मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?

1065007मुंबई डान्स बार बंद झालेत? छेः अजिबात नाही. आबा पाटलांनी जेंव्हा डान्स बार बंद करण्याचे जाहीर केले होते, तेंव्हा त्यांच्या क्षमते बद्दल, किंवा त्यांच्या मनातल्या चांगल्या विचारा बद्दल अजिबात संशय नव्हता, पण ब्युरोक्रसी, आणि इतर विभाग ज्यांना या मधून मलिदा मिळतो ते सगळे  हे  डान्स बार बंद करणे यशस्वी खरंच होऊ देतील का? ही संशयाची पाल मनात चुकचुकत   होती. या डान्स बार मधल्या एका नर्तिकेच्या करोडॊ रुपयांच्या संपत्ती बद्दल जेंव्हा पेपर मधे सारखे छापून येणे सुरु झाले,, तेंव्हा शरीर विक्रीला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त करून देण्याचा प्रसार माध्यमांचा प्रयत्न वाटत होता तो.

डान्स बार च्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरु होणे, म्हणजे या पूर्वी असे काही नव्हतेच असे नाही. फार फार पूर्वी पासून आपल्या मुंबई मधे ही परंपरा चालत आलेली आहे. गोलपीठा, किंवा पिला हाऊस भागात सुशिक्षित , संभ्रांत लोकांना जायची लाज वाटायची, म्हणून अशा जागांचा शोध सुरू झाला की जिथे या ’सो कॉल्ड उच्चभ्रू लोकांना”पण तोंड चुकवत जावे लागणार  नाही .  एखादा संभावित व्यवसाय शोधायचा ,की त्या व्यवसायाच्या आड हे सगळे धंदे बिनबोभाट चालवता येतील – आणि असा व्यवसाय म्हणजे…..

लोकांच्या या गरजेचा व्यावसायिक उपयोग करून घेतला गेला तो  मुंबई मधे.  ताडदेवच्या एसी मार्केट मधे जवळपास २५ च्या वर डान्स स्कूल सुरु झाले, आणि ह्या संभ्रमित बुरख्याआड वेश्याव्यवसाय पण सुरु झाला. बरेच दिवस हा प्रकार सुरू होता, पण लवकरच या प्रकारा बाबत शिवसेनेने आवाज उठवला, आणि ह्यावर पोलिसांना ऍक्शन घ्यायला भाग पाडले गेले. आणि हे सगळे डान्स स्कूल एका रात्री मधे बंद करण्यात आले.

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात – ही गोष्ट इथे पण अगदी १०० टक्के लागू होते इथे. डिस्को ने याच काळात  बॉलिवूड च्या माध्यमातून प्रवेश केला, आणि मुंबईला पहिला डिस्को सुरू झाला तो ” बुलक कार्ट ” या जे जे स्कुल ऑफ आर्ट्स समोर असलेल्या ठिकाणी.  या ठिकाणी दिवसा कॉलेजेस च्या तरुण तरूणीचा राबता असायचा, तर रात्री……! या डिस्कोची लोकप्रियता इतकी वाढली की दोन तीन महिन्यात सिझर पॅलेस, मयुर पॅलेस, वरळीला ’ हेल’ वगैरे अनेक डिस्को  सुरु झाले. मुंबई मधले टोळी युद्ध त्या काळी तसे आजच्या तुलनेत मधे बाल्यावस्थेत होते, पण त्यांनी पण या डिस्को वर ताबा मिळवणे सुरु केले, आणि या प्रकाराला वेगळेच वळण लागले. मिटींग प्लेस, किंवा पिक अप जॉईंट अशी संभावना या डिस्कोची होऊ लागली.या विरोधात पण शिवसेनेनेच पुन्हा एकदा आवाज उठवला होता, आणि या डिस्को मधे चालणाऱ्या गैर प्रकाराबद्दल पोलिसांना ऍक्शन घ्यावी लागली होती.

