पुणेरी पगडी…

Mahadev_Govind_Ranadeजर मी तुम्हाला या शेजारच्या फोटॊ मधली व्यक्ती कोण आहे हे विचारले तर कमीत कमी ९९ टक्के लोकं लोकमान्य टिळक हे नाव अगदी खात्रीपुर्वक  सांगतील.  याचे कारण? अगदी सोपे आहे. आजही आपल्याला कुठल्याही नेत्याचा चेहेरा लक्षात नसतो, तर त्यांची व्यक्ती रेखा ही वेषभूषेवरून लक्षात ठेवण्याकडे आपला कल असतो.बरेचदा तर त्या व्यक्तीची वेषभूषा म्हणजेच त्या व्यक्तीची ओळख झालेली असते.  या  फोटो मधे  त्यांनी  घातलेल्या त्या पगडी   मुळे आपले सुप्त मन ह्या व्यक्ती म्हणजे  लोकमान्य टिळक आहेत असे निर्देश जागृत मनाला  देते, आणि जागृत मन ते मान्य पण करते.  वर दिलेला फोटो म्हणजे पुणेरी पगडी चा ज्यांनी  समाजा मध्ये वापर रुळवला, त्यांचा  म्हणजे न्यायमूर्ती माधवराव रानडे यांचे आहे,  आणि आजचे पोस्ट आहे ते म्हणजे पुणेरी पगडी बद्दल.

आपली संस्कृती , म्हणजे इतिहास असतो  का? नाही, मला तरी  तसे वाटत नाही. पण  बरेचदा   आपल्या इतिहासाला  आपण आपली संस्कृती  समजून विचारांची गल्लत करतो. महाराष्ट्रात पूर्वी फेटा, टोपी , मुंडासे किंवा इतर वगैरे डोक्याला बांधल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही अशी पद्धत होती. त्यातल्या त्यात मग समाजातील स्थानानूरुप डोक्यावरचे शिरस्त्राण बदलले जायचे

आमच्या घरी सकाळी जो टीनाच्या डब्यात पाव बटर घेऊन विकायला यायचा, तो मुल्ला डोक्यावर काळी पर्शियन  उंच गोंडा लावलेली टोपी घालून यायचा, तर कल्हईवाला हा डोक्यावर मुंडासे बांधलेला असायचा.दुधवाला ( भैय्या नाही) डोक्यावर पांढरी टॊपी घातलेली , बहुतेक वेळेस तर डोक्यावर काय आहे हे जाती धर्माप्रमाणे ठरलेले असायचे. नंतर काही वर्षातच हे सगळे बंद झाले, आणि   लोकं डोक्यावर काही न घालता फिरणे सुरु झाले. एके काळी बोडख्याने फिरणे अशुभ समजले जायचे तीच गोष्ट सिनेमा मुळे फॅशन म्हणून गणली जायला लागली.

हल्ली लग्ना मधे डोक्यावर पगडी ( फेटा नव्हे) बांधण्याचा प्रकार सुरु झालेला आहे. महाराष्ट्रीयन लोकं पण लग्ना  खास ऑर्डर देऊन येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाड्याच्या डॊक्यावर राजस्थानी पद्धतीने पगडी बांधून घेतांना दिसतात- मला प्रश्न पडतो आपण मराठी मग  ” लोकं फेटा का नाही बांधून घेत? ” शेवटी मराठी संस्कृतीचे , स्वराज्याचे प्रतीक आहे तो फेटा किंवा पगडी !  पण दुर्दैवाने आपण त्याला विसरलो आणि राजस्थानी पगडी जवळ केली आहे.   कमीत कमी पुण्याला तरी सगळे मराठी लोकं लग्नात फेटा किंवा पुणेरी पगडी का वापरत नाहीत हा प्रश्न मनात येतोच.

हे सगळं झालं तरीही पुणेरी पगडीची स्वतःची ओळख अजूनही टीकुन आहे. दगडुशेठ हलवाई च्या गणपती ला पण हीच पगडी घातलेली आहे.  पुणेरी पगडी नियमित वापरणारी शेवटची व्यक्ती म्हणजे सेतू माधवराव पगडी.  त्यांच्या बरोबर  पुणेरी पगडीचा   वापर संपला आणि ही फक्त सरकारी समारंभात एखाद्याला मान देण्यासाठी वापरायची वस्तू झालेली आहे.नुकताच सिनेकलाकार जितेंद्रचा सत्कार करतांना त्याला पण हीच पुणेरी पगडी घातली गेली होती, आणि त्याचे फोटो पण बरेच ठिकाणी पेपर मधे झळकले, आणि तेंव्हा पासूनच या विषयावर काही तरी लिहायचा विचार करत होतो.

