दुःख…

दुःख

दुःख

काही महिन्यापूर्वी सुख म्हणजे काय हा एक लेख लिहिला होता. आज   दुःख म्हणजे काय – हा विषय घेतोय लिहायला. मला जिवंत लोकांपेक्षा मेलेल्या लोकांविषयी जास्त आदर वाटतो, किंवा जे जन्मले नाहीत त्यांचा तर हेवा वाटतो, कारण या जगात  येऊन चालणारी दुष्कृत्य, विश्वासघात, प्रेम भंग, वगैरे  पहायची वेळ येत नाही .

आपले संत महात्मे , अगदी कुठल्याही धर्मातले घ्या,  सगळ्यांनी आयुष्यात खूप दुःख भोगलेले आहे. जिझस, कृष्ण, राम, गौतम बुद्ध, पैगम्बर सगळ्यांचे आयुष्य खूप  कष्टात गेले. कदाचित  हेच एक कारण असेल की आपण स्वतः कायम दुःखाला खूप प्राधान्य देत आलो आहोत.  दुःखी रहाणे म्हणजे काही तरी चांगले असाही काही लोकांचा समज होत असतो . आपल्या देवाप्रमाणेच आपणही अशीच काही दुःख भोगावी म्हणून तशीच दुःख अनुभवणारी काही धर्म संस्था आहेत.  Da vinci Code  आठवतो का?

समजा तुमच्या आवडीच्या टी-सेट मधला एक  कप  फ़ुटला तर? कप फुटला म्हणून “वाईट वाटेल”, दुःख होणार नाही. दुःख होणं आणि वाईट वाटणं या मधे आपली नेहेमीच गल्लत होते. सायकल चालवणे  शिकतांना पडणे, शाळेत कमी मार्क मिळणे , वगैरे लहानसहान गोष्टी या वाईट वाटण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण मग   दुःख होतं म्हणजे मग नेमकं काय होतं ?

एखाद्या घटनेमुळे जेंव्हा” वाईट “वाटते तेंव्हा  त्या मुळे वाईट वाटते ते पण     तेवढ्यापुरतेच असते.कदाचित  काही तासात, किंवा एखाद्या दिवसात तुम्ही ती घटना विसरून पुन्हा आपलं आयुष्य नेहेमीप्रमाणे  हसतमुखाने जगणे सुरु करता.  पण दुःख म्हणजे   ज्या गोष्टी मुळे आपल्याला खूप दिवस वाईट वाटत रहातं.  इतकं  की   त्या शॉक मधून कित्येक दिवस बाहेर पडू शकत नाही ते दुःख.  पटतं का? म्हणजे तुमच्या घरातल्या एखाद्या जेष्ठ व्यक्तीचा, आई- वडील, भाऊ वगैरे कोणाचा तरी मृत्यु. किंवा तुमच्या कारचा ऍक्सिडेंट होऊन तुमचे फ्रॅक्चर होऊन अंथरूणाला खिळून रहाणे , उदर उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणे वगैरे घटनांच्या नंतर जे वाईट वाटत रहाते त्याची तीव्रता आणि काळ खूप जास्त असतो, अशा घटनांमध्ये जे वाईट वाटत रहाणे असते, त्याला   दुःख हा शब्द वापरणे योग्य ठरेल .

एखादी दुःखद घटना घडली की मग पहिले तर ती घटना नाकारण्या कडे आपला कल असतो. असं माझ्या बाबतीत होऊच शकत नाही . काहीतरी नक्कीच गफलत झालेली आहे,  जे झालंय ते चुकीचे आहे, आणि लवकरच काही तरी होईल वगैरे विचार मनात येत रहातात. घडलेली घटना ही घडलेली नाहीच ही मनाची धारणा होऊन बसते. ह्या स्टेज मधून बाहेर यायला बरेच दिवस लागू शकतात.

