कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.

AmteFamily

त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.

नमस्कार
इमेल बद्दल आभारी आहे .
रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.
२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.

आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

Screen area1-001

Screen area2-001

आपल्याला काय करता येईल?

आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे.  सगळा हिशोब आपली मदत पोचली की ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.

https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform

आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !!!

……………………………………………………………..

मंडळी आम्ही हे करतोय … तुम्हीही यात सामिल होऊ शकता !!

राजीवजी आणि सचिन तुम्हा दोघांना आणि युनिफॉर्मची खरेदी करण्याच्या कामात पुढाकार घेणाऱ्या ब्लॉगर्स मित्रमंडळाला काम पडणार आहे आणि तुम्ही आनंदाने ही जबाबदारी स्विकारलीये त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार!!

Share this:

 

 

तन्वी च्या ब्लॉग वर ही पोस्ट वाचली. वरोरा, आनंदवनाशी एक जवळचा संबंध असलेला मी. म्हणून ही पोस्ट शेअर करतोय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

6 Responses to

 1. PrachiPrachi says:

  Thank you for this post.. Much require to get realisation on what we are doing and where we are leading the world.

  • प्राची,
   वरोरा माझे जन्म गाव , आणि जिथे तुमची नाळ पुरली गेली आहे त्या जागेबद्दल थोडी जास्त आत्मियता असतेच!

 2. Prachi says:

  Great! Thanks for sharing theis post. Much require to realise what we are doing and where we are leading this world.

 3. Nitin says:

  मेल ला रीप्लाय केला,
  एक छान पोस्ट. खारीचा वाटा आनंदाने उचलायला तयार आहे. तुमच्या या पोस्ट ची लींक मित्रांना फॉरवर्ड केली.
  धन्यवाद.

  • नितीन
   ्धन्यवाद.. मदत नक्कीच योग्य ठिकाणी पोहोचेल, कारण कोणी एनजीओ वगैरे नाही आहे मधे. सरळ सरळ आपणच ती मदत पोहोचवणार आहोत.

 4. महेश कुलकर्णी. says:

  सुंदर.छान.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s