लोथल, मृतांचे शहर.

लोथल शहराचा प्लान असा होता. आर्टीस्ट ने काढलेले चित्र.

लोथल शहराचा प्लान असा होता. आर्टीस्ट ने काढलेले चित्र.

मोहनजोदारो आणि हरप्पा हे शब्द मी चौथ्या वर्गात असतांना ऐकले होते.  यातला हरप्पा शब्द म्हणायला खूप मजा वाटायची. इतिहासातला तो धडा फक्त या हरप्पा मुळे लक्षात राहिला. इतिहास तसाही माझा आवडता विषय ,  हडप्पा संस्कृती २५०० ते ३०००  इसवीसन पूर्वीची होती म्हणजे नेमकं काय ते समजण्याचं वय पण नव्हतं ते, आणि त्यामुळेच त्याचा सिरियसनेस पण नव्हता. तरी पण या जागेला एकदा तरी पहायचं हे मनात ठरवले होते. या जुन्या ऐतिहासिक वास्तू/जागा पहाण्याची आवड फार नंतर निर्माण झाली.  आणि आता तर अशी परिस्थिती आहे, की एखादं असं चांगलं ठिकाण असले की वेळात वेळ काढून मी तिथे हमखास भेट देतो  .

मोहन्जोदारो आणि हरप्पा संस्कृतीचे अवशेष मुख्यत्वेकरून पाकिस्तान मध्ये सिंध प्रांतात  आहेत. आता पाकिस्तानात जाऊन ते अवशेष पहाणे तर शक्य नाही. पण एकदा कामाच्या निमित्याने जेंव्हा

अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा  असेच त्याच काळातले एक शहर अहमदाबाद जवळ सापडले आहे अशी माहिती मिळाली.. भारतीय पुरातत्त्व खात्याने १९५५ च्या सुमारास उत्खनन करून मोहन्जोदारो हरप्पन संस्कृतिच्या काळचे काही अवशेष शोधून काढले. अवशेष म्हणण्यापेक्षा पूर्ण गावच शोधून काढले म्हंटले तरी हरकत नाही. ती जागा म्हणजे लोथल.

लोथल! अहमदाबाद पासून साधारण ८० – ९० किमी अंतरावर आहे. अहमदाबादला गेल्यावर लोकं काय पहायचं म्हणून नुसता विचार करत बसतात, पण अहमदाबादला  इतके काही पहाण्यासारखे आहे की कमीत कमी तीन दिवस तरी पूर्ण  लागू शकतात.

ही लोथलची साईट जरा वेगळ्याच मार्गावर असल्याने इथे कधीच जाणे झाले नव्हते, पण जेंव्हा सुटी काढून बायको मुलींच्या सोबत  खास सुटी साठी म्हणून अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा मात्र एक दिवस खास राखून ठेवला होता या जागेला भेट देण्यासाठी. तसंही एखाद्या लहान गावी जायचे म्हंटले की खाण्याची आबाळ होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणूनच आम्ही निघतांनाच अहमदाबादच्या कुणाल बेकरी मधून पॅटीस, कोल्ड्रिंक्स, वगैरे खाण्याचे सामान पॅक करून घेतले होते. अगदी सकाळी सकाळी साडे आठच्या सुमारास आम्ही हॉटेल वरून निघालो. लोथल  या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे “मृतांचे शहर”. आणि ते अगदी शब्दशः खरं आहे  हे तिथे गेल्यावर जाणवलं . अगदी चिटपाखरूही त्या ठिकाणी नव्हतं.

गुजरातचे रस्ते चांगले असल्याने प्रवासाचा वेळ फारच  फार लवकर संपतो याची जाणीव होतीच, म्हणून जातांना आधी अडलज ची वाव पाहून मग पुढे निघालो. लोथल! या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला कार्व्हिंग केलेली मंदीरं, दगड, किंवा मोठे पॅलेस वगैरे पहायला मिळतील अशी आशा मनात ठेऊन गेल्यास निराशाच पदरी पडेल. अर्थात, पाच हजार वर्षापूर्वी बांधलेली  घरं आजही सुस्थितीत असतील अशी कल्पना करौन तिथे गेलात तर निराशाच पदरी पडेल. पण पाच हजार वर्षापूर्वीची संस्कृती कशी आणि किती डेव्हलप झालेली होती हे इथे नक्कीच पहायला मिळेल.

