नॅशनल शेम!

flagइथे एक झेंडा लावलेला आहे या पोस्ट शेजारी . तुम्हाला माहिती आहे का तो झेंडा कुणाचा आहे ते?  तुम्हाला माहिती असायलाच हवा, जर तुम्ही भारतीय असाल तर. अहो आपण सगळे जण हा धर्म पाळतो. आपल्या धर्माच्या सर्वोच्च पीठाचा झेंडा  आहे  हा.    ह्या झेंड्याचं महत्त्व जर तुम्ही भारतीय असून जाणत नसाल, तर तुमचे भारतीय होणे वाया गेले असे म्हणावे लागेल.  🙂  ( हलके घेणे) असो तर हा झेंडा आहे -बीसीसीआय चा.

मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग हे काही नवीन नाही. वर्षानुवर्ष हे घडतंय. पूर्वी पण घडलंय, आजही घडतंय. त्यात नवीन काय? पण आज जेंव्हा ही बातमी वाचली, आणि बिसीसी आयच्या अधिकाऱ्यांचे टिव्हीवरचे इंटरव्ह्यू पाहिले, तेंव्हा मात्र “माझी सटकली” आणि म्हणून हा लेख. मी पण तुमच्यासारखाच एक काळी  क्रिकेट वर प्रेम करणारा, मॅचेस फॉलो करणारा एक क्रिकेटवेडा, पण हल्ली मात्र अजिबात मॅच फॉलो करत नाही. जेंव्हा अझरुद्दीन ( माझा फेवरेट प्लेअर होता तो ) फिक्सिंग मधे पकडला गेला तेंव्हापासून माझा इंटरेस्ट कमी झाला. तसा सचिन आणि राहूल हे दोघं आहेत आवडीच्या प्लेअर्स पैकी, तरी पण…..

भारताच्या क्रिकेट विश्वात बिसीसीआय चे स्थान मोठे आहे. ही संस्था स्वतःला स्वायत्त संस्था म्हणवते . बिसीसीआय चे क्रिकेट च्या खेळा मधून , जाहिराती मधून  करोडो रुपयांचे उत्पन्न आहे , आणि म्हणूनच असेल की ,  बरेच राजकीय नेते पण या संस्थेकडे स्वतःला क्रिकेटचा “क्री” पण येत नसतांना आकर्षित झाले आहेत/होत असतात. शरद पवारांना पण या मधे इंटरेस्ट होताच 🙂  बिसीसीआय चा   स्वतःचा ध्वज. लोगो – आहे , जो क्रिकेट पटू ड्रेस वर मिरवतांना

हा लोगो पण ब्रिटीश काळी दिल्या जाणाऱ्या ” ऑर्डर ऑफ द स्टार” या सर्वोच्च बहूमानाची कॉपी आहे. तो ओरिजिनल लोगो पण खाली देतोय. अरे कमीत कमी स्वतःचा लोगो तर स्वतः बनवा.. तिथे पण ब्रिटीशांची चाटू गिरी??

दिसतात. भारतीय टीम चा ड्रेस पण निळा आहे, कारण तो पण बीसीसीआय च्या झेंड्याचा रंग आहे म्हणून!

फार पूर्वी एकदा एका बिसीसीआय च्या  अधिकाऱ्याने तोडलेले तारे  वाचले होते, म्हणत होता, की क्रिकेट खेळाडू जेंव्हा  बाहेर खेळायला बीसीसीआय तर्फे पाठवले  जातात, तेंव्हा ते भारताचे प्रतिनिधित्व करत नसतात, तर “बीसीसीआय” चे करीत असतात.अशी  निर्लज्जा सारखी  कॉमेंट वाचली आणि तेंव्हा तर जाम चीड आली होती.  मला  आणि इतरही  भारतियांना   (जरी माहिती असलं की बीसीसीआय चा संघ आहे ) तरी मनातून वाटत असतं  की जो संघ खेळायला जातो तो भारताचाच असतो आणि, म्हणूनच भारतीय लोकं त्यांच्यावर प्रेम करतात .काही खेळाडूंना देवाप्रमाणे पूजा करतात.

