तुम्ही मुंबईकर आहात जर…

मुंबईकर..

मुंबईकर..

तुम्ही मुंबईकर आहात जर…

१) कोणी एखादी  जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही.

२) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप.

३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने नाही तर, खरे  कारण  तुमच्या मनातले खरे कारण पावसाळा “सुरु = ट्रेकिंग सुरु= किंवा भटकंती सुरु “हे तुमचे समीकरण असते.

४) जगातले सर्वोत्कृष्ट स्नॅक कम स्टेपल फूड हे वडापाव  आहे हे तुमचे ठाम मत असते.  बेस्ट वडापाव वाला हा तुमच्या गल्लीतला (ज्याच्या कडून तुम्ही नेहेमी वडापाव घेता तो ) असतो हे तुमचे ठाम मत असते.

५)  तुमचा वडापाव वाला जगातला उत्कृष्ट वडापाव बनवतो हे तुमचे पक्के मत असते. जर  कधी  चांगला वडा पाव हा मुद्दा डिस्कशन ला  निघाला  की  तुम्ही आपल्या वडापाव वाल्याचे नाव पुढे करता आणि आपल्या मतावर ठाम असता. दुसरी गोष्ट म्हणजे वडा-पावाची तुलना कोणी मॅक डी बरोबर  केली की तुमचा जळफळाट होतो.

६) तुम्ही कुठेही पाणीपुरी/भेळपुरी खाऊ शकता, पण पाणी प्यायची वेळ आली की बिसलेरी विकत घेता.

७)तुम्ही  जिम मधे जाणे टाळता, कारण तुमच्या मते तुमचा दररोज जो लोकल मधे चढणे उतरणे, आणि ब्रिज चढणे उतरणे हा व्यायाम पुरेसा असतो, पण जर कोणी जातच असेल तर तो  मात्र जिम पर्यंत बाईक/कार ने जातो..

८)लोकल मधे प्रवास करतांना जो पर्यंत कोणी तुमच्या पायावर पाय देत नाही तो पर्यंत लोकल मधे गर्दी आहे अशी तक्रार तुम्ही करत नाही.

९) क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा /गप्पा मारण्याचा विषय आहे हे  पुलं चे मत तुम्ही पुरेपूर सिद्ध करता. सचिन चे कसे चुकले? धोनी कसा वाईट कॅप्टन आहे वगैरे वगैरे विषयावर तुम्ही तास अन तास बोलू शकता.

१०) मुंबई बाहेरच्या लोकांशी  बोलतांना तुम्ही मी कुलाब्याला जातोय  हे न सांगता टाऊन साईडला जातोय हे  सांगता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे न समजल्याचे भाव एंजॉय करता.

११)तुम्हाला अगदी दादर पासून मुंबई सेंट्रल  ( ३-४ स्टेशन )ला जायचे असले तरी पण तुम्ही फास्ट लोकलने प्रवास करता. त्या साठी तुम्ही आधीच्या  दोन स्लो लोकल सोडून देता.

१२)पावसाळा  सुरु झाला की तुमच्या बॅग मधे  छत्री विराजमान होते. अगदी निरभ्र आकाश जरी असलं तुम्ही छत्री  वागवत फिरता.

१३)भरपूर पाऊस पडल्याचे प्रुफ म्हणजे लोकल बंद पडणे. जो पर्यंत लोकल बंद पडत नाहीत तो पर्यंत तुम्ही खूप पाऊस खूप पडल्याचे मान्य करत नाही.

१४) टुम्ही पावसाळ्यात मिलन सबवे बंद झाला का? हिंदमाता जवळ पाणी भरलं का? कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का? यावर लक्ष ठेऊन असता.

१५) हापूस आंबा हा तुमचा विक पॉइंट असतो. तुम्ही जर मूळचे  कोकणातले असाल, तर तुमच्या घरी दहा आंब्याची कलमं, २० सुपारीची आणि २० नारळ असतातच, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने सगळे हडप केल्यामुळे तुम्हाला आंबे विकत घ्यावे लागतात हे तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत असता.

१६)तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे  भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.

१७) ८-०६, ८-३५ ९-५१ ह्या सगळ्या वेळा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात .

१८)तुमच्या दृष्टीने  तुमच्या उत्तरेला  (नॉर्थ बॉंबे ला) रहाणारे सगळे खालच्या दर्जाचे, आणि दक्षिणेला ( साऊथ बॉंबे साईडला) रहाणारे शायनिंग मारणारे असतात. सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनला हे लागू होत असतं.

