फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल

preambleहिंदू स्थानाची रचना , अठरा पगड जाती धर्म वगैरे पहाता, हिंदू स्थानावर वर माझे कितीही प्रेम असले तरीही मी हिंदू स्थानाला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात आहे,  कारण हिंदू स्थानी राज्य कर्ते हे  स्वातंत्र्य दिल्यावर पन्नास वर्ष पण देशाचा  सांभाळ करू  शकणार नाहीत.  हे वाक्य माझे नाही, तर   चर्चिलने स्वातंत्र्य पूर्व काळात म्हटलेले आहे.

इमर्जन्सी साठी जेंव्हा  केंद्र सरकार जेंव्हा  १०० रुपयांची मदत कुठल्याही राज्याला पाठवते , तेंव्हा फक्त त्यातले केवळ १४ रुपयेच गरजवंता पर्यंत पोहोचतात, आणि ८६ रुपये मधल्या मधे गायब होतात. हे पण वाक्य  माझे नाही, तर पूर्व पंतप्रधान राजीव गांधी याचे वाक्य आहे.राजीव गांधी यांनी ब्युरोक्रसीच्या कार्यप्रणालीवर हा  प्रकाश टाकला आहे तो अगदी खरा आहे.

ह्या अशा परिस्थितीत जेंव्हा चिखलीकर या  एक्झिक्युटीव्ह इंजिनीअरला अटक होते, आणि त्याच्याकडे २० कोटी  रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडते , तेंव्हा मात्र मनात विचार आल्याशिवाय रहात नाही, की ह्या माणसावर काय कारवाई केली जाईल?  उतर अगदी सोपं आहे काहीही नाही….कारण लवकरच तो  काही लाख रुपयांच्या जामीनावर बाहेर निघेल,मग कोर्टात केस सुरु होईल, जी कमीत कमी १० एक वर्ष तरी चालेलच.  आणि मग समजा,  सेशन कोर्टात जरी शिक्षा झाली, तरीही तो हाय कोर्टात अपील करून पुन्हा जेलच्या बाहेरच राहील. असे होता होता , आधी हायकोर्ट , मग सुप्रीम कोर्ट असे करता करता पन्नास एक वर्ष जातील.नंतर कदाचित  या पेक्षा एखादा मोठा घोटाळा पकडला जाईल, आणि लोकं विसरतील या माणसाला, आणि हा सुखाने कुठे तरी आयुष्य जगेल.

आपल्या देशामधे देशद्रोहाचे आरोप असलेले संजय दत्त, मेमन सारखे लोकं जेंव्हा जामिनावर उजळमाथ्याने बाहेर फिरत असतात,  आणि जनता त्यांना आपल्यात सामावून घेते, तेंव्हा पण “खरंच देश मोठा की व्यक्ती ?”  या मधे देश मागे टाकून व्यक्तीला मोठेपणा देण्याची मनोवृत्ती दिसुन येते.

पिडब्लुडी, इरीगेशन, रेव्हेन्यू , कलेक्टरेट,आर टी ओ  वगैरे असे अनेक विभाग( कुठलाही सरकारी विभाग) आहेत  की , ” त्या विभागातल्या   १०० टक्के लोकांवर छापे घातले आणि संपत्तीची चौकशी केली तर त्या पैकी कमीत कमी ९० टक्के लोकांच्या कडे तरी अशीच बेहिशोबी मालमत्ता सापडेल , आणि ती पण इतकी जास्त असेल की कदाचित भारत देशा वरचे सगळे परकीय कर्ज फेडले जाऊ शकेल.ही अतिशयोक्ती नाही .

या सगळ्या विभागात किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयात  जर काम करून घ्यायचे असेल तर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, याचा अनुभव आपण सगळ्यांनीच आयुष्यात कधी ना कधी तरी  घेतलेला असतो. त्या विभागात गेल्यावर आपण आधी तिथला दलाल कोण आहे हे शोधतो, आणि मग सगळी कामं कशी अगदी बिनबोभाट पार पडतात- फक्त काही पैसे खर्च करावे लागतात. रजिस्ट्रार ऑफिस मधे पण घराची रजिस्ट्री करायला गेलो ह्तो, आणि तिथे पण पैसे खर्च केल्याशिवाय काम होत नाही, हे जेंव्हा लक्षात आले, तेंव्हा मात्र ज्युडिशिअरीला पण या दलालांच्या  कॅन्सरने  वेठीस धरलेले आहे हे लक्षात आले.

