तुका म्हणे..

काही दिवसापूर्वी संत तुकारामांची गाथा वाचणे सुरु केले. तुकाराम महाराजांचे स्त्री विषयक विचार पाहून ” हे असे का?” हा प्रश्न मनात नक्कीच उभा राहिला. गाथे मधे एका अभंगात हे असे लिहिलेले आहे:-

गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी,
लाड देता तियेसी, वाटा पावे कर्माचा,
शुद्ध कसूनी पहावे, वरी रंगा ना भुलावे
तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी तें.

तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातले. स्त्री, पुरुष, जात, पात अजिबात न मानण्याचा वारकरी संप्रदायाचा शिरस्ता असतांनाही जेंव्हा तुकाराम महाराज जेंव्हा हा अभंग लिहितात, तेंव्हा त्यांना खरंच काय अभिप्रेत असावे हा  प्रशन पडतो. चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र आहे, या पूर्वापार चालत आलेल्या विचारांचा पगडा तुकाराम महाराजांवर पण होता का?

हा अजून एक अभंग पहा:-

स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ट वा पाषाण मृत्तिकेच्या,
नाठवए हा देव न घडे भजन, लालचावले मन आवरेना.

दृष्टी सुखे मरण, इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ
तुका म्हणे जरी अग्नि झाला साधु, तरी पडे बाधू संघष्टपणे.

स्त्रियांच्या संपर्कात पुरुष आला, की पुरुषाचे मन लालची होते, आणि मनात वासना निर्माण होतात. स्त्रिया या अग्नी सारख्या असतात, कितीही सौ़म्य असल्या तरीही त्यांचा स्पर्श हा भाजून टाकणारा – दाहकच असतो ,आणि तो बाधल्या शिवाय रहात नाही. पुराणात लिहिलेल्या विश्वामित्र मेनका,रामायण, महाभारत या ग्रंथांमधल्या घटनांचा विचार त्यांच्या मनात आला असेल म्हणून हे असे अभंग लिहिले असावे का?

बाईल तरी ऐसी व्हावी, नरकी गोळी अनिवार
घडॊ नेदी तीर्थ यात्रा, केला कुत्रा हात सोका.
आपुलीच करवी पूजा, पूजवी देवासारखे,
तुका म्हणे गाढव पशू, केला नाश आयुष्याचा.

हा अभंग पण स्त्री विषयक विचार जास्त स्पष्ट करतात. तुकाराम महाराजांच्या मते स्त्रिया या जात्याच चतूर असतात, लाडीगोडीने , गळे पडू पणा करून बरोबर आपल्या नवऱ्याला कह्यात घेतात. स्वतःच्या तारुण्याच्या आणि सौंदर्याच्या जोरावर त्याला कुत्र्यासारखा लाचार बनवतात. शेवटी काय, तर बायकोच्या आहारी गेलेल्या पुरुषाला गाढवा इतकी पण किंमत रहात नाही.

स्त्री च्या प्रेमात गुंतलेल्या प्रुरुषाला मग परमार्थाबद्दल ओढ कशी काय वाटू शकेल? सगळा वेळ जर बायकोचे सौंदर्य रसपान करण्यात जात असेल तर आध्यात्मिक उन्नती कडे दुर्लक्ष हे होणारच. पुरुषाच्या कॉन्सन्ट्रेशन क करता येण्याच्या  दोषासाठी पण स्त्री लाच दोषी मानलेले का असावे? अशा पुरुषांबद्दल तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग पहा.

बाईल अधीन होय़ ज्याचे जिणे, तयाच्या अवलोकने पडिजे द्वाड,
कासया ते जंत जिताती संसारी, माकडाच्या परी गारुड्याच्या.
बाईलाचा मना येईल ते खरे, अभागी ते पुरे बाइलीचे,
तुका म्हणे मेंग्या गाढवाचे जिणे, कुत्र्याचे खाणे लगबग..