१९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो.

२०) स्टॉक मार्केट तुमचा विक पॉइंट असतो, तुमची इनव्हेस्टमेंट अगदी ५० हजार असेल तरी सुद्धा, तुम्ही स्टॉक च्या मुव्हमेंट्स वर नजर ठेऊन असता आणि लोकल मधे डिस्कशन सुरु झाले की हिरारीने आपली मतं मांडता.

२१)गर्दी नसली की तुम्ही नर्व्हस होता.

२२) पावसाळ्यात गुडघाभर घाणेरड्या पाण्यातून गर्लफ्रेंडला बाइक वर मागे बसवून ड्राइव्ह करणे ही तुमची रोमॅंटीझम ची अल्टीमेट आयडीया असते.

२३) ड्राइव्ह करतांना दहाव्या मिनिटाला तुम्ही इतरांना शिव्या देणे सुरु करता.

२४) तुमच्या दृष्टीने मुंबई मधे आत शिरतांना ३० रु टोल टॅक्स हा  योग्यच आहे

२५)तुमच्या घरी पेपर वाला   दर रवीवारी पेपर सोबत कमीत कमी ५ तरी निरनिराळे  होम डीलिव्हरीचे मेन्यु टाकुन जातो, आणि तुमच्या कडे असे सांभाळून ठेवलेले कमीत कमी २० एक तरी होम डिलिव्हरी मेन्यु कार्ड्स असतात.

२६) तुमच्या स्पिड डायल वर एक किराणा दुकानदार नक्कीच असतो.

२७)तुम्ही राणीची बाग, तारापोरवाला मत्सालय, किंवा म्युझियम कधीतरी लहान असतांना एकदा पाहिलेले असते. नंतर तुम्ही या ठिकाणी कधीचे गेलेले नसता.

२८) तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्ती चांगलं वागायला लागली की तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल संशय वाटतो.

२९) निरनिराळ्या भाषेतल्या शिव्या तुम्ही आधी शिकता, आणि त्या  शिकल्या  की  त्यांचा मुबलक वापर केल्यावर आपल्याला ती भाषा येते असा तुमचा समज असतो. ( जसे गांडाभाई, बोकाचोदा  वगैरे वगैरे)

३०) तुमच्या फ़्लॅटला एक नेहेमीचे दार आणि एक वॉच डोअर ( जाळीचे दार) नक्कीच असते. बाहेर जातांना तुम्ही मुख्य दाराला, एक लॅच लॉक, दुसरे कडी घालून लॉक आणि तिसरे लॉक जाळीच्या दाराला लावून आणि प्रत्येक कुलुपं तीनदा चेक करूनच तुम्ही बाहेर पडता.

३१) बार मधे गेल्यावर ५५ रुपयांच्या बिअर साठी तुम्ही २०० रुपये अगदी विना तक्रार देता , पण रिक्षावाल्याला एक रुपया पण जास्त देत नाही.

३२) सुटी म्हणजे ट्रेकींगला जायचा दिवस हे तुमचे स्पष्ट मत असते.

३३) भांडताना हिंदी भाषीय वरचढ व्हायला लागला की  तुम्ही भैय्या म्हणून हिणवता, आणि मराठी मधे भांडण  मुद्दाम कंटीन्यु करता.

३४) हिवाळ्यात जेंव्हा १२ डिग्री तापमान असते तेंव्हा तुम्ही कितना चिल्ड है म्हणून स्वेटर शोधायला लागता.

३५) खूप पाऊस पडला की तुम्ही सकाळी बातम्या लावून बसता, कुठे पाणी भरलंय का हे बघायला, म्हणजे ऑफिशीअली  ऑफिसला दांडी मारण्याची सोय होते.

३६) तुमचे दररोजचे ४-५ तास ऑफिसला जाण्या – येण्यात खर्च होतात.

३७)डिओडोरंट हे तुमच्या साठी मस्ट असते.

३८) किती अंतर आहे हे तुम्ही मिनिटांमध्ये सांगता – किमी मध्ये नाही.

३९) टॅक्सी , ऑटॊ चे मीटर चुकीचे आहे म्हणून तुम्ही कमीत कमी आठवड्यात एकदा तरी त्यांच्याशी भांडता.

४०) लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.

४१) सुटीच्या दिवशी मित्र मैत्रिणी सोबत बाहेर जाऊन खाणे ही तुमचा अल्टीमेट एंजॉयमेंट!