भ्रष्टाचारावर  न लिहिलेलेच बरे. कारण भ्रष्टाचार  न करणारा माणूस आज भारतामधे केवळ तोच उरला आहे, की ज्याला पैसे खाण्याचा चान्स नाही. सगळेच जण पैसे खातात, म्हणजे ” हमाम मे सब नंगे” अशी परिस्थिती असल्याने ह्या गोष्टीला पण एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. क्लास ४ कर्मचाऱ्या पासून ते अगदी अत्युच्च दर्जाच्या ब्युरोक्रॅट किंवा नेत्या पर्यंत सगळेच जण पैसे खातात हे उघड सत्य आज कोणीही मान्य करे. कुठलीही गोष्ट जरी हरवली तरी पुन्हा सापडू शकते, पण जर समजा एखाद्याचं चारित्र्य हरवलं तर ते पुन्हा सापडण्याचे चान्सेस अजिबात नाहीत. पण दुर्दैवाने चारित्र्याला विचारतो कोण??

मध्यंतरी येडूरप्पा , गडकरी वगैरेंच्या पैसे खाण्याबद्दल बरंच काही छापुन येत होतं, तेंव्हा एक भाजपाचा खास खंदा पुरस्कर्ता मित्र भेटला. मी जेंव्हा या मनोवृत्तीवर चिंता व्यक्त केली, तेंव्हा तो म्हणाला, “आज पर्यंत कॉंग्रेस ने खाल्ले आहे, तेंव्हा आता यांनी पण थोडे खाल्ले तर काय बिघडले?” . एक उच्च शिक्षित माणूस जेंव्हा अशा प्रकारची बेजबाबदार कॉमेंट करतो तेंव्हा, चर्चिलचे म्हणणे अगदी  बरोबर होते का? हा विचार पण मनात आल्याशिवाय रहात नाही.

काही वर्षापूर्वी ” फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल” ही लोकशाही ची व्याख्या खूप पॉप्युलर झाली होती. अगदी नेहरू,इंदिरा गांधी ते राजीव गांधी या सगळ्यांनी या घोषणेचा वापर केला होता. मला एक प्रश्न पडतो तो म्हणजे या घटने मधले ते ’ पिपल’  आहेत ते कुठले ” पिपल’ अभिप्रेत आहेत? कारण हल्ली तर हीच घोषणा, ” फॉर द पोलिटेशिअन्स , ऑफ द पॉलिटीशिअन, बाय द पॉलिटिशिअन”  किंवा  ” फॉर द ब्युरोक्रॅट्स  , ऑफ द ब्युरोक्रॅट्स, बाय द ब्युरोक्रॅट्स” अशी झालेली आहे. हे सगळे ब्युरोक्रॅट्स एकमेकांची पाठ खाजवण्यात दंग झालेले असतात. तेरी भी चूप, मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे सगळीकडे.

नियम किंवा कायदे हे बनवले जातात, ते केवळ पैसे खाण्याच्या नवीन जागा निर्माण करण्यासाठी. डान्स बार बंद करण्याचा तमाशा पण याच कारणासाठी होता . जितके कडक कायदे, तितका जास्त हप्ता – हा अलिखीत नियम आहे.

ज्या देशात आज जे काही होतंय त्या मधे सामान्य ” पिपल” ला कोणीच विचारात घेत नाही. राजकीय नेते हे ब्युरोक्रॅट्स च्या लॉबी च्या दबावात येऊन बरेच निर्णय घेतात,  त्या निर्णयांचा सामान्य माणसाला  म्हणजेच  त्या ” पिपल” वर काहीच फायदा होत नाही. लोकशाही खरंच क्षीण झाली आहे का गेल्या काही वर्षात?  आज जेंव्हा ब्युरोक्रसी ही ३३ रुपयात एखादा माणूस आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतो असे बेजबाबदार विधान निर्लज्ज पणे करतो , आणि मंत्री पण त्याचीच री ओढतो .