स्त्रियांच्या तोंडात तीळ देखील भिजत नाही, त्या मुळे कुठलीही गुप्त गोष्ट ही स्त्री पासून लपवून ठेवा असे या खाली दिलेल्या अभंगात म्हंटले आहे. त्यांच्या मनात कुठलीच गुप्त गोष्ट रहात नाही, त्या मुळे ती कधी बाहेर पडेल ते सांगता येणार नाही आणि त्याचे परिणाम अर्थातच पुरुषालाच आणि संपूर्ण कुटूंबीयांनाच भोगावे लागतात. कदाचित पूर्वीच्या काळच्या एकत्र कुटुंब पद्धती चा विचार हा अभंग लिहितांना केला गेला असेल का?

“गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी,
लाड देता तियेसी, वाटा पावे कर्माचा”

हा अभंग लिहिताना त्या काळचा विचार केला तर लक्षात येईल की त्या काळी अस्तित्वात असलेल्या एकत्र कुटुंब पद्धती मधे स्त्री ने घरातले बघायचे आणि बाहेरचे काम , पैसा कमावणे वगैरे पुरुषाने करायचे अशी सरळ सरळ श्रम विभागणी केलेली असायची. होती. घरटी ५-६ भाऊ, त्यांच्या बायका , मुलं असा ४०-५० माणसांचा मोठा कुटुंब कबीला असायचा. त्या मधे इतक्या लोकांचा स्वयंपाक, जेवणाचे पहाणे, दुध काढणे, लोणी घुसळणे,चुलीची लाकडं वगैरे असंख्य कामे स्त्रियांच्या वाट्याला असायचे. ही कामं करणं तर आवश्यक होतंच. मग दासी प्रमाणे काम करणे आलेच. खरंच काय अभिप्रेत असावे त्यांना हा प्रश्न पडतोच.

असो.. माझा काही या विषयावर फार अभ्यास नाही तरीही  लिहीतोय..

ज्या प्रमाणे ज्ञानेश्वरी गुढार्थ दिपिका आहे, त्याच प्रमाणे गाथेवर एखादा ग्रंथ कोणाला माहिती असल्यास कृपया इथे कॉमेंट्स मधे लिहा. कारण वर वर दिसणारा अर्थ आणि खरा अभिप्रेत असलेला अर्थ यात फरक असणे नक्कीच संभव आहे.
संदर्भ भक्तीमार्गाचा कळस.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , , . Bookmark the permalink.

24 Responses to तुका म्हणे..

  1. Santosh says:

    Tya kalashi anuroop asawa; ha tumcha wichaar patala Kaka.
    Ani kahi tari wegala wachayla dilat mhanun… Thanks! 🙂

  2. Suoyg says:

    Kaka, suggest to read Prof. Keshav V. Belasre’s books on Tukaram.

  3. तत्कालिन समाजव्यवस्थेचा नाही म्हणले तरी थोडाफ़ार पगडा असणारच. पण तुकोबांचे जर एकंदर साहित्य वाचले तर ’स्त्री’ किंवा ’बाईल’ या शब्द एका केवळ व्यक्तीशी संबंधीत असेल असे वाटत नाही. त्या काळातल्या लोकांना विशेषत: तुकोबांना अभिप्रेत असलेल्या सर्वसाधारण अशिक्षित समाजापर्यंत आपले म्हणणे पोचवण्यासाठी स्त्री , बाईल हा शब्द संसार, विषय यासाठी एक रुपक म्हणून वापरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    “गुज बोलावे संतासी, पत्नी राखावी जैसी दासी” यात मला वाटते परमार्थ साधताना संसार, भौतिकता या गोष्टींना दुयम स्थान देण्यात यावे असा अर्थ अभिप्रेत असावा.

    “लाड देता तियेसी, वाटा पावे कर्माचा” यात केवळ परमार्थच नव्हे तर दुय्यम असला तरी संसारही (कर्म – कर्तव्य) तितकाच महत्वाचा आहे. असे तर म्हणायचे नसेल तुकोबांना?

