क्षमा..

Those-who-do-not-remember-the-past-are-condemned-to-repeat-it.या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद  नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत  तसं शरीर थकत जातं, पण केवळ  इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं  निसर्गाला आव्हान देत वाढत्या वयाकडे पाठ फिरवण्याचे प्रयत्न करतात, पण ते काही फार काळ जमत नाही. कधी तरी एक दिवस येतो आणि मग शरीर आणि मन एकमेकांपासून फारकत घेतं, आणि मग शस्त्रक्रिया, किंवा औषधोपचार करून शरीर जगवावं लागतं.

शरीर आणि मन यांचं द्वंद्व सुरु झालं की यात नेहेमी मनाचा विजय होतो, आणि  शरीर खचतं. मन लपवून ठेवता येतं पण शरीर तर नाही ना लपवून ठेवता येत? मला वाटतं की हेच ते कारण असावं की ,काही ठरावीक वयात आपण थोडं जास्त अंतर्मुख होतो, आणि मग इतरांशी न बोलता  आपलं मन हे स्वतःशीच  जास्त बोलायला लागतं – हे होतं तुम्ही एकटे असतांना, आणि  त्याच वेळेस तुमचे मन मागे वळून भूतकाळात डोकावत असतं.

भूतकाळात डॊकावुन पाहिल्यावर कधी तरी सुंदर स्वप्न दिसतात, तेंव्हा तो भूतकाळ तर खूप आवडतो. अगदी शाळेतले मित्र मैत्रिणी, लग्नापूर्वी बायको बरोबर ( ती बायको  नसतांना ) बरोबर चोरून फिरल्याचे दिवस , ह्या आनंददायक आठवणी, तर कधी तरी आपण कोणाशी कसे वाईट वागलो होतो ते पण आठवत. कुठल्यातरी गोष्टीचा मनात एक विनाकारण   आकस ठेवून आपण ’ तसे ’ का वागलो हे भूतकाळात  डोकावून तिऱ्हाइताच्या दृष्टीने पाहिले की स्वतःची चूक समजते, आणि प्रसंगी स्वतःचीच लाज पण वाटते.आज ती वेळ गेलेली आहे, आणि आपण ज्या व्यक्तीशी तसे वागलो ती व्यक्ती आपल्यात नाही, आणि  अगदी मनापासून क्षमा मागायची इच्छा होत असली , तरी पण  आता ते शक्य नाही,  हे लक्षात आलं की वाईट वाटतं.  आपल्याला तसे वागायचा खरंच अधिकार होता का?  ह्याचं उत्तर स्वतःलाच सांगितल्यावर, आणि आपल्या वागण्याची खंत वाटते आणि डोळ्यात पाणी येतंच.

आपण कधी काळी केलेल्या चुकांकडे पाठ फिरवून दुर्लक्ष केल्याचा आपला प्रयत्न, आपली चूक असतांना पण इतरांवर आपण जास्तच ऑफेन्सिव्ह’ होऊन केलेले आरोप- म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा लपविण्याचा तो प्रयत्न नव्हता का? होय! स्वतः वरच्या केल्या गेलेल्या खऱ्या आरोपांना उत्तर द्यावे लागू नये म्हणून समोरच्या व्यक्तीवर केले निरर्थक बिनबुडाचे आरोप  करून त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची माझी स्ट्रॅटेजी खरंच योग्य नव्हती, आणि त्या मुळे मी समोरच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास दिलाय याची जाणीव पण होते, आणि आपण तसे का वागलो याचे आश्चर्य पण वाटते.

आयुष्यात नाते संबंध झिडकारणे सगळ्यात सोपे,  आणि  जेंव्हा तुम्ही ते झिडकारत, तेंव्हा स्वतःबद्दल उगाच काही तरी अवास्तव कल्पना करून घेतलेल्या असतात आपण. आज वयाची काही वर्ष संपली आहेत, उरलेल्या वर्षांबद्दल  कसे जातील याची काळजी वाटत ही असतेच. आपण जसे वागलो, तसेच जर आपल्याशी आज कोणी वागले तर?? हा प्रश्न तर मेंदूला नेहेमीच कुरतडत असतो.