पुणेरी पगडी चा इतिहास खूप मनोरंजक आहे.    पुणेरी पगडी ची माहिती शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण नेट वर अजिबात काहीही  माहिती मिळाली नाही.

पुणेरी पगडी ही नियमित वापरात आणली, ती  न्यायमूर्ती माधवराव रानडे यांनी. सुरुवात माधवरावांनी केली  आणि    जे एस करंदीकर, डॉ. डीडी साठ्ये, तात्यासाहेब केळकर कवडे शास्त्री,  लोकमान्य टिळक, सेतू माधव पगडी वगैरे बरेच लोकं ही पगडी नियमित वापरू लागले. उच्चभ्रू रुची चे लक्षण म्हणजे पुणेरी पगडी  हा समज रुढ झाला, आणि  कदाचित त्या मुळेच शिक्षण क्षेत्रातले लोकं, उच्च विद्याविभूषित लोकं, न्यायदान क्षेत्रातील, सरकारी उच्च पदस्थ मराठी अधिकार्‍याचे शिरस्त्राण म्हणजे पुणेरी   पगडी हे समीकरण रुढ झाले.

पगडीची किंमत ठरायची ती त्यावर वापरलेल्या जडजवाहीर, किंवा सोन्याचा जरतारी कामामुळे.

पगडीची किंमत ठरायची ती त्यावर वापरलेल्या जडजवाहीर, किंवा सोन्याचा जरतारी कामामुळे.

पगडी बनवणे सोपे काम नव्हते.  कोष्टी  समाजाचे अती कुशल कारागीर  लोकंच हे काम करू शकायचे.  दर पंधरवड्यात एकदा  घरी येऊन ९ इंच रुंदीचा आणि ६५  वार लांबीचा  कपडा  वापरून ही पगडी बनवली जायची. १७ व्या शतकापासून  जी पारंपारिक पद्धत होती तीच  पद्धत १९-२०  व्या शतकातही  वापरली जायची. प्लास्टर ऑफ पॅरीस, किंवा मातीचा  चा डोक्याच्या आकाराचा डाय बनवला जायचा.  त्यावर कांजी केलेले कापड वापरून आणि शिवून पगडी  बांधायचे काम केले जायचे. एकदा पगडी बांधून घेतली की ती साधारण पंधरा दिवस तरी चालायची.

पगडीच्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट नाव आहे. माथा म्हणजे, डोक्यावरचा भाग, कोका किंवा पोपट म्हणजे वर असलेला उंचवटा. ह्या भागावरच पगडीचे देखणे पण अवलंबून असते. जर हा भाग चुकला की मग पगडी ची शान शिल्लक रहात नाही. पगडी घातल्यावर  हा  भाग नेहेमी उजव्या डोळ्यावर यायला हवा असा

पुणेरी पगडी आणि त्या पगडीच्या निरनिराळ्या भागांची नावे.

पुणेरी पगडी आणि त्या पगडीच्या निरनिराळ्या भागांची नावे.

रिवाज होता. जरतार म्हणजे शोभेसाठी  जरीचे काम केलेले  असायचे  . पूर्वी खरी सोन्याची तार काढून त्याचे कलाबतू आणि जर बनवून व वापरली जायची.  घेरा म्हणजे घेरा, त्याबद्दल काही सांगता यायचं नाही. वर दिलेल्या फोटो मधे सगळे भाग दाखवले आहेत.  पगडी च्या आतल्या भागात  लवकर खराब होऊ नये आणि घालतांना सुखकर व्हावे म्हणून मुलायम कपडयाचे अस्तर लावले जायचे.

पगडी बनवण्यासाठी प्राजक्ताच्या फुलांच्या देठापासून  किंवा तेरड्याच्या फुलांपासून तयार केलेला लाल रंग   वापरला जायचा.   लाल रंग वापरण्याचे कारण फक्त एवढेच की तो रंग लवकर खराब होत नाही, आणि चांगला दिसतो.  आजही पगडी बनवली जाते, पण पद्धत एकदम बदललेली आहे . फॅक्टरी डाय कपडा एकत्र घड्या करून वापरला जातो. बरेचदा कागदी पल्प बनवून त्याचा बेस बनवून तो सेट झाल्यावर त्यावर कपडा शिवून पगडी बनवली जाते. आणि एक बाकी खरे की जुना आकार अजूनही मेंटेन केला जातो.