डान्स स्कूल झाले, डिस्को झाले,   आता नवीन काय ? तर लेडीज सर्विस बार सुरु झाले. इथे तुम्ही दारू प्यायला गेलात, की तुम्हाला मुली वेटर म्हणून काम करतांना दिसायचा. परदेशात जरी हे अगदी सर्वसामान्य असले, तरी पण भारतात मात्र  ह्या सर्व्हिस चा उपयोग बार च्या वेळे नंतर ’ इतर सर्व्हिस” साठी पण होऊ लागला.पण हा प्रकार काही आपली मूळ  घट़्ट रोवू शकला नाही. कारण गिऱ्हाइके बार बंद होई पर्यंत थांबायला तयार नसायचे, आणि मग त्या मुळे इथे काही हा धंदा जम बसवू शकला नाही.

यावर उपाय? राजरोस पणे करता येणारा धंदा म्हणजे आयुर्वेदिक मसाज पार्लर.  मुंबईला पण बॅंकॉक च्या धरती वर, आयुर्वेदिक मसाज च्या नावाखाली  मसाज पार्लर सुरु  करण्याचे पवच फुटले. पूर्वाश्रमीच्या सगळ्या वेश्या या मसाज पार्लर मधे ’मसाजर’ म्हणून काम करू लागल्या. मसाज म्हंटले की अंगावरचे कपडे उतरवणे आलेच, मग त्या मुळे  या ’ आयुर्वेदिक मसाजच्या धंद्याच्या आड शरीर विक्रयाचा धंदा अगदी बेमालूम पणे चालायचा.

चांगल्या वस्ती मधे असलेले हे मसाज पार्लर्स म्हणजे वेश्यांचे अड्डे झाले होते.दिवस भरात केंव्हाही लोकांना येता यायचे, आणि हवी ती सर्व्हिस घेऊन अर्ध्या पाऊण तासात मोकळे होऊन बाहेर पडता यायचे.  त्यातही फुल सर्व्हिस (?) मसाज पार्लर्स  थोडे जास्त पॉप्युलर  आहेत. सगळेच मसाज पार्लर्स असे जरी नसले, तरी पण बहुसंख्य (९९ टक्के तरी) याच प्रकारात मोडणारे होते. हे असे मसाज पार्लर्स आजही जागोजागी दिसतात, फक्त वर नावं वेगळी असतात. जी गोष्ट तुम्हा आम्हा सारख्या सामान्य लोकांना उघडपणे दिसते, ती पोलिस विभागा पासून कशी काय लपून राहू शकते? हा प्रश्न आहेच.

हेच ते पार्लर. या बद्दल मोठी बातमी आली होती एनडी टिव्ही वर . फोटो एन्डीटिव्ही च्या साईट वरून घेतलायकाही ठिकाणी काळ्या काचा असलेले युनीसेक्स सलून पण सुरु झालेली आहेत. तिथे काय चालत असेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. हा व्यवसाय आजही मुंबई मध्ये अगदी उघड पणे सुरु आहे. अशा बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी छापे पण घातले होते. नुकताच कुलाब्याच्या एका  ब्युटीपार्लर (?) वर पण छापा घातला होता.

भारता मधे किंवा जगात कुठेही वेश्या व्यवसाय हा  बेकायदेशीर नाही. आपल्या कडे असा एक समज आहे, की पिला हाऊस भागात, ” त्या ” घरांवर असलेले नंबर्स हे लायसन्स नंबर्स आहेत. पण तसे नाही. या व्यवसायासाठी लायसन्सची गरज नाही. अगदी कोणीही हा व्यवसाय करू शकतो. जर असे आहे, तर मग अशा मुलींना बरेचदा पोलिसांनी अटक केली म्हणून आपण जे वाचतो ते काय असतं? तिला वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपाखाली नाही तर “सप्रेशन ऑफ इमॉरल ट्राफिक ऍक्ट ” च्या कलमाखाली अटक केली जाते.

या ऍक्ट मधे काय आहे?भारता मधे अल्पवयीन मुलींना या व्यवसायात आणणे हे कायद्याविरुद्ध आहे. तसेच , अशा काही मुलींना एकत्र ठेऊन त्यांचा वापर “धंद्यां” साठी करून पैसे कमावणे , स्त्री ची दलाली करून तिच्याकडून पैसे घेणे, किंवा एखादी मुलगी शरीर सुखासाठी विकत घेणे  हा  पण कायद्याने गुन्हा आहे.  आपण जे काही बातम्यांमधे वाचतो ते सगळे या आयपीसी कोड खाली बुक झालेले गुन्हे असतात. वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपा खाली   नाही.