सध्याची पिढी ही कॉंग्रेस भाजपा, रिपब्लिकन पार्टी , आणि लोकल पार्टी जसे शिवसेना, मनसे , राष्ट्रवादी आणि या सारख्यांया असंख्य पक्षांकडे / नेत्यांकडे आशेन पहात असते,आपल्या आवडीचा पक्ष , किंबहूना ज्याला आपण मत दिले आहे तो पक्ष काहीतरी करेल अशी आम जनतेची आशा असते, पण प्रत्येकच वेळेस निराशा होते हे पण शाश्वत सत्य आहे.

’”पिपल” ने   कर्नाटकात भाजपाला उखडून तिथे कोँग्रेस चे रोपटे रोवले, त्यानेही काही फरक पडेल असे नाही. पण जर अशीच परिस्थिती राहिली, तर लवकरच लोकं नक्षलवादा कडे ओढले जाणार  नाहीत हे कशावरून? हा प्रश्न मात्र मनाला खूप अस्वस्थ करतो  .

इती लेखन सीमा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

30 Responses to फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल

 1. Atul Ranade says:

  Most of the Indian’s feelings.

 2. Amit Mohod says:

  Ashyaa Paristhitit Arvind Kejriwaal sarkhi maanasa aani tyanchi “Aam Aadmi Party” hyanchyaa var vishvass thevaylaa harkat nahi asa vatat.

 3. mandar17390 says:

  एकदम खरंय, सगळ्या सरकारी सिस्टीम गंडक्या आहेत.
  मागच्या वर्षी एकदम उड्या मारत सरकारी संशोधन केंद्रात काही काळासाठी साठी जॉईन झालेलो.
  रिसर्चच्या नावाखाली जे चालतं ते बघून डोकं हलले.
  एकच किस्सा इथे सांगतो. बाकीच राहुदेत. तुम्ही मेकेनिकल इंजिनीअर असल्याने तुम्हाला नक्की समजेल हे,मल्टी बॉडी डायनामिक्स साठी MSC चे ADAMS CAR, ADAMS AIRCRAFT, ADAMS VIEW असे modules आहेत. प्रोसेसर सेम आहेत पण प्री प्रोसेसिंग अप्लिकेशन स्पेसिफिक असतंय. पाहिलं कारसाठी, दुसरं विमान आणि तीसरं मोड्युल जनरल आहे, या नमुन्यानी ADAMS CAR आणि ADAMS VIEW चे लायसन्स घेतलेले. इथे कार वर कोणीही काम करणार नसतांना ते लायसन्स घेतलं आणि लायसन्स ऐकीव माहिती प्रमाणे दीड कोटीच होतं. त्यानंतरचा भाग, तुम्ही जेव्हा कोणतेही असे सोफ्टवेअर विकत घेता तेव्हा ट्रेनिंग असतं आणि एक वर्ष फ्री सपोर्ट असतो. तर ते ट्रेनिंग कोणीही घेतलेलं नव्हतं.त्यामुळे लायसन्स असलं तरी वापरता लिट्रली एकाला पण येत नव्हतं. आम्हाला नवीन पोरांना नेटवर बस ते शोध आणि मला हे करून दाखव असले सल्ले.
  सपोर्ट फ्री असला तरी आम्ही डायरेक्ट बोलायचं नाही… नंतर त्या सपोर्ट देणाऱ्या माणसालाच मित्र करून घेतला. लै मदत केली त्याने.

  • मंदार
   खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. इतके पैसे खर्च करून पण जर काही फायदा करून घेत नसतील तर हा पैसा व्यर्थ खर्च आहे असे म्हणावे लागेल.
   हल्ली तर हार्ड वेअर आणि सॉफ्ट वेअर मधे इतक्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, की आजचे स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी वाले गॅजेटस उद्या स्क्रॅप मधे दिसतील, अशी वेळ आलेली आहे.

 4. नक्षलवाद च यावर उपाय आहे असं आजकाल वाटू लगलंय, गेला आठवडाभर LBT च्या नावाखाली सामान्य जनतेचे हाल होत असताना, एकही राजकीय पक्ष….. LBT च्या अखत्यारीत न येणा-या ज्या दुकानरांना दुकाने उघडी ठेऊन व्यवसाय करायचा आहे त्यांना अभय द्यायला तयार नव्हते. आज सकाळी रिटेल दुकानदारांनी संप मागे घेतल्याची बातमी कळल्यावर ’राज ठाकरे’ यांनीही दुकानदारांना अभय द्यायला तयार असल्याचे जाहीर केले. पण मुळात बंद करूच नका, आंही बघतो कोण तुम्हाला बंद कारायला भाग पाडतो ते, अशी भूमिका का नाही घेता आली.?