२००९ मधे पुणेरी पगडी संघ या दहा लोकांच्या गृप ने,  या पगडी ला जॉग्रोफीकल इंडीकेशन मिळवून दिले  ज्यामुळे   पुणेरी पगडी ही पुण्याची प्रॉपर्टी  किंवा प्रोप्रायटरी  आयटम झालेली आहे . पुण्याच्या बाहेर ही पगडी किंवा अशा प्रकारची  पगडी पुणेरी पगडी म्हणून विकली जाऊ शकत नाही. आजही पुणेरी पगडी म्हणजे पुण्याची शान आहे, आणि या पगडीचा वापर कमीत  लग्न कार्यात वगैरे  नियमित पणे  होत रहावा असे वाटते , आणि ते आपल्याच हातात आहे, अहो सुट घालुन लग्नाला उभे रहाण्यापेक्षा पगडी घालून उभे राहिले तर किती छान दिसेल नाही का?? कारण  आजही पुणेरी पगडी म्हणजे पुण्याची शान आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

32 Responses to पुणेरी पगडी…

 1. aruna म्हणतो आहे:

  agadI yogya. pagaDI hI aapalI aahe. tichaa maan raakhalaa paahije.

 2. Chinmay म्हणतो आहे:

  काका.. आवडला हा लेख! पुणेरी पगडी अगदीच कमी वापरली जाते. पण हल्ली लाग्नांमधून आणि मुंजीत नेहमीच दिसते. पण ते fashion म्हणून. माझ्याकडे पुणेरी पगडी आहे. बाबांची आहे, पण आता ती मी ढापली आहे. आणि बरेचदा काही “गहन चर्चा” करायला कुठे जायचे असल्यास मी ती बरोबर घेऊन जातो, आणि बाईकवरून उतरल्यावर हेल्मेट काढून ती पगडी चढवतो.!
  तसं पाहिलं तर पगडी आणि भिकबाळी आमच्या पिढीत नक्कीच आकर्षण आहे, आणि बरीच मुले या दोनही गोष्टी घेताहेत. आमचा तर एक भिकबाळी चा ग्रुप पण आहे! 😀 आता बाकीचांचं माहिती नाही, पण मी कधी कधी १९३० सालात जगतोय असं वागतो. शेंडी, भिकबाळी, पुणेरी पगडी, खाली धोतर आणि कोट या अवतारात बरेचदा बाहेर पडलो आहे. (एकदा तर कॉलेजमध्ये धोतर आणि पगडी या अवतारात बसलो होतो.) आणि माझ्यासारखे इतर अनेकजण आहेत! 😀

  • महेंद्र म्हणतो आहे:

   चिन्मय,
   मध्यंतरी सोमेश चा पण फोटो त्याच्या ब्लॉग वर पाहिला होता, पगडी, धोतर घातलेला. ट्रॅडीशनल डेला ऑफिस मधे घालून गेला होता तो.
   मला फक्त एवढंच म्हणायचंय की ह्या सांस्कृतीक पु
   णेरी ओळखीचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा, लग्ना कार्यात , राजस्थानी पगडी ऐवजी, पुणेरी पगडी वापरली जावी.. इतकेच.

  • anand aundhekar म्हणतो आहे:

   chinmay…bhikbali cha konta age group tuza?

 3. अतूल पाटणकर म्हणतो आहे:

  सध्या या पगडीची ओळख पुण्याप्रमाणेच जाती/ पोटजातीशी जोडली जाते आहे. त्यामुळे जी तरुण मंडळी उत्साहाने या पगड्या/ भिकबाळी घालतात, त्यांना ती त्यांच्या जातीची ओळख वाटते का, असा प्रश्न पडतो. काही पगडीधर मंडळींशी बोलल्यावर हा समाज अजूनच पक्का झाला.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अतुल
   ह्या पग्डीची ओळख जाती पोटजातीशी जोडली जात असेल तर ते निश्चितच अयोग्य आहे. विचारवंतांची पगडी ती पुणेरी पगडी ! कमीत कमी पुणेरी पगडीच्या बाबत तरी जातीयवाद पुढे येऊ नये अशी इच्छा आहे.