पण  काही दिवसानंतर मग मात्र घडलेली घटना   मान्य केली जाते.एकदा ही वाईट घटना मान्य केली की मग एकटे रहाणे सुरु होते. कोणाशीच बोलायची इच्छा होत नाही.  आपल्या दृष्टीने त्या घटनेशी संबंधित असलेल्या किंवा कारणीभूत असलेल्या सगळ्या लोकांबद्दल संताप होणे सुरु होते.  ह्या राग येण्याची सुरुवात जरी इतरांचा राग येण्याने झाली तरीही शेवट स्वतःचाच राग येण्यात होतो.

ह्या रागाचा भर ओसरला की मग स्वतः आपण ” असं केलं असतं तर बरं झालं असतं” . जर कोणाचा मॄत्यु झाला असेल तर दुसऱ्या डॉक्टरचे ओपिनिअन घ्यायला हवे होते.नोकरी मधला प्रॉब्लेम असेल तर , बॉस ची थोडी चाटूगिरी करायला हवी होती, असे अनेक विचार मनात येतात. एकदा वेळ निघून गेल्यावर या विचारांचाही काही फायदा  नसतो, पण बरेच स्वप्न रंजन करण्यात आपण वेळ घालवतो.जेंव्हा ह्याची जाणीव होते की आत ह्या सगळ्या विचारांचा काही फायदा नाही, तेंव्हा मात्र डिप्रेशन ची स्टेज सुरु होते.

डिप्रेशन होण्याचे मुख्य   कारण  म्हणजे ,आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव होणे. या पिरियड मधे स्वतःबरोबर जास्त वेळ घालवण्याची प्रवृत्ती वाढते . मन खूप नाजूक होऊन जातं.   एकटे बसून रहाण्याची इच्छा होते. अशा वेळेस मात्र देव आणि दैवाची साथ हवी हवीशी वाटू लागते. आयुष्यभर निरीश्वरवादी वादी असलेले लोकं पण देव आणि दैवाच्या मागे लागतात. नामस्मरण करण्याचा काळात तुमचे मन इतर विचारांपासून मुक्त होते, आणि ” बरं वाटणे” ही प्रक्रिया सुरु होते. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत केवळ देव – दैव साथ देते असे नाही, इतरही बऱ्याच गोष्टी जसे दुसऱ्या कुठल्यातरी कामात गुंतून जाणे, किंवा काही काळ निघून जाणे हे पण कारण असू शकते. हाच काळ वाईट सवयी लागण्याचा (दारू पिणे वगैरे ) असतो.

डिप्रेशन संपलं की मग जे काही झालेलं आहे, ते तुमचे मन मान्य करते, आणि एकदा एखादी गोष्ट मान्य केली की मग मात्र त्यातून दुःखावर मात करणे अगदी सहज शक्य असते. प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी तरी असे प्रसंग येतात, पण मला तरी नामस्मरण आणि देव आणि दैवाची जास्त मदत होते हे नक्की!

हे संपलं की खरी सिल्वर लाइनिंग दिसणे सुरु होते. आपण त्या दुःखा  मधून  बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे सुरु करतो. सगळं विसरून नवीन काही तरी सुरु केल्याशिवाय काही गत्यंतर नाही हे लक्षात आल्यावर  पुन्हा आपल्याच नेहेमीच्या आयुष्यात रिएंट्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केले जातात.  बऱ्याच आशा असतात, अपेक्षा असतात. अपेक्षांच्या हिंदोळ्यावर  कुठे तरी ऍक्सेप्ट केलं जाईल  ह्या आशेवर जीवन जगणं सुरु रहातं.. हे सगळं प्रत्येकालाच   कधी ना कधी तरी अनुभवावे लागते, फरक इतकाच , की काही लोकं डिप्रेशन मधून लवकर बाहेर पडतात, तर काही लोकांना खूप वेळ लागतो. शेवटी आयुष्य आहे ते जगायचं असतंच ना प्रत्येकाला!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , . Bookmark the permalink.