लोथल ला आम्ही पोहोचलो, आणि समोर एक लहानशी एक मजली म्युझियमची इमारत दिसली. लोथलच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू या म्युझियम मधे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या मधे काचेच्या मण्यांच्या माळा, मातीची भांडी, टेरेकोटाची मडकी, खेळणी आणि बरंच काही सामान इथे व्यवस्थित शोकेसेस मधे लावून ठेवलेले आहे. पण फोटो काढण्याची परवानगी नाही. 😦

म्युझियम पाहून झाल्यावर आम्ही उत्खननाच्या जागेवर जाऊन पोहोचलो. सगळी कडे मातीची भांड्यांचे तुकडे पडलेले आहेत. .सहज एक तुकडा उचलला, आणि त्यावर एक काळी रेष ओढलेली दिसत होती. कदाचित कुठल्यातरी एखाद्या मोठ्या चित्राचा तो हिस्सा असावा. तो तुकडा पाच हजार  वर्षापूर्वीच्या काळात कोणी तरी वापरलेल्या भांड्याचा आहे ही जाणीव झाली  आणि अंगावर शहारे आले. पूर्वीच्या काळी धान्य साठवणी करता, पाणी साठवण्यासाठी मातीची भाजून पक्की केलेली भांडी वापरली जायची. इथल्या म्युझियम मधे इथल्या उत्खननात अशी बरीच चांगल्या स्थितीतील रंगवलेली भांडी सापडलेली आहेत.

लोथल म्हणजे गुजरात आणि सिंध प्रांतात असलेल्या मोहंजोदारॊमधे होणाऱ्या व्यापाराचे मुख्य ठिकाण. वाहतूक अर्थातच नदीच्या पात्रातून  केली जायची.  लोथलला एक पाच हजारवर्षापूर्वीचे बांधलेले पोर्ट ( धक्का –   जेटी) आहे. जगातील ज्ञात असलेले हे सगळ्यात जुने पोर्ट. इथून साबरमती नदीच्या पात्रातून अगदी सिंध प्रांतापर्यंत व्यापार चालायचा. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील इंदूस नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या मोहन्जोदारो ( २७० किमी अंतरावर आहे इथून)बरोबरचा व्यापार इथूनच चालायचा.

विहीरीचे बांधकाम असे केले आहे.

विहीरीचे बांधकाम असे केले आहे.

लोथल चे म्युझियम पाहून आम्ही उत्खननाच्या साईट वर निघालो. चारही बाजूंनी कंपाऊंड घातलेले आहे.  आत शिरल्या बरोबर समोर एक विहीर दिसली. साधारण ५००० वर्षापूर्वीची विहीर अजूनही सुस्थिती मधे आहे. खालपर्यंत विटांचे बांधकाम असलेली ही विहीर आहे. मध्यंतरीच्या काळात विहीर बांधायला दगड वापरला जायचा, पण इथे मात्र फक्त विटांचा वापर केल्या गेलेला दिसतो.

विहीरी मधे अजून एक  वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट दिसली. ती म्हणजे विहीरीच्या  बांधकामासाठी वापरलेल्या विटा. या विटांचा आकार  चौकोनी न करता एका बाजूला लहान ठेवला आहे. या आकारामुळे या विटा एकत्र रचल्या की आपोआपच गोलाकार तयार होतो.  ५००० वर्षापूर्वीची ही बांधकामा बद्दलची जाण पाहून आश्चर्य वाटते.

इथे डॉक/पोर्ट  जवळ साधारण दहा एक फुट उंचीच्या चबुतऱ्यावर एक स्टोअर रुम होती. उंचावर असल्याने, त्या गावचा मुख्य वर बसून सगळ्या पोर्ट वर नजर ठेऊ शकत असे.  इथे फक्त चबुतरा शिल्लक आहे. धक्का, म्हणजे पोर्ट चं बांधकाम पण विटा वापरून केलेले आहे, आणि आजही ते सुस्थितीत आहे.

लोथल ला एक काचेचे मणी तयार करण्याची भट्टी आणि तिचे अवशेष पण सापडले आहेत. या ठिकाणी उत्खननात सापड्लेले मणी इथेच तयार केले गेले असावे. त्या मण्यांच्या फॅक्टरी मधे ११ खोल्या आहेत. तयार झालेला माल इथेच ठेवला जात असावा. लोथल हे मायक्रो बिड्स साठी त्या काळी प्रसिद्ध होते.