 4. Atul Deshmukh म्हणतो आहे:

  महाराष्ट्रात तरी मराठी लग्नात जवळच्या पाहुण्या मंडळिना उपरणे, टोपी किवा फेटाच भेट देतात..राजस्थानी पगडी कुठे देताना पहिली नाही..कदाचित मुंबईची मराठी मंडळी देत असतील. मुंबईच्या मराठी मंडळिना कदाचित फेटा कमीपनाचा वाटत असेल. किवा राजस्थानी पगडीची कलाकुसर जास्त छान असेल….आणि पुण्यातील मंडळिना पुणेरी पगडीबद्दल कौतुऊक अँणी आपुलकी आहेच ..हल्ली बाहेर वावरत असताना आपण सगळे western outfit च वापरतो..त्याला कारण आपले फक्त follow करणे ही वृत्ती आहे..शेवटी history repeats itself अहेच. त्यामुळे पुणेरी पगडी, , भिकबाली, फेटा , टोपी वगैरे दिसेल पुन्हा नवीन fashion म्हणून..:(

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अतुल
   मुंबई कडे राजस्थानी पगडी बांधण्याचा रिवाज सुरु झालेला आहे. ही लिंक पहा म्हणजे मला काय म्हणायचंय ते समजेल..http://www.jasoneggleston.net/india/wp-content/uploads/2009/11/mevik.jpg
   इतर ठिकाणी टोपी / उपरणे देतात हे खरे, मी लग्नाच्या विधी बद्दल लिहिलेले नाही, तर लग्नातल्या वऱ्हाडी मंडळींबद्दल राजस्थानी साफा बांधतात असे लिहिलेले आहे.

   मराठवाड्यात गुलाबी रंगाचा फेटा वापरला जातो, तो तर आता नामशेष होत आला आहे. पश्चिम म्हाराष्ट्रात अजून तरी फेटा वापरला जातो शुभ प्रसंगी .

 5. प्रसाद रोकडे म्हणतो आहे:

  नमस्कार,
  आपण ज्याला राजस्थानी पगडी म्हणताहात तो खरे तर कोल्हापुरी पद्धतीचा फेटा आहे, पण कपड्यावरची design राजस्थानी आहे. आजकाल अशा पद्धतीचे फेट्याचे कापड दुकानात भाड्याने मिळते. लग्न समारंभात फेटा बांधुन घेण्याची सध्या fashion आहे. अशा लोकांनी राजस्थानी design चे कापड घेऊ नये.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   श्री प्रसाद,
   राजस्थानी कापड बघून मला तो त्यांचा प्रकार वाटला. युपी मधे अशाच प्रकारे गुलाबी फिकट रंगाचे फेटे बांधतात.

 6. suhas adhav म्हणतो आहे:

  kharach aapli sanskruti aapanach japayla havi…. majha aajol punyacha aasun sudha mala mahit navta he kahi….
  adhi vataycha fakta bramhan samajatil sikshan shketra mhana kiwa nyay vyavatha sambhalnerech lok hyachya sathich hi pagdi aaste…
  etihasachya pustakatil chitra pan hech sangay chi … jasa marate tr pagota bandhayche tasa ha ek veglya profession cha part aasel aasa vatay cha
  pan chan mahiti milali tumchya post mule … kharach chan jamlay 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   सुहास,
   शक्य आहे. बहूतेक कामाप्रमाणे पण आणि आर्थिक परिस्थिती प्रमाणे पण कोणी काय घालावं हे ठरत असावं. आणि दुसरी गोष्ट समजा शेतात काम करायचं असेल तर ते पगडी घालून कसे शक्य होईल? त्या साठी मुंडासे किंवा फेटाच हवा. उन्हा पासून संरक्षण करणारा.

 7. Ashlesha म्हणतो आहे:

  उत्तम माहिती. ही माहिती कुठे मिळाली हे कळू शकेल का? पुस्तकाचे नाव वगैरे? मला स्वतःला हयाबद्दल अजून वाचायला आवडेल. धन्यवाद

  • महेंद्र म्हणतो आहे:

   आश्लेषा,

   ब्लॉग वर स्वागत. या विषयावर काही पुस्तक वगैरे नाही. एकदा प्रवास करतांना कुठल्या तरी एअरलाइन्स च्या मासिकात या बद्दल थोडं फार छापलेलं होतं. 🙂

 8. अभय म्हणतो आहे:

  वर दिलेल्या फोटो मधील फेट्याचे डिझाईन राजस्थानी पध्दतीचे असले तरी तो फेटा च आहे बहुतेक. आणि अनेक ठिकाणी मराठी पध्दतीचे जरी चौकडा वगैरे फेटे वापरतात पण अनेकांना बांधायचे किंवा द्यायचे असतील तर कॉटन फेटा परवडतो आणि त्यात बांधणीचे डिझाईन उठून दिसते . रुंद घेराची पगडी जाऊन जशी सुटसुटीत पुणेरी पगडी आली तसाच फेटाही थोडा लहान झाला . नऊवारी साडी एवढा मोठा फेटा अजूनही बीड वगैरे भागात काही वृद्धांच्या रोजच्या वापरत दिसतो . पगडीला मोती फक्त सरदार वगैरे लोक लावत असत . हे शिरपेच सुध्दा पगडीतच लावलेले नसून बहुतेक वरून वेगळे बांधायचे असत .
  वेग वेगळे जातीसूचक फेटा, पगडी , मुंडासे जावून गांधी टोपी आली . मधल्या १ – २ पिढ्यांनी हि गांधी टोपी वापरली .
  सध्या मराठी लग्नात मराठी पध्दतीचा सदरा वगैरे जावून शेरवानी , जोधपुरी असे जास्त रुबाबदार वाटतील असे पोशाख वापरायला सुरवात झाली आहे .