मध्यंतरीच्या काळात,कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून  ’कॉल गर्ल’ची संकल्पना सुरु झाली. परदेशात असणार ही सर्व्हिस भारतात का नसावी?गिऱ्हाइकाने वेश्यांकडे जाण्या ऐवजी, तिलाच आपल्याला हव्या त्या ठिकाणी बोलवायचे, अशी ही पद्धत! तुम्ही फोन करायचा, आणि मग ती मुलगी तुम्हाला हव्या त्या ठिकाणी येईल. असे असंख्य फोन नंबर्स शेअर केले जायचे – अगदी खास प्रायव्हेट नेटवर्क द्वारा.

पूर्वीच्या काळी लपून छपून चालणारा हा कॉल गर्ल्स चा धंदा हल्ली अगदी उघडपणे सुरु झालेला आहे. मुंबईला तर जागो जागी जाहिराती लावलेल्या दिसतात ” घरी मसाज साठी बोलवा… हा फोन नंबर…. ” किंवा पेपर मधे पण अगदी उघडपणे जाहिराती दिसून येतात. फ्रेंडशिप क्लब च्या नावाने वेश्या व्यवसायाचे लोण पण सुरु झालेले आहेच. पेपर मधे जाहिरात दिलेली असते, की अमुक अमुक फ्रेंड्स क्लब चे सभासद व्हा म्हणून. नंतर कुठल्यातरी बॅंकेचा अकाउंट नंबर दिला जातो, तिथे तुम्ही पैसे भरले की तुम्ही सभासद होता, आणि मग त्या सगळ्या वेश्यांचे नंबर्स वगैरे तुम्हाला दिले जातात.

हा लेख मी का लिहायला घेतला असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल. परवाच आमचे ’आय एस ओ ’चे रिव्हॅलिडेशन ऑडिट पार पडले. मग सगळं काही व्यवस्थित झालं, म्हणून आम्ही सगळे सिलेब्रेशन साठी म्हणून चेंबुर मधल्या एका बार मधे गेलो. तिथे गेल्याबरोबर, जे काही दिसले,  ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. डान्स बार आबा पाटलांनी बंद केला म्हणून ऐकले होते , पण इथे तर राजरोस पणे सगळे सुरु होते! असो. तिथला प्रकार बघून तिथून सरळ बाहेर पडलो आणि दादरच्या प्रितम मधे गेलो, आणि सिलेब्रेट केले.

नंतर  नेट वर शोध घेतल्यावर या डान्स बार बंदी नंतरही हे बार सुरु आहेतच याचे प्रुफ म्हणजे शेकडॊ व्हिडिओ अपलोड केलेले सापडले..

हे असे अनेक व्हिडीओ आहेत. हा नुकताच म्हणजे २०१२ चा व्हिडिओ!
शेवटी जाता जाता एक विचार मनात आला, की स्वतः आबा पाटलांनी लक्ष घालूनही हे डान्स बार बंद होत नाहीत, याचा अर्थ ब्युरोक्रसी नेत्यांपेक्षा  पण  जास्त ताकतवर झालेली आहे असा होत नाही का?असो. इती लेखन सीमा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

38 Responses to मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?

 1. भारत देश ज्या मार्गाने चालला आहे, ते पाहून खरोखरच काळजी वाटू लागली आहे. आणि आताशा भारत माझा देश आहे हे सांगायची देखील लाज वाटू लागली आहे.

  • प्रत्येक गोष्ट इतक्या सहजपणे उपलब्ध होत आहे, की खरंच पुढे अजून काय ? याची काळजी वाटते आहे.

 2. ruchira says:

  Sad but true… Garaj hi shodhachi janani.. Baar band kele ki dusar kahitari ugvel.

  • रुचिरा
   नक्कीच, दुसरी काहीतरी पळवाट निघेलच. अजूनही मसाज पार्लर्स सुरु आहेतच. तसेच अजून काही तरी सुरु होऊ शकेल.