60 Responses to दुःख…

 1. अभिषेक says:

  काका परवाच तुमची (आणि लेखांची) आठवण आली होती… होता कुठे! पोस्ट अजून वाचायची आहे 🙂

 2. गुरु says:

  क्या एनालिसिस है काका!!!!!! बस कल से गयेवी पोट्टी के ख़्वाब बंद अन नयी पोट्टी खोजना सुरु!!!!!

 3. विनायक बेलापुरे says:

  mast … as usual

 4. भारत मुंबईकर says:

  काका,

  एकदम बरोबर.

  हे जीवनातील अविभाज्य असे अंगच आहे. त्याला सामोरे गेलेच पाहिजे.

  • भारत,
   न टाळता येणारी गोष्ट असल्याने समोरा जावेच लागते. कुठेही ” ब्रेक डाउन ” होता कामा नये एवढेच.

 5. Abhay Mudholkar says:

  baryach diwanni tumachya lekhache mail ale ani lagech lekh wachala. pahilya pratham likhan parat suru kelyabddal dhanyawaad!
  lekhacha vishay pan chhan ahe and tumhi to nehmichya tarhene chaan mandala ahe.
  Greta!
  Welcome back! Looking forward to your more posts.
  Abhay Mudholkar

  • अभय,
   थोडा पर्सनल कामात गुंतल्याने इकडे लक्ष देउ शकत नव्हतो . पण आता मात्र नियमीत लिहायचे ठरवले आहे.

 6. Gauri says:

  छान पोस्ट…. इनफॅक्ट तुमच्या सगळ्याच पोस्ट्स इंट्रेस्टिंग आहेत…2 महिन्यांपुर्वी एका म्हणीचा अर्थ शोधत होते नेट वर तेव्हा तुमची ‘गमतीशीर म्हणी’ ही पोस्ट वाचली आणि नंतर रोज काही ना काही वाचत गेले आर्काइव्स मधून…कॉमेंट मात्र आज देतेय 🙂

 7. shrikant s. thakur says:

  mala ha lekh khup aavadala.ajunahi asech navin vishay tumchya kadun vachayala milavet hich apeksha.abhinandan.

 8. alka patil says:

  Abhay mhanato te khare aahe, we were missing ‘ kai vatel te ‘. mail pahilya barobar tumcha lekh vachala. vishay atishay mahatvacha ani sarvanchya manatla aahe. Chan lihita.

  • अलका,
   वेळ प्रत्येकावरच येते, फक्त त्या वेळेस पॉझिटीव्ह फ्रेम ऑफ माईड ने सामोरा जाऊन फेस करणे किती आवश्यक आहे हे सांगायलाच हा लेख लिहिलाय.

 9. shubhalaxmi says:

  hello kaka,
  khup chan ahe lekh…. pudhchya lekhachi vat pahate…..
  bye tc

 10. Poorva says:

  Mahendra Sir ,

  Its true….. Superb.

  Poorva Kulkarni

 11. Sarika says:

  Break k baad… Nice one…

  • सारीका,
   हा ब्रेक थोडा मोठाच झाला, पण या पुढे नियमित लिहीण्याचा प्रयत्न करीन. या वर्षी ब्लॉग च्या वाढदिवसाचा लेख पण लिहिला नाही, १३ लाख व्हिजिटर्स झाल्यावर पण काही लिहिले नाही, थोडं जास्तच दुर्लक्ष झालं होतं. 🙂 असो.. आभार.

 12. Mahesh Atale says:

  Lekh khup changla, thodkyat sarv samjaun sangnara.. but Hya chakrala bhednara mantra , marg, he hi dyavet jyayoge he chakra ( satat firat rahanare) kuthe tari thambel.. as from the patients point of view, RESULT is more important than ANALYSIS.!.

  • महेश
   प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. काही लोकं दारूचा पेला जवळ करतात, आणि त्यात बुडून विसरून जाण्याचा प्रयत्न करतात, पण मला स्वतःला नामस्मरण आणि भक्तीमार्ग जवळचा वाटतो. नामस्मरण, किंवा पूजा करतांना मन एकदम शांत होतं हा माझा अनुभव आहे.

