारणीभूत ठरू शकतो. 🙂 एकदा दोन चार लोकांना पिंक स्लिप दिल्या की इतर लोकं एकदम अ‍ॅक्टिव्ह होतात .. म्ह्णून एच आर लिह्लंय.

 3. Snehal says:

  Mast story aahe….. ani agadi khari…. HR hi position market madhye ka aali he ajun mahit nahi…. may be market madhe kahi lokana job tar milala….
  Mala vatate he dept banavnyachya mage reason hote employees will get moral support, moral support tar sodach one day or the other u will come to know u have lost ur job &while giving the termination letter hr dnt knw the exact reason behind that….

  🙂 GOD HR

  • स्नेहल
   पुर्वी फक्त बिकॉम झाले असले तरी एच आर मधे नोकरी मिळायची . हल्ली एमबीए एच आर सुरु झाल्याने कमीत कमी एमबीए हे क्वॉलिफिकेशन मस्ट झालंय.. आणि त्यामुळेच एक वेगळंच वलय आलंय या नोकरीला.

 4. bageshrik says:

  Fact aahe kaka hi. HR lok jabardast politics khelatat. ekada ka tumhi yanchya najaret sapadalat ki bas mg tumhich target asata. yacha ek apratim example me saddhya pahatiye. tyamule baki koni ajun HR chya vakadyat shirat nahiye. Afterall pinl slip matters. 🙂

  • भाग्यश्री
   मी एका आय टी मधल्या मित्राकडून ऐकली होती की आयटी कंपनी मधे एच आर खूप जास्त पॉवरफुल असतं . पण इतर कंपन्यात मात्र तसं नसतं, इमिडिएट बॉस जो पर्यंत तुमची कम्प्लेंट करत नाही, तो पर्यंत काळजी करण्यचे कारण नसते 🙂

 5. mandar17390 says:

  कुच पटा नही, असल्या ठिकाणी आपण काम नै करणार (नोकरी लागल्यानंतरचा प्रश्नं आहे तो 🙂 )..
  हे जर का कोणी कामच करत नसेल तर ठीक आहे.जिथे लोकांना धक्क्याला लावावे लागते आणि लोकं लवकर कामच करत नाहीत ..
  समजा डोक्याचे काम आहे. रिसर्च टाईप वर्क- तिथे असल्या वागण्याने प्रॉब्लेमच जास्त होतील.तिथे रिझल्ट काय येतील माहिती नसते,झालं तर पेटंट नाय तर प्रोजेक्ट फेल …असले रिस्की कामं कोणी घेणारच नाही मग…एम्प्लॉइजना पण अक्कल असतेच ना…

  • मंदार
   मला वाटतं की माझं म्हणणं मी स्पष्ट करू शकलो नाही. 🙂
   एच आर अधून मधून ( आय टी कंपन्यात) दोन तीन लोकांना पिंक स्लिप देते, आणि मग सगळं वातावरण एकदम ढवळून निघतं. काही लोकं आपणहून सोडुन जातात, आणि काही नवीन लोकं येतात..असं म्हणायचं होतं मला. पहिले दोन लोकं जे काढले जातात ते म्हणजे शार्क चे बळी असे म्हणायचे होते. 🙂

   • mandar17390 says:

    आयटी कंपन्यानी केलं तर ठीकाय, जे हापिसात जिम, स्वीमिंग पूल, टेबल टेनिस इत्यादी देतात त्यांनी तर जरुरू करावे…
    या गोष्टी बघून मला पण कधी कधी मेकचा असून आयटी मध्ये जावेसे वाटते 😉

    • मंदार
     मेक वाले पण काही तरी कोर्स करून आय टी मधे जायचे पूर्वी. 🙂 पण हल्ली ते पूर्वीचे ग्लॅमर राहिलेले नाही आयटी मधे हे पण तितकेच खरे.सध्या डॉलर एक्स्चेंज रेट चांगला असल्याने त्यांचे बरे चालले आहे इतकेच!

 6. anuvina says:

  म्हणून बरेच वेळा चुकून माझ्या कडून “Human Resource” च्या ऐवजी “Hanuman Resource” वाचलं जातं. बाकी ह्यू.री. वाल्यांचे जबरदस्त सेटिंग असतं असं म्हणतात अगदी स्टेशनरी वाल्या पासून ते उमेदवारा पर्यंत.