 3. arunaerande says:

  If u see the episodes of ‘ yes Minister’ u will know how the bureaucracy never allows anything that is against their interests. here the interests mostly move around money!

  • ब्युरोक्रसी सक्स! अगदी खरं आहे. सगळी सिस्टीम ओव्हरहॉल व्हायला हवी, तरच काही तरी होणं शक्य आहे.

 4. खुपच खेदजनक……
  नागपुरातही आताशा हा प्रकार बरया पैकी फोफावतोय.

  • नागपूरला लाहोरी ला हा प्रकार पूर्वी व्हायचा, पण तो फक्त कॅब्रेट पुरता मर्यादित होता. सध्या बंद झालाय असे ऐकतो ::)

 5. ni3more says:

  agadi barobar sherya tu mhanat ahes bharat maja desh bolyala hi laaz waatu lagali aahe aata. hya servan war halli konachach vachak nahi ahe.

  • ह्या गोष्टींवर इतक्या सहजपणे उपलब्ध नसाव्या. चांगल्या वस्तीचा गोलपीठा होऊ नये एवढेच वाटते.

 6. आपण लेख चांगला लिहिलाय. पण आपला मूळ मुद्दा पूर्णपणे अमान्य! Consenting adults बंद दरवाज्याच्या मागे काय करू शकतात आणि काय नाही हे ठरवायचा अधिकार पोलिसांना आणि सरकारला कोणी दिला? जर पुरुष वेटर फ़ेटे आणि कोट घालून serve करू शकतात, तर बायका साड्या किंवा स्कर्ट घालून का serve करू शकत नाहीत?

  Rape हा गुन्हा आहे आणि असायलाच हवा. पण ती स्त्री बारबाला होती, की शालीन, सोज्वळ, पदरधारी आर्यमाता होती यावर गुन्ह्याची तीव्रता ठरू नये.

  आणि सरकारने शक्यतो शयनागारांच्या बाहेरच रहावे. आत काय करावे आणि काय नाही हे लोकांना चांगले कळते!

  – संजीव

  • संजीव,
   स्त्रियांनी बार मधे वेटरचे काम करण्यास आक्षेप नाही, फक्त त्या आड शरिर विक्रय करणे हा उद्देश नसावा.
   कुठल्याही स्त्री वर अत्याचार झाले तर ती कोण होती यावर त्याची तिव्रता मोजण्यात येऊ नये ह्या मताशी पण मी अगदी पूर्ण सहमत आहे.
   मी वर लिहिले आहेच, की वेश्याव्यवसाय हा गुन्हा नाही, फक्त सिटा खाली अटक होऊ शकते. जर एखाद्या स्त्री ला हा धंदा करायचा असेल तर तिला तो पूर्ण अधिकार आहेच. फक्त संघटीत पणे असे काम करणे हा गुन्हा आहे, आणि त्यालाच माझा आक्षेप आहे.

 7. मामा, मला नाही वाटत हे कधीही बंद होईल असं..न डान्सबार हा व्यवसाय…माझ्या मते याचे कारण वेगळं आहे..डान्स बार मधे कस्टमर म्हणून जाणारे लोक किंवा डान्स बार बंद होऊ नये या विचाराचे लोक हे समाजाच्या सगळ्याच पातळीमधले आहेत, त्याचप्रमाणे थोड्या फ़ार फ़रकाने डान्स बार नर्तकी सुद्धा समाजाच्या सगळ्याच पातळीमधल्या आहेत…आजकाल पैसा मिळवणं हे महत्वाचं आहे, साधन महत्वाचं नाही…आणि ड्रिंक्स डान्स हे एंजोयमेन्ट झालेलं आहे..मग ते लग्न कार्यासाठी असो, कुठल्या पार्टीसाठी, पब साठी अहो की बार साठी असो..त्यामुळे ही एंजोयमेंट किंवा रिलॅक्सेशन ची गरज असं आजकाल मानण्यात येतय… जिथे केवळ पैसाच नाही तर चैन आहे आणि त्यातून त्यांच्या मनाला (देहालाही) शांतता मिळतेय म्हंटल्यावर हा व्यवसाय ही मंडळी सहजपणे थांबू देतील का?

