मालक पण इथेच जेवतात…

IMG-20130423-00255 हॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ”  लक्ष वेधून घेतो.  या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही तसाच ठेवलेला आहे. पूर्वी हॉटेल मधे जेंव्हा मालक स्वतःच जेवतात म्हंटल्यावर जेवण चांगले असेलच यावर गिऱ्हाइकाचा विश्वास बसायला मदत व्हायची. मी हे लिहितोय ते हॉटेल माटुंग्याच्या रामा नायक यांचे उडपी श्रीकृष्ण बोर्डिंग बद्दल.

काही वर्षापूर्वी हॉटेल मधे खाणं हे कमी पणाचं समजलं जायचं. घरच्या लोकांनी बाहेर हॉटेल मधे जाऊन खाणं हा गृहिणीलाही अपमान वाटायचा स्वतःचा, पण हल्ली हे बदललेले आहे. गृहिणी सकट सगळे जण जेवायला बाहेर जातात, आणि त्यात काही कमीपणाचे मानले जात नाही. हॉटेल मधलं अन्न म्हणजे कमी प्रतीचे, त्या मधे स्वच्छतेचा अभाव, आणि इतर बऱ्याच काही गोष्टींचा समज होता.  चांगल्या हॉटेल्स ची कमतरता तर होतीच, आणि म्हणून नेमक्या ह्याच काळात म्हणजे साधारण १९४० च्या सुमारास कर्नाटकातून आलेले. केळीच्या पानावर साधे सरळ अगदी घरगुती चवीचे दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण त्यांनी देणे सुरु केले –  या गॅरंटी सकट की जेवण स्वच्छ बनवलेले आहे, आणि मालक पण इथेच जेवतात, म्हणजे चांगल्या प्रतीचे आहे !

ह्या हॉटेल ची माहिती मला राजाभाऊं कडून समजली.  राजा भाऊंनी एकदा फेसबुक वर पोस्ट टाकली होती, की इथे  जेवायला जातोय म्हणून, आणि नेमका दोन दिवसानंतर माझा पुण्याचा मित्र आला होता, तो शुद्ध शाकाहारी असल्याने त्याला घेऊन इथे जेवायला गेलो, आणि त्या नंतर तर ह्या हॉटेल चा अगदी डाय हार्ड फॅन झालोय मी.  आता या कर्नाटकी शेट़्टीच्या हॉटेल मधे वेगळे असे काय आहे की याचे खास वेगळेपण आजही टिकून आहे? तर तुम्हाला ते समजून घेण्यासाठी इथे एकदा यायलाच हवे.

IMG-20130423-00254स्वच्छ ते बद्दल तुमच्या मनात काही शंका आहेत?? जर उत्तर होय असेल, तर शेजारीच अजून एक पाटी आहे, तुम्ही आमच्या स्वयंपाक घरात जाऊन पाहू शकता. स्वयंपाक घरात सहज नजर टाकली तरी पण स्वच्छ पांढऱ्या ऍप्रनमधले लोकं काम करतांना दिसतात.मी आत जाऊन पाहिले नाही, पण जे काही समोर दिसतं त्या बद्दल अजिबात काही कम्प्लेंट करायला चान्स नाही.

सेंट्रल वरच्या मा्टुगा स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर डाव्या हाताला पहिल्या मजल्यावर असलेले हे रामा नायक यांचे , “ऊडपी श्रीकृष्ण भोजनालय”‘१९४२ साली सुरु केलेले हॉटेल आजही ७१ वर्षानंतर त्याच दिमाखात उभे आहे. आपली परंपरा जपत .रामा नायक ह्यांच्या पुढल्या पिढीने  बऱ्याच गोष्टी अगदी पूर्वी ज्या प्रमाणे होत्या त्या तशाच ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो – अगदी चवी सकट! इथे जेंव्हा पहिल्यांदा जेवायला गेलो होतो तेंव्हाच ह्या   हॉटेलच्या  अगदी प्रेमात पडलो होतो.

IMG-20130423-00253दाक्षिणात्य पद्धतीचे म्हणजे चार प्रकारचे जेवण असते. एक म्हणजे तामिळ, दुसरे आंध्रा, तिसरे केरळी आणि चौथे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिभेवर ज्याची चव आपला जम बसवलेली आहे ती म्हणजे कर्नाटकी उडपी. ह्या तिनही प्रकारात एक वेगळी चव असते. नुसता सांबार जरी म्हंटलं, तरी, त्याच्या चवीमधे फरक असतोच. कर्नाटकी किचीत गोडसर चव असलेला सांबार असो काय किंवा आंध्रा मधला आंबटसर चवी कडे झुकणारे सांबार असो, दोन्ही मला अगदी सारखेच प्रिय आहेत. अर्थात केरळी, तामिळ सांबार – जे साधारण सारख्याच चविचे असतात, त्याची पण एक वेगळीच मजा असते.