जी मॅच होते, ती भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी असते. बिसीसीआय विरुद्ध पाकिस्तान नसते. बीसीसीआय ला महत्व आहे ते केवळ भारतीय ऑफीशिअल संघ म्हणून समजल्या जाणाऱ्या संघा मुळे . मॅच सुरु असतांना मैदानावर सचिनने सिक्स मारली, हरभजनने विकेट काढली, द्रविड ने सेंच्युरी मारली  की भारताचा तिरंगा झेंडा फडकवला जातो, तुमचा बीसीसीआय चा झेंडा नाही.  मॅच पहायला जाणारे लोकं आपल्या चेहेऱ्यावर भारताचा झेंडा रंगवतात, बीसीसीआय चा नाही. टींमचा विजय हा भारताचा विजय असतो बीसीसीआय चा नाही . भारत पाकिस्तान मॅच जिंकली की भारताचा विजय झाल्याचा आनंद फटाके उडवून साजरा करतात- बीसीसीआय चा नाही! वर्ल्ड कप हा भारत जिंकतो, सगळी कडे म्हणजे पेपर, टीव्ही वर भारताने वर्ल्ड कप जिंकला ही बातमी असते, बीसीसीआय ने नाही! ही गोष्ट त्यांनाही माहिती आहेच, पण “येडा बनके पेडा खानेका काम” बरोबर करते बीसीसीआय.

आणि अशीही पुस्ती जोडली जाते की बीसीसीआय या संस्थेला ती सरकारी अखत्यारीत येत नसल्याने  जे काही करायचं असेल ते ही संस्था करू शकते, आणि त्यांनी तसे का केले  याचे उत्तर जनतेला किंवा सरकारला देण्यासाठी ते बांधील नाहीत. तुम्ही यांना ’माहितीच्या अधिकारा ’खाली पण एकही प्रश्न विचारू शकत नाही. क्रिकेटच्या चार तासाच्या आयपीएल च्या मॅचचे तिकीट हे ७५० ते २५००० पर्यंत असते , ते का ?? इतके जास्त तिकिटं ठेवण्याचे कारण काय? हे विचारण्याचा पण कोणालाच अधिकार नाही.

आता समजा उद्या श्रीसंत किंवा ते दोन चंगूमंगू प्लेअर्स पकडले गेले,   त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून दिलेली शिक्षा भोगून ते बाहेर आल्यावर बीसीसीआय  त्यांच्यावर आजीवन बंदी घालायची की काही वर्षासाठी याचा निर्णय घेऊ शकते.  कोर्टाने जरी दोषी ठरवले, पण जर बीसीसीआय च्या स्वतःच्या शोध समितीने यांना निर्दोष म्हटले, तर हे सगळे  कदाचित पुन्हा भारताकडून खेळतांना दिसतील.

ज्या देशात क्रिकेट हा धर्म समजला जातो त्या देशात  श्रीसंत आणि त्या दोन चंगूमंगू चे वागणे हे राष्ट्रीय शोक  व्यक्त करण्याच्या लेव्हलचे आहे आणि म्हणूनच ते  नॅशनल शेम मधे मोडते.

पैशाचा भ्रष्टाचार समजा देशहिताच्या आड येत असेल तर? बीसीसीआय ची टीम ही भारतीय टीम म्हणून ओळखली जाते, तेंव्हा या संस्थेवर काही तरी अंकुश असायला हवा की नाही? तसेच ह्या संस्थेला   स्वायत्त संस्था म्हणून राहू देणे कितपत योग्य आहे? उत्तर तुम्हीच शोधायचं आहे. ह्या प्रश्ना वरच हा लेख संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

23 Responses to नॅशनल शेम!

 1. BCCI खाजगी आहे म्हणजे नक्की काय? उद्या जर माझ्या खिशात करोडो रुपये आले तर मी अशी दुसरी संस्था register करू शकतो काय? खाजगी संस्थेला सरकार वारेमाप किंमतीची मैदाने फुकट (जवळपास!) का वापरू देते? ही संस्था कोणाच्या मालकीची आहे? ती कोणत्या कायद्याखाली येते? NGO Act, Society Act, Companies Act की आणखी काही? कर किती भरतात हे लोक? की तोही माफ आहे?

  • संजीव,
   असेही होऊ शकते 🙂 संस्था रजिस्टर करता येईल, पण नंतर तिचे रजिस्ट्रेशन आय सी सी मधे करावे लागते. नुसता गोंधळ आहे. पण त्यातही एक गोम आहेच, आय सी सी पण एक अजून संस्था आहे, ती या सगळ्या देशांच्या क्रिकेट बोर्डाचे एकत्रित कंट्रोल करते. त्यांची माहिती http://en.wikipedia.org/wiki/International_Cricket_Council इथे आहे.