एक पूर्णपणे वसवलेले शहर म्हणजे लोथल असे म्हणता येईल.खालच्या अंगाला असलेल्या भागात, बाजार पेठ,  कामगारांची रहाण्यासाठी घरं , विहीरी  वगैरे आहेत.  इथे साधारण २५-३० कुटुंबांच्या रहाण्याची सोय केलेली असावी असे अवशेषांवरून वाटते. इथून जवळच एक घराचा चबुतरा दिसतो, तो बहुतेक या गावच्या मुख्य माणसाच्या घराचा असावा. त्या ठिकाणी असलेली बाथरूम, किचन आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या विटांच्या नाल्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत, आणि त्या काळच्या डेव्हलपमेंटची साक्ष देतात, म्हणूनच याला आर्किटेक्चरल मार्व्हल म्हणता येईल.  एका ठिकाणी तर अतिशय उत्तम स्थिती मधे असलेली  पाणी साठवण्याचे सोय पण दिसुन येते. या पाणी साठवणीच्या वस्तूला बरे लोकं फरनेस समजतात. पण फरनेस सध्या नामशेष झालेली आहे, आणि फक्त अवशेष शिल्लक आहेत.त्यांना पण जाळीने झाकून बंदिस्त करून ठेवले आहे.

हे  इतके डेव्हलप असलेले शहर नामशेष होण्य़ाचे कारण म्हणजे नदीला आलेला पूर. त्या पुरानंतर  इथे रहाणारे लोकं विस्थापित झाले. ज्या पाण्यासाठी त्यांनी इथे शहर  बसवले होते त्या पाण्यानेच त्यांचा घात  केला.

This slideshow requires JavaScript.

तसं म्हंटलं तर लोथल ला काहीच नाही, आणि म्हंटलं तर बरंच काही आहे. जर तुम्हाला पुरातन वास्तू मधे, आर्किओलॉजी मधे काही इंटरेस्ट असेल तर ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल.  अहमदाबाद पासून केवळ ८० किमी वर असलेली ही जागा  पुढल्या वेळेस अहमदाबादला गेल्यावर मिस करू नका .

(इथे मोहंजोदारो आणि हरप्पन संस्कती बद्दल जास्त काही लिहलेले नाही, कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त या जागेची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , . Bookmark the permalink.

40 Responses to लोथल, मृतांचे शहर.

 1. ruchira says:

  Nakki baghaychyach ashya jaganchya listmadhe ajun ek nav add zal… Majh adalj baghitlyavar as zal hot.. What a marvolous art it is.. Aata he lothal architectchya najretun baghnar… Sounds very interesting.. Thanks kaka for sharing

  • रुचिरा
   मस्त जागा आहे. आम्ही तिथे दोन तास थांबलो होतो. म्युझियम पाहून झाल्यावर साईट पहाण्यासाठी कोणी गाईड नव्हता ही कमतरता जाणवली. पण तिथल्याच एका माणसाला पैसे दिले आणि त्याने सगळे दाखवले. आपल्याकडे ऐतिहासिक स्थळांची ही नेहेमीचिच कमतरता आहे.

 2. anuvina says:

  मस्त वाटलं लोथल चे स्थलवर्णन. इतक्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि असं काय घडतं की त्या जमिनीत गडप होतात हेच मोठं कुतूहल आहे.

  • आनंद,
   ही जागा नदीकाठी असल्याने इथे नेहेमीच पुराने नुकसान व्हायचे, पण शेवटचा पुर म्हणजे महापूर होता, त्या मधे सगळे काही वाहून गेले अशी माहिती मिळाली.

 3. shrikantkakirde says:

  छान वर्णन आहे..

 4. Nikhil Sheth says:

  इंदूस नदी? सिंधू नदी किनारी आहे मोहेंजोदारो. सिंधू ला इंग्रजी मध्ये Indus म्हणतात.

  • निखिल
   हिंदी बोर्ड वर सुधा इदूस असाच उल्लेख सापडला होता म्हणून तेच वापरले. 🙂

 5. श्वेता says:

  Nikhil, the Google-transliterate must have translated Indus to इंदूस..
  I hadn’t heard about Lothal, GJ at all. I wonder if textbooks ever mentioned it. Happy to learn about it. Thank you for sharing, Sir. 🙂

  • aruna says:

   our textbooks were written ages ago and they have not been updated. Lothal is relatively a later find!

   • अरुणा
    अगदी बरोबर. अहो इतिहास सोडा, पण इंजिनिअरींगची पुस्तकं पण अपडेट होत नाहीत ही परिस्थिती आहे आजची !

  • श्वेता,
   लोथल बद्दल फारशी माहिती नाही कुठल्याच पुस्तकात . आपल्याकडे तसाही जून्या वारसाहक्काने मिळालेल्या गो्ष्टींचा फारसा अभिमान बाळगायची पदधत नाही. इथल्या विटा चोरून लोकांनी घरं पण बांधलेली आहेत असेही ऐकण्यात आले. आता खरं खोटं देव जाणे.

