कौतुक

महेन्द्र, mahendraस्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून घेतो.
प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या स्वभावात अगदी सारखी असते ती म्हणजे आपल्याला आपले कौतूक केलेले खूप आवडते.  दोन वर्षाच्या चिंगी पासून तर ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत. चिंगी, “तुझे बुटू किती छान आहेत गं ”  , किंवा “तू किती सुंदर आहेस गं”.. म्हटले की चिंगी खूष होते,तसेच एखाद्या ८०वर्षाच्या आजोबांना तुमची तब्येत खूप छान आहे हो असे म्हंटले की ते  खूश होतात.. थोडक्यात काय तर  प्रत्येकालाच आपले कौतूक केलेले आवडते.

आपले  जे वागतो ते पण बरेचदा केवळ इतरांनी आपले कौतूक करावे , आपल्याला चांगले म्हणावे म्हणूनच असते  . बायकोने स्वयंपाक केल्यावर ” छान झाली आहे भाजी” असे म्ह्टले की तिला भरून पावते, त्या पेक्षा जास्त तिची अपेक्षा  पण नसते.  ऑफिस मधे एखादे काम   केल्यावर बॉस ने दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सुखावून जाते .जर कोणी कौतुक करणारे नसेल तर काय फायदा हो  कामं करण्याचा?

कौतूक बरेचदा आपल्याला इतरांकडून हवे असते. आपल्या लोकांकडून नाही. नाही पटत?? उदाहरणार्थ घरात कळकट गाऊन घालून दिवसभर बसणाऱ्या  बायका   तयार होतात  ते केवळ बाहेर निघतांना, कौतुकाची नजर हवी असते ती बाहेरच्या लोकांकडून नवऱ्याकडून नाही, आता काही स्त्रिया म्हणतील, की नवऱ्याच्या  कौतुकाच्या नजरेत स्वार्थ दिसतो 🙂 असो.. विषयांतर होतंय.

मी हे लिहितोय म्हणजे मी पण काही वेगळा नाही. मला पण कौतूक खूप आवडते. मग ते अरे बारीक झालास रे थोडा. असे जरी कोणी म्ह्टले तरी मला आनंद होतो.  ब्लॉग वर पण काही तरी लिहिल्यावर कौतूक व्हावे असे वाटत असतेच, किंबहूना मी लिहितो ते पण केवळ माझे कोणी तरी कौतूक  करावे म्हणूनच!   केवळ याच कारणासाठी आपण काही लिहिले की ब्लॉग ची लिंक मी चार – दोन गृप मधे आणि स्वतःच्या भिंतीवर लटकवत, सोबतच ही जाहिरात नाही हे बिरुद चिकटवायला पण कमी करत नाही

जर एखाद्या व्यक्तिने  आपल्या लेखाचे अपेक्षे प्रमाणे कौतूक केले नाही की मग थोडी चाहूल घेतो, की ह्याने लेख वाचला की नाही आपला?  नाही असे वाटले तर लिंक मेल करतो. नंतर तरीही त्याची रिऍक्शन आली नाही तर फोन करून विचारतो , ” की काय रे लेख वाचला की नाही?”  बरेचदा तर मित्रांच्या पोस्ट वर आपल्या लेखाची लिंक पोस्ट करून इतरांच्या फेसबुक भिंती रंगवण्याचे कामही मी कधी कधी करत असतो.

आपण लिहिलेला एखादा जुना लेख आपल्यालाच खूप आवडलेला असतो, पण त्या लेखाचे फारसे कौतूक झालेले नसते, किंवा कोणी “लेख जमलाय बरं का” असेही फारसे म्हटले नसते, तोच लेख पुन्हा पुन्हा फेसबुक मधे मित्रांच्या  भिंतीवर चिकटवून खरंच  लेख जमलाय की नाही याची चाहूल घेण्यासाठी नाही तर कौतूक करून घेण्यासाठी पोस्ट करतो मी बरेचदा.  म्हणजे काय,   कौतूक  व्हावे म्हणून लिहितो मी.

आत्म समाधान किंवा मला वाटतं म्हणून  मी “काय वाटेल ते “लिहिले असते, तर कौतुकाची अपेक्षा केली असती का? एखादा लेख कोणी वाचला नसेल तर ” अरे माझा तो लेख वाचलास की नाही?” असे विचारून त्याने वाचे पर्यंत पाठपुरावा   म्हणजे  माझा लेख वाच आणि माझे कौतूक कर, छान झालाय म्हण” ही आंतरिक इच्छा लपवून …………….!  किती दांभिक पणा नाही का ?

हे आयुष्य आहे ते आपण जगतोय ते केवळ पाठीवरच्या कौतुकाच्या थापे साठी! लहान मुल जेंव्हा स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभे रहाते, तेंव्हा आई नजरेतले कौतुक त्याला नक्कीच समजते. शाळेत सरांनी केलेले सुंदर हस्ताक्षरा बद्दलचे कौतूक , एखाद्या मैत्रिणीने अरे वा.. मस्त आफ्टर शेव्ह आहे रे म्हणून केलेले कौतूक, नवीन बाईक घेतल्यावर नाक्यावर बाईक घेऊन गेल्यावर मित्रांनी केलेले बाईकचे कौतूक, लग्न झाल्यावर बायको सोबत बाहेर निघाल्यावर नातेवाईकांनी/ मित्रांनी बायकोचे केलेले कौतूक, मुलीचे इंजिनिअरींग पुर्ण झाल्यावर जसे काही आपणच काही तरी मिळवले आहे असे समजून स्वतःचे करून घेतलेले कौतूक…. असे अनंत प्रकार आहे. शेवटी काय तर ह्या आयुष्याचा सगळा पायाच ह्या कौतुकावर अवलंबून आहे.

लेख लिहिलाय बरेच दिवसापूर्वी पण पण पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. आज सहज ड्राफ्ट चेक केले तर हा लेख दिसला आणि पोस्ट करतोय आज..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

25 Responses to कौतुक

 1. ruchira2702 म्हणतो आहे:

  Chhan.. Mast jamlay h… Kaka pan jas kautuk karun ghyayla aavdat titkch nirpeksh aapan konach kautuk ka nahi karat? Changlyala changl mhantana aapan barechda sahaj ka nasto?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   रुचीरा
   मराठी माणसं थोडी कंजूस असतात कौतुक करण्याच्या बाबतीत हे तर अगदी खरं आहे. पण हे ही तितकेच खरे की ज्याला ही नॅक जमली, तो सामाजिक जिवनात पॉप्युलर होतो.

   • वसुधा म्हणतो आहे:

    ॐ महेंद्र आपणास नवीन वर्ष ईसवी सन २०१४ साल ला शुभेच्छां शुभ प्रभात

    • वसुधा म्हणतो आहे:

     ओमं कौतुक वाचून मी पण कौतुक विषय लिहिला आहे पण संगणक कांपूटर ने माझ्या ब्लॉग चा आढावा तयार केला आहे व फेस बुक ने पण आढावा तयार केला आहे त्यांनी केलेले कौतुक साठी लिहिले आहे बाकी कौतुक साठी काही नाही

 2. ganesh patil म्हणतो आहे:

  कौतुक करणाच्या कौतुक हि कोठून येत आहे ..हे खूप महत्वाच आहे ..वर वर कौतुक …आणि ..मनापासून केलेल कौतुक …फरक त पडतोच भाऊ …या लेख साठी तुमच नक्की कौतुक ….

 3. Vinayak Belapure म्हणतो आहे:

  अगदी बरोबर महेंद्र जी
  कौतुक व्हावे ही सुप्त अपेक्षा थोर थोर लोकांच्यात ही आढळते.
  सामान्याचे काय वर्णावे ?
  दु:खातून आलेल्या विरक्तीहून सगळे भोगून झाल्यानंतर आलेली विरक्ती ही नुसती मरगळ नसेल तर एखाद्या शांत डोहा सारखी असेल.
  सोने नाणे मृत्तिकासमान म्हणता येण्यासाठी त्या पातळीला पोहोचावे लागत असावे
  आपण कुठवर तिथे पोहोचणार ?

  छान लिहिलाय (हे कौतुकाने नाही तर मनाला भिडल्याने लिहितोय )

 4. anuvina म्हणतो आहे:

  साहेब,
  थोडक्यात काय तुमचे अगदी राजे महाराजे यांच्या सारखे आहे …. ;). तुमच्या या दरबारात आमच्या सारखे बरेच स्तुतीप्रधान भेटतील.
  नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 5. Sameer Raje म्हणतो आहे:

  वाह साहेब , छानच लेख लिहिलात .तुमचे खूप कौतुक

 6. Sarika म्हणतो आहे:

  Kaka,
  Nehmipramane Lekh chhan. Kautuk/appreciation pratyekala havech aste… tyane ajun utsah vadhto…. mansachya svabhavatla ajun ek mahatvach nirikshan mhanje jas kautuk aavdat tasach konihi chuk kadhleli/dakhavleli konalach aavdat nahi asa maz nirikshan aahe…

 7. arunaerande म्हणतो आहे:

  man is a social animal and hence, lives in the society and thrives on interaction. it is but natural for anyone to want to get noticed. Nothing wrong with it. that, this expectation does not get fulfilled many times is sad. but that to is human nature. many times one purposely abstains from appreciating someone cause maybe he wants to tease that person or is genuinely against that person.
  that apart, i do appreciate your posts and enjoy them. many times share them with my friends too. 🙂
  so keep writing irrespective!

 8. vrdhotre म्हणतो आहे:

  I really like your posts. Please asech blogs lihit ja. Khup divas zale tumche posts pahile nhavte. Aaj pahun khup aanand zala. Parva lihilela friends che types ha tar post mla khup aavadla.

 9. suhas म्हणतो आहे:

  chan jamlay lekh.. 🙂 kavtuk far mahat vachi bhumika par padhta…. chemical reaction madhye jashi bhumika catalyst par padhta tasa kahi… kamachi stuti ekprakare aajun changlya level var gheun jayla kharach khup madat karte

 10. tush म्हणतो आहे:

  mi first time blog vachla khup chhan vatale……thank u…..

 11. Chandrashekhar Bhoite म्हणतो आहे:

  manushya ha kautuk, stuti yachach khara tar bhukela asto.pan tasa to dakhwat nahi. tumchyakade te dharishtya ahe. mhanunch tuche kautuk v abhinandan.

 12. Chandrashekhar Bhoite म्हणतो आहे:

  tumche ya shabdatil m khalla gela tyachi hi durusti.

 13. प्रिती म्हणतो आहे:

  हो मला मान्य आहे कि आपले कौतुक प्रत्येकाला अगदी मनापासून आवडते; आणि त्यात काही वावगे आहे असेही मला वाटत नाही. कारण कौतूकाच्या अपेक्षेने का होईना पण हाती घेतलेले काम अधिकाधिक चांगले (कौतुकास पात्र) कसे होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहतो. पण दुसर्‍याने आपले कौतुक करावे(किंवा दुसर्‍यांकडून कौतुक व्हावे) हि अपेक्षा कितपत योग्य आहे? किंबहुना योग्य आहे का? नाही? हा प्रश्न विचार करण्यास प्रवृत्त करतो.
  (For Example) मी एखादा प्रोजेक्ट किंवा मला दिलेले एखादे उद्दिष्ट खुप मेहनतीने चांगल्याप्रकारे(कौतुकास पात्र असे) पुर्ण केले असेन. पण फक्त आकस बुध्दिने माझे सहकारी, वरीष्ठ त्याची दखलही घेत नसतील; म्हणून काही माझे काम कौतुकास पात्र नाही असे होत नाही.
  उलटपक्षी असेही होईल की, मला माहीती असेल एखाद्या गोष्टीबाबतीत मी कौतुकास पात्र नाही; पण केवळ माझ्यावरील प्रेमापोटी माझे आप्त, जिवलग माझ्यावर उगाचच कौतुकाचा वर्षाव करीत असतील.
  मग वरील दोन्हीही बाबतीत मी माझ्यावर केलेल्या/न केलेल्या कौतुकाचा किती परीणाम करुन घ्यायला हवा ??
  तात्पर्य: दुसर्‍यांकडून कौतुकाची अपेक्षा करण्याऐवजी स्वत:लाच स्वत:चे कौतुक करायला यायला हवे. म्हणजे आपण दुसर्‍याने न केलेल्या कौतुकाबद्दल दु:खी होणार नाही व गरज नसताना केलेल्या कौतुकाने हुरळुनही जाणार नाही.
  या प्रसंगी इंग्रजीतील एक छान Thought मला आठवला आहे: Value yourself; because if you don’t know your own value & worth then don’t expect other will calculate it for YOU. 

 14. प्रिती म्हणतो आहे:

  हो मला मान्य आहे कि आपले कौतुक प्रत्येकाला अगदी मनापासून आवडते; आणि त्यात काही वावगे आहे असेही मला वाटत नाही. कारण कौतूकाच्या अपेक्षेने का होईना पण हाती घेतलेले काम अधिकाधिक चांगले (कौतुकास पात्र) कसे होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहतो. पण दुसर्‍याने आपले कौतुक करावे(किंवा दुसर्‍यांकडून कौतुक व्हावे) हि अपेक्षा कितपत योग्य आहे? किंबहुना योग्य आहे का? नाही? हा प्रश्न विचार करण्यास प्रवृत्त करतो.
  (For Example) मी एखादा प्रोजेक्ट किंवा मला दिलेले एखादे उद्दिष्ट खुप मेहनतीने चांगल्याप्रकारे(कौतुकास पात्र असे) पुर्ण केले असेन. पण फक्त आकस बुध्दिने माझे सहकारी, वरीष्ठ त्याची दखलही घेत नसतील; म्हणून काही माझे काम कौतुकास पात्र नाही असे होत नाही.
  उलटपक्षी असेही होईल की, मला माहीती असेल एखाद्या गोष्टीबाबतीत मी कौतुकास पात्र नाही; पण केवळ माझ्यावरील प्रेमापोटी माझे आप्त, जिवलग माझ्यावर उगाचच कौतुकाचा वर्षाव करीत असतील.
  मग वरील दोन्हीही बाबतीत मी माझ्यावर केलेल्या/न केलेल्या कौतुकाचा किती परीणाम करुन घ्यायला हवा ??
  तात्पर्य: दुसर्‍यांकडून कौतुकाची अपेक्षा करण्याऐवजी स्वत:लाच स्वत:चे कौतुक करायला यायला हवे. म्हणजे आपण दुसर्‍याने न केलेल्या कौतुकाबद्दल दु:खी होणार नाही व गरज नसताना केलेल्या कौतुकाने हुरळुनही जाणार नाही.
  या प्रसंगी इंग्रजीतील एक छान Thought मला आठवला आहे: Value yourself; because if you don’t know your own value & worth then don’t expect other will calculate it for YOU. 

 15. Anand Namjoshi म्हणतो आहे:

  hello Sir,
  Tumche lekh kharach khup chaan astat, he kautuk nahi ye ter ek khara abhipray aahe majhya kadun 🙂
  Hope we will read more articles in future on his blog.

  Regards,
  Anand Namojshi

 16. tivtiv म्हणतो आहे:

  छान लेख 🙂
  मी पण याच विषयावर आणि याच शीर्षकासह मागे एक लेख माझ्या ब्लॉगवर लिहिला होता 🙂
  (आणि त्या लेखाच्या कौतूकासाठी नाही बर का 😉 ) त्या लेखाची ही लिंक,
  http://tivalyabavalya.wordpress.com/2012/05/14/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95/

 17. Dinesh Pawar म्हणतो आहे:

  Namskar Ssaheb, fakt ekach vinanti aahe ki tumhi lihine chalu theva, tumche lekh farach khup chaan asataat.

 18. राजेंद्र गोविंद वारघडे म्हणतो आहे:

  खरे तर दुसऱ्याचे कौतुक करावेसे वाटणे यात मोठा अर्थ आहें तो म्हणजे मला ते समजलंय याची प्रतिक्रीया ,आजकाल समाजात खोटे कोतुक करणे आणी ती जमणे याला कला असे नाव देण्यात आले आहें त्यामुळे तुम्ही लिहिलेला लेख ज्यांनी मनापासून वाचला समजून घेतला तो कौतुक करीलच मात्र आपलं कोतुक करणारा जाणकार आहें का हे समजले पाहिजे कारण शेकडो अडाण्यांनी केलेल्या कौतुकापेक्षा एका सामान्य जाणकाराने दिलेली थाप ही सुध्दा आयुष्यभराच्या आठवणीत खोल जाऊन राहते आणी सतत् आपल्याला उत्साही ठेवत असते इथे तुमचे कौतुक करताना माझ्यातला जाणकार एकच म्हणेल ,तुमचा लेख वाचणारे ,कमीत कमी कौतुक का आणी कशासाठी करायचं याच तरी उत्तर शोधू लागतील आणी स्वत;लाच विचार समृध्द करतील ,हे ही नसे थोडके…..

 19. महेंद्र म्हणतो आहे:

  मित्रांनो , मी हल्ली ब्लॉग वर फारसा येत नाही, कामाचा व्याप वाढल्याने इकडेथोडे दुर्लक्षच होतंय. म्हणून प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणे जमत नाही. समजून घ्याल अशी आशा करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s