शेवटी काय तर, वेळ कधीच पुन्हा मागे नेता येत नाही, घड्याळाचे काटे पण कधीच थांबवता येत नाहीत, स्वतःच्या कर्तबगारीवर तुम्ही पैसे कमावून आपलं भवितव्य घडवतो आहे असा विचार करू शकतो,  पण  के्वळ पैसे कमावणे म्हणजे भवितव्य घडवणे नाही.भूतकाळातील एकही क्षण ( तुम्ही मिस केलेले ) त्याला पुन्हा अनुभवायला मिळत नाही – हा एक शाप आहे, आणि याच शापाचे ओझे अश्वत्थाम्याच्या डोक्यावरच्या जखमे प्रमाणे सांभाळत आमची पिढी ही आयुष्य जगते आहे.

जन्माला येतांना डॊळ्यात घेऊन येणाऱ्या अश्रु घेऊन आपण या जगात येतो, वयोमाना प्रमाणॆ शरीराच्या अवयवांनी जरी आपली साथ सोडली, किंवा एके काळी जवळच्या असलेल्या लोकांनी , किंवा जगातल्या  सगळ्या आप्तेष्टांनी जरी साथ सोडली, तरी दैवाने दिलेले ते सोबती म्हणजे अश्रू मात्र आपली साथ अगदी इमाने इतबारे करत असतात. ते केवळ अश्रूच आहेत की तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत करतात, आणि मग पुन्हा नवीन आव्हानं पेलण्यास मनाला तयार करतात.  म्हणून आपली खरी संपत्ती म्हणजे अश्रू- कधीच न संपणारी!

हे असे विचार का मनात यावे? मला एकच सांगायचंय, जर कोणाची क्षमा मागायची असेल तर   योग्य वेळ कुठली??अगदी आजची वेळ योग्य आहे, अजिबात वेळ करू नका, आणि क्षमा मागून मोकळॆ व्हा . असो. इती लेखन सीमा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

52 Responses to क्षमा..

 1. पियू says:

  अजून या फेज मध्ये जायला बराच अवकाश असल्याने लेखातील भावना १००% समजून घेता आल्या नाहीत. परंतु वाचलेले बरेचसे पटले.

  अवांतर: लेख आणि लेखात वापरलेला फोटो यांचा संबंध समजला नाही.

 2. suhas adhav says:

  manat kay kadhi ye el kay sangava….
  parithiti nusar man badalta sarkhach… aaj je barober vata , te kadhi vichar kela tar chuk pan vatu shakta…..
  shevti kay sagle manachech vikar ji shama magaychi vel yete 😛
  pan kharach shkama magaychi vel hi aatachich he agdi patla mala
  ekdacha manavarcha tan jato 🙂

  • सुहास
   इंग्रजी मधे एक म्हण आहे, अवर माईड इज लाइक अ ड्रंक मंकी , स्टंग विथ द स्कॉर्पिओ..
   शेवटी ब्लॉग पण काय वाटेल ते आहे, त्या मुळे काही पण लिहिलं जाऊ शकतं.

 3. Santosh says:

  Kuthe tari aaat… tumhi ekdum MANATALA bolalat… kinwa lihilat asach watala 😥

  Abhari ahe!!! 🙂

  • संतोष
   प्रत्येकाच्याच मनाची ही अवस्था असते, फक्त तारुण्याच्या जोशात आपण खूप वेळा या कडे दुर्लक्ष करतो .

 4. “आपण कधी काळी केलेल्या चुकांकडे पाठ फिरवून दुर्लक्ष केल्याचा आपला प्रयत्न, आपली चूक असतांना पण इतरांवर आपण जास्तच ऑफेन्सिव्ह’ होऊन केलेले आरोप- म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा लपविण्याचा तो प्रयत्न नव्हता का?”

