आजच्या लोकसत्ता मधला लेख.

एखाद्याने फ्रॅंकली बोलणं म्हणजे काय? त्याने  ” काय वाटेल ते” बोलणं,  असा होतो का? नुकताच गिरिश कर्नाड चा लोकसत्ता भेटीचा सचित्र वृत्तांत पाहिला आणि   मनात आले की हा माणूस इतक्या सहज पणे असे  इतकी भडक विधाने कशी काय करू शकतो?

तुम्ही स्वतः फार मोठे विद्वान (?) आणि विचारवंत (?) आहात हे समजता ही गोष्ट  जरी मान्य केले तरीही , तुमचे स्वतःचे महत्व वाढवून घेण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाऊन सगळ्या जगा विरुद्ध गरळ ओकण्याची / चिखलफेक करण्याची काही गरज  नाही   असे वाटते. पण लगेच एक गोष्ट लक्षात आली, की जर त्यांनी  अशी विधानं केली नसती, तर मी हा लेख लिहायला तरी घेतला असता का? अर्थात नाही. म्हणजे कसेही करून बातमी मधे रहाण्यासाठी काही तरी कॉंट्रोव्हर्सीयल बोलायचे अशी स्ट्रॅटेजी दिसते यांची.

असेही वाटते की फिल्म ऍंड टेलिव्हिजीन संस्थेची खिरापत  कॉंग्रेस सरकार कडून पदरी पाडून घेतल्या मुळे कदाचित असेल की  कॉम्ग्रेस विरोधकांच्या विरुद्ध (जसे अमिताभ बच्चन – गुजरातचे प्रमोशन केल्याबद्दल, अडवाणी गृहमंत्री झाल्याबद्दल )गळा काढणे आपले कर्तव्य आहे – आणि असे वागणे  क्रमप्राप्त आहे असे त्यांना वाटत असावे.  म्हणून कदाचित ते तसे काही तरी पब्लिक मधे बोलत असतात.

विजय तेंडूलकरांच्या नाटकाचे श्रेय हे तेंडूलकरांना नाही तर त्या नाटकांच्या संगीताला आहे असाही शोध गिरीश कर्नाड यांनी लावलेला आहे. गिरीश कर्नाड यांना तेंडूलकरांची नाटके आवडली नाहीत असे ते म्हणतात, त्या बद्दल कोणालाच काही म्हणायचे नाही, पण त्यांच्या नाटकांचे व्यावसायिक श्रेय हे त्यांचे नव्हते असे म्हणण्याचा अधिकार गिरीश कर्नाड यांना नाही.   व्यक्ती म्हणून मला तेंडूलकर मला कधी फारसे  आवडत नसले तरीही मी हे लिहितोय, कारण विनाकारण तेंडूलकरांचा मृत्युपरांत अपमान करण्याची ह्यांना  काहीच गरज   नाही. तेंडूलकर हयात असतांना  हे कशाला मुग गिळून गप्प बसले होते, आणि त्यांच्या नाटकांचाही का म्हणून अनुवाद केला असेल बरं ? असाही प्रश्न मनात उभा रहातो.

लो.स. मधे  यांचे एक वाक्य वाचले, ” की चित्रपट हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या खालच्या स्तरावरच्या लोकांची रुची जोपासणारे माध्यम आहे, तर कादंबरी हे मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीशी मिळता जुळता प्रकार आहे”. गिरीश बाबू, एकदा मुंबईच्या मल्टीप्लेक्स मधे जाऊन पहा , किंवा दूर कशाला, तुमच्याच बंगलोरच्या मल्टीप्लेक्स मधे जाऊन पाहिले तरी तुमचे स्वतःचेच वाक्य किती चुकीचे आहे हे तुमच्या लक्षात येईल, कारण झाडून सगळे उच्चवर्गीय लोकं तुम्हाला तिकडे ३००-४०० रू.ची तिकिटे काढून आलेले दिसतील