  जनतेचा कळवळा वगैरे सगळे झूट ! आघाडी सरकारने हे LBT सुरू केले, मग त्यांच्याच पक्षाच्या एका मंत्र्याचा मुलगा स्वाभिमान संघटना चालवतो. ठाण्यात पाणी गेलं की आंदोलन वगैरे करतो, बेळगाव प्रश्नावर ’झालंच पाहिजे’ नाटकाच्या बंदीवर भरभरून धमक्या देत असतो. पण प्रत्यक्ष जेव्हा जनता हालात होती, तेव्हा कुठे मूग गिळून बसले होते? की परदेशात वा-या करत होते?

  • श्रेया,
   मला हेच म्हणायचं होतं. स्वतःचा सिस्टीम मधला विश्वास उडणे, परवाचीच सुप्रिम कोर्टाने सिबीआय हा पिंजऱ्यातला पोपट आहे म्हणणे, अशा घटना पाहिल्या की अजूनच मग विषण्ण होतं.

 5. Vinayak Belapure says:

  महेंद्र जी
  तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच स्वतंत्र भारताचे चित्र विदारक आहे. लाज लज्जा अब्रू शरम नावाची गोष्ट खरच आस्तित्वात आहे की नाही असे वाटायला लागते. परंतु चर्चिलने जे वाक्य म्हणाले ते दुसर्या महायुद्धाच्या आसपास सत्ते साठी आसुसलेल्या, वाटेल त्या तडजोडी साठी तयार असलेल्या आणि सगळी लाज सोडून दिलेल्या काँग्रेसी लोकाना पाहून यात आज शंका वाटत नाही. अर्थात चर्चिल दोन गोष्टी सोयीस्कर विसरला ते म्हणजे खुद्द जे इंग्लंड मोठे झाले ते पहिल्या एलिझाबेथने चाचेगिरी स्टेट स्पोंसर्द केली त्यामुळे आणि दुसरे म्हणजे सगळा भारत कोन्ग्रेसी गांडूळाचा नाहि. या देशातील पूर्वापार राजवटीनी सुसंस्कारी राजवटी राबवलेल्या आहेत. ज्ञान नृत्य संगीत शिल्पकला इ इ इ कला फिलोसोफी ना प्रोत्साहन दिले आहे. कल्याणकारी राज्यांची अगणित उदाहरणे आहेत. हा देश विद्वानांचा आहे १५०० पूर्वीचा इंग्लंड म्हणजे नुसत्या रोमन छायेतील रानटी वसाहती. हजारो ढवळ्या शेजारी बांधलेल्या काही पवळ्याना गुण न लागता वाण लागला हे खरे आहे पण सगळेच तसे नाहित.

  • aruna says:

   विनायक,
   या देशात काही चांगले लोक शिल्लक आहेत, पण त्यांची काय अवस्था आहे? सरकारी नोकर असतील तर २० वर्षात २७ बदल्या, आणि त्याही कठीण ठिकाणी ! नाहीतर मुस्कट्दाबी, किंवा सरळ धमक्या आणि खून! पिंपरीच्या शेट्टींचे काय झाले?
   सगळेच चित्र निराशाजनक आहे.

   • Vinayak Belapure says:

    नेतृत्वकळप राष्ट्राची त्यात्या काळातील प्रतिमा बनवण्यास कारण ठरतो. फ्रान्स नेपोलियनपूर्वी (आणि नेपोलियननंतर) शौर्य विसरलेला नव्हता. देशाची मानसिकता घडवण्यात नेतृत्व मोठी भूमिका बजावते. गलितगात्र नेतृत्व देशाला गलितगात्र बनविते, भ्रष्ट नेतृत्व भ्रष्ट !!
    पिपल गेट द गवर्नमेंट दे डिझर्व आणि यथा राजा तथा प्रजा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

    आशावादी राहायला हवे.