  या आणि अशाच फेजच्या रीसिविंग एंडला आहे सध्या. म्हणून जास्तच भावलीये पोस्ट. 🙂

  • श्रद्धा,
   स्वतःशी प्रामाणिक राहून लिहिली आहे पोस्ट. मी असाच वागलो आहे लोकांशी, पण आज जी जाणीव झाली,तीच जर आधी झाली असती, तर कदाचित ….. असो.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 5. ruchira says:

  Manapasun patal kaka, mafi magun takavi khup oze kami hote manavarch… Pudhcha maf karel n karel never mind… Kalch vachla ha blog aani lagech sorry mhtl kahi khas javlchya lokana…. Khup bar vatal kaka..thanks

  • रुचिर,
   धन्यवाद.. झालं, मी लिहिलेल्या या पोस्टचं तू सार्थक केलंस. 🙂 बरं वाटलं वाचून.

 6. अभिषेक says:

  ग ह न

  • अभिषेक,
   आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी तरी जाणीव होतेच या गोष्टीची, फक्त योग्य वेळ आल्यावर, आणि जर हेच थोडं आधी समजलं असतं तर ..??? हा प्रश्न पण मनात येतो.

 7. mandar17390 says:

  हे असे विचार का मनात यावे? मला एकच सांगायचंय, जर कोणाची क्षमा मागायची असेल तर योग्य वेळ कुठली??अगदी आजची वेळ योग्य आहे, अजिबात वेळ करू नका, आणि क्षमा मागून मोकळॆ व्हा .

  हे अगदी पटलं, आत्ता थोडं विचित्र वाटले तरी चालेल नंतर त्या घटनेकडे बघून अमुक असे केलं असतं तर बर झालं असतं असे वाटायला नको… लहान असताना प्रचंड चिडका होतो मी, तोंडाला येईल ते बोलायचो आणि नंतर मलाच वाईट वाटायचं, नंतर अक्कल आल्यावर सुटलं.. सहसा होत नाही आता असं, स्वतः वर ठाम असणे महत्वाचे.

  • मंदार,
   कितीही ताबा असला, तरी कधी तरी अशी वेळ येतेच आणि आपण १०० टक्के पर्फेक्ट वागू शकत नाही. अशा प्रसंगांचा धांडॊळा घेतला तेंव्हा हे पोस्ट झाले. धन्यवाद.

 8. पियू says:

  याला अजून एक पैलू आहे. आपण जे वागतो.. जसे वागतो त्यामागे आपल्या वयाचा खूप मोठा वाटा असतो. आयुष्याच्या त्या-त्या वळणावर दुसरा एखादा माणूस जसा वागेल (किंवा आपण ज्याला दुखावले आहे तो माणूस जसा वागला असेल/ वागेल) असेच आपण वागलेलो असतो. त्यासाठी आयुष्याच्या पुढच्या वळणावर गेल्यावर मागे वळून पाहतांना स्वत:ला इतकं पण दोषी समजू नये.

  ज्याप्रमाणे वयोपरत्वे येणारे शहाणपण/ समंजसपणा/ शांततेची आवड/ माणसांची गरज हे आयुष्याचे रंग आहेत तसेच लहान असतांना हट्टी स्वभाव, तरुणपणात येणारा मस्तवालपणा हेही याच आयुष्याचे रंग आहेत. ते आपण तसेच स्वीकारायला हवेत. उद्या तुमच्या आसपासचे एखादे लहान बाळ उगाचच प्रौढ माणसासारखे समजूतदार माणसासारखे वागायला लागले तर तुम्हालाच ते पहावेल का? एखादा तरुण नवीन लग्न झालेला माणूस म्हातारा झाल्यासारखा विरक्तीने वागायला लागला तर तुम्ही त्याचे समर्थन कराल का?

  आपला स्वभाव ही देवाने आपल्याला त्या-त्या वयानुसार दिलेली देणगी आहे. तिचा स्वीकार त्या-त्या वयात तर हसत कराच.. पण नंतरदेखील त्याविषयी इतके अपराधी किंवा वाईट वाटून घेऊ नका. रादर हळूहळू शरीर म्हातारपणाकडे झुकतेय याची जाणीव झाल्यावर हे सगळे शहाणपण सुचणे हीदेखील या वयाचीच देणगी आहे.