नायपॉल यांना नोबल पारितोषिक मिळाले ते केवळ त्यांनी मुस्लिमांच्या विरुद्ध लिखाण केले म्हणून असे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत.   एखाद्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सन्मानाला पण ह्या गूहस्थाने ग्रहण लावण्याचे महत्कार्य केलेले आहे.अगदी असेच काहीसे  पण निगेटीव्ह उद्गार याने रविन्द्रनाथ टागोरांच्या बद्दल पण   काढलेले आहेत. याचे असेही म्हणणे आहे की रविन्द्रनाथ टागोर हे रंगभूमीवर उभे राहू शकले नाही, आणि सत्तरच्या काळात जे नाटक यशस्वी झाले ते पण त्या नाटकाच्या संगीतामुळे- नाटकाच्य़ा संहिते मुळे नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो , की रविन्द्रनाथ टागोर आणि नायपॉल यांना नोबल पारितोषिक देणे हे चूक आहे  .  मला वाटतं की गिरीश कर्नाड यांच्या मते केवळ ते एकटेच  नोबल प्राइझ साठी योग्य उमेदवार आहेत. 🙂 असो , जर तुम्हाला मिळाले तर आम्ही निश्चितच तुमचे कौतूक करू.

वैचारिक भूमिकांवर ठाम रहाणे महत्त्वाचे असे कर्नाड म्हणतात. नेमके या विरुद्ध महात्मा गांधींचे विचार होते.  महात्मा गांधींना एकदा विचारण्यात आले, आज तुम्ही जे बोलताय त्याच्या अगदी विरुद्ध तुम्ही पाच वर्षापूर्वी बोलला होतात, तेंव्हा तुमच्या कुठल्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा? यावर महात्मा गांधींचे उत्तर होते, मी आज जे बोलतोय त्यावर , कारण आजचे विचार हे अनुभवाने मजबूत झालेले आहेत.

इतक्या विद्वान (?) माणसाबद्दल  जास्त काय लिहावे, तो लोकसत्ता मधला लेख वाचला आणि त्यावरचे माझे मत लिहावेसे वाटले म्हणून हे पोस्ट.  एका ज्ञानपीठ विजेत्या पद्मभूषण गिरीश कर्नाड यांचे विचार वाचून खरंच वाईट वाटले, पण लगेच लक्षात आले, की लाभाचे पद पदरी पाडून घ्यायचे असेल तर असेच विचार उपयोगी पडतात.  🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

26 Responses to आजच्या लोकसत्ता मधला लेख.

 1. ninad kulkarni म्हणतो आहे:

  बेजाबदार , सवंग ,उथळ विधाने मी सुद्धा करू शकतो
  दुर्दैवाने मी प्रसिद्ध नसल्याने अश्या विधानांना पुरेशी प्रसिद्धी मिळणार नाही ह्याची खात्री असल्याने सामान्य माणसासारखी सामान्य म्हणजे सेन्सिबल विधाने करतो.

 2. Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar म्हणतो आहे:

  आपल्याकडे व्यक्तिपूजेला इतकं महत्त्व दिलं जातं, की एखाद्या व्यक्तीला आपण महान ठरवल्यानंतर त्याच्याबद्दल कोणताही नकारात्मक विचार खपवून घेतला जात नाही- तो कितीही योग्य असला, तरी. त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीच वाईट असू शकत नाही अशीच सर्वाची धारणा असते. गिरीश कर्नाड……

  गिरीश कर्नाड याचं हे मत मात्र शंभर टक्के बरोबर आहे .

  • महेंद्र म्हणतो आहे:

   ह्या वाक्याला आक्षेप नाही. पण एखादी व्यकतीला नोबल प्राइझ मिळाल्यावर त्या व्यक्ती विरुद्ध अशी विधाने करण्याची खरंच गरज आहे का?
   नकारात्मक विचार एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या लेखा विरुद्ध असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती ने मुस्लीम विरोधी लिखाण केले म्हणून त्याला नोबल प्राइझ दिले असे म्हणणे मूर्खपणाचे लक्षण आहे असे मला वाटते.
   विचारांचे खंडन विचारांनी करा.प्रस्थापितांविरुद्ध बिनबुडाच्या अरोपांनी/ वक्तव्यांनी करण्यचा गिरीश कर्नाडांचा प्रयत्न निश्चितच अयोग्य आहे असे मी म्हणेन.