  • आनंद,
   तू तर आयटी वाला.. म्हणजे तुला नक्की चांगलंच माहिती असेल या प्रकाराबद्दल. 🙂

 7. Shweta says:

  “बळी तो कान पिळी ” ह्या तत्वावर चालणारे जग आहे…!!! 😀
  आम्ही corporate field wale, HR ला Boss चा “watch Dog” म्हणतो… 😛

  बाकी, post A -१ झालीय…!!! 🙂

 8. nitinbhusari says:

  अजुन अनुभव नाही एच आर चा पण (लेख) गोष्ट आवडली.

  • नितीन,
   लवकरच समजेल हे सगळं 🙂 पण तुम्हा पत्रकारांच्या व्यवसायात असे नसावे बहूतेक.

 9. bolMJ says:

  हा हा मस्त कनेक्शन जोडलंय..

 10. पंचतारांकित!

 11. NITIN says:

  kaka tumcha mhanan barobar ahe HR he ek bhayanak prani ahe ani tyan amhla ghabrav lagatach karan kadi te list kadhtil yacha nem nahi
  lekh chan zhala ahe

 12. suhas adhav says:

  goshta chan vatli ani tatariya pan….pan aajun pariyant anubhav nahi hyagoshticha 😛
  may be pudhchya varshi yeel…. 🙂

  • 🙂 जीवघेणा अनुभव असतो हा. एक दिवस कोणी तरी येतो, आणि एक यादी आणतो, त्या यादीमधल्या लोकांना पिंक स्लिप देऊन सरळ घरी पाठवलं जातं, सगळं वातावरण ढवळून निघतं, थोडे लोकं, दुसरा जॉब पहातात, काही लोकं आहे तसेच अ‍ॅडजस्ट करून घेतात.. शेवटी , हेच तर खरं आयुष्य आहे, नाकारात येत नाही हे नक्की!

 13. adi says:

  छान गोष्ट!

  थोडे वेगळे मत! व्यावसायिक जगतात सुद्धा कंपन्यांचे विविध प्रकार असतात. त्यातील काहीमध्ये कामाच्या स्वरूपामुळे / वातावरणामुळे बहुतांशी कर्मचारी आपसूकच सतर्क राहतात. तिथे HR ला धाक दाखविण्याची गरज भासत नाही. काही कंपनीमध्ये असलेल्या थोड्याशा सैल वातावरणाचा कर्मचारी पुरेपूर फायदा उठवू पाहतात मग तिथे HR जागृत होते. शेवटी काय तर जर आपल्यात धमक असेल आणि आपण अजून योग्य ठिकाणी असू शकू असे वाटत असेल तर कर्मचाऱ्याने खुशाल भरारी घ्यावी.

  • आदी
   ब्लॉग वर स्वागत.. सहज थोडा विनोदी म्हणून कोरीलेट करणारा लेख लिहायचा प्रयत्न केला होता.. इतकं सिरियस लिखाण नाही हे 🙂 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

   • Aditya Patil says:

    धन्यवाद!

    खरे तर काल इंटर की चुकून आधीच दाबली गेली. माझे नाव आदित्य! आपला ब्लॉग सुरेख आहे!

 14. सध्या माझी वाटचाल शार्कच्या तोंडाच्या दिशेने सुरू आहे ;-( शेवटी काय एकतर शार्कच्या तोंडात जाऊन मरा नायतर त्या पंचतारांकित हॉटेलात जाऊन मरा, एकदा का (नोकरीच्या) जाळ्यात अडकले की शेवटी समुद्रात स्वच्छंद विहार करण्याचे सुख निघून जाते ते कायमचेच.

  • सिद्धार्थ,
   अगदी बरोबर उपमा. हे जाळं तोडून बाहेर पडणं खूपच अवघड असतं हे नक्कीच! 🙂

 15. सिद्धार्थ + १

  रच्याक, गोष्ट सही आहे. आणि एचआर आणि मॅनेजमेंटच्या अॅनालॉजीने अजूनच धमाल आली 🙂

 16. Pallavi says:

  गोष्ट आवडली!! शार्क म्हणजे एच. आर. शेफ म्हणजे मॅनेजमेंट!!!

 17. hasa leko says:

  kaka
  life of the pi bagha
  wagha barobar hota mahnun mulga jivant rahila

 18. Rajeev Upadhye says:

  गोष्ट आवडली

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s