प्लास्टीनेशन

स्त्री आणि गर्भातले मुल प्लास्टीनेशन केलेले

स्त्री आणि गर्भातले मुल प्लास्टीनेशन केलेले

आपले हे शरीर सुंदर दिसावे म्हणून र आपण आयुष्यभर प्रयत्न करतो . फेअर ऍंड लव्हली, गोरं होण्याचं क्रिम , लांब केस होण्यासाठी निरनिराळे शांपु, थोडं लठठ वाटायला लागलो, की जिम मध्ये जाणे, फिरायला जाणे  मॅजिक पोशन म्हणजे वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या त्या पावडरी  घेणे वगैरे…. अगदी काहीही  करून पहाण्याची आपली तयारी असते.   शरीरा वरचे आपले  प्रेम काही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कमी होत नाही. जो पर्यंत जिवंत आहोत, तो पर्यंत तरी हे  रहाटगाडगे सुरुच असते.

आपल्या मृत्यु नंतर या शरीराचे काय? आयुष्यभर ज्या शरीरावर एवढं प्रेम केलं ते असंच जाळून टाकायचं? काही सेन्सेटिव्ह लोकं  ज्यांना सामाजिक जाणीव आहे ते, म्रुत्यु नंतर शरीर जाळण्यापूर्वी  डोळे, स्किन वगैरे गोष्टी दान करण्या बद्दल  इच्छा पत्रात लिहून ठेवतात, माझ्या माहितीतल्या एकाने तर आपले शरीर मेडिकल कॉलेज मधे मुलांना शिकण्यासाठी , डिसेक्शन साठी दान केल्याचे माहिती आहे.गांधीजींनी की नेहरुंनी ते निटसे आठवत नाही, पण आपल्या शरीराची राख सगळ्या भारत देशात विमानातून शिंपडावी अशी इच्छा लिहून ठेवली होती. प्रत्येकाची वेगळी आयडीया असते…

प्लास्टिनेशन नंतर तारा वगैरे वापरून शेवटचे टचेस देताना. या नंतर फक्त सुकवणे ही प्रक्रिया शिल्लक रहाते.

प्लास्टिनेशन नंतर तारा वगैरे वापरून शेवटचे टचेस देताना. या नंतर फक्त सुकवणे ही प्रक्रिया शिल्लक रहाते.

पार्शी लोकांच्या मते मृत शरीर हे अपवित्र, तेंव्हा ते जमीनिवर न ठेवता, हवेत ठेवले जाते, आणि पक्षांनी खाऊन शेवटी हाडं उरली, की चुन्यात विरघळवली जातात.

हे सगळं आठवायचं कारण काय? अहो जगात मृत्यु नंतर आपल्या शरीराचे काय करायचे ह्या बद्दल या  बद्दल काही लोकांच्या भन्नाट आयडीया असतात. काही अती श्रीमंत लोकं -जसे वाल्ट डिस्ने  ह्यांनी भविष्यात कधी तरी मृत व्यक्तीला जिवंत करण्याच्या टेक्नॉलॉजी शोधली जाईल, तेंव्हा आपले शरीर   शरीर पुन्हा जिवंत होण्यासाठी उपलब्ध असावे म्हणून  लिक्विड नायट्रोजन मधे प्रिझर्व करून ठेवावे असे लिहून ठेवले होते. या प्रकाराला क्रायोजेनिक प्रिझर्वेशन म्हणतात.एक कंपनी आहे, लाईफ एक्स्टेन्शन फाउंडेशन नावाची, ती हे काम करते.   alcor.org  नावाची बेव साईट पण अहे त्यांची. तुम्ही जिवंत असतांना त्या कंपनी बरोबर करार करायचा ,की मग ती कंपनी  तुमच्या मृत्युनंतर ताबडतोब तुमचे शरीर ताब्यात घेऊन  प्रिझर्व करून ठेवते- भविष्यात कधी तरी पुन्हा जिवंत करण्याचा शोध लागे पर्यंत….  🙂

असे म्हणतात, की आफ्रिकेत तर एका जमातीत मृत व्यक्तीला खाण्याची पद्धत आहे. म्हणजे ती व्यक्ती म्हणे आपल्यात सामावून जाईल अशी भावना.

स्वतःची स्किन हातात घेऊन उभा असलेला माणूस

स्वतःची स्किन हातात घेऊन उभा असलेला माणूस

अशा असंख्य गोष्टी आजपर्यंत वाचनात आल्या होत्या, पण मृत शरीर हे आर्ट फॉम मधे बदलण्याची आयडीया कशी वाटते? शरीरातले मसल्स , नर्व्हस वगैरे गोष्टींवर प्लास्टीनेशन ची प्रक्रिया करून त्या शरीराला  पोझ  मधे सेट  केले जाते.

