इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे??

मार्क झुकेरबर्ग म्हणतो प्रायव्हसी काही फारशी महत्वाची पण नाही, पण स्वतःच्या घराशेजारची चार घरं विकत घेतो, स्वतःला प्रायव्हसी मिळावी म्हणुन – दुतोंड्या कुठला!

जर इंटरनेट चा विचार केला तर हा अधिकार खरंच तुमच्याकडे आहे का? तुमची प्रायव्हसी कितपत सुरक्षित आहे? जर तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुम्ही इंटरनेट वर जे काही पहाता, वाचता, ते इंटरनेट हिस्ट्री डिलिट केली की कोणालाच कळणार नाही . पण ते तसे नाही, तुम्ही फार तर तुमच्या घरच्या लोकांपासुन तुमची नेट ऍक्टीव्हीटी लपवू शकाल.

तुमच्या मोबाइल वर गुगल मेल ऍप नक्कीच असेल, तुम्ही कुठेही गेलात तरीही गुगल मेल तुमचा डेटा गोळा करत असते. अगदी मिनिट टू मिनिट तुमच्या मुव्हमेंट्स गुगल ट्रॅक करतं. खरं वाटत नसेल तर इथे लिंक देतोय, तुमच्या गुगल अकाउंट ला लॉग इन करून ह्या लिंक वर क्लिक करा आणि स्वतःच बघा.

गुगल डॉक्स च्या साईट वर किंवा गुगल ड्राइव्ह वर तुम्ही सेव्ह करुन ठेवलेला डेटा पण व्हलनरेबल आहे. तो पण डेटा विकला जाऊ शकतो, तेंव्हा महत्वाचा डेटा क्लाउड वर सेव्ह करुन ठेऊ नका. कुठलेही ब्राउझर वापरतांना काम सोपे होण्यासाठी आपण बरेच प्लग इन इन्स्टॉल करतो, ते ताबडतोब काढून टाका.

तुम्ही कुठल्या साईट्स ला भेट देता, काय वाचता, कुठले व्हिडीओ पहाता, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला माहिती असतात. तुमच्या सगळ्या नेट वरच्या ऍक्टीव्हीटीचे त्यांच्याकडे रेकॉर्ड, डेटा ऍनॅलिसीस त्यांच्याकडे असते. तुमच्या ऍक्टीव्हीटीज ऍनॅलाइझ करून तुम्हाला  तुमच्या इंटरेस्टच्या जाहिराती पुश करत असते

आता एक साधे उदाहरण देतो, तुम्ही नेट वर कॅमेरा सर्च केला, की तुमच्या जी मेल अकाउंट मधे, फेसबुक पेज वर सगळ्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या आणि त्याला लागणाऱ्या ऍक्सेसरीजच्या जाहिराती दिसणे सुरु होते.   स्वतः चेक करुन पहा. बरेचदा तुम्ही एखादं टॉरंट शोधत असता, आणि तुमचा आय एस पी प्रोव्हायडर चा मेसेज येतो की तुम्ही जे करताय ते कायद्याच्या विरुद्ध असल्याने तुम्हाला दाखवता येत नाही.

बहुतेक सगळ्यां आय एस पी चे सर्व्हर अमेरिकेत किंवा युरोप मधे आहेत. नुकताच अमेरिकेत एक नवीन नियम पास करण्यात आलेला आहे, त्या नियमान्वये तुमचा आय एस पी प्रोव्हायडर तुमचा सगळा डाटा कोणालाही विकु शकतात, त्या मधे तुमची ब्राउझिंग हिस्ट्री, डाउनलोड हिस्ट्री, तुमची मेडिकल इनफर्मेशन, तुमचे इ मेल चे कंटॆंट्स, तुमचे गुगल वर सेव्ह करुन ठेवलेले फोटोग्राफ्स, बॅंक आणि फायनान्स डिटेल्स वगैरे सगळं ! एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात फुकट काहीच मिळत नसते, मग ते साधे ऍप असले तरीही तुम्ही बरीच हिड्न किंमत मोजत असता त्या ऍप च्या वापरासाठी.

तुम्ही जेंव्हा एखादे ऍप मोबाइल वर इन्स्टॉल करता, तेंव्हा तुम्ही त्या ऍप “फुकट ” देणाऱ्या कंपनीला बऱ्याच परनवानग्या न वाचता देता.खरं तर तुम्हालाच तुमच्या प्रायव्हसी ची किंमत नाही, तर मग ती इतरांनी म्हणजे आय एस पी नी तरी का ठेवावी? कुठलेही ऍप डाउनलोड करतांना कुठल्या प्रकारची परवानगी आपण देतो आहोत हे नक्कीच चेक करा आणि योग्य वाटेल तो निर्णय घ्या.आंधळेपणाने सगळया टर्मस ऍंड कंडीशन्स मान्य करु नका.

आय पी ऍड्रेस म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरची इंटरनेट वरची खरी ओळख. तुम्ही जरी खोटा इ मेल आयडी बनवुन कोणाला मेल पाठवला तरीही त्या मेल सोबत तुमचा खरा आयपी ऍड्रेस जात असतो-  तो कसा पहायचा हे आधीच्या एका पोस्ट मधे लिहिलेले आहे.त्या आय पी ऍड्रेस वरुन तुम्ही नेमकं कुठल्या कॉम्प्युटर वरुन लॉग इन केले ते सहज समजु शकते, आणि तुमची ओळख पण पटवली जाऊ शकते.

तरि पण या मधुन बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तुम्ही स्वतःचे व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क बनवुन इंटर्नेट ब्राउझ केल्यास आपल्या ऍक्टीव्हीटी लपवु शकता.  या साठी तुम्हाला आपला स्वतःचा आयपी ऍड्रेस मास्क करावा लागेल.कसे?? अगदी दहा मिनिटात होणारे काम आहे हे.

आय पी ऍड्रेस मास्क करण्याचे बरेच उपाय आहेत. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ब्राउझिंग साठीऑपेरा ब्राउझर वापरणे . ऑपेरा ब्राउझर मधे तुम्ही स्वतःचे लोकेशन बदलु शकता. म्हणजे जरी तुम्ही भारतातुन सर्फिंग करत असाल तरी पण अमेरिकेतिल आयपी वापरली तर अमेरिकेतुन सर्फिंग करत आहेत असे दिसेल. तुमच्या इ मेल सोबत जो आयपी ऍड्रेस असेल तो अमेरिकेतला असेल. अर्थात जर तुम्ही हा मार्ग वापरुन कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सायबर क्राइम मधे तुमचा तपास केला जाउ शकतो हे विसरु नका. हे कसे वापरायचे थोडक्यात खाली दिलेले आहे.

१)ऑपेरा डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. डाउनलोड केल्यावर हे ब्राउझर आपल्या कॉम्प्युटर वर इन्स्टॉल करा.

२) इन्स्टॉल केल्यानंतर ऍडब्लॉकर  ऑन करा.

ad blocker

३) व्हीपीएन नेट वर जे सर्च विंडॊ च्या शेजारी दिसते, त्यावर क्लिक करा, तुम्हाला चार पाच देशांचे सर्व्हर्स चे ऑप्शन दिसतील, त्या पैकी कुठल्याही एका सर्व्हर वर क्लिक करा . बस झाला तुमचा आय पी मास्क. आता या पुढे तुम्ही जे काही कराल ,ते  ज्या देशाचा आयपी तुम्ही वापरत आहात त्या  देशातुन  करत आहात असा आभास निर्माण होईल.

व्हीपीएन

तुमचे ब्राउझर आता उघडा. ते असे दिसेल.

ब्राउझर

या शिवाय जर तुमच्याकडे मोझीला फायरफॉक्स असेल तर त्यात सुद्धा आयपी बदलली जाऊ शकते.

इंटरनेट ऑप्शन्स, वर क्लिक केल्यावर ऍडव्हान्स्ड वर क्लिक करा. तिथे  , नेटवर्क वर क्लिक करा. त्यानंतर कनेक्शन सेटींग वर क्लिक करा. तिथे तुम्हाला नो प्रॉक्सी असे डिफॉल्ट सेटींग दिसेल, त्या ऐवजी  मॅन्युअल प्रॉक्सी सेटींग वर क्लिक करा. एका बॉक्स मधे एक आयपी ऍड्रेस दिसेल तो तुमचा खरा आय पी ऍड्रेस . त्या ऐवजी तुम्हाला हवा असलेला दुसऱ्या देशाचा आयपी ऍड्रेस टाका आणि पुन्हा नो प्रॉक्सी वर क्लिक करा.  थोडं कन्फ्युजिंग आहे, पण ऑपेरा बेस्ट चॉइस माझ्या मते. मी स्वस्तः पण ऑपेराच वापरतो.

मुळ इंग्रजी लेख 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड. Bookmark the permalink.

3 Responses to इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे??

  1. मी काय म्हणतो says:

    ओपेरा मध्ये एका वेळी एकच VPN वापरता येते, त्या एवजी TOR ब्राऊजरचा वापर करावा. आपले कनेक्शन आधी युरोप तिथून नायजेरिया मग फ्रांस त्यानंतर यु.एस आणी मग आपण ब्राऊज करत असलेल्या वेबसाईटवर जाते.

  2. Ganesh Godik says:

    Useful information

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s