   • श्वेता says:

    सर, being an educator, मी textbooks ला पुर्णपणे blame नाही करू शकत, पण 3 idiots चित्रपटातला प्राध्यापक सहस्त्रबुद्धे चा dialog आठवला.. first man on moon .. Neil Armstrong.. who was second?..no one remembers who came second… तसच काहीसं आपल्या लोथल च्या बाबतीत घडलं असे वाटते 😦
    पण लोकांनी विटा चोरून घरं बांधली हे वाचून पहिले तर हसू आले नंतर थोडं sad पण वाटले..

    • श्वेता,
     खरं आहे, दुसरा कोण ते कधीच कोणी लक्षात ठेवत नाही.
     तसं अरुणा सुद्दा अगदी रिटायर्ड होई पर्यंत शिक्षण क्षेत्रातच काम करीत होत्या 🙂

     • श्वेता says:

      hee hee … lol.. then I should zip it .. I take back my words as I totally lack experience.. 😀
      thesis साठी मी textbook analysis & development चा विषय निवडला होता.. एक quantitative instrument पण design केली.. तरीही मला आपले textbooks आवडतात.. कधी-कधी वाटते .. they have sufficient info… such an irony..
      but.. his has been a good discussion.. thank you sir and aruna maam 🙂

 6. suhas adhav says:

  kharach etihas ha vishay ekda tya thikana badal vachun sampat nahi….baghitla tar khup chan samajta ani maja yete…
  ekda jari pahila aasel tari te mag navachta hava titka lihita yeta… 🙂

  • सुहास
   इतिहास खरंच मनोरंजक आहे, फक्त तुम्हाला आवड असायला हवी. स्वतः पाहिल्यावर तर नक्कीच भरपूर काही लिहिता येतं हे खरं 🙂

 7. लोथल ला अहमदाबाद हून कसे जायचे याचे थोडे मार्गदर्शन करावे

  • तुषार
   अहमदाबाद राजकोट स्टेट हायवे वरून गेल्यावर एक डावीकडे वळण आहे. आपल्या स्वतःच्या वाहनाने गेलेले जास्त बरे, कारण तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टची फारशी काही सोय नाही. फक्त दिड तासाचा रस्ता आहे. ८० किमी.

 8. नवी माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद !
  लिखाण नेहमीप्रमाणे फार आवडले.

 9. अप्रतिम लेख. मोहनजोदारो आणि हरप्पाबद्दल कायम ऐकत आलोय पण तिकडे जाता येणार नाही हे ही माहित होतं. लोथलबद्दल मात्र कधीच ऐकलं नव्हतं. बघुया कधी योग येतोय ते. Ancient Aliens मध्येही कधीच याचा उल्लेख आला नाहीये..

  • हेरंब,

   अरे मला पण माहिती नव्हतं. गेली कित्तेक वर्ष अहमदाबादला जातोय, पण ही जागा माहिती नव्हती.

  • हेरंब,
   तुझं भारतात येणं कधी जमतं ते सांग, सगळी सोय करतो जाण्याची/रहाण्याची 🙂

 10. Tanvi says:

  महेंद्रजी , पुर्वी तूम्ही अनेक जागांबद्दल लिहीलंत ’काय वाटेल ते’ वर आणि मी दरवेळेस ’या सुट्टीत भारतात आले की इथे जाईन’ असे म्हणत गेले….. यावेळेस जेव्हा प्रवास करता येणार नाही हे आधिच माहितीये तेव्हा म्हणावं वाटतय की , ’जेव्हा केव्हा जाता येइल तेव्हा जाण्याची यादी करावी लागेल आता, आणि मग त्या यादीत हे नाव न विसरता येइलच ”
  पोस्ट आणि माहिती मनापासून आवडली….

  • तन्वी,
   नक्की जमेल. पुढल्या वेळेस 🙂 तिकडे प्रवास पण तसा सुखाचा आहे, म्हणजे तुला तब्येतीची पण काळजी करायला नको. रस्ते एकदम छान आहेत ,अजिबात धक्के वगैरे बसत नाहीत.

 11. Nikhil Sheth says:

  भारतीय पुरातत्व विभागाने गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात भरपूर काम काम केले अहे. त्यांच्याकडे असलेले मर्यादित ह्युमन आणि आर्थिक स्रोत बघता अन भारतीयांची एकंदर उदासीन वृत्ती लक्षात घेता तर खूपच काम केले अहे.