आता हे प्लास्टीनेशन म्हणजे नेमकं काय?  मेडीकल सायन्स मधे पॉलिमर्स मधे  बॉडी पार्ट सॅंपल्स  प्रिझर्व केले जातात. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तिचा ट्युमर   काढला आणि टेस्ट केला, पण  पुढे भविष्यातही कधी तरी पुन्हा टेस्ट करायचे काम पडले, तर तो व्यवस्थित रहावा, सडू नये म्हणून  त्याचा एक तुकडा पॉलिमर मधे सेट केला जातो.जेंव्हा पुढे कधी  टेस्ट करायचे काम पडले तर  वरचे पॉलिमर तोडून आतला तो तुकडा पुन्हा टेस्टींग साठी काढायचा आणि हव्या त्या टेस्ट्स करायचा . ही इतकी साधी प्रोसिजर पण लवकरच आर्ट फॉर्म मधे बदलणार आहे हे कोणी सांगितले असते तर त्याला वेड्यातच काढले गेले असते.

१९७७ साली  गुंथर व्हॉन हॅग हा एका लॅब मध्ये  ऍनाटोमी असिस्टंट म्हणून काम करत होता. तिथे त्याने असेच पॉलिमर मधे सेट केलेले शरीराचे सॅंपल्स पाहिले, ते पाहिल्यावर त्याला असे वाटले की जर पॉलिमर एखाद्या भागाचे प्रोटेक्शन वरून ओतल्यावर करू शकते, तर समजा तेच पॉलिमर   त्या पार्टच्या आत इंजेक्ट केले तर?? आणि त्याला लवकरच ह्यात यश मिळाले , आणि या प्रक्रियेचे पेटंटही मिळाले.

ही प्रोसिजर नेमकी काय आहे ?   व्हॅक्युम मधे  ज्या भागाचे प्लास्टीनेशन करायचे आहे तो भाग ठेवतात – सिलिकॉन , आणि इतर पॉलिमर्स च्या  लिव्किड मधे. व्हॅक्युम मुळे त्या भागातली हवा निघून जाते आणि त्या जागी पॉलिमर्स शिरतात.  प्लास्टीनेशन केल्यावर शरीरातले सगळे बॅक्टेरिया मरतात, आणि मग शरीराची सडण्याची प्रक्रिया थांबते.

सेक्स पोझिशन . अशा अनेक प्रकारच्या पोझेस आहेत

सेक्स पोझिशन . अशा अनेक प्रकारच्या पोझेस आहेत

ही प्रोसिजर पाच भागात विभागली आहे. सर्वप्रथम जेंव्हा एखादे शरीर  येते, तेंव्हा त्याची सडण्याची प्रक्रिया थांबावी म्हणून  ते सर्वप्रथम फॉर्मल्डीहाईड मधे ठेवले जाते, आणी त्या शरीराचे हवे तसे डिसेक्शन केले जाते. एकदा मनासारखे डिसेक्शन झाले, की  त्या शरीराला  ऍसिटोन  बाथ देऊन स्वच्छ करतात आणि  नंतर सिलिकॉन रबर, एपॉक्सी रेझीन आणि पॉलिमर्स च्या  बाथ मधे आळीपाळीने ठेवले जाते.  हे सगळे करतांना व्हॅक्युम चेंबर वापरतात, ज्यामुळे हवा निघून जाऊन त्या ठिकाणी पॉलिमर्स पोहोचतात्त, आणी डिकम्पोझिशनची प्रक्रिया थांबते.

एवढे झाले की शेवटचे फिनिशींगचे काम सुरु होते. तारा, ठोकळे वगैरे वापरून  हव्या त्या पोझिशन मधे शरीर सेट केले जाते. हे काम फारच काळजीपूर्वक करावे लागते, कारण ही प्रोसेस रिव्हर्सेबल नाही. एकदा हवी ती पोझिशन सेट केली, मग तो पॉलिमर म हिट, लाईट किंवा हवा वापरून  कडक (हार्डन्ड) केले जाते . इथे हे सगळे केवळ दोन पॅरिग्राफ मधे लिहिले आहे, पण प्रत्यक्षात मात्र एका शरीराचे प्लास्टीनेशन करण्यासाठी कमीत कमी १५०० तास  आणि एक वर्ष लागते.

images (2)ह्या प्लास्टीनेशन केलेल्या  शरीरांचे नंतर म्युझियम मधे ठेऊन प्रदर्शन मांडले जाते. हे प्रदर्शन जग भर फिरतय गेली काही वर्ष. आजपर्यंत म्हणेज चाळीस मिलियन्स लोकांनी हे प्रदर्शन युरोप आणि अमेरिकेत पाहिलेले आहे, पण भारतात तरी अजून पर्यंत आलेले नाही.