  एक छोटेसे उदाहरण: आपण लहान असतांना आपल्या आईवडिलांना किती त्रास दिला हे आठवून आज आपण उदास किंवा अपराधी वाटून घेतो. पण आईवडिलांनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांना लहानपणी असाच त्रास दिलेला असतोच की.. खाण तशी माती या न्यायाने आपण तरी त्याला कसे अपवाद ठरणार?

  आज होळीचा दिवस.. आयुष्यात आलेले सगळे रंग तितकेच महत्वाचे आणि आयुष्य समृद्ध करणारे आहेत याची जाणीव करून देणारा दिवस… सो… यातून बाहेर पडा.. मुख्य म्हणजे स्वत:ला माफ करा.

  असो… मी काही तुम्हाला उपदेश करण्याएवढी मोठी नाही. पण सकारात्मक विचारांच्या दृष्टीने स्वत:वर प्रेम करण्याची सुरुवात कोणत्याही वयात केलेली चांगलीच.. नाही का?

  • पियू,
   डायव्हर्ट होतोय मूळ विषय. तू दिलेली उदाहरणे एकदम वेगळीच आहेत,
   स्वभाव ही वयानुसार दिलेली देणगी आहे हे काही पटत नाही. स्वभाव या विषयवर पुर्वी पण लिह्ले होते. http://wp.me/pq3x8-2kr
   आज ज्या गोष्टीचा तुम्हाला पश्चात्ताप होतो, ह्याचाच अर्थ म्हणजे ती गोष्ट चूक होती हे तुमचे मन मान्य करते आहे. जी गोष्ट तुमचे मन मान्य करते, ती नेहेमीच खरी असते, कारण त्या गोष्टीचा स्वीकार तुम्ही समाजासाठी नव्हे तर, स्वतः साठी करत असता.
   पिय़ू, समोरचा माणूस तसा वागला असेल म्हणून आपण तसे वागलो असतो ही गोष्ट शतशः चूकीची आहे. मी स्वतःच बरोबर आणि जगातले सगळे जण चूक असे नेहेमीच होणे शक्य नाही. कधी तुम्ही पण चूकीचे वागू शकता- आणि त्या गोष्टीचे समर्थन कसे काय करायचे? नेमक्या ह्या “अशाच गोष्टी” आठवतात नंतर कधी तरी.. त्या बद्दल लिहिले आहे हे पोस्ट.
   स्वतःवर प्रेम करा हे ठिक आहे, पण केलेल्या चूकां मान्य करण्याने तुमचा मोठेपणा कमी होत नाही, तर वाढतो. रिट्रोस्पेक्शन हे कधी पण चांगलेच!

   • पियू says:

    >> स्वभाव ही वयानुसार दिलेली देणगी आहे हे काही पटत नाही.

    मी हे वयानुसार येणाऱ्या अल्लडपणा आणि मस्तवालपणा, थोडीशी बेपर्वाई याविषयी बोलत आहे.

    >>आज ज्या गोष्टीचा तुम्हाला पश्चात्ताप होतो, ह्याचाच अर्थ म्हणजे ती गोष्ट चूक होती हे तुमचे मन >>मान्य करते आहे.

    हे मी नाकारलेले नाहीये. पण कालच्या चुकांसाठी आज रडत बसायचे की स्वत:ला माफ करून पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेत चालू लागायचे हे आपल्याच हातात असते.

    >>समोरचा माणूस तसा वागला असेल म्हणून आपण तसे वागलो असतो ही गोष्ट शतशः चूकीची आहे.

    ‘समोरचा माणूस आपल्याशी असा वागला म्हणून आपण त्याच्याशी असे वागलो’ हा युक्तीवाद मी नाही मांडलाय काका. ह्या लेखाचा सूर एकंदर ‘कोणे एके काळी आपण इतरांच्या मनाची पर्वा न करता त्यांना दुखावले याबद्दल आज वाटणारे दु:ख’ टाईपचा आहे. आणि मी हे सांगतेय की तरुण असतांना सहसा अशी मनोवृत्ती थोड्याफार फरकाने बहुतेकांची असतेच. त्याबद्दल आज वाईट वाटत असेल, तर त्या लोकांची माफी मागून मोकळे व्हा. त्या व्यक्ती हयात नसतील तर देवापुढे उभे राहून एकदा मनापासून त्या व्यक्तीच्या आत्म्यासाठी शांती मागा. पण पुन्हा पुन्हा आपण कसे निर्दयीपणे वागलो हे उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही.