४२) तुम्ही संध्याकाळी ५-३२ ला लोकलच्या ब्रिज वरून जात असतांना तुम्हाला ईंडीकेटर वर एखादी फास्ट लोकल  १ मिनिटात येत आहे असे दिसले तर तुम्ही धावत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करता. त्या लोकल नंतर दोनच मिनिटांनी दुसरी लोकल आहे हे माहिती असून सुद्धा!

४३) कोणाला भेटण्याची जागा म्हणजे रेल्वे स्टेशन वरच्या प्लॅटफॉर्म वरच्या इंडिकेटर खाली ही जागा असते.

४४) कुठे टाऊन साईडला  जायचे असल्यास तुम्ही घरी कार असूनही  शक्यतो लोकल ने प्रवास करता.

४५) स्वतःच्याच बायकोला ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटायला बोलावता, आणि डेट ला घेऊन जाता  🙂

४६) पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.

४७) तुम्ही कुठेही गेलात तरी आपण होऊन  कोणी न सांगता पण  रांगेत  उभे रहाता .

४८) तुम्ही कितीही गर्दी असलेल्या लोकल मधून उतरला तरीही तुमच्या बुटांचे पॉलिश  खराब झालेले नसते.

४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’

५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.

५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.

५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन !

५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला!

५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता

५५) FM radio is your best Entertainment in Traffic

५६) दक्षिणेकडे रहाणारे सगळे ( कर्नाटकी , तामीळ तेलगू ) हे तुमच्या मते “मद्रासी” असतात/

५७)रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे

५८)वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा?” असं एकेरी विचारणे आणि त्याने देखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.

५९)आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात!

६०)आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का? अशा कॉमेंट्स करणे.

६१)स्त्रियांचे स्पेशल :- लोकल मधे क्लिपा, नेलपॉलिश वगैरे विकायला येणाऱ्याचा  खजीना  उचकटून  पहाणे , आणि घरी गेल्यावर नवऱ्यापुढे खजीना रिता केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दाखवणे.

६२)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

79 Responses to तुम्ही मुंबईकर आहात जर…

 1. ni3more says:

  wow nice kaka nehami pramane vishyala dharun jali ahe hi post nice.

 2. ruchira2702 says:

  Hushhh.. To be continued aahe ka kaka hi list? Punekar yetil bar competitionla

  • रुचीरा
   ५०पुर्ण करायचे होते, पण थांबलो 🙂

   • shekhar gore says:

    एक खास वैशिष्ट्य राहुन गेले :
    एखादी भयंकर घटना घडते तेंव्हा घरी बसुन वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर बघुन नंतर ऑफिसमधे त्या बद्दल बोलतांना आपणासमोरच घडलेली घटना म्हणून वर्णने करतात.
    पण जेंव्हा त्याबद्दल निषेध व्यक्त करायचा असेल तेंव्हा मात्र एखादी मेणबत्ती पेटवण्य़ा पलीकडे त्यांची मजल जात नाही. काहीही झालं तरी निर्विकार मनाने आणी चेहेऱ्याने पुढची येणारी लोकल पकडुन मार्गस्थ होतात.
    आणि ’ मुंबई स्पिरीट’ बद्दल अभिमानाने बोलत रहातात !

 3. bageshrik says:

  46- me punekar aani aatyacha mulaga mumbaikar. tyamule mumbai viruddha pune ha muddha nehamich rangato. baki post ekdam sahich aahe.

 4. अभिषेक मुळे says:

  एकदम उत्तम !!!

 5. Nitin Bhusari says:

  लेख आवडला. मुंबईकरांच्या गुणविशेषांना उत्तमरीत्या वर्णन केलेत.

 6. Snehal says:

  प्रचंड…..101%खरे
  काहीच वाद नाही हयात……

 7. परफेक्ट!!! मी ६ महिनेच मुंबईत होतो.. पण हेच सगळं पाहिला मिळालं…
  अजून काही गोष्टी-