   • Mahesh Atale says:

    He matra khar. pan tya barobarach Heavy exercises jase ki kiman 5/10 kilometer Walking, boxing ( on bag of course ) or swimming, cha pan khup fayda hoto. Fact TYA KSHANI dok yevdh sataklel ast na ki SARASAR vicharbuddhich manus haravun basto.. ani Namsmaranapasun te vyayamaparyent sarv goshti hya SARASAR vicharannich hotat na..

    • बरोबर.. मी दररोज सकाळी १तास आणि रात्री ४० मिनिटे फिरतो. चांगले स्ट्रेस बस्टर आहे ते..

 13. samidha says:

  खुपच छान पद्धतीने माणसाचे दू:ख आणि त्या दू:खाच्या वेदनेतून त्याचा होणारा प्रवास संगीतला आहे . खरच आहे नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवावी जेंव्हा आपल्या समोरील एक दरवाजा बंद होतो …तेंव्हा नक्कीच थोड्याच अवधीत आपल्या समोर अनेक दरवाजे उघडतात फक्त डोळसपणे कोणत्या दरवाजातून आत जायचे याचे भान ठेवावे ….! आणि ते भान रहाण्यासाठी आणि दू:खावर मात करायची असेल तर आपली मानसिक ताकद जास्तीत जास्त कणखर (strong ) पाहिजे . आणि आणि ही सहनशीलता वाढविन्याची ताकद अध्यात्म़ात आहेच। …. पण आपले मन भरकटु नए यासाठी जास्तीत जास्त दू:खी व्यक्तिनी आपल्या आवडत्या चांगल्या गोष्टींच्या , व्यक्तींच्या (मित्र /मैत्रीणी , साहित्य /संगीत /नाटक) जे जे आपल्याला पोझिटिव एनर्जी देतील त्या सर्व गोष्टी करव्यात…त्याच्या सानिध्यात रहावे !

 14. स्वप्न रंजन व दिवास्वप्न ह्यांच्यात लय टायम जातो राव
  जर्मनीत आल्यावर सुरवातीला नेहमी वाटायचे अबुधाबी मधून परत लंडन ला आलो असतो तर ह्याच विचारात पुढचे स्वप्न रंजन
  माझी सुरुवातीची काही वर्ष जर्मनीत फारच लेखात उल्लेख केला तश्या अवस्थेत गेली.
  आता कुठे ह्या सगळ्यातून बाहेर पडत आहे.

  • निनाद,
   परदेशी असतांना वाटणारा एकटेपणा फारच वाईट. हाउस वाइफ असेल तर तिची परिस्थीती अजूनच वाईट होते. तुझे अनुभव खरंच लिही तू. अगदी जे काही मनात येईल ते लिहीत जा, ’दिलसे’!

 15. Raghu says:

  Khup divasani ani nehami pramane khupach chaan.. Welcome back..

 16. गुरु says:

  ओन अ सीरियस नोट काका, मला असं वाटतं की डिप्रेशन च्या फेज मधून बाहेर यायसाठी कधी कधी काही “पॉजिटिव व्हिम्स” पण असावीत माणसाला. फिंगर पेंटिंग एक असाच शौक उदाहरणार्थ , रंगात बोटे बुडवा अन कागदावर घासा, तुमचा सगळा वैताग कागदावर उतरतो मन साफ़ होत अन कधी कधी ती एक उत्तम कलाकारी होऊन जाते!!!!. मी पर्सनली बाइकिंग प्रेफर करतो !!! विचारांच काहुर माजलं की सरळ जानेमन बाहेर काढली की एक किक हाणा अन 30-40 किमी संथ गतीने हिंडून या!!! मूड फर्मास फ्रेश होतो, त्याशिवाय ispirational कविता वाचन हे एक आवडते काम माझे. रोबर्ट फ्रॉस्ट ची “द रोड नॉट टेकन” , विलियम एर्न्स्ट हेन्ले ची “इन्विक्टस”, कुसुमाग्रजांची “कणा”, द पोएम ऑफ़ फ़ू मांचू (जापानीज माणसाची कविता) ह्या काही निवडक आल टाइम बेस्ट काविता