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अभय,
   मला तर हा जो हल्सली फेटा वापरतात, तो पाहिल्गयावर हिदी सिनेमात दाखवतात फेटा दाखवतात तसा वाटतो. माझ्या यावर अभ्यास नाही, अगदी सहज नजरेला पडले ते लिहिले आहे.
   बांधणी चे कापड वापरले गेल्याने राजस्थानी लुक येत असावा. . मराठी फेटा म्हणजे मला जो मराठवाड्यात गुलाबी रंगाचा वापरला जातो तसा असतो असे वाटते, किंवा भगव्या रंगाचा पण असू शकतो.
   . रुंद घेराची पगडी ( जिला चकरी पगडी म्हणायचे) ती उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बाहेर फिरण्यासाठी वापरली जायची. पण जर एखाद्याचे काम उन्हात नसेल तर इतकी मोठी पगडी म्हणजे सांभाळण्यास त्रास , म्हणून पुणेरी पगडी तयार झाली असावी.
   तुम्हाला सहज माहिती साठी सांगतो, सध्याचे बडॊदा संस्थानचे गायकवाड महाराज हे याच विषयावर पिएचडी करताहेत 🙂

 9. अभय म्हणतो आहे:

  लेख आणि विषय दोनीही छान आहे .
  लेख आणि विषय आवडल्याचे सांगणार्या पहिल्या दोन ओळी comment पोस्ट करताना पेस्ट करायच्या राहून गेल्या

 10. ameya म्हणतो आहे:

  माधवराव नव्हे तर न्या. महादेव गोविंद रानडे.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अमेय,
   होय, त्यांचे नाव महादेव होते, पण सामाजिक कार्यात आणि घरी त्यांना माधव म्हणायचे म्हणून ते लिहिले. प्रतिक्रियेसाठी आभार.

 11. Nilesh Joglekar म्हणतो आहे:

  लेख फारच छान आहे . पगडी बद्दल माहिती आवडली.
  निलेश जोगळेकर

 12. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  छान!!!

 13. anuvina म्हणतो आहे:

  माझे आजोबा नेहेमी पगडी वापरायचे. लहानपणी आम्हांला त्याचे खूप अप्रूप कारण १०० तून कुणीतरी दिसायचं पगडी घालून. ज्ञानी माणसाचे द्योतक आहे असं म्हणायचे ते. आता माझे वडील वापरतात कधी कधी, विशेषतः समारंभातून. एक वेगळाच रुबाब, आब असतो पगडीचा. बाकी लेख उत्तम आणि नेहेमी प्रमाणे अभ्यासपूर्ण.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   आनंद
   धन्यवाद.. खूप दिवसांपूर्वी या बद्दल वाचले होते. एकदा असेच फोर्ट ला फिरतांना रानडेंचा संगमरवरी पुतळा दिसला होता आणि मला तो टिळकांचा वाटला, आणि तेंव्हाच हा लेख लिहायचे ठरवले होते..

 14. samidha म्हणतो आहे:

  khupach chhan lekh aahe…! Tarihi “PAGADI” vaparane he kuna yera gabalyache kam nahi…! punyat ti sanskrutik paranpara mhanun jarur vaparavi tari tya puneri pagadicha itihas pahata ticha “AAB” rakhala gelach pahije…! ek fashion mhanun ti ghalane manala patat nahi…! Nyaymurti Mahadev Govind Ranade. Lokmanya Tilak , Setu Madhav Pagadi yanchya sarkhya thor vyaktimawani pagadila ek bouddhik vyavdhan dile aahe…! aani te bhan tarun pidhila asel tarach tyani pagadi ghalavi ase majhe mat aahe..! san, samarambhat puneri pagadi ghanun punyachi hi bouddhik sanskrutik paranpara jarur jopasali javi…. pan pagadichi “Gandhi Topi” hou naye hich ichha….!

 15. Jayashri म्हणतो आहे:

  KHUP CHHAN MAHITI AHE SIR !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s