  १) काही विचारलं आणि ते बरोबर असेल, तर मुंबईकर “सवाsssल” असं काहीतरी म्हणतो… ते मला अजूनही कळलेच नाही!! प्रश्नच ण विचारता हे नक्की सवाल कसला करतात!!
  २) बाकी मुंबईला किती पण शिव्या द्या, शिवाजी पार्कला काहीही बोललो, की मार खायला सज्ज… आहो मी एकदा नुस्त म्हणालो की पार्कात पोरी येतात त्या पेक्षा पुण्यातल्या हनुमान टेकडीवर जास्त सुंदर पोरी दिसतात…तेव्हा पोरं आणि पोरी दोघांनी मिळून शाब्दिक कोथळा बाहेर काढला होता माझा
  ३) उगीचच इंग्रजी बोलणे… ते पण.. आय वॉज टेलिंग यू ना… असं काहीतरी… ते पण सुधारलं नाही कधीच!!:D
  ४) मराठी बोलताना आलेलो,गेलेलो, केलेली, पिलेली असं काहीतरी विचित्र मराठी बोलणे… पुणे विरुद्ध मुंबई या वादात पुणेकरांना हा मुद्दा उचलून धरायला अजिबात वेळ लागत नाही! 😀

 8. Sarika says:

  Zakas!!! 🙂

 9. SnehaL says:

  पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.

  hey matr 100% khare aahe kaka .. majhe mumbai che sagle relatives DISCUSSION kartat Pune madhe aale ki ..

 10. महत्वाचे म्हणजे तुम्हाला जाज्वल्य अभिमान वगैरेसारखी व्यसने नसतात 😉

 11. Pradeep says:

  50. baryach divsaani Mumbai madhye aalyas aaplya area chya stall varcha vada-paav aani Aarey Energee na chukta pitaa!
  51. paan walya bhaiyyala naahitar boot polish walyala address vichartana tumhala ajibaat kami pana vaatat naahi, aani te tumhala madat kartil hi khaatri aste.

  • प्रदीप
   हा हा हा.. हे खरंय अगदी . :० एखादा आठवडा मुंबई बाहेर राहून आल्यावर पहिली गोष्ट शक्य तितक्या लवकर करतात ती म्हणजे वडापाव खाणे.

 12. suhas adhav says:

  mastach .. chan aaahe lekh…. sampurna mumbai cha life style reflect hotay 🙂
  ani strongly agree with mumbai pune point…. kadhich nasampnara , navayane vad ghalta yenara vishay… but still mumbai is best 😀

  • सुहास
   विषय तर वादातीत आहेच 🙂 पण इथे वाद होणार नाहीत. हाच लेख जर मुक्तपीठ वर लिहिला असता तर नक्कीच कॉमेंट्स चं पेव फुटलं असतं.

 13. Vinayak Belapure says:

  हाहाहाहा एकदम सही. आता आम्हा पुणेकरांवर पण येउदे एक . 😉

 14. madhuri says:

  sunder lekh. hahahaa….. baaykola date la bolavta. aho dusrilaa gheun gele tar dusryaa divshiche jevan band hi bhiti aste ki. mastach stri shakti zindabad.

 15. Hema says:

  kharach kup chan varanan kelay…tumhi aplya mumbai che…mumbai ki baat hi kuch aur….he………….

 16. पु लं च्या शैलीत मस्त लिहिला आहे..
  1, 14, 40, 43 : Observation फारच छान
  पटत नाही : 5, 47
  माझ्या मते दादर चा कृष्णा वडेवाला सर्वात बेस्ट आहे (मी दादरला राहत नाही).

 17. bolMJ says:

  मस्त लिहलय काका…एकदा असाच एक लेख आमच्या पुण्याबद्दल पण लिहा.. 😀

  • महेश
   सुरुवात मी करून देतो, लेख तू पूर्ण कर..
   १) चितळ्यांचे श्रीखंड सर्वोत्कृष्ट असते. भारता बाहेर निघतांना चितळ्यांचे श्रीखंड, बाकर वडी आणि गुलाबजाम आधी पॅक करून घेतात.

   • Anagha says:

    2)सर्वात शुद्ध मराठी फक्त पुण्यात बोलली जाते.

    • अनघा,
     ३) पुणेकर खरा शहरी, बाकी इतर लहान शहरात रहाणारे सगळे “पावटे”

    • shekhar gore says:

     हा गैरसमज समाजांत इतका पक्का रुजला आहे की त्याचे निराकरण करणे अशक्य झालेले आहे.
     पुणेकरांच्या अनेक गैरसमजांतला हाही एक!