 3. ngadre म्हणतो आहे:

  तुमची पोस्ट आवडली आणि पटली. बरेच प्रसिद्ध कर्तबगार लोक आयुष्याच्या उत्तरार्धात असे अचानक राळ उडवणे किंवा ज्या त्या इतर व्यक्तीचे प्रतिमाभंजन असे का करतात ? की वयाचा परिणाम ?

  नाना पाटेकर , तेंडुलकर : , आणखीही उदाहरणे आहेत.

  तेंडुलकरानी राळ नाही उडवली पण अनेकदा उगीच स्फोटक विधाने अन नंतर गोंधळ सारवासारवी केलीच.

 4. Mohana म्हणतो आहे:

  <<>> मुळात असे प्रश्न विचारले जाताना ती व्यक्ती तितक्या योग्यतेची आहे का हे कितपत विचारात घेतले जाते? घाशीरामचं संगीत आव्हानात्मक होतं हे सांगण्याच्या नादात हे भडक वक्तव्य झालं असं वाटलं वाचून.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   तसे असू नये. पब्लिक फोरम वर बोलतांना स्वतः काय बोलतोय यावर निश्चितच नियंत्रण असायला हवे.
   तेंडूलकरांचीनाटकं आवडली नाहीत, तर ठिक आहे, पण मग त्यांचे भाषांतर का केलेत हो तुम्ही? हा प्रश्न आहेच.
   अमिताभ बच्चन युपीचा पण ब्रॅड अम्बेसेडर होताच, त्याबद्दल काही का बोलले नाहीत कर्नाड? गुजरात टुरीझम प्रमोट करण्याच्या अमिताभच्या बद्दल बोलणे पण संयुक्तिक नव्हते.

 5. Digambar Behere म्हणतो आहे:

  लोकसत्ता मधील राम जगताप आणि रसिका मुळ्ये यांच्या लेखातील एक गोष्ट मला उमगली नाही, ती अशी कि “वैचारीक भूमिकेवर ठाम रहाणे महत्वाचे.” ही कर्नाडांची भूमिका असतांना तेंडूलकर त्यांच्या स्वत:च्या वैचारिक भूमिकेशी एकनिष्ठ राहून आपल्या नाटकांतून ती भूमिका संपुर्णपणे प्रेक्षका पर्यंत पोचवतात, ते मात्र त्यांना आवडत नाही. ते म्हणे “प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वावच न ठेवता सगळंच्या सगळं कथानक स्टेजवरच मांडायचं.”
  दुसरी गंमत म्हणजे “सलीम जावेद यांच्या संवादाचा (अमिताब) यांच्या करिअर मध्ये फारमोठा वाटा आहे म्हणून त्यांनी (सलीम जावेद) यांच्या (धार्मिक, वैचारिक श्रद्धांशी) एकनिष्ठ राहून भारतीय लोकशाही मध्ये राहूनही त्यांनी स्वत:च्या श्रद्धाना, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचाराना तिलांजली द्यायला हवी होती असे कर्नाडांना म्हणायचे होते का? असा प्रश्न मनात आल्या शिवाय रहात नाही.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   दिगंबरजी,
   ब्लॉग वर स्वागत. तो एक लेख वाचल्यावर असंच काही तरी मनात आलं होतं. असं काही तरी विचित्र ऐकलं /वाचलं की मोठी माणसं नजरे मध्ये उगाच छोटी होतात.

