केरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.

केरळ मधे रमजानच्या पहिल्याच दिवशी गाय कापुन कॉंग्रेस ने काय मिळवले असेल ? बरं, गाय कापणारा पण हिंदू , खाणारे पण हिंदू. दिवस पण असा निवडला की रमजानचा पहिला दिवस! गाय कापणे मुस्लिम धर्माशी कोरिलेट व्हावे एवढाच उद्देश दिसतो या मधे.

केरळ मधे गोमांस बंदी नाही, त्यामुळे केरळमधे कुठेही गोमांस उपलब्ध आहे. असे असतांना पब्लिक प्लेस मधे गाय कापुन लोकांच्या मनात क्षोम निर्माण करण्याचे कारण