   • shekhar gore says:

    अहो हे तर कोणीही विसरु नये पुणेकरांबद्दल:
    —आमची शाखा कुठेही नाही हे अभिमानाने सांगतात ( आयुष्यभरात आपण गल्लीच्या कोपऱ्यापलीकडे जाउ शकलो नाही हे मात्र ते कधीही मान्य करत नाहीत )

 18. Manish says:

  EKDAM Saaaaahhhhhiiiiiiiiiiiiii
  Baki amhi na mumbaikar na punekar. Aamhi Jalgaonkar tyamule ti mumbaichi gardi agdi nakoshi watte. tyatlya tyat local tar ajibaat nakoshi watte. Me anubhavlele pune yavar ek seprete nibandh tayar hou shakto.
  manish

 19. ४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’
  ५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.
  ५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.
  ५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन !
  ५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला!
  ५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता
  ५५) FM radio is your best Entertainment in Traffic.
  क्रमश:

 20. Saurabh says:

  तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.

  baryach vela anubhavlay

 21. १९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो. 🙂
  आवडेश ! आणि तो बियरचा point सुद्धा भारी आहे 🙂
  रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे
  वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा?” असं एकेरी विचारणे आणि त्यानेदेखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.
  आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात!

  • आखिलेश
   आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का? अशा कॉमेंट्स करणे.

 22. aruna says:

  तुमची निरीक्षणशक्ती जबरदस्त आहे.आणि तुमचे विचार तुम्ही खूप सुसूत्रपणे मांडू शकता. what i like most is that you write on varied topics and with equqqal authorty.

 23. खरा मुंबईकर... says:

  खरा मुंबईकर कधीही मुंबईला मुंबई असे संबोधत नाही… तो नेहमी म्हम्हईकर असेच बोलतो…

  • खरा मुंबईकर,
   तुम्ही एकदम कोलीवाड्यात पोहोचलात की 🙂 माझा एक मित्र आहे सायनला रहातो त्याची आठवण झाली 🙂

 24. Poorva Kulkarni says:

  Solid obseravation……………. mast lekh khup aavdla. Mi mumbiekar aahe hyacha mala abhiman aahe, char divsanantar bahergavi kantala yeto. EAST OR WEST MUMBAI IS THE BEST.
  THANKS

 25. आत्ताच Whatsapp वर आलेला इंग्रजी संदेश…

  What does it take to be a Mumbaikar..

  For a Mumbaikar..
  1. Tamil, Telugu, Malayalam and Kannada are all the same.

  2. We all feel the inflation when there is a hike in the Vada Pav prices.

  3. We call everyone “boss”.

  4. Mumbaikar inventions : cutting chai, manchaw soup 1 by 2.

  5. One God : Tendulkar

  6. Bandra has more stars than the universe.

  7. In Mumbai, not one day goes without rejection of taxiwala/ rickshaw wala.
  The probability of a yes from a girl is more than a yes from them.

  8. The Ganpati dance on Nashik dhol is the ultimate dance form.

  9. If you shout “Ganpati Bappa”, you’ll definitely hear “Morya” in return. 100 %.

  10. Boarding a Virar or a Kalyan bound train from Dadar is more difficult than getting into IIT/IIM.

  11. Essel world = Disneyland
  Marine Drive = heaven

  12. Girls from Kashmir have beauty, girls from Kerala have brains.
  Girls in Mumbai: kuch ho na ho, attitude ki koi kami nahi.

  13. We all know the value of one minute when it comes to taking a train.

  Yeh hai Mumbai meri jaan..:P

 26. mazejag says:

  Ata thoda Ladies wishwa:
  1) Ladies dabyat yenarya prateyk klipa,nail polish,kanatli ityadichya toplya unckun baghanar ani lagech ghari gelyawar navryala khajina dakhawalyapramane dakhawnar.
  2) Roj phonewar aaj kay karu as vicharat navryachya particha andaz ghenar
  3) John Abraham ha any time hot watnara vishay….:P
  4) Dadar la 5 chi bhel gheun window jar milali ki wa….husshhh karun dulkya ghet…ghari
  5) Diet roj sakali surn houn sandhyakali bombalt
  6) College ch station par kartana haluch bhutkalat janar mann ani Navrayala atavat ka tula mhanun kelele phone

  Endless………

 27. sanjivani says:

  हा हा हा …
  अप्रतिम निरीक्षण शक्तीचा आणखी एक लेख.
  यादीतील खूप सार्या गोष्टी मला पण लागू पडतात .
  अश्विनीने पण यादीत लेडीज विषयी ची उत्तम भर घातली आहे.

 28. Mahesh Mohan Shinde says:

  ultimate kaka………. mastach……..