 6. suhas adhav म्हणतो आहे:

  😀 aashe thor vyakti 😛 aapli presidhi vadhavnya sathi kay kartil hyacha nem nahi….
  swatala kahi jamat nasel tar aata prasidha mansavar jara bot theun kahi hota ka baghu aashi hi mansa… javal pas rakhi savant 😛

  • महेंद्र म्हणतो आहे:

   सुहास
   तसे नाही. हा माणूस विद्वान आहे. याने कन्नड मधे बरेच साहित्य निर्मितीचे काम केलेले आहे . एक चांगला सिनेमा डायरेक्टर प्रोड्युसर म्हणून प्रसिद्ध आहे कर्नाटकात. तसेच ज्ञानपीठ आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. इतकं असुनही असे विचित्र का बोलावे हेच समजत नव्हते.
   राखी सावंत.. अगदी बरोबर उपमा आहे 🙂 क्रिएट कॉंट्रोव्हर्सी , ऍंड एंजॉय द पब्लिसीटी.. 🙂

 7. Abhay Mudholkar म्हणतो आहे:

  ही कानडी लोक हल्ली मराठी मिडिया मध्ये येउन मराठी लेखक / कलाकार यांच्या बद्दल काहीही बोलतात आणि आपली मराठी माध्यमे ते छापून आणतात. याचे वाईट वाटते. इथे मला कर्नाटक आणि महाराष्ट्र हा वाद सुरु करायचा नहिये. परंतु असे जे तोंडाळ आणि सो कॉल्ड प्रथितयश लोक आपली मते मांडतात तेव्हा खरच प्रश्न पडतो कि ह्या लोकांची आपण का तरफदारी करतो. माझ्या मते तुमचा हा लेख फारच topical असला तरी छान आहे. मी कालच श्री कर्नाड यांची मुलाखत / विचार वाचले लोकसत्ता मध्ये तेव्हा मलापण असेच वाटले होते. खूप छान आणि मार्मिक लेख लिहिलात.

  अभय मुधोळकर

 8. आपणही तीच चूक करू नये… अशी थोरामोठ्याची विधाने प्रसिद्ध झाली की.., चुकीचे रिपोर्टिंग पासून, धुरळा खाली बैसला… पर्यंतचा कालावधीत शक्यतो शांतता राखावी, चूककर्त्यास विधाने परत घेण्याची मुबलक संधी देऊन तो अश्वत्थामा आहे, की अर्जुन वगैरे तपासावे इत्यादी इत्यादी….

  • महेंद्र म्हणतो आहे:

   हा थोर माणूस आपले विधान पुन्हा पुन्हा जस्टीफाय करे. जर महात्मा गांधींचे विचार बदलले नसते, तर सुट टाय सोडून पंचा नेसायला ते तयार झाले असते का? आणि मग सत्याग्रह, वगैरे वगैरे…???

 9. आजकाल मशिदीवरचा भोंगा देखिल नवीन काहीतरी कोकलसांगतोय असे १-२ वेळा नीट लक्ष देता ध्यानात आले आहे, तरी दररोज तीच कविता लाकलश्रोत्यासमीक्ष वाचून कदाचित महोदयांना कंटाळा आला असेल म्हणून नवकाव्य वगैरे असेल,…

 10. aruna म्हणतो आहे:

  महेंद्र,
  मी तुमच्याशी १०० टक्के सहमत आहे अणि मुधोळकरांशी २०० टक्के! खरे तर असे वाटते की आता उतार वयातही लोकांच्या नजरेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न तर नसेल? हे लोक स्वतःला शहाणे ठरवण्यासाठी मोठ्या व्यक्तींवर चिखल-फेक कशाला करतात?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अरुणा,
   तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर दोन उपाय आहेत, असे काही तरी करा की तुम्हाला सगळे लोकं आपण होऊनच मोठं करतील, मान देतील,
   नाही तर दुसरा उपाय म्हणजे,इतरांना लहान लेखा, स्वतःची खुजी उंची उगीच मोठी वाटायला लागेल.. निदान स्वतःला तरी~

 11. anuvina म्हणतो आहे:

  प्रसिद्धीचा हव्यास आणि मिंधेपणा मुळे अशी विधाने येतातच …. आणि त्यात जर तुम्हांला आवताण देऊन बोलायला लावले तर मग काय बघायलाच नको. गिरीश कर्नाड काही वेगळे नाहीत. मराठीवर एवढी गरळ ओकणारे कर्नाटकातील रंगभूमीबद्दल का बोलत नाहीत. ….