  • गुरु,
   अरे लेखाचा विषय दुःख … त्या मुळे मेंदूमधे होणारी एंडॉर्फिन ची निर्मिती हा मुख्य मुद्दा आहे. जितकं जास्त एंडॉर्फिन तयार होईल तितकं लवकर बरं वाटणे सुरु होईल . कॅथॉर्सिस ( थकून जाण्याइतका मानसिक व शारीरिक व्यायाम करणे , ( बॉक्सिंग, जॉगिंग, खेळ, ) किंवा मोठमोठ्याने आरत्या म्हणणे, श्लोक म्हणणे, जप करत बसणे असे अनेक उपाय आहेत. या सगळ्या उपायात एकच उद्देश असतो, मनाला आणि शरीराला इतके थकवायचे , की त्याला तुमच्या सद्यःस्थितीचा विसर पडावा. हे सगळं केलं की एडॉर्फीन च्या निर्मितीत वाढ होते आणि बरं वाटणं सुरुहोतं.. BTW, Depression वर एक लेख पूर्वी लिहिला ्होता..

   • गुरु says:

    नक्कीच काका! पण तुमच्या इतकं मी नव्हतं न विश्लेषण केलेलं ! सो फ्लो चार्ट मधल्या ज्या ब्लॉक वर बोलता येईल असं वाटलं त्या वर बोललो!!!!!

    😉 😀 😀

    • गुरु says:

     वैसे काका endorphine फ्लो बढ़ने के लिए कोई मेडिकेशन नहीं रहता क्या???

     • त्याची निर्मिती ब्रेन मधे होत असते. त्याचे प्रमाण वाढले की तुम्हाला बरे वाटणे सुरु होते… आणि त्याचा फ्लो वाढवण्यासाठी???होय, मला माहिती असलेले , एल एस डी, ब्राऊन शुगर , लाल परी, चरस ….. बरेच आहेत. पण नंतर येणारा . जोक अपार्ट, पण ऍड्रिनॉलीन , सेरेटोनीन, ग्लुटामेट आणि एनकेफ~लीत या केमीकल्स च्या मेंदू मधे होणाऱ्या निर्मीती तुम्हाला डिप्रेशन होण, लो वाटणं वगैरे होत असते, पण एंडॉर्फिन ची निर्मिती झाली हा इफेक्ट कमी होऊन तुम्हाला बरे वाटणे सुरु होते.मनाची चंचलता कमी झाली की एंडॉर्फीन ची निर्मिती वाढते. असो जास्त बोअर करत नाही फार जास्त टेक्निकलॅटीज मधे जाण्याचा मला अधिकार नाही, कारण मी सायकॉलॉजिस्ट नाही 🙂

 17. भानस says:

  विश्लेषण एकदम चांगले केले आहेस. एकदा का आपला आपल्याशीच चाललेला झगडा संपला की हे दु:ख लवकरच संपणार आहे ही भावना मूळ धरु लागते. मग त्या दिशेने मनाचा सकारात्मक प्रवास सुरू होतो. 🙂 🙂

  • श्री,
   जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नसते ही गोष्ट एकदा लक्षात आली की मग मात्र सगळं सोपं होतं. प्रत्येक काळ्या ढ्गाला चंदेरी किनार असतेच, फक्त ती प्रगट व्हायला कधी कधी थोडा वेळ लागतो ,एवढेच!

