खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?

आदित्य उद्धव ठाकरे,प्रितम आणि  पंकजा मुंडे, नितीश राणे  , राहूल गांधी, प्रणॊती शिंदे, ( बहूतेक नाव बरोबर लिहिले असावे) प्रिया दत्त, पुनम महाजन, सुप्रिया पवार सुळे , अमित किर्तिकर, अजिंक्य पाटिल ( डी वाय चा मुलगा ). वैभव पिचड, निरंजन डावखरे  वगैरे सगळ्या व्यक्तींच्या मधे काय साम्य आहे? उत्तर अगदी सोपं आहे,ही सगळी कुठल्या ना कुठल्या तरी नेत्याच्या वंशावळी मधली ही मंडळी आहेत. या शिवाय पण बरेच लोकं असतील , पण सहज आठवली ती नावे वर लिहिलेली आहेत.

म्हणायला भारतात लोकशाही आहे, पण जनतेची मानसिकता मात्र अगदी सरंजामशाही च्या दिवसात होती तशी आहे. पूर्वीच्या काळी राजे लोकं असायचे, आणि त्यांची पिल्लावळ मग केवळ बाप राजा म्हणून मुलगा पण राजा व्हायची. त्या साठी स्वतःला काही करण्याची गरज नसायची. बरेच लोकं की जे अगदी राजा साठी किंवा त्यांच्या वंशावळी साठी जीव देतील असे असायचे. राजाज्ञा प्रमाण हाच एक जिवनाचा हेतू असायचा. आज ची राजनैतीक उलथा पालथ पाहिल्यावर खरंच काही बदल झाला आहे  मला वाटत नाही. आज फक्त त्या राजांची जागा, नेत्यांनी आणि राज पुत्राची जागा त्यांच्या मुलांनी घेतली आहे.

प्रसंगी राजे लोकांसाठी स्वतःच्या प्राणाची आहूती पण देण्याची या लोकांची तयारी असायची.जयललीताला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेंव्हा जेल मधे पाठवले गेले, तेंव्हा तामिळनाडू मधल्या जवळपास १५ लोकांनी आत्महत्या केली.  मागे कर्नाटकात तो राजकुमार नावाचा एक नट जेंव्हा मेला, तेंव्हा पण भरपूर जाळपोळ वगैरे झाली होती. या मॉब फ्रेन्झी ला खरंच काय म्हणावे हेच समजत नाही. आपल्याला लोकशाही मिळाली, पण लोकशाही म्हणजे नेमकं काय? हे समजले आहे का?

निवडणूकीच्या निकालांनी दाखवून दिले की आपण आजही त्या सरंजामशाही चे आपण गुलाम आहोत.बाळासाहेब ठाकरे कायम घराणेशाही वर टिका करत आले, पण स्वतः वर वेळ आल्यावर त्यांनाही हा मोह टाळता आला नाही. मग या मोहापायी आपली आयुष्यभराची कमाई म्हणजे निर्माण केलेल्या पक्षालाही डावावर लावायला त्यांनी  कमी केले नाही.

वर दिलेल्या नावांपैकी किती नावे तुम्ही सामाजिक कार्यात मदत केल्याबद्दल पुढे आलेली ऐकली आहेत? आदित्य ठाकरे आणि  राणे च्या मुलाचे मध्यंतरी कारने ओव्हरटेक करण्याबद्दल जे रस्त्यावर भांडण झाले त्या  बातमी मधे नाव वाचल्याचे आठवते. या व्यतिरिक्त कुठल्याही विधायक कार्याशी यांची नावे जोडलेली नाहीत.साधारण अशीच परिस्थिती इतरही नेत्यांच्या मुलांची आहे.

भाषण  देतांना या नेत्यांच्या पुत्र – कन्यांची बौद्धिक पातळी किमान जनतेच्या बरोबरीची तरी असायला हवी. पण तसे नसते, म्हणूनच हल्ली बरेच पप्पू तयार झालेले आहेत भारतीय राजकारणात, आणि अशा पप्पूंची भाषणे ऐकणे आमच्या सारख्या सामान्य जनतेच्या नशिबी येते.

जॉर्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, अटलबिहारी, इंदीरा गांधीं सारख्या नेत्यांची भाषणे ऐकल्यावर ही  भाषणे ऐकणॆ म्हणजे अत्याचारच! सुप्रिया ने तर या वेळेस एका भाषणात मोदींचा एकेरी उल्लेख केला आहे, आणि तो पण काहीही कारण नसतांना. असो… प्रत्येकाचे संस्कार आणि बौद्धीक पातळी वेगळी असते , आणि त्या बद्दल आपण न बोललेलेच बरे.