    • विशाल
      ज्ञानेश्वरी गुढार्थ दिपीका आहे, त्यावर राम शेवाळकरांचे पण बरेच साहित्य आहे, पण गाथे वर मात्र काहीच साहित्य मिळाले नाही.

  4. samidha says:

    काही वर्षा पूर्वी सकाळ वृत्तपत्रात “कजाग बायका” या मथळ्या खाली सोक्रेटिसची पत्नी आणि तुकाराम महाराज यांची पत्नी ” आवड़ाबाई ” यांचा परिचय करून दिला होता . त्यामध्ये आवड़ाबाई यानी तुकाराम महाराजाना कसे छळले याचे वर्णन केले होते ! पण मला मात्र लेखकाची ती भूमिका पटली नाही .

    प्रत्यक्षात तुकाराम महाराजाना “आवडाबाई” बद्दल कधीच राग नव्हता . तिची आपल्यामुळे होणारी आबाळ , फरफट दिसत होती , समजत होती …(याचा त्यांच्याही मनाला त्रास होतच असेल) पण ज्या पारमार्थिक उंचीवर तुकाराम महाराज पोहचले होते त्या ऊँची पर्यन्त आवडाबाई पोहचु शकत नाही याचीही त्याना जाण होती …! कारण ती माउली संत माउली नव्हती तर लेकरांच्या मायेत अडकलेली माय माउली संसारी स्त्री होती ….!

    एकुणच तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र पाहिले तर त्यांचे मन भौतिक सांसारिक जीवनात कधी रमलेच नाही मात्र पारमार्थिक अध्यात्मिक जीवनाची ओढ़ त्याना संसार , मुले पत्नी यांच्या पासून दूर नेत होती . त्यांचे अस्तित्व त्यांचे ठायी असणे त्यांच्या पारमार्थिक जिवनातील अड़चण होती आणि स्वत:चा हा अनुभव ते अभंगाद्वारे प्रकट करीत असावेत …! थोडक्यात जो परमार्थ साधू इछितो त्याने संसार , भौतिक सुखात अडकू नए असेच त्याना सुचवायचे असावे …!

    • समीधा,
      त्यांना काय अभिप्रेत असावे हेच लक्षात येत नाही . म्हणून मुद्दाम इथे हे अभंग लिहिले आहेत. एखाद्या चांगल्या पुस्तकाचे नाव कळेल या उद्देशाने.
      या अभंगा शिवाय अजूनही बरेच अभंग आहेत जे स्त्री विषयक विचार सांगतात. बरेच दिवस झाले हा विचार मनात घोळत होता, आज हे पोस्ट लिहिले!

  5. Mohana says:

    त्या काळाचा परिणाम असावा आणि त्यात भर म्हणून आवडाबाईच्या संसार सांभाळण्याच्या कसरतीत नकळतपणे त्यांना होणारा त्रास हे ही कारण असावे.
    अवांतर – <<>> – कॉन्सन्ट्रेशन ऐवजी एकाग्रता हा शब्द चपखल बसेल असं वाटतं.

    • मोहना,
      शक्य आहे.. पण स्वतःचे वैय्यक्तिक अनुभव त्यांनी अभंगात गुंफले असतील हे पटत नाही मला स्वतःला. कारण हे अभंग बराच काळ टिकणार हे माहिती होतेच.

  6. Poorva says:

    Dear Mr Mahendra,
    Is this your personal opinion ? now days ladies are forward in each & every field . They are doctors, engineers, pilot, authors, police etc…………. of course I respect saint Tukaram,but I do not agree with some thought.(Abhang).

    Poorva

    • पूर्वा,
      तुकोबाचे म्हणणे आहे ते, माझे नाही. त्याचा गर्भितार्थ काय ते समजले नाही म्हणून हे पोस्ट लिहिले , की कोणी जाणता माणूस यावर काही तरी उत्तर देईल म्हणून! पण तसे झालेले नाही. असो

  7. यातील बरेच अभंग प्रक्षिप्त असण्याची शक्यता आहे. कारण तुकाराम महाराजांच्या नंतर गाठे मध्ये बऱ्याच अभंगांच घालघुसड झालेली आहे. आणि यावर बहुतेक सर्व संत साहित्य अभ्यासकांचे एकमत आहे.

  8. prasad says:

    mala asa vatat ki tukobani ha parmarthik arthane means shtri mhnje apli maya ya arthane hi ha shbd getla asnar.atma ani maya mhnje sharir.atma ha aplya sharirach means mayech rakshan krto tichi seva krto ya arthane asu shkte

  9. महेश कदम says:

    नमस्कार,
    कोणतेही संत साहित्यमधील एक विशिष्ट ओवी वा अभंग काढून त्यावर त्यांच्या विचारांचे मूल्यमापन करने योग्य नाही. त्यानी लिहिलेले समग्र वाचन करून त्यांचा लिखाण अध्यात्मिक अनुभव आणि आचरण यावरून त्याबद्दल आपले मत मांडावे.
    हया लेखातून तुमचा हेतु शुध्द वाटत नसून गाथा वाचताना पण संतसाहित्य हया भावनेतून नसून पूर्वग्रहदूषित चिकित्सा वाटते.त्यांचे आध्यात्मिक अनुभव आणि आपले आचरण पाहुन आपल्या स्वतःचे मूल्यमापन करणे ही पद्धत आहे.
    समग्र गाथा वाचण्याची तसदी घ्यावी नाहीतर समर्थांची दासबोधातील ओवी चा प्रत्यय सर्व संत साहित्यात येईल.

    पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण! उगाच ठेवी जो दूषण!
    तो दुरात्मा दुराभिमान! मत्सरे करी!!
    जयाचा भावार्थ जैसा! तयास लाभ तैसा!
    मत्सर धरी जो पुसा!तयास तेंचि प्राप्त!!

  10. jivan says:

    आपले संत साहित्य हे रुपमात्मक आहे. त्याचा शब्दश: अर्थ आणि मतितार्थ वेगळा असतो. त्यामुळे केवळ वरवर वाचन करून हे समजणो कठीण आहे किंवा थोडाशा वाचनाने ते समजत नाही. त्याचा अर्थ स्वत:ला वाटेल तसा घेणोही चुकीचे आहे. मला वाटते संत तुकाराम महाराजांना बाईल या शब्दाचा मतीतार्थ वाईट विचार जसे की काम, वासना, क्रोध इ. अभिप्रेत असावा. कारण अशा वाईट विचारांच्या संगतीला माणूस लागला की त्याचे नुकसानच होते. श्रीकृष्णाला सोळा सहस्र बायका होत्या असे आपण ऐकतो. परंतू एका संत सज्जनानी मला सांगितले की याचा अर्थ श्रीकृष्णाचे माणसाचे जेवढे दुर्गूण मानले जातात त्या सर्व दुर्गूणवर नियंत्रण होते. असे असले तरी शब्दश: अर्थ करून तथाकथित बुद्धीवादी चांगले घ्यायचे सोडून विनाकारण वादविवाद करतात. त्यामुळे मुळ उद्देश बाजूलाच राहतो.

  11. विठ्ठल नांगरे says:

    ऊत्कृष्ट

  12. श्रीकांत सावंत says:

    आती सुन्दर

  13. मधुकर कामळे says:

    खर तर संताच्या अभंगाचा अर्थ समजन्या एेवढी समज मला नाही..पण संतांचे विचार सत्य असुन आचरणात आणल्यास मानवतेचा वीकास नक्कीच होतो असे मला वाटते…धन्यवाद

  14. Ankush Khot says:

    वरवर दिसणारे सारे खरे नसते स्त्री हीच जननि असते ,अभंग गाथे मध्ये इतर कोणीतरी घुसडले असण्याची शक्यता नाकारतायेत नाही

    • अंकुश,
      अभंगाचा शब्दशः अर्थ कधीच अभिप्रेत नसतो, त्या प्रत्येक अभंगाचा काहीतरी गर्भितार्थ असेल तो समजावा म्हणून ही पोस्ट टाकली होती.

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s