   • अरुणा,
    चांगल्या लोकांचे काहीच भले होऊ शकत नाही हे वेळॊवेळी सिद्ध झालेले आहे. याचे कारण आपले कायदे. पण असो, त्यावर एक वेगळा लेख होऊ शकतो.
    किरण बेदी सारख्या ऑफिसरला पण पुर्वांचलात बदलीची शिक्षा झाली होतीच.

  • विनायकजी,
   अहो हल्ली सरकार काम करण्यापेक्षा तडजोडी करून स्वतःला वाचवण्यातच व्यस्त असते. म्हणून तर तृणमुल सारखा लहानसा पक्ष , किंवा रामदास आठवले सारखे दोन एमएलए असलेले नेते पण सत्तारुढ पक्षाला हवे तसे वाकवू शकले. ( रामदास आठवले, हे मागच्या सरकारच्या संदर्भात बोलतोय मी).
   युरोप चा इतिहास हा रक्तरंजीत आहेच. फ्रेंच राज्यक्रांती होण्यापूर्वी जशी परिस्थिती होती , साधारण तशीच आपल्याकडे आहे का सध्या?

 6. Democracy in India is ‘Far the People, Off the People and Bye the People’.

 7. Manish says:

  Naksalwadapeksha China or Pakistanchya under partantrat jaael ase watat nahi ka konalach. China kay karto aahe, Pakistanche Upadwyap suruch astat. aani aaple xxxx rajykarte paisa parshwabhagat ghalnyat goog astat.
  manish

  • मनिष,
   एकदा सिस्टीम वरचा विश्वास उडाला , की लोकं कुठल्याही दिशेने वळू शकतात.सिस्टीम , ज्युडीशिअरी चा वचक जो पर्यंत आहे, तो पर्यंत सगळं ठिक सुरु आहे. सध्या हा फक्त सामान्य लोकांवरच वचक आहे, नेते, राजकारणी, ब्युरोक्रॅट्स , ह्या सगळ्यांसमोर सिस्टीम गुडघे टेकुन उभी असते.

 8. suhas adhav says:

  masta vishay ani lekh…. kharatar aapli ji preamble aahe na ti far chan aahe ….
  pan aaplya deshacha durday va ki hyat la ekhi mudda neet implement kela jat nahi…
  aagdi opposite aahe jasaki injustice for common people….inequality in eduaction,jobs
  sagla agdi virdhach
  hyavar upay tari kay ? ek mansane badlun honar nahi… ani ha badal aachanak sudha honar nahi… aaj charcha karu ani udya gappa…
  majha manat aasa nehmi “aacharya channakyana” kade baghun vata ki ekhada rashtra ani jar ek saksham aashi pidhi ghadvaychi aasel tar ek uttam teacher pratekala jyala rashtra heet ani moral values hyavncha abhi man ani jan aahe aasa shikshak pratek vidyartyala labhava
  tevha aapan aasha badalachi aapeksha karu shakto… i know me je bolo te shakya nahi ye 😛

  • सुहास
   बदलाची सुरुवात कुठून तरी तर व्हायलाच हवी . शिक्षण पहिली पायरी. त्या साठी चांगले शिक्षक तयार व्हायला हवेत. प्रायव्हेट क्लासेस जास्त शिकवतात, आणि शाळे मधे कमी हे चित्र तर बदलले गेलेच पाहिजे. एक व्यक्ती बदलली, तर युग बदलायची सुरुवात होईल. अ लॉंग जर्नी स्टार्ट्स विथ वन सिंगल स्टेप” हे वाक्य आठवलं

 9. tivtiv says:

  या संदर्भात एक कविता आठवली. त्याची लिंक आहे- ‘http://tanmaykanitkar.blogspot.in/2013/02/blog-post_9472.html’
  & ब्लॉग पण चांगला आहे ‘http://tanmaykanitkar.blogspot.in/’
  Tanmay ‘Parivartan Pune’ साठी काम करतो.
  http://parivartan-pune.blogspot.com/

 10. मामा,
  “पीपल” हरवला आहे हे म्हणणे अगदीच बरोबर आहे. पण याला काही प्रमाणात पीपल सुद्धा कारणीभूत आहेच. भिती आणि भ्रष्ट वागणूक ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेतच.. ३०० वर्ष राज्य केलेल्या परकीयांना हाकलवून लावणे शक्य झालेल्या आपल्या देशातील पीपल ला आपल्याच देशातल्या भ्रष्टांना ताब्यात घेता येत नाहीये कारण ही “फ़ॉर द पीपल” ची (स्वतंत्रा पूर्व) बंडखोरी “रोटी कपडा और मकान” शोधण्यात संपून जातेय.