   या संस्थेला कर माफी तर नेहेमीच मिळत असते. कारण त्यांचे पदाधिकारी असलेले राजकीय नेते 🙂 नांवं लिहायची गरज आहे का? 😀

 2. मामा, खरय तुझं..नॅशनल शेम

  मघा आपण बोललो तसं मला हे सगळंच थोतांड वाटतं…खाजगी असो वा सरकारी….हे सगळंच थोतांड आहे…मुद्दाम घडवून आणलेलं!! आता BCCI (Board of Control for Cricket in India) आपल्या कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी काहीही बोलणार, काहीही वागणार! मला तर हे फ़िक्सिंग ओपन होणं हे सुद्धा मुद्दाम केल्यासारखच वाटतय..कारण आता BCCI म्हणतय
  We are handicapped, can’t control bookies, BCCI says
  PTI | May 19, 2013, 02.29 PM IST

  http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/spot-fixing-hits-ipl-6/news/We-are-handicapped-cant-control-bookies-BCCI-says/articleshow/20133930.cms इथे ही बातमी वाचायला मिळेल.

  उगाच काहितरी हालचाल केल्यासारखं करून काय करणार आहे BCCI?

  • सुरुची,
   बिसीसीआय काहीच करणार नाही. गम्मत पहा. काही दिवसात सगळे लोकं हा प्रकार विसरून पण जातील .फिक्सिंग उघड केलं हेमुद्दाम घडवून आणले आहे असे मला वाटत नाही.
   सोन्याचं अंडं देणारी कोंबडी कोण कापून खाईल? आणि कशाला? हे सगळे प्लेअर्स म्हणजे सोन्याचं अंडंदेणारी कोंबडी – त्या बुकींच्या मते.

 3. Pankaj Z says:

  मलाही काही प्रश्न पडले होते… जर ही संस्था खाजगी असेल तर मग…
  १) सचिन तेंडुलकर कुठल्या कलमानुसार सरकारकडे कारवरील इंपोर्ट ड्युटीची माफी मागतो?
  २) खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना कुठल्या अधिकाराने बीसीसीआय पद्म/रत्न पुरस्कारांची शिफारस करते?
  ३) जर ती खाजगी संस्था आहे तर त्यांना करमाफी आणि सवलत का?

  • पंकज, काकांनीं म्हटल्याप्रमाणे वरील सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे

   “तुम्ही यांना ’माहितीच्या अधिकारा ’खाली पण एकही प्रश्न विचारू शकत नाही.”

   • “The BCCI is India’s richest sporting body and the richest cricket board in the world.[” हे वाक्य वाचले विकी वर. इतके असूनही या संस्थेला नाममात्र दरात मैदाने दिली जातात, पंकजचा दुसरा मुद्दा तर बिलकुल” तीर निशानेपे लगा” असा आहे .
    सगळ्यांच्या मागे शरदराव आहेत हे विसरू नका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मह्णजे , शरदराव.

   • सिद्धार्थ,
    तेंडूलकर ला ऑनररी विंग कमांडर ची पदवी दिली गेली, धोनी पण असाच कोणी तरी नेव्ही मधे आहेच.. हे काय सुरु आहे तेच समजत नाही मला.

 4. तुम्ही “हलकेच घ्या”, असं लिहिलं आहे म्हणून नाहीतर मला आधी प्रश्नच पडला होता की आपल्या धर्माचं कुठलं हे सर्वोच्च पिठ आणि त्याच्या ध्वज असा कसा? 😉

  क्रिकेट हा माझा धर्म अजिबात नाही आणि मला या गोष्टीचा नितांत अभिमान आहे.

  मी तर म्हणेन की भारतामधे क्रिकेटला अवाजवी महत्व दिलं गेलेलं आहे. आपल्या देशात इतर अतिमहत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. धर्मांशी संबंधित गोष्टींचं राजकारण तर सुरूच असतं. पण या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, आदर्श भारतीय नागरिक बनण्यापेक्षा लोकांना आपला धर्म क्रिकेट आहे असं अभिमानाने सांगावंसं वाटणं हीच मुळात नॅशनल शेम आहे. या क्रिकेटप्रेमींमुळेच बीसीसीआय आणि क्रिकेटपटू यांचा गल्ला भरत असतो, त्यामुळे स्पॉटफिक्सिंगला नॅशनल शेम म्हणून जाहीर करणं हे ओघाने आलंच.

  विरंगुळा म्हणून पाहण्यासाठीचे इतर अनेक खेळ असतात, छंद असतात. पण पैशामुळे क्रिकेटला जे ग्लॅमर प्राप्त झालं आहे, त्यालाच लोक जास्त भुलू लागले आहेत. सचिन तेंडुलकरची बॅट “तळपताना” दिसते पण देशरक्षणासाठी प्राण पणाला लावणार्‍या सैनिकाची कुणी चर्चा करताना दिसत नाही. धिस इज अ नॅशनल शेम! आणि हे मी रोजच्या रोज पाहात असते, वाचत असते. विषाद वाटतो पण करता काहीच येत नाही. १६ डिसेंबरला शिवाजी पार्कला “विजय दिवस” चं सेलिब्रेशन पाहायला गेले होते. फार अभिमान वाटला आपल्या सैनिकांचा, देशाचा! असं वाटलं की ज्या देशाचं सैन्यबल इतकं तगडं आहे त्या देशाच्या नागरिकांना कसली आहे भिती? पण त्याच रात्री… दॅट वॉज अ नॅशनल शेम! असो. क्रिकेटप्रेमासमोर देश, धर्म और समाज किस झाड की पत्ती है?