  फाळणी नंतर हडप्पा आणि मोहेंजोदारो दोन्ही पाकिस्तानात गेले तेव्हा आपण जोमाने आपल्याकडच्या भागात काही सापडते आहे का ते शोधायचा प्रयत्न केल. अविरत प्रयत्न केले. काही लहान लहान गावे सापडली होती. पण मोठे शहर नव्हते. मात्र मग लोथल, धोलाविरा, कालीबंगन, सुरकोतडा वगैरे अनेक मोठी मोठी शहरे सापडली आहेत.

  त्यांचा साधारण काळ हा हडप्पाच्या थोडासा नंतरचा आहे. असे म्हणतात कि हे लोक अनेक आणि अगम्य कारणांमुळे हळू हळू पूर्वेकडे सरत गेले. त्यांचे दोन फाटे पडले. एक गुजरातच्या दिशेने गेला तर दुसरा हिमालयाच्या कुशीत पंजाब च्या उत्तरेकडे गेला. तिथेही अनेक जुनी गावे सापडली आहेत.

  आजमितीला भारतात हडप्पा संस्कृतीची किमान २०० ते ३०० गावे/शहरे आहेत. आणिक नवी नवी सापडताच आहेत. अनेक ठिकाणी मात्रा आजही मनुष्यवस्ती असल्याकारणाने माहित असून देखील उत्खनन करता येत नाही.

  • निखिल,
   मी पण त्या धोलविरा बद्दल ऐकले होते, जायची पण इच्छा आहे. 🙂 गांधीधाम , भुज पर्यंत जाऊन आलोय , पण हे गाव मात्र सुटलंय. मला वाटतं की जिथे कुठे नदी आहे, तिथे ही संस्कृती रुजली .

 12. aruna says:

  आपली भाषेच्या संबंधातील टेक्स्ट पुस्तके बर्‍यापैकी काळानुरूप बदलली आहेत. पण इतिहास भूगोल यामधील माहिती अजूनही बरीचशी ब्रिटिशकालीनच राहिली आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास १५ ऑ.१९४७ व २६ जाने. १९५० पर्यंत येऊन थांबतो. फार तर काही नवीन धरणांची माहिती असते. पण नंतर झालेल्या घडामोडींचा काहीही खास उल्लेख नाही.नवीन संशोधनांबद्दल्माहिती नाही. आपल्या शास्त्रज्ञांबद्दल( भाभांनंतर्च्या) माहिती नाही. मुलांना आजचा भारत पुस्तकांमधून बघायला मिळत नाही. जुनी माहिती पण कधी कधी थोडी दिशाभूल करणरी असते, कारण आधी ती ब्रिटिश लोकांच्या चष्म्यातून लिहिली गेली. असॊ.

 13. काका, आपल्या संस्कृतीला एवढा ५००० वर्षांचा इतिहास असताना… आपण अजूनही ‘विकसनशील’च का…??? वास्तविकता, विकासाची खरी सुरुवात…आपल्यापासूनच झाली असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही, मग नक्की आपलं – आपल्या पूर्वजांचं चुकलं कुठे???

  • प्रसाद,
   अरे इंग्रज लेकाचे उशीरा आलेत ना, म्हणून. ते जर आधी आले असते तर आपण लवकर विकास साधला असता.
   —-
   आपल्या संस्कृतीला एवढा ५००० वर्षांचा इतिहास असताना… आपल्या पूर्वजांचं चुकलं कुठे???>>> पाच ह्जार वर्षा पुर्वी आपल्या पेक्षा बाप असलेले लोकही ईथे होतीच की. मेक्सिकोची माय संस्कृती व अजेटीक संस्कृती व त्यानी केलेले बांधकाम तर पाच हजार वर्षे जुनी आहेतच पण त्या बांधकामाची अवाढव्यता पाहता आजचे मशिनरी युगातले इंजिनियर्सही हादरून जातात.
   त्या तुलनेत आमचे बांधकाम अगदीच शुल्लक आहेत.
   असो….

   • मधूकर
    धन्यवाद. गेले २-३ दिवस नेट वर नव्हतो त्या मुळॆ उत्तर देण्यास उशीर होतोय.

  • प्रशांत,
   एक टिव्ही स्रिरीज आहे Ancient Allens नावाची.Torrent वर आहे अव्हेलेबल , ती नक्की पहा. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

 14. trupti says:

  congress sampurna bhartache asach “lothal” karnar ahe

 15. dilpark says:

  ABHINANDAN. CHAN LEKH AHE VACHUN ANAND JHALA.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s