 29. Ganesh Budkhale says:

  लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.

  Sahee …asach asat nehmi mansach…

 30. Ashvini says:

  kaka ajun thodese..

  > suttya paishanvarun conductor shi vaad jhalyashivay ek hi aathvda jat nahi
  > panipuri walya bhaiya kade aur teekha pani ani aur ek sukha puri shivay pot bharat nahi
  > traffic jam madhe adaklyashivay ekahi diwas purna hot nahi
  > Fast train hi fast dhavat nasun madhlya station var thambat nahi he itar non mumbaikarana sangtana aplyala bhav khata yeto..
  > Akkhya mubaitali fyashan Hill road, linking, FS chya joravar aste.
  > parla station yaychya aadhi parle ji cha vaas fakt mumbaikaranach yeu shakato.
  > Masebajrachya baher assal mumbaikarala ghan vaas yet nahi tasech juhu beach la hi
  > Lahanpani Juhu chowpati var killa, bhel, gola ani mhatariche kes was ultimate fun.
  > Tumhala filmstars disat astil asa non mumbaikaranchya bolnyasah aadaryukt bhaav milto..

  Saglyat bhari mhanaje
  > Mumbai la naav thevnyacha hakka fakt Mumbaikaranach asto, bakichyani mumbai viruddha bra jari kadhla tari tyacha kothla kadhlach mhanun samja…

  • अश्विनी,
   🙂

   • shekhar gore says:

    सगळे मुंबईकर जन्मभर मुंबईला आणि तिथल्या गर्दीला आणि अडचणींना शिव्या देत रहातात पण मौका मिळाल्यावर कोणीही मुंबई सोडत नाही. रिटायर झाल्यावर गावी जाऊन निवांत रहाण्याबद्दल चर्चा नेहेमी करतात.

 31. Abhijeet says:

  सर,

  मुंबईची मज्जा काही औरच आहे. अख्ख्या जगाच्या पाठीवर असे कर्तृत्ववान आणि वेगळेपण जपलेले शहर सापडणार नाही.इथुन जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा फास्ट ट्रेनमधून उतरल्यावर जसे जाणवते अगदी तसे वाटते. या शहराला सलाम.

  • अभिजीत
   मुंबई सर्वसमावेशक आहे. मी इथे आलो, तेंव्हा दोन तीन वर्षात परत जायचं हा विचार मनात घेऊन, पण शेवटी झालं काय? इथलाच होऊन राहिलो.

 32. shubhalaxmi says:

  hello kaka, agdi brobr mudde ahet, mala prshn pdto tumhi itke chan lihita kse??? khup chan ahe post…… amhi mumbaikar…:-) bye tc

 33. sansun23 says:

  Dear Mahendra ,

  Nice write up .

  Ek laghoo- Shanka , aapan punyache aahat ka??

  Regards
  San

 34. च्यायला कोणी रे कीर्तीच्या वडापावची आठवण काढली
  जीव सातासमुद्रापलीकडून गलबलला .
  कीर्ती कॉलेजच्या कॉर्नर वर मिळतो म्हणून ह्या वाद्याला कीर्तीचा वडापाव हे नामाधीमान प्राप्त झाले एरवी कीर्तीचा व त्याचा काहीही संबंध नाही , तेथून दोन वडापाव बांधून घ्यायचे बरोबर भरपूर चुरा आधीच बियर शॉप मधून काळ्या पिशवीतून बियर मग ह्या वडापाव ची गाडी व कीर्ती कॉलेज लागून असलेल्या दादर चौपाटीच्या कट्यावर बसायचे
  तेथे दादरचे सांडपाणी भर समुद्रात सोडले जाते त्याचा भयानक गंध त्यात महानगरपालिकेचा भगभगता दिवा ह्यांच्या सानिध्यात आयुष्यातील मळमळ, सल , वैफल्य , महत्त्वाकांक्षा, बेत असे वडापाव व बियर च्या साक्षीने रचायचे , मग शिवाजी पार्कात येउन त्याला फेर्‍या मारणे , असे उद्योग विद्यार्थी दशेत केले होते ,
  बाकी काकांचे मुंबईकर लोकांविषयी अचूक विश्लेषण आहे

 35. dev says:

  wah
  ata ek ajun lekh houde
  kontyahi shahart “mumbaikar kasa olkhava”
  1. jo gadi thambaichya aat utaraychi ghai karto
  2. rastyavarchi lok sodun kadechya panwalyala rasta vicharto…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s