शेवटी एक प्रश्न पुन्हा समोर येतो, की जर आपण असे घराणेशाही ला पुढे नेत असू आणि त्यांचं घराणं लोकशाहीच्या मार्गाने राजेपदावर नेऊन ठेवत असू , तर  खरंच लोकशाही साठी लायक आहोत??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

21 Responses to खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?

 1. DB DESAI says:

  There is a great need of political education of our people. Not only the illeterate or lowly educated but highly educated and elite class also. Political literacy is non existent in this class. I do not know how to write in devnagari script hence the comment is in english. The politicians who has lost the elections and the people like AAM party and their sympethisers should devote time and energy for political literacy in the public. Media can play a good role in addition to giving publicity to political tamashas.

  • सगळेच काही वाईट आहेत असे मी म्हणत नाही, पण एखाद्याला केवळ डायनेस्टी मुळे डोक्यावर घेऊन नाचणे पटत नाही. आणि दुर्दैवाने ही गोष्ट प्रत्येकच पक्षात दिसून येते.

 2. dattatrya m. gore says:

  nice

 3. manoj pandit says:

  आपण जे विचार मांडलेले आहेत त्याप्रमाणेच एक तर भारतत राजेशाही पद्धत वापरली जावी किंवा लोकांना लोकशाहीचे रीतसर शिक्षण दिले पाहिजे

  • या गोष्टी शिकवून येत नाहीत, त्या आपोआप समजायला हव्या. राजेशाही पद्धतीला मी अजिबात सपोर्ट करणार नाही, फक्त मतदारांमधे जागरुकता आली तरीही पुरेसे आहे.

 4. Amod says:

  अगदी मनातला प्रश्न विचारलात काका. “राजाज्ञा प्रमाण” हाच आपला सामजिक पिंड आहे खरंच. तो कसा तयार झाला हा पी एचडीचा छान विषय आहे. 🙂
  सरंजामी घराणेशाहीचा मुद्दा अजून पुढे नेऊन म्हणावंसं वाटतं, की आजची मोदींची लाट, त्याआधी केजरीवाल, अण्णा, वर्षानुवर्षं गांधी-नेहरु मंडळी, महाराष्ट्रात ठाकरे मंडळी या दुर्दैवानं एकच गोष्ट दाखवतात की आपल्याला विचार करण्यापेक्षा पूजा करायला आवडते. संकट आले की मार्ग शोधण्यापेक्षा धावा करा, अशा संस्कारातून हे होत असेल का?
  (आता कालचंच केंद्राच्या निर्णयाचं उदाहरण .. आधार, DBT, Diesel price de-regulation हे देशाला चांगले की वाईट याचं आपलं उत्तर “ते काय आहे” पेक्षा “कोण” राबवतंय यावर पूर्णपणे बदलतंय असं दिसतंय मला आजूबाजूला. आपली भक्तीची वृत्तीच कारणीभूत असावी का यासाठी?
  हे असं होतं आणि मग लोकशाहीत माझंही “मत” आहे असं म्हणायला भलताच अर्थ मिळून मतमोजणीची शिरगणती होते. 🙂 )

  • अगदी मनातले लिहिले तुम्ही 🙂 थोडे अजून ऍड करतो..
   बेडका मधे आणि राजकारण्यांमध्ये खूप साम्य आहे. अगदी १००टक्के. मी दिसायला म्हणत नाही.. . बेडूक कसा पावसाळा आला की सुप्तावस्थे मधून बाहेर येतो आणि डरांव डरांव करू लागतो, तसेच हे राजकारणी पण निवडणूका जवळ आल्या की ” मराठी माणूस” , ” मराठी अस्मिता” ” “जात- पात “, ” हिंदू मुस्लीम वाद, या सगळ्या गोष्टींबद्दल कळवळा येऊन आपल्या जहरी वाणीने फुत्कारे सोडणे सुरु करतात. निवडणूका संपल्या की पुन्हा हे सुप्तावस्थेत जाऊन बसतात.

   एकच विचारावेसे वाटते….. अरे बाबा आमच्या कैवार घेतलेल्या ” समाजसेवा ” हा पूर्ण वेळ धंदा असलेल्या राजकारण्या…… होतास कुठे रे इतके दिवस लपलेला??

   या वाय झेड लोकांना वाटते की जनता मूर्ख आहे.. अर्थात त्यांचे पण काही चूक नाही कारण जनता पण कसायामागे कापून घेण्यासाठी जाणाऱ्या मेंढराप्रमाणे त्यांच्या मागे चालत जायला तयार असते.

   आपण म्हणतो की आपल्याला लोकशाही मिळवून ६३ वर्ष होऊन गेली..पण दुर्दैवाने या ६३ वर्षात काही एक बदल झालेला नाही…

   जनता पण तीच, तशीच मूर्ख, आणि बेडूक म्हणजे राजकारणी पण तसाच स्वार्थी…फक्त दोघांची पण पुढची म्हणजे तिसरी पिढी .

 5. arunaerande says:

  महेंद्र,
  अगदीच बदल झाला नाही असे नाही. या वेळची निवडणूक जरा आशादायक आहे. पण आपल्या समाजाची ही आंधळी भक्ती जाणे कठीण आहे. य एका मधे एक प्रकारचा आळशीपणा, जबाबदारी टाळन्याची भावना हे ही अंतर्भूत आहे. शिवाय, ‘मला काय त्याचे?’ अशी वृत्ती पण जाणे कठीण आहे, असे मला वाटते.

 6. काही अंशी ही वंशावळ फोफावण्यास आपणही कारणीभूत आहोत, असे वाटते. तसे नसेल तर दुसरा पर्याय का नाहीय आपल्याकडे? तसा भक्कम पर्याय निर्माण झाला तर आपोआपच ही वंशावळ खंडित होईल. काय होते की, मतदान केले म्हणजे आपले काम संपले. आता निवडून दिलेला भिडू प्रामाणिकपणे त्याची जबाबदारी पार पाडेल, अशी भाबडी आशा आपण बाळगतो. निवडून आलेला माणूस जर ‘लोकसेवक’ असेल तर त्याच्यावर वचक ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. मतदान करण्याचे कर्तव्य आपण बजावतो. पण, नंतर पुढचे सगळे निवडून दिलेल्या उमेदवारावर सोपवून मोकळे होतो. यांना वेळोवेळी जाब विचारायला हवा. सुतासारखे सरळ होतील…

 7. याला कारणही आपण आहोत. परंतु, प्रश्न असा आहे की, सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहेत. परंतु पुढाकार घ्यायची मानसिकता कोणाचीच नाही. आमच्या मतदार संघात भाजपचा उमेदवार खुनाच्या आरोपात सव्वा वर्षे जेलमध्ये होता. आणि अजून निर्दोष म्हणून मुक्तता नाही. पण आम्हाला काय त्याचे? आले निवडून साहेब…

 8. काका, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये!
  बाकि, अगदी योग्य मुद्द्याच लिहिलत….

 9. Hemant says:

  very nice and very correct:- आज फक्त त्या राजांची जागा, नेत्यांनी आणि राज पुत्राची जागा त्यांच्या मुलांनी घेतली आहे…… to the point.
  Great article!

 10. आपले म्हणणे अगदी मान्य. फक्त एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे यांना राजकारणात प्रवेश सुलभ रित्या मिळतो. इथे टिकून राहण्याची धडपड मात्र काटेकोरपणे करावे लागते. राहुल गांधीना ती जमली नाही. सुप्रिया सुळेना किती जमतेय शंका आहे. पंकजा मुंडेना ते साधलेय असे वाटते. हे म्हणजे थोडेसे आरक्षणासारखे आहे. म्हणजे राखीव जागेमुळे तुम्हला विशिष्ट कोर्स ला प्रवेश मिळेल, पण उत्तीर्ण होण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. अर्थात त्यात देखील चीटिंग करता येते, हे देखील आपल्या आसपास दिसते.

 11. asd says:

  what is solution for this ?

  • एकच उत्तर सुचते, या सगळ्या नेत्यांच्या मुलांना त्यांची योग्य जागा दाखवायला हवी.

 12. pramod says:

  barobar mehendr saheb aapn je nirikshan mandle aahe te kharach vicharat padnare aahe, ajchya ya paristitine lokshahisathi ladlelya tya sarv mahapurushanchya karyavar paani taklya sarkh aahe aatachya pidine swatache farmothe nuksanch kele aahe.

 13. ही पोस्ट वाचून आठवण झाली टिळक व आगरकर वादाची
  ह्यात आगरकरांचे म्हणणे मला पटते , सामाजिक सुधारणा सामाजिक साक्षरता ,आणि समाजात साक्षरता त्याने येणारी जागरुकता अगदी तळागाळात पोहोचवली पाहिजे होते , तेव्हा कुठे जेव्हा स्वराज्य मागण्याची वेळ येईल तेव्हा बहुतांशी जनतेला स्वराज्य म्हणजे काय ह्याचा अर्थ माहिती असेल ,
  दुर्दैवाने तसे झाले नाही.
  सरंजामी मानसिकता असलेल्या आपल्या समाजात संस्थानिक व इंग्रज गेले व खादीधारी संस्थानिक निर्माण झाले ,
  म्हणजे पुढचे पाढे पंचावन
  आमच्या घराण्यात ५ गावांचे कुलकर्णी पद शहाजहान ने दिल्याचा उल्लेख आहे ,तेव्हापासून साहेब येई पर्यंत राज्यकर्ते बदलले शिवशाही पेशवाई आली मोगलाई गेली पण आमच्या कुलकर्णी पदावर टाप आली नाही ,
  आता भारतात जो मध्यमवर्ग व उच्च मध्यम वर्ग आला आहे त्याला सुद्धा कोणीही राज्यकर्ते येवोत त्यांच्या माफक चंगळवादी आयुष्यात काडीमात्र फरक जाणवत नाही म्हणूनच
  काळरात्र झाली तरीही आयुष्याच्या मशाली न करता आम्ही डेली सोप मध्ये मग्न असतो.
  म्हणूनच इंग्रजीत म्हण आहे
  प्रत्येक समाजाला त्यांच्या लायकीनुसार राज्यकर्ते मिळतात.

 14. jadhav Kalpesh says:

  बघा काही कळतं काय यातल
  😳 राजकारण😳

  🔹शरद पवार – प्रा.एन.डी. पाटील.
  🔹शंकरराव मोहिते-पाटील – बाळासाहेब देसाई.
  🔹दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) – माजी राज्यमंत्री अजित घोरपडे

  हे परस्परांचे साडू-बंधू

  🔸अजित पवार यांची पत्नी – सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.

  🔸जयंत पाटील यांची बहीण – माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे. (मेहुणे)

  जयंत पाटील – शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).

  🔸आमदार विलासराव शिंदे यांची बहीण – शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे.

  🔸आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी – सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री ह्या सख्ख्या बहिणी आहेत.

  🔸प्रमोद महाजन + गोपीनाथ मुंडे = मेहुणे.
  (प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ. आहे.)

  🔸शरद पवार + बाळासाहेब ठाकरे = व्याही. (शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई, भाचा सदानंद सुळे यांच्या सौभाग्यवती आहे.)

  🔸सचिन पायलट + फारूक अब्दुल्ला = जावई.
  (केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मिरचे फारूक अब्दुल्ला यांचे जावई).

  🔸कलमाडी + निंबाळकर राजघराणे = व्याही.
  (निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई).

  🔸शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू.
  (शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी).

  🔸स्व. विलासराव देशमुख + डिसुझा + भागनानी + हुसैन = व्याही.
  (विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत.
  जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी).

  🔸मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते.

  विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत.
  विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून.

  🔸विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे.
  (चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून).

  🔸पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते.

  🔸शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे.

  🔸कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले…!

  🔸दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे विद्यमान आमदार मालोजीराव यांची पत्नी.

  🔸राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी.

  🔸शरद पवार यांची एक मेहुणी ना.म.जोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.

  🔸पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी.

  🔸दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे शिवेंद्रराजे यांची पत्नी.

  🔸कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात.

  🔸कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे.
  (राजळे यांची आई ती थोरातांची बहीण).

  🔸राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी.

  🔻नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई.

  🔻अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही नारायण राणे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची पत्नी.

  🔻कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे व्याही.

  🔻जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव व विद्यमान मंत्री राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.
  🔻भोकरदन भाजपा चे खा.रावसाहेब दानवे यांची मुलगी शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना दिलेली आहे…

  👉हे सगळे एका ताटात🍵 जेवतात म्हणून कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी सारे एकच…!

  👉वरिल नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा, राजकारणासाठी एकामेकांवर लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू 🔪नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये..

  राजकारण हे काय व कस आहे हे आपणच ओळखावे.

  ⚫जो ते शिकला.. तोच टिकला..🔵

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s