  बळजबरीने आणल्या गेली आणि बार डान्सर झाली अश्या मुली आहेत पण स्वखूशीने या व्यवसायात येणा-यांची संख्या वाढतेय..कारण गाण्याच्या तालावर तास न तास अंग झुलवत बसण्याला मेहनत किंवा बुद्धी लागत नाही…आजकाल तो सर्वात सोपा व्यवसाय झाला आहे…पैसाही मिळतो आणि एंजोयमेंटही…

  या व्यवसायात बळ्जबरीने ओढल्या गेलेल्यांना पुढे समाजात परतून आल्या तरी मान्यता मिळत नाही आणि मग त्यांनाअ पोटापाण्यासाठी पुन्हा ह्या धंद्यात जावच लागतं……कुणी कुठवर लढाई किंवा इब्रतीच्या डिंगा मारतील रे?..जगातली सगळ्यात मोठी लढाई म्हणजे रोटी कपडा और मकान ची….सो बळजबरीने असो किंवा स्वखुशीने, एकदा ह्या व्यवसायत पडलं की परतायचा मार्ग नाही…आणि ही भर वाढतच चालली आहे…काहीही करा…काहीच फ़रक पडत नाही…एक कुलूप घातलं तर शंभर चोर त्याच्या शंभर किल्ल्या बनवून घेतात..त्यातलाच हा भाग..

  आता ह्या व्यवसायात ज्यांची नावं उघडपणे घेता येत नाही अशीही बरीच मंडळी आहेत, आणि त्यांच्या छत्र छायेखाली सगळे व्यवसाय सुरक्षित सुरु आहेत..तेव्हा कुणाला थांबवायचं, डान्स बार बालिकांना, कस्टमरला, मालकाला की ज्यांच्या साठी आणि ज्यांच्या कृपेने हे सुरू आहे त्यांना?

  मला नाही वाटत…कधी थांबेल असं

  • अगदी बरोबर बोल्लात आपण.. मला मनापासून वाटता की बार बंद करणे हा उपाय नक्कीच नाही.

   • जेंव्हा कायदा केला गेला आहे, तेंव्हा पालन तर व्हायलाच हवे असे माझे मत आहे, नाही तर कायदा कॅन्सल करून टाकावा राज्य सरकारने.

  • सुरुची,
   पूर्वी पण जेंव्हा बार नव्हते तेंव्हा पण या स्त्रिया धंदा करायच्याच, त्या फक्त एका खास भागात. अगदी तुमच्या आमच्या घराशेजारी नाही.
   हे बंद होणे शक्य नाही असे नाही, फक्त त्या साठी फक्त ब्युरोक्रसी ने ठरवायला हवे की हे बंद करायचे आहे.. बस्स!
   डान्स बार पूवी पण आपण लावण्या वगैरे ऐकत होतोच. तमाशाला पण लपून छपून जायचे लोकं. कालांतराने ती एक फॅशन झाली, तसेच याचे पण झाले असते .

   • मामा, थोड्क्यात काय..कदाचित डान्स बार बंद होऊन अजून काहितरी उघडेल..फ़क्त स्वरूप बदलेल बाहेरचं…आताही तसच झालय नं. पूर्वी हे सुरु होतच अगदी राजे महाराज्याच्या काळापासून…आता त्याचा शेप बदलला आणि आवाका वाढला…पण यातली एकही गोष्ट बंद कधिच झालेली नाही…असो..बंद झाली तर त्याहून चांगलं काय असेल?..फ़क्त कठीण आहे हे नक्की…

  • थांबणं शक्य आहे, ब्युरोक्रसी च्या इच्छाशकतीची कमतरता आहे म्हणून सुरु आहे सगळं. पहिली दोन वर्ष पूर्ण बंद झालं होतं. आमच्या ऑफिस समोरचा तो तारा पंजाब रेस्टॉरंट तर फॅमिली रेस्टॉरंट मधे कन्व्हर्ट झालंय . 🙂
   हे योग्य की अयोग्य हा प्रश्न नाही, पण जेंव्हा शासन एखादा निर्णय घेऊन कायदा लागू करते, तेंव्हा तो पालन केला गेला पाहिजे हे पहाणे पण शासनाचेच काम आहे.