    >>कधी तुम्ही पण चूकीचे वागू शकता- आणि त्या गोष्टीचे समर्थन कसे काय करायचे?

    कधीकाळी घडून गेलेल्या चुकीचे आज समर्थन कश्याला करायचे? सरळ चूक झाली हे मान्य करायचे आणि पुन्हा असे वागायचे नाही असं स्वत:ला बजावून स्वत:च स्वत:ला मोठ्या मनाने माफ करून टाकायचे.

    आणि हो. आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी स्वत:ला माफ करणे म्हणजे चुकांचे समर्थन करणे किंवा ‘आपण चुकलोच नाही’ असे म्हणणे नसते. उलट स्वत:ला माफ करणे म्हणजे आपल्याकडून चुका झाल्या हे स्वत:शी मान्य करणे आणि आणि त्याहीपुढे जाउन त्या ‘गिल्ट’ मधून स्वत:ला बाहेर काढणे होय.

    >>नेमक्या ह्या “अशाच गोष्टी” आठवतात नंतर कधी तरी..

    ती ‘कधीतरी’ म्हणजे मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांची नांदी असते. अश्याच वेळी आपण आपल्याला सावरायला हवं. नाहीतर आपण त्यातून बाहेर कसे पडणार?

    >>स्वतःवर प्रेम करा हे ठिक आहे, पण केलेल्या चूकां मान्य करण्याने तुमचा मोठेपणा कमी होत नाही, >>तर वाढतो.

    अर्थातच. पण भूतकाळात केलेल्या चुकांसाठी आपण आपल्याला माफ करायला शिकलो नाही तर आपण कधीच मोठे होणार नाही हे अगदी नक्की.

    >>रिट्रोस्पेक्शन हे कधी पण चांगलेच!

    रिट्रोस्पेक्शन हे मागे केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकून पुढे जाणे, त्या चुका पुन्हा कश्या होणार नाहीत हे पहाणे असेल तरच चांगले. रिट्रोस्पेक्शन केल्याने ‘आपण किती वाईट वागलो.’ ‘आपण असे वागलोच कसे?’ ‘ज्याला मी दुखावले तो माणूसही आता हयात नाही. त्यामुळे आता माझ्या चुकीला माफी नाहीच.’ फक्त असे आणि असेच विचार मनात येणार असतील तर रिट्रोस्पेक्शनला चांगले कसे म्हणावे?

  • पियू
   जाऊ दे, जास्त काही लिहित नाही, नाही तर इथेच मायबोली, मुक्तपीठ व्हायचं. 🙂

   • पियू says:

    😀 अहो काका तुम्हाला कधी असे निराशाजनक विचार करतांना पाहिलं नाहीये हो आम्ही.. त्यामुळे राहावलं नाही.

    • विनिता,
     अगं निराशाजनक विचार नाहीत हे. अगदी सामान्य माणसाचं सामान्य मन असंच असतं, आणि मी तर एक अतीसामान्य माणूस.. 🙂

 9. bageshrik says:

  Zepala. Khup sahaj sopya bhashet hota. aani prayatna karel offensive na honyacha (karan lok mhanat me ajun lahan aahe 🙂 ) maafi magana evadha pan kathin nahiye jr chuk kalali aahe tar. mafi magun jr kahi changala hot asel tr accha he naa. 🙂
  thanks kaka. chan lihalay. agadi manatala 🙂

 10. प्राजक्ता says:

  खूप छान लिह्ली आहे.
  शेवटचं वाक्य मनाला पटलं. माझ्या आजी बरोबर मी खूप भांडले होते, आणी होस्टेलला निघून गेले, ती त्याच आठवड्यात वारली, शेवटी माफी मागायची राहून गेली- कारण चूक माझीच होती 😦

 11. लेख आवडला, आणि पियू च्या विचारांशी पुर्ण सहमत.