कांदा, लसूण न घालता केलेले कर्नाटकी पद्धतीचे रस्सम म्हणजे रामा नायक कडला माझा विक पॉइंट! इथे रस्सम  आमसूलाचे, चिंचेचे, किंवा कधी टोमॅटोचे पण असते. रस्सम वाढायला तो वेटर आला, की त्याल समोर उभा ठेवून चार पाच वाट्या रीचवल्या शिवाय मी जेवणाची सुरुवात करित नाही.त्यातले आमसुलाचे रस्सम माझे फेवरेट. केरळी, मद्रासी रस्सम मधे कांदा, लसूण असतो, पण इथे तसे काही नाही. तिखट नाही, पण चवदार असे रस्सम इथे असते. ह्या हॉटॆल मधे अनलिमिटेड जेवण हे केळीच्या पानावर वाढले जाते.  ऑथेंटीक  कोस्टल कर्नाटका स्टाइलचे जेवण असल्याने  सगळ्याच भाजांमधे नारळाचा अगदी सढळ हाताने केलेला वापर  हा ओघाओघाने आलाच.

परवा जेंव्हा इथे जेवायला गेलो होतो, तेंव्हा काटेकोहोळ्याची भाजी होती,(काटेकोहोळे म्हणजे ज्या पासून आग्ऱ्याला पेठा बनवला जातो तो एक भोपळ्याचा प्रकार) आणि  सुरण ची कडधान्याच्या उसळी मधे केलेली भाजी होती.काटेकोहळ्याची भाजी होऊ शकते, आणि ती चवदार असते यावर विश्वास ठेवायला भाग पाडले  या रामा नायक यांच्या हॉटेल ने! ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. भरपूर नारळाचा चव घातल्याने आणि वेगळे कर्नाटकी मसाले ( म्हणजे नेमके कुठले असतील बरं?) घातल्याने  एका वेगळ्याच चवीची ओळख झाली होती. पानकोबीची भाजी पण कधी नव्हे ती चवीने खाल्ली. 🙂

सुरुवातीला ताज्या कैरीचे लोणचे, दोन भाज्या, दही आणि दोन तवा चपाती ( इथे फुलके मिळत नाहीत) वाढल्या जाते. हे संपवल्यावर  भाताचा डॊंगर समोरच्या केळीच्या पानावर वाढून तो वेटर निघून गेला. हा डॊंगर संपेल?? हा प्रश्न मनात पडतो, पण सुरुवातीला, काटेकोहोळ्याची भाजी आणि भात, नंतर ती उसळ सदृष भाजी आणि भात, संपवण्यातच सगळा डोंगर संपला.

वेटरचे लक्ष होतेच, त्याने समोर पुन्हा एक लहानशी टेकडी एवढा भात वाढला. सांबर भात, रस्सम भात, आणि शेवटी दही भात -लोणचं, आणि सोबत ७-८ आप्पलम घेऊन जेवण संपवले. स्विट डिश मधे अर्थात आमरस घेतला. काचेच्या उभ्या ग्लास मधे असलेला हा आमरस म्हणजे शेवटच्या तृप्तीच्या कळसा वरचा चमकणारा हिरा!

बाहेर निघालो, तर बरीच मोठी रांग होती, म्हणून इथे जेवायला जायचे असेल तर लंच टाइम म्हणजे एक ते दोन च्या दरम्यान जाणे टाळा, रांगेत उभे रहाणे टळू शकेल. जायचं कसं? एकदम सोप्पं आहे. माटुंग्याला उतरा, पूर्वेला बाहेर पडल्यावर ,कोणालाही विचारा. 🙂 रामा नायक … मुंबई मधली एक शाकाहारी जेवणाची खास जागा. चुकवू नये अशी एक जागा 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , . Bookmark the permalink.

42 Responses to मालक पण इथेच जेवतात…

  • सुरुची
   फॉर अ चेंज व्हेज खादाडी पोस्ट टाकली आहे. दोन ऑप्शन होते, एक म्हणजे पुण्याचं रानमळा, आणि रामा नायक.. आता रानमळ्यावरची पोस्ट पेंडींग ठेवतो काही दिवस.

 1. सागर says:

  साउथ इन्डियन जेवण मस्तच असते.कॉलेज ला असताना आंध्रा मेस होती शेजारी.चवीत बदल हवा असेल तेंव्हा नक्की जाणे व्हायचे. रस्सम माझाही विक पॉइंट.मुंबईत आल्यावर जाऊया आपण नक्की

  • सागर,
   नक्की.. कधी येणार ते सांग. नाही तर नेमका त्याच वेळेस मी टूर वर : असे व्हायला नको.

 2. स्नेहल says:

  इतके सुरेख वर्णन….आत तर जावेच लागेल….