 8. Pingback: मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?- महेंद्र कुलकर्णींच्या (काय वाट्टेल ते) लेखावर माझे मत | मोकळ्

 9. नेहमीप्रमाणे यावेळिसुद्धा सुंदर विषय निवडला. अभिनंदन.
  लेख वाचल्यावर काही प्रश्न मनात आले
  तुम्हाला असा का वाटत की वेश्याव्यवसाय/डान्स बार बंद व्हावेत?
  फक्त वेश्याव्यवसाय असल्यानेच संस्कृतीचा र्हाडस होतो का?
  आपण (किंवा आर आर पाटील म्हणा) डान्स बार बंद होण्याआगोदर तिथल्या वेश्यांच्या पुनर्वसनाचा कितपत विचार करतो?
  मुळात मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राचा इतिहास बघितल्यावर कळ्ते की हा व्यवसाय काही नवीन नसून प्राचीन काळापासून प्रथा आहे. माणसाची शारीरिक भूक इतकी आहे की हा व्यवसाय बंद होणे अशक्य आहे. मी आणि माझा मित्र याच विषयावर research करण्यासाठी एकदा data collection ला गेलो होतो. काही वेश्यांशी बोललो; त्यांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला “दुसरा काम तो मिल जाएेगा सेठ, पर अब जो लत लगी है उसे कैसे पुरा करेंगे?” तुम्हीच वर म्हणल्याप्रमाणे गरज ही शोधाची जननी आहे, त्यांचा हा व्यवहार रोखला तर दुसरा काहीतरी सुरू होईल.. जे याहून भयंकर आणि अजागळ असेल.
  कुणाला पटणार नाही पण यावर तडकाफडकी ऑर्डर काढून बार बंद करण्याएेवजी या व्यवसायाला अधिकृत करायला काही हरकत नाही. पण भक्तिपन्थाकडे वळलेल्या लोकांच्या धाकामुळे कदाचित काही लोक चिकित्सकवृत्ती हरवून बसले आणि म्हणूनच असे विचार कुणाला सुचतच नाही.
  बर्या्च देशांमधे वेश्याव्यवसाय हा अधिकृत करण्यात आल्यामुळे crime rate पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. पण आपल्या देशात हे कधी होणार कोण जाणे. भारतात MONOGAMY प्रथेमुळे शारीरिक भुकेच शमन होण्याएवजी दमन होत आहे.. आता डॅन्स बार पण बंद झाले तर ही भूक, दिल्लीचे तरुण भागवतात तसे इतर राज्यात पण होईल.

  • वेश्या आहेतच, डान्स बार नाहीत म्हणून दिल्ली प्रमाणे लोकं करतील असे म्हणणे काही पटत नाही. शरीराची गरज भागवायची, तर लग्न संस्था अजूनही अस्तित्वात आहेच.
   मोनोगमी मुळे दमन कसे काय होते ? मला तरी तसे वाटत नाही . उलट मोनोगमी मुळे एड्स किंवा इतर रोग वगैरे होण्याचा धोका टळतो.
   आता या स्त्रियांचे पुनर्वसन कसे करायचे? तर मला वाटतं जर त्यांची इच्छा असेल तरच ते होऊ शकेल, नाही तर त्या हा धंदा कायदेशीर पणे सुरु ठेऊ शकतातच.
   माझ्या लेखाचा उद्देश केवळ कायद्याचे कसे उघड पणे उल्लघन होते ते होते.

  • इथे मी तुम्हाला सहमत नक्कीच नाही…एकपत्नी व्रताचे फ़ायदे हे वेगळे आहेत, आणि शारिरिक भूक भागवण्यासाठी दिल्लीतले कृत्य किंवा वेश्याव्यवसाय हा काही उपाय नाही…भक्तीपंथाकडे वळलेल्यांबद्दल बोलायचं झालं तर केवळ पाप पुण्याच्या भितीपोटी हे असं बोलतात असा समज चुकीचा आहे..त्यामागचे शास्त्रीय कारण वेगळे आहे…बाकी देशांमधे AIDS चे प्रमाण, life expectancy, कुटुंब व्यवस्थेच्या जवाबदा-या न उचलता येण्याची अक्षमता असे अनेक शारिरिक आणि मानसिक दुर्बलतेचे मुद्दे फ़ोफ़ावलेले दिसून येतील… शेवटी At what cost? हे सुद्धा महत्वाचं नाही का?.. हा व्यवसाय बंद व्हावा या विचारांना माझा दुजोरा आहेच, पण सद्य परिस्थित ते अशक्य आहे…आणि दिल्ली प्रकाराचा तर इथे संबध नाही…विकृती ती शेवटी विकृती