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अगदी खरे. पण वैताग येतो हे असे लेख , इंटरव्ह्यु वाचले की. आपणच शेवटी धर्मसहिष्णू 🙂 कोणीही यावे आणि आपल्या थोबाडीत मारून जावे असे झालेले आहे हल्ली.

 12. ninad kulkrni म्हणतो आहे:

  एवढे सगळे झाले तरी एका मात्र नक्की
  त्यांचे एक था टायगर मधील काम चाबूक झाले होते.
  त्यांनी व्यावसायिक बॉलीवूड सिनेमात नियमितपणे काम करायला सुरुवात केली पाहिजे
  म्हणजे सिनेमांचा दर्जा वाढेल.

 13. शैलजा शेवडे म्हणतो आहे:

  महेंद्रजी,
  तुमच्या विचारांशी एकदम सहमत…! गिरीश कर्नाडांची मतं डोक्यात जाणारी असतात. अयोध्येतील वादग्रस्त जागा राम मंदिरच आहे, हे कोर्टाकडून सिध्दही झालयं. तरी पण यांना बाबरी मशिद पाडली..म्हणून झुंडशाही वाटते…!
  भारतात बहुसंख्य हिंदू आहेत. आणि हिंदू गाईला गोमाता म्हणतात. तरी यांना गोमांस खाण्यावर बंदी ही वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला वाटते. म्हणजे करोडोंच्या श्रध्देपेक्षा मुठभर लोकांच्या गोमांस खाण्याला हे जादा महत्व देतात.
  त्यांच्या असल्या विचारांचा हजारदा धिक्कार…!

  • महेंद्र म्हणतो आहे:

   शैलजा,
   मनःपूर्वक आभार. अहो सकाळी पेपर घेऊन बसलो आणि वाचून झाल्यावर चक्क आवाक झालो होतो.
   लेख लिहितांना आधी थोडा जास्त स्ट्रॉंग झाला होता, तो नंतर थोडा सौ़म्य केला 🙂
   गोवधबंदी बद्दलचे याचे विचार वाचले आणि खरंच संताप आला. सरकारी इतमामाची पदरी पाडून घ्यायची सवय झाली असली की मग असे बोलणे भाग असते ह्या लोकांना.

 14. आमोद म्हणतो आहे:

  महेंद्रजी,
  गिरीश कर्नाड यांची मुलाखत जितकी प्रक्षोभक आणि सच्ची वाटली, तितकाच हा तुमचा लेख पण…. हा विचार पण केला पाहिजे की, त्यांच्या आत्मचरित्राचे उद्घाटन होते… तेव्हा त्यांनी त्यांचे विचार मांडले तर त्यात काहीच चूक नाही… प्रश्न आहे तो लो.स. च्या त्याला प्रसिद्धी देण्याचा…. जसे तुम्ही तुमचा लेख लिहिल्यावर सौम्य केलात तसे त्यांनी केले नाही, कारण ते त्यांचे ‘प्रोफेशन’ आहे. प्रसिद्धी तर त्यांना पण हवी आहे…
  तुमच्याच ‘ब्लॉगचे आयुष्य’ लेखात लिहिल्याप्रमाणे, ‘केवळ लिहायचे म्हणून’, ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून’, ‘माझे मत सांगायचेच’ म्हणून लिहिलेले ब्लॉग्स हळूहळू ओस पडतात… तुम्ही जनरली तसे लिहित नाही, त्यामुळे हा लेख वाचून थोडे वाईट वाटले… बाकी बर्याच चिंता आहेत आयुष्यात… गिरीश कर्नाडांचा लेख वाचून इतके अस्वस्थ होऊ नका… 🙂

  आमोद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s