 3. श्वेता says:

  nosatalgic…
  रुईया आणि दादर-माटुंगा चे दिवस आठवलेत… रामा नायक, goodluck कॅफे, mani’s लंच होम आणि किंग्स सर्कल चे रामा नायक ह्यांचेच ‘इडली हाऊस’, आणि इतर सगळी खाण्याची ठिकाणे… सध्या फोटोच बघून समाधान मानते… 😦
  🙂 🙂 🙂

  • किंग्ज सर्कल च्या इडली हाऊस पासूनच रामा नायक यांनी सुरुवात केली होती.ते तर पहिले हॉटेल होते त्यांचे. माटुंग्याला खाण्याची चंगळ अजुनही आहेच. स्पेशली, दाक्षिणात्य खादाडी साठी तर बेस्ट आहे हा भाग. मद्रास कॅफे मधली मिळगीपुडी उपमा तर सुपरक्लास.. हल्ली तिथे रागी दोसा मिळणे सुरु झाले आहे, पण चवीला काही फारसा आवडला नाही तो.

   • श्वेता says:

    oops.. खरच सर? इतकी वर्षं तिकडे खाल्ले तरी मला पहिले हॉटेल माहीत नव्हते… तुमचं हे पोस्ट वाचून मी कॉलेजची वर्षे मी ह्याच भागात काढली असल्याने मला ह्या सगळ्या हॉटेल’स ची खूपच आठवण आली..

 4. Aparna says:

  Thank God जेवणाचे फ़ोटो नाही टाकलेत काका :)पोस्ट
  चविष्ट

  • अपर्णा,
   या पोस्टचे श्रेय तुलाच जाते. तुझा मेल आला, आणि आठवलं की ब्लॉग वर बरेच दिवसात काही लिहिलेले नाही, म्हणून ही पोस्ट लिहायला घेतली. 🙂

 5. हे माझंही आवडतं हॉटेल आहे दादा. पुर्वी अंधेरीला नोकरीला होतो, तेव्हा आठवड्यातून एकदा हमखास भेट असायची इथे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या. धन्यवाद 🙂

  • विशाल,
   मला माहिती नव्हतं, मी नेहेमी मद्रास काफे मधे जायचो, किंवा मणीज मधे. पण हे मात्र अप्रतीम आहे अगदी.

 6. एकदम जबरी पोस्ट. तुमच्या लेखनातूनच तिथली चव समजते आहे.
  BTW, मुंबईतील खादडीवर बहुदा ही तुमची पहिलीच शुद्ध शाकाहारी पोस्ट असावी 😉

 7. suhas adhav says:

  kharach ekdam chavishtha aastat south indian dish …infakt aaplya bhartachya baryach rajat barach kahi chavishtha aahech……
  mala tumhi mention kelelya hotel badal mahiti navti..
  jaun pahil ekda 🙂

  • अरे एकदम फेमस आहे .कधी व्हेज साठी जावेसे वाटले तर नक्की जा. लिमिटेड थाळी पण पुरेशी असते. माटुंग्याला बरेच जॉइंट्स आहेत .

   • suhas adhav says:

    he tar agdi uttam … veg khatat fakta majhya ghari … mag ugach te nonveg separate thikani banavtat ka nahi aashe issues nahitach 🙂

 8. Milind says:

  काका,

  काय post टाकलीत हो? एकदम nostalgic झालो . माटुंग्या चा रामा नायक असो वा पुण्यातली ‘बादशाही’ . तेच feeling हो .

  अप्रतिम.… कोणत्याही pizza – burger joint ला ती मजाच नाही . अगदी लहानपणीच्या आणि मग पुढे college च्या काही छान आठवणी जाग्या केल्या बद्दल खूप आभार .

  कळावे ,

  आपला ,

  मिलिंद

  • मिलिंद
   आपण शेवटी काय , आठवणींवरच जगत असतो, आजचा दिवस म्हणजे उद्या साठी ची एक आठवण!

 9. Nitin Bhusari says:

  वाह !!!!!!!
  तोंडाला पाणी सुटलं हो…….

 10. Anushka says:

  Khrach apratim jevan milta tithe! Mala tithli(ch) tondlyachi bhaji avadte!
  Rasam tar ekdam sahi asta!
  🙂

  • अनुष्का,
   प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते, इथली पण स्वतःची एक वेगळी चव आहे.

 11. मस्त पोस्ट काका… आता लवकरच पुण्याच्या रानमळया ची पोस्ट येऊ द्या… लवकरच चिंचवडला जात आहे १ वर्षासाठी तरी.. विथ wife.. 😉 .. 🙂 ..

 12. Popat Chavan says:

  Mi hyderabad madhye rahato pan mala he south indian khane ajibat awadat nahi. Ya ch khanyamulech mi punyamadhye job shodhayala survat keli ahe.

  Mi majhya aaichya hatachi bhakari , chapati, puranpoli, ghevadyachi bhaji, vangyache bharit, gavarichi bhaji phar miss karato

  • पोपट,
   मी कुठल्याच प्रकारच्या जेवणाची तुलना केलेली नाही. एखादी गोष्ट रोज जेवायची म्हंटलं तर कंटाळा हा येणारच. पण कधी तरी एखाद्या वेळेस नक्की आवडतात असे वेगळे प्रकार.

 13. Mohana says:

  अमेरिकेतून पटकन जाऊन जेवून यावं असं वाटलं :-).

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s