 10. suhas adhav says:

  western culture madhun je je kahi vaet gheta yeel te sagla aaplya deshat barober ghetla jatay samajatlya kahi lokan kadun… ani etkya mothya pramanavar chalu aahe ki …. jo sadha aahe tyala vatel me aaloy kuthe 😛
  he kahi samajachya eka bhaga purti maryadit nahi….western culture che effect aksharshaha sahletlya mulan pasun … te office madhye kam karnaryan pariyant distoy…..
  aashaveli ekach goshta vachau shakte … te mhanje gharche sanskar 🙂
  majhe baba police aahet… te jari paise ghet nasle … tari aasha dhandyana koni ekta virodh nahi karu shakat jar department madhye neet rahaycha aasel…. karan var pariyant sagla vata share hot aasto … kadhi kadhi kamavarchya gapa goshti aaiktana he yetach majhya kanavar… kharach mothya pramanat chalu aahe sagla

  • सुहास
   अगदी मान्य- ह्या मधे एका कोणा व्यक्तीच्या हातात काही नसतं, सगळे निर्णय वर असलेले ब्युरोक्रॅट्स घेतात, इतर लोकं केवळ त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम करतात.
   केवळ मोठ्या माणसांचे आशीर्वाद असले की मगच हे सगळे सुरु राहू शकते, अन्यथा नाही. आबा पाटलांनी डान्स बार बंदी आणल्यावर जवळपास दोन वर्ष तरी सगळं काही बंद होतं, पण आता मात्र सगळं पुन्हा व्यवस्थित सुरु झालेले आहे. कदाचित वरचा ब्युरोक्रॅट बदलला असेल .

   • suhas adhav says:

    dance bar badal mahit nahi bandi aalyapasun aaiknyat nahi majhya…. pan haldi spa and massage parlour….. ethe aasle prakar jasta hotat mage babanshi boltana kala…
    pan he sagla agdi aatokya baher aahe aasa kahi nahi
    varun jari pressure aasl tari pratekacha vaiyaktik prashna aahe ki tyt samil vhaycha ka nahi….
    mala tari aasa vata ki atleast swatachya area madhye tya vibhagacha senior PI he thambaushakto jar eecha aasel tar
    karan purna police station var command aaste tyachi swata sagla kahi regulate karu shaktat… i mean aaplya hatakhalchyana tari thambau shakta na… yogyati karvae hou
    shakte

    • आजच बातमी वाचली, पनवेलच्या बार बंद करण्या बद्दल ची. शेवटी काय , तर पि आय च्या लेव्हलच्या माणसाला बळीचा बकरा बनवलं गेल, खरे लोकं जे या बार ला अभय देणारे होते, ते सुटले.
     दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टाची आणि पोलिसस्टेशनची पायरी शहाण्याने चढू नये असे म्हणतात. 🙂

 11. Anushka says:

  खूपच चांगला लेख आहे काका. पण मला तरी नाही वाटत कि हा व्यवसाय पूर्णपणे बंद करता येईल. फ्रान्स मध्ये मला वाटतं १८ कि १९ व्या शतकात,या व्यवसायावर पूर्ण बंदी घातली. पण असं दिसलं कि हा व्यवसाय बेकायदेशीरपणे चालूच राहिला व त्यात वाढ सुद्धा झाली आणि वेश्यांच शोषण पण जास्त होऊ लागलं. हा व्यवसाय हजारो वर्षे वेगवेगळ्या रुपात आहेच. फक्त भारताच ‘थायलंड’ होणार नाही एवढी काळजी मात्र घ्यायला हवी.