 18. suhas adhav says:

  chan post aahe… 🙂 engineering nuktich sampli tyamule lakshat aahe…. last sem 8 madhye s/w project managment madhye …. change manangement hya chap madhye elisabeth kübler ross chya 5 stages aahet…. tyachyashi milta julta vatla lekhatil kahi stages.
  tithe fakta char oli hotya topic madhye ethe tyacha explanation pan hota 😀

 19. D B DESAI says:

  dev and namasmarana barobarach aplya kharya mansanchihi dukhatun sawarnyat madat hote. sadhya ashya kharya aplya manasancha tudavada ahe and khotya devbhakticha sukal chalala ahe. aplya manachi takad, vicharanchi takad, sharirachi takad he sagalech nehami changale thevale pahiji and vadhavata ale pahije. kathin ahe. samajala, patala tari karta yeilach ase nahi pan nustya namasmaranane, devbhaktine kam honar nahi. te kelyamule ji manashanti milte, utsaha milto, adhar watato, man tharyawar yete teva aple swatache prayatna kele pahijet ani deva/daivachi sath asel hyawar vishwasahi thevala pahije.

  • देसाईसाहेब,
   धन्यवाद. डीप्रेशन वर आधी एक वेगळा लेख लिहीला होता, त्यात हे सगळे मुद्दे कव्हर केले होते. पुनरावत्ती नको म्हणून इथे टाळले.

 20. madhuri says:

  Mi sadhya same position madhun jaat aahe. office work , time madhe punctual asundekhil phakta annyayavirudha daad maagaayla gelo mhanun chargesheet dili geli. delhivarun enquiry honaar aahe. Aani boss chi chaatugiri karun maaze junior mala cross karun gele. (je office madhe rummy play kartaat & late comer) .So nowadays I am near to god. Baghuya, Satyaala Maran aste ka naahi.

 21. Girish says:

  MBK, i guess shevti vyakti titkya prakruti mule prateyakachi garaj ani understanding of situation vegli aste.. kuni dukhi hoto kiva vait vat te kiva koni nirvikar asto..aso, was great to read ur blog after a gap.

  • गिरीष
   या चक्रातून बाहेर पडायला कॊणाला आठवडा पुरतो तर कोणी महिना घेतो. व्यक्ती तितकया प्रकृती हे खरंय अगदी.

 22. Amol bhalerao says:

  Aaj hya velela mi tyach candision madun jath aahe

 23. Ishwar Lad says:

  It`s good to know about the feelings of grief.

 24. Hema Chipte says:

  chan visheleshan kele ahe dukhache tumhi……

 25. Vivek Deshpande says:

  Kaka, mala pan saddhy asacha tras hot aahe. mala yatun baher padayache aahe. Thumi madat karal ka?

 26. लेख फार उत्तम उतरलाय …..डोळे भरून आले ……..

  ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते सुख अन ज्या गोष्टीत यातना ( शारीरिक अथवा मानसिक ) होतात ते दुःख, माझ्या मते दुःखाची व्याख्या सुखाच्या व्याखेच्या परस्पर विरोधी असावयास हवी ……पण मुळात तसे होत नाही ….काही लोक दुसऱ्याला सुखात पाहून दु:खी होतात ….
  काही लोक दुःख विसरण्यासाठी दारूचं आसरा घेतात ,,,पण दारू उतरल्यावर तेच दुःख त्याचा पिच्छा सोडत नाही …पण दारू हे एक अस साधन आहे कि जे दु:खात अन सुखात दोन्ही वेळेला उपयोगी
  ( पिनाऱ्यांच्या ) पडते . तर काही लोक निराश्याच्या गर्तेत पडून आत्महत्याही करतात …
  नामस्मरण हा एकमेव मार्ग मला या ठिकाणी दिसतो …..पण त्याबरोबर पारिवारिक / मित्र परिवाराच पाठबळही मिळण्याची गरज असते ….
  आत्महत्या कधीही मार्ग ठरू शकत नाही ….हे जीवन फार सुंदर आहे आणि मी ते जगणार …हीच भावना मनात ठेवून प्रत्येक संकटाचा सामना करण्याची शक्ती मला दे – हीच परमेश्वराजवळ प्रार्थना …..
  रामकृष्ण हरी …….

 27. nitinbhusari says:

  I had read this article long back before my accident. This information kept me away from depression. Thank you sir for such wonderful article.

Leave a Reply to Poorva Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s