  सर सलामत तो पगडी पचास पेक्षा..सर तो सलामत! बस काफ़ी है, इथवर येऊन ठेपलेलं आहे.. ती बंडखोरी परत आली तर काही शक्य आहे..आत हेच बघ नं ईतक्या रेप केसेस होतात, पण त्यांचे निकाल लागण्या आधी अशा अजून १०० एक तरी रोज नव्याने होत असतील…ह्या ऐवजी या पीपल नेच जर कडक शीक्षा एकत्रीत येऊन दिली तर?

  दुस-या वर्गात शिकलेले एकीचे बळ आपण विसरतो आणि आपापल्या पुरते जगतो..मग ह्या भ्रष्टांना काय कमी आहे?

  “बाय द पीपल” हा भाग जरा लक्षात घेतला तर बाकी सगळं हळू हळू ठिक होईल अशी आशा करू शकतो

  • सुरुची
   नक्षलवादी विचार ! 🙂 मी अगदी हेच म्हणत होतो, लोकांचे विचार नक्षलवादी होतील .

   • नक्षल वाद वेगळा मामा, हा केवळ एकजुटीचा भाग….कोणते कार्य कोणत्या पद्धतीने करणे हे नंतर…निदान ही एकजूट तर हवीच नं…माझ्या बंडखोरी या शब्दाला, वागण्याची नाही, तर हिम्मतीची बंडखोरी या अर्थी वाचलं तर मला नेमकं काय म्हणायचय हे लक्षात येईल.
    शेजा-याला त्रास होतोय न, मला काय? हा विचार करणा-यांनी , उद्या मलाही हा त्रास होऊ शकतो असा विचार करून त्या शेजा-याच्या सोबत राहावं ही मनाच्या कमकुवत आणि स्वार्थीपणाशी केलेली बंडखोरी असं मला म्हणायचं आहे.. अर्थात बोलणं सोपं आहे….जे होत्य त्याची कारण अभेद्य वर्तुळासारखी आहेत….

    दोनच उपाय..जे सुरु आहे ते सुरु राहुद्या, किंवा बदल घडवा…आपण पहिल्या वृत्तीचे…नाईलाज

 11. आपण जेंव्हा एखाद्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप करतो तेंव्हां तीन बोटे आपल्या कडे असतात . हेच आपण विसरतो. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणी प्रमाणे जनतेच्या लहान लहान भ्रष्ट्राचारा मुळेच भ्रष्ट्राचाराचा महासागर निर्माण होतो हे आपण विसरतो . लहान बाळाच्या नर्सरी च्या प्रवेशा पासूनच आपण डोनेशन देवून आपल्या मुलाला भ्रष्ट्राचाराचे बाळकडू पाजवत असतो . प्रवासात TT ला बर्थ साठी सहज शंभर दोनशे रुपये रेल्वेत जागा मिळण्यासाठी देतोच ना आपण . कोणत्या ही सरकारी कार्यालयात, दवाखान्यात काम लवकर होण्यासाठी लहानमोठी रक्कम आपण लाच म्हणून देतच असतो. आजकाल मतदान तर लाच घेतल्या शिवाय होतच नाही . मग ती लाच दारू, पैसा, जाती धर्माच्या नावाने होणारे मतदान असो हा सर्व भ्रष्ट्राचाराचाच प्रकार म्हणावा लागेल . असा भ्रष्ट्राचार करून निवडून येणारया नेत्या कडून आपण ईमानदारीची , स्वच्छ कारभाराची अपेक्षाच करणे चूक आहे . कारण पुढच्या निवडणुकीत निवडून येण्या साठी मत खरेदी करण्यास त्याला परत करोडो रुपये दोन नंबर मध्ये काळ्या पैश्याच्या रूपाने लागणारच असतात मग तो काळे धंदे करणारच .
  यार हमारी बात सुनो ऐसा इक इन्सान चुनो जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो . ………… लेकिन जो पापी न हो वो पहला पत्थर मारे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s