  • अनुष्का,
   बंद झाला होता दोन तीन वर्ष.. पुन्हा सुरु झालाय सगळा प्रकार. 🙂
   असो.
   ” फक्त भारताच ‘थायलंड’ होणार नाही एवढी काळजी मात्र घ्यायला हवी.” हे च वाटत होतं म्हणून लेख लिहिला.

 12. स्नेहल says:

  फार काळजिची वाटते अजुन पुढे काय????

 13. स्नेहल says:

  फार काळजि वाटते अजुन पुढे काय????

  • स्नेहल,
   खरंच काही समजत नाही . एखादी गोष्ट जर अशी नाक्या नाक्यावर उपलब्ध व्हायला लागली, तर तरूण पिढीला अजून काही प्रलोभनांना सामोरा जावे लागेल. त्यातले स्वतःवर विश्वास असणारे टिकतील, इतर वहावत जातील.

 14. santosh says:

  काका नमस्कार
  हे कोणते डान्स बार घेऊन बसलात ..खरे डान्स बार तर ग्रामीण भागात आहेत नाव फक्त कलाकेंद्र,,,,,,,,,,नी …आयुषाचा तमाशा… तेही शासकीय परवानगी घेऊन

  • होय बऱ्याच बातम्या आल्या होत्या अशा. गेले चार पाच दिवस सारख्रे रेड करताहेत बार वर.

 15. Since my earlier comment was ill-organized it was not accepted by few, I reiterate my thoughts much clearer this time.

  काका तुम्ही बर्याच comments मधे ब्युरॉक्रसी चा उल्लेख केला आहे. तुमचा राग नक्की कोणावर आहे- ब्युरॉक्रसी की डान्स-बार? दोन्हीवर सुद्धा असु शकतो… असो.
  मला इतकच सांगायचा आहे की डान्स-बार/वेश्याव्यवसाय हे कुणासाठी असतात- common-man साठी. अस असताना फक्त ब्युरॉक्रसी ला दोष देणे बरोबर नाही वाटत. After all, “quantity of products/services supplied must equal the demand for it” आणि याच कारणामुळे, सामान्य माणसाच्या demand ला का दोष देऊ नये? नियम आहे म्हणून सरकारने या व्यवसायावर अखक्या देशात जरी बंदी आणली, तरी ज्या लोकांची या व्यवसायाला demand आहे ते सर्व साधू होतील का? हे कधीच शक्य नाही.. तुम्ही ब्युरॉक्रसीवर उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे पण या व्यवसायाच मुळ ब्युरॉक्रसी नाही.
  किती लोकांना कल्पना आहे माहीत नाही, पण आजकाल एक नवीनच संस्कृतीचा प्रसार होत आहे – FRIENDS WITH BENEFITS (यावर एक चित्रपट सुद्धा आला होता), माझा भाषेवर जास्त प्रभुत्व नाही, नाहीतर मीच FWB वर एक article लिहिला असता. प्रत्येक राज्यात 10 गृहमंत्री जरी असले तरी FWB वर नियंत्रण आणता येणार नाही.
  सांगायच तात्पर्य येव्ढच की कुठल्याही बंधनाला पळ्वाट ही नक्कीच असते, त्यासाठी ब्युरॉक्रसी ला दोष देण्यापेक्षा आपण लोकांच्या गरजांचा शोध घेण जरुरीच आहे.

  • माझा राग ब्युरोक्रसी वर जास्त आहे. वेश्या व्यवसायावर नाही. वेश्या व्यवसाया साठी वेगळे नियम आहेत, जागा आहेत, त्याचे पालन व्हायला हवे. होतं काय, की ह्या सगळ्या गोष्टींचा वापर हा पैसे कमावण्याकडे केला जातो. आता हा निव्वळ योगा योग असेल , पण हा लेख लिहिल्या पासून कमीत कमी ५ बार वर रेड पडल्यांच्या बातम्या वाचनात आल्या.
   मला हे ंम्हणायचं आहे, की कायदे केले जातात,.. असो, यावर एक लेख लिहितो वेगळा :)कारण बऱ्याच गोष्टी आहेत लिहायच्या.

 16. ravi says:

  bar banad zal payjat kadi jag yanar

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s