  एक वर्ष…. फक्त एक वर्ष आपल्या देशातील लोकांनी क्रिकेटवर संपूर्ण बहिष्कार टाकावा. सगळं चित्र पालटेल. पण तसं होणार नाही. कारण क्रिकेट हा आपला धर्म आहे. सचिन तेंडुलकर हा आपला देव आहे आणि क्रिकेटवर बोलणं, ऐकणं, वाचणं, लिहिणं ही आपले परम कर्तव्य आहे..

  जय क्रिकेट, जय सचिन!

  • कांचन,
   पटलं . अगदी पुर्ण पणे पटलं.
   ज्या दिवशी ह्या माकडांना पकडलं, त्याच दिवशी भारताचं बजेट पास झालं बातमी आली का कुठे? मी पण एकेकाळी क्रिकेट पहायचो, पण हल्ली बंद केलंय.
   एक वर्ष सगळ्यांनी पहाणे बंद केले की सगळं व्यवस्थित होईल.

 5. suhas adhav says:

  masta post aahe … 🙂 baryach goshti jya tumhi lihilya tya mahiti navtya mala…
  pan ek baki patla
  “”आणि अशीही पुस्ती जोडली जाते की बीसीसीआय या संस्थेला ती सरकारी अखत्यारीत येत नसल्याने जे काही करायचं असेल ते ही संस्था करू शकते, आणि त्यांनी तसे का केले याचे उत्तर जनतेला किंवा सरकारला देण्यासाठी ते बांधील नाहीत. तुम्ही यांना ’माहितीच्या अधिकारा ’खाली पण एकही प्रश्न विचारू शकत नाही. क्रिकेटच्या चार तासाच्या आयपीएल च्या मॅचचे तिकीट हे ७५० ते २५००० पर्यंत असते , ते का ?? इतके जास्त तिकिटं ठेवण्याचे कारण काय? हे विचारण्याचा पण कोणालाच अधिकार नाही.””
  hyamulech maharashtrat le jeshtha nete cricket shi aapla nata jodun aahet
  bara aahe na kashala mag cbi chi chavkashi ani kasla natak 😛

  • सुहास,
   अरे बऱ्याच लोकांना माहिती नाही या बद्दल त्यांना वाटतं की भारतीय टीम ही भारताचीच आहे म्हणून. आणि तुझं शेवटंचं वाक्य हे अगदी बरोबर आहे कारण विकी वर सापडलं मला ते हे आहे, “The BCCI is India’s richest sporting body and the richest cricket board in the world.[“

 6. “Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low calibre & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water would be taxed in India.” असं मी नाही म्हणत, हे Sir Winston Churchill ने 64 वर्षापूर्वी म्हटलं होतं….

  • चर्चिल चं अगदी बरोबर होतं. आज त्याचा अनुभव येतोय आपल्याला .:) याच विषयावर एक लहानसा लेख लिहायची इच्छा होती.

 7. प्रत्येक cricketer चा पगार आणि बक्षिसं ऐकून तर डोकं सटकटं माझ, आम्हा Chess player ला तर National Team कडून खेळताना सुद्धा स्व:खर्चातून जावं लागतं.

  • क्रिकेट मुळे सगळे खेळ झाकाळल्या गेले आहेत.सहज आठवलं, विश्वनाथ आनंद जेंव्हा पहिल्यांदा वर्ल्ड चॅंप झाला तेंव्हा त्याला घ्यायला एअरपोर्ट वर कोणीच गेलं नव्हत . त्याला मिळालेलं पाच लाखाचं बक्षिस पण त्याने कुठल्या तरी संस्थेला दान केलं होतं.
   इतर खेळ हे खेळ नाहीतच असे सरकारला वाटते. टेनिस ला सानिया च्या लुक मुळे थोडं ग्लॅमर मिळालं, पण ते तेवढ्यापुरतेच .

 8. अत्यंत सुंदर लेख पंत. प्रत्येक मुद्दा पटला.

 9. आम्ही कुठेही असलो तरी तुमचे आमचे एकदम शेम असतं…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s