 12. aruna says:

  वय वाढते त्या प्रमाणात maturity वाढते असे म्हणतात. योग्य अयोग्य या बाबतीत ही विचार होतो. अर्थत् सगळ्य़ांच्या बाबतीत असे होईलच असे नाही. परंतु तरुण वयात एक रग असते, स्व-कर्तृत्वाचा अभिमान असतो आणि म्हणुनच कदाचित् इतरांच्या भावना वगैरेंचा विचार करायची गरज भासत नाही.one is forever truying to go ahead and achieve new goals. here is no time to think about what and whom he hurts. all that comes only when one comes to a phase where he is secure and need not worry who goes ahead of him. That is human nature. there are some who are sensitive enough to consider others even while young, but a very few. what is important, is tyhat one thinks back, take a stock and try to make amends.Self realization is very important. asking pardon of those whom one might have hurt is good for the soul of both.
  But what aout those who hurt you and may have caused you sorrow?
  Does one tend to forgive them, even if if they don’t ask for it?

  • अरुणा,
   जगात आपण कसं वागायचं ते आपण ठरवऊ शकतो, पण इतरांनी कसे वागावे ते संपुर्णपणे त्यांच्याच हातात आहे. पण कमीत कमी आपल्यापेक्षा वडिलधाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत तरी असा प्रश्न पडू नये असे वाटते.

   • aruna says:

    तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण कधी कधी असे ही अनुभव येतात. आणि प्रश्न पडतो की लोक असे का वागतात! ( म्हणजे ते कधीच मोठे होत नाहीत का?) खरे तर त्यांच्यावर रागावण्यापेक्षा त्यांची कीव करावीशी वाटते. एका इंग्लिश कवितेत म्हटले आहे, ‘this world is made up of
    all kinds of things and people!’

 13. काका, अन्तर्मुख केलंत पुन्हा एकदा… बरे्चदा असं होतं, की काही व्यक्तिंसमोर आपली नजर आपोआप खाली झुकते, कुठेतरी मनात guiltiness असतो… आपलं काहीतरि चुकलेलं असतं पण चुक कबुल करायची हिम्मत होत नाही म्हणा किंवा आपला Ego आड येतो आणि तो ‘Sorry’ ओठांतल्या ओठांतच राहुन जातो.

  व. पू. काळेंच एक मस्त वाक्य आहे कि, ज्या माणसाचं मन कूठेतरी जिवंत आहे त्याला हातुन घड्लेल्या प्रत्येक चुकीबद्द्ल शिक्षा वा प्राय्श्चित्त हे हवंच असतं नाहितर वेड्यासारखी अवस्था होते….!!

  लेख नेहमी प्रमाणे मस्तंच…. पु.ले.शु. 🙂

 14. काळबादेवी says:

  मँक्सफँक्टर ची फेस पावडर लावून मोक्षाची उपासना अशीच करायची असते बहुदा…

 15. SnehaL says:

  आपली खरी संपत्ती म्हणजे अश्रू- कधीच न संपणारी!

  khar aahe kaka ..

 16. हर्षित says:

  छान लिहिलेय……. आणि फोटोवरील वाक्य पण डेंजर आहे….. मी बऱ्याचदा अंतर्मुख होण्याचे टाळतो….कारण मलाच मग बऱ्याच गोष्टी बद्दल दोषी वाटायला लागते…..

 17. Pingback: marathi blogs List | Marathi Search Results

 18. मामा,
  अगदी एक एक गोष्ट, एक एक शब्द खरा आहे…पण आपण असं का वागतो? आपलं चूक आहे हे बरेच दा माहित असतानाही क्षमा न मागणं ह्याही मागे एक मानसशात्रीय कल आहेच. परिणामांचा… बरेचदा अनेक लोक, क्षमा “मागत” नाही तर आपल्या वागणुकीतून दाखवायचा यत्न करतात मात्र समोरच्याला ते समजेलच की नाही याची खात्री नसते…तो माणूस हयात देखिल उरत नाही मात्र ओझं कायम राहतं…हे आणि असे अनेक ओझे एकत्र जाणवायला लागले की माणूस अंतर्मुख होतो..
  अंतर्मुख होऊन, स्वत:च मुल्यमापन करेपर्यंत ठीक पण हे ओझे उतरणार कसे….कदाचित आपण माफ़ी मागू शकलो नाही मात्र एखाद्याला मनापासून माफ़ केलं तर त्या ओझ्यात थोडा फ़रक पडेल कदाचित….

  खूप छान लिहिलयस मामा

  सुरुचि

 19. शब्द नि शब्द खरा आहे काका.
  अगदी पटल. आणि ह्यावर लेख लिह्याबद्दल ह्याट्स ऑफ!!
  पण कधी कधी ना पुन्हा पुन्हा माफी मागून सुद्धा जेव्हा समोरचा माणूस तुम्हाला शिव्याच देतो, तेव्हा ती माफी ची भावना निघून जाते मनातुन कुठेतरी. अश्याच वळणावर आलोय सध्या आयुष्यात. कळत नाही कि मनात काय ठेवून पुढे जावं अश्यावेळी …
  तुम्हाला झालंय का असं कधी?

  • वैभव,
   नाही. अजून तरी नाही. 🙂

  • aruna says:

   वैभव,
   आपण आपल्याला वाटतं म्हणून माफी मागतो. म्हण्जे आपण योग्य वागतो. आता समोरचा तेव्हढाच विचारी आणि समजुतदार असेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तो कसाही वागला तरी आपण योग्य तेच केले असा विचार करून पुढे जावे. त्यावर जास्त वेळ वाया घालवू नये not worth it. just forget it and go on with your life.पुन्हा पुन्हा माफी तर कधीच मागू नये.

 20. आमोद says:

  खरंच असं होतं का? माफी मागून खरंच मन हलके होते का?
  प्रत्येक वयात केलेल्या चुका पुढे जाऊन दिसतातच…. पण कितीही शिकले तरीही पुढच्या नवीन वयात नवीन चुका होतातच… म्हणूनच आपण म्हणतो कि माणूस नेहेमी शिकत असतो….
  हे पाठ्यपुस्तक मरेपर्यंत कधीच संपत नाही… हे माहित असूनही मधेच थांबून मागचेच धडे पुन्हा वाचायचा हा अट्टाहास का करायचा? जुन्या इयत्ता पास झालो, पण १००/१०० मार्क नाही मिळाले, तर ते आता मिळवण्याचा ध्यास कशाला? आता पुढच्या इयत्ता.. नवे धडे…. जुन्या धड्यांची माफी नाहीच मागू…. नाहीतर तिथेच अडकतो माणूस…..
  कळले तेवढेच पास होण्यास पुरेसे होते हे जेव्हा कळते…. तेव्हाच जे कळले होते त्याची किंमत कळते… नाहीतर केवळ चुका आणि माफी याच गोष्टी राहतात आठवायला….

  • आमोद,
   माफी मागून मन हलकं होतं की नाही ते माहिती नाही, पण जर एखाद्या व्यक्तीची माफी मागायची राहून गेली, आणि ती व्यक्ती जर स्वर्गवासी झाली तर निश्चितच मनःस्ताप होतो हे नक्की. हा माझा अनुभव आहे.
   कमीत कमी स्वतःच्या परीवारातल्या व्यक्तींची तरी माफी मागण्यात काही गैर नाही असे मला वाटतेल.

   • aruna says:

    आपलि चुक अपल्या लक्षात आली तर जरूर माफी मागावी, मन नक्कीच हलके होते अणि समोर्च्याला पण बरे वाटते. if someone dies before giving u a chance to apologize u can still doit withh the faith that he/she is listening to u from whereever he/she is! believe me it helps.

 21. Ajaytao2010 says:

  Nice reading about you

  Thanks for visiting my blog. Be in touch. Browse through the category sections, I feel you may find something of your interest.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s