उबंटू.

हे उबंटू म्हणजे नेमकं काय? आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं? वाचा पुढे.

download (1)सध्या जगात खूप निगेटीव्हिटी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायला मिळतो. पोट भरलेले असतांना पण प्रत्येक व्यक्ती आपल्याच पोळीवर तुप कसे ओढून घेता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या मानव जाती मधे एक कॉमन बॉंड आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ह्या बॉंड मुळेच एकमेकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होत असतो.

तर गोष्ट अशी आहे , एक ऍथ्रोपोलॉजिस्ट- म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यासक आफ्रिकेमधे मानवी स्वभावाचा अभ्यास करायला जातो. ज्या ठिकाणी अगदी बेसिक गोष्टी सुद्धा नाहीत अशा त्या  एका दुर्गम भागातिल गरीब वस्ती मधे जाऊन हा अभ्यास सुरु ठेवतो. त्या भागातले लोकं अतिशय गरीब, म्हणजे आज सकाळी खायला आहे तर संध्याकाळी नाही.

दररोज काही मुलांना समोरच्या मोकळ्या पटांगणात खेळतांना बघत असतो.अंगावर घालायला पुरेसे कपडे नाहीत, पोटभर भोजन  पण नाही , पण मुलं मात्र नेहेमीच आनंदी दिसतात त्याला.त्याला आश्चर्य वाटतं हे कसं?

एकदा तो एक प्रयोग करण्याचे ठरवतो. दुसऱ्या दिवशी त्या भागात येतांना आपल्या सोबत तो एक सुंदर बास्केट घेऊन येतो. त्या बास्केट मधे भरपूर कॅंडी, फ्रुट्स असतात. ती मुलं पण समोर खेळत असतात. त्यांना तो बोलावतो आणि सांगतो, ” ह्या बास्केट मधे बराच खाऊ आहे, हा मी मधे ठेवणार, तुम्ही सगळ्यांनी दूर एकाच अंतरावर उभे रहायचे, आणि मी ” नाऊ” म्हणालो, की धावत जाऊन बास्केटला हात लावायचा, जो सर्वप्रथम बास्केट ला हात लावेल, त्याला ह्या बास्केट मधला सगळा खाऊ मिळेल”

पटांगणात मध्य भागी ही बास्केट ठेवली जाते. सगळी मुलं सारख्याच अंतरावर उभी करायची म्हणून गोलाकार करुन मुलं उभी रहातात. मधे असलेल्या बास्केट कडे सगळ्यांचेच डोळे लागले असतात, आणि सगळे जण ” नाऊ” शब्दाची वाट बघत असतात.

त्या ऍंथ्रोपोलॉजिस्ट ने ’नाऊ” म्हंटल्यावर जे काही होतं, ते बघुन त्याला मात्र मोठा धक्का बसला. सगळी मुलं अगदी सावकाश पणे एक एक पाऊल टाकत त्या बास्केट च्या दिशेने  चालू लागली. सगळे जण एकाच वेळी त्या बास्केटजवळ पोहोचले, आणि सगळ्यांनी आपला हात त्या बास्केटला लावला आणि  त्यात असलेला खाऊ वाटुन खाल्ला.

ज्या मुलांना दररोज साध्या जेवणाचा पण प्रश्न असतो त्यांच्या कडुन असे वागणे अपेक्षित नव्हते त्या ऍन्थ्रोपोलॉजिस्टला. त्याने  विचारले, हे असे तुम्ही का केले? जर कोणी एक मुलगा जोरात धावत गेला असता तर त्या  एकालाच सगळा खाऊ मिळाला असता तर तो त्याला कित्त्येक दिवस पुरला असता! त्यावर त्या मुलांनी उत्तर दिले, उबंटू. म्हणजे जर आमच्या पैकी इतर दुःखी होत असतिल तर “तो” ज्याला ही सगळी बास्केट मिळेल तो कसा काय आनंदी होऊ शकला असता? आपल्या सभोवतालचे लोकं जर दुःखी असतील तर आपण कसे काय आनंदी राहु शकतो?

आय ऍम बिकॉज व्हॉट वी आर ऑल! ह्या जगप्रसिद्ध वाक्यामागची ही कथा. बऱ्याच सेमिनार्स मधे सांगितली जाते, उबंटू म्हणजे मानवी व्यक्तीमत्वाचा पॉझिटीव्हनेस.तुम्ही एकटे आयसोलेशन मधे मानव म्हणुन जगुच शकत नाही.उबंटु म्हणजे पर्स्परातिल सौदार्ह्य.आपण स्वतःकडे नेहेमी एक व्यक्ती म्हणुन पहातो- इतरांपासुन वेगळा, पण खरी परिस्थिती ही असते, की तुम्ही आम्ही सगळे जोडले गेलेलो असतो, एकाने केलेल्या गोष्टीचे इतरांवर पण परीणाम होत असतात.तुम्ही जेंव्हा चांगले काही करता, तेंव्हा तेच सगळीकडे पसरते.

उबंटू हा कन्सेप्ट नाही, तर जीवन शैली आहे !

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to उबंटू.

  1. Abhliash Mehendale says:

    वाह! सुंदर कथा काका. हा फोटो अनेकदा पहिला आहे पण त्यामागचं कारण आज कळलं. खरंच छान कन्सेप्ट आहे.

  2. Mahesh says:

    सुंदर.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s