प्लास्टीनेशन मधे  आज पर्यंत शेकडॊ प्रकारे शरीराची रचना केलेली  आहे. फुटबॉल, बेसबॉल खेळणारा ऍथलेट , चेस खेळणारा खेळाडू,  घोड्यावर बसलेल्या अवस्थेतल्या योध्या पासून तर गर्भात असलेल्या मुला सकट त्याच्या आईचे केलेले प्लास्टीनेशन तर आहेच पण सोबतच बऱ्याच प्राण्यांचे, पक्षांचे वगैरे पण केलेले प्लास्टीनेशन आहे .

यातल्या काही रचना जसे एक स्त्री आणी  गर्भाशयात असलेल्या मुलाचे केलेले प्लास्टीनेशन   , किंवा संभोग रत असलेली  स्त्री पुरुष   यांच्याबद्दल बरेच उलट सुलट वाद विवाद घडले आहेत. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हे असे करणे म्हणजे मृत शरीराचे धिंडवडे काढणे आहे, तर काही लोकांच्या मते हा एक  एक आर्ट चा  उत्कृष्ट प्रकार आहे.  तसेच आर्ट व्यतिरिक्त या म्युझियमचा उपयोग मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ऍनाटॉमी समजण्यासाठी पण होतो —  इथे त्या मुझियमचा एक व्हिडीओ पोस्ट करतोय, तुम्हीच बघून ठरवा की आर्ट आहे की  नाही ते..

एक बाकी खरं, जर कधी भारतात हे प्रदर्शन आले, तर मी मात्र नक्की पहाणार .

all images courtesy :-Gunther von Hagens, Institute for Plastination. By Jackie Mantey Columbus Alive.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , , . Bookmark the permalink.

22 Responses to प्लास्टीनेशन

 1. सुहास म्हणतो आहे:

  आयला… इंटरेस्टिंग आहे हे सगळं… पहिल्यांदाच ऐकतोय ह्या बद्दल. आणि तुम्ही लिहिते झालात जास्त बघून बरे वाटले 🙂 🙂

  अवांतर – व्हिडीओ दिसत नाही आहे. त्याची लिंक द्या किंवा एम्बेड करा पोस्टमध्ये… 🙂

 2. Sameer Raje म्हणतो आहे:

  फारच छान माहिती दिलीत . धन्यवाद पण ​विडीयो कुठे दिसत नाही ,कृपया त्याची लिंक पाठवा

 3. creativemau म्हणतो आहे:

  माहिती छान शेअर केलीत! Thank you !! आणि हो लिहीते झालात हे सर्वात चांगले!

 4. hema म्हणतो आहे:

  navin mahiti kalali. thanks.

 5. arunaerande म्हणतो आहे:

  my goodness! the photos are unending. from where do they get the bodies? and how do they make the muscles? the expressions? feels kind of weird.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   बरेच लोकं आपलं शरीर मेडिकल सायन्स च्या भल्यासाठी म्हणून दान करतात . अशी अनेक शरीरं त्यांना मिळतात. शरीराची अंतर्रचना शिकण्यासाठी म्हणून हे तसे उपयोगी ठरू शकते ही गोष्ट नक्कीच नाकारता येणार नाही.
   बरेच लोकांना चिरंजीव व्हायचा ध्यास असतो…… तसे पण काही असतील या मधे.

 6. suruchi म्हणतो आहे:

  Khara bolaych jhala tar hua mrut dehacha upyog karnyachya wegweglya kalpna mala tari sahanch hot nahiyet..pratyek dharmat tya tya jatit kahi tari vichar ani sankalpana na dharunach sheeatche sanskar akhle astil n….vidnyan pudhe gelay he manus ahe ani netradan dehadan ithwar jagopyogi krutya hi manus sher…pan shobhechya itar vastu nisargat upalbdh astana mrutdeha ka wapraycha? Jevha wax cha wapar karun hawa to akar deta rang rup deta yetay tar mrutdehach ka…shiway punha kadhitari jiwant honyachi asha manya pan shharir japun thewaycha he mhanje kahitarich…aso jagat he sagla suru ahe hi matra navin mahiti milali….personaly vicharshil tar me aple traditional agni sanskar prefer karin…ho ani netradan….baaki aslya ideanchi kalpna pn nhi

  • महेंद्र म्हणतो आहे:

   सुरुची
   या विषायावर भरपूर वाद विवाद चर्चा घडल्या आहेत. त्या स्त्री आणि गर्भातल्या मुलाचे प्लास्टीनेशन जेंव्हा लोकांना दाखवले गेले तेंव्हा तर खूपच खळबळ उडाली होती.

 7. सुरुचि नाईक म्हणतो आहे:

  Shya..mobilewarun far typo hotat

 8. नितीन गव्हाळे म्हणतो आहे:

  खूप दिवसांची सुटी घेतली होती ,………, छान माहिती होती !!

 9. Sarika Gurav म्हणतो आहे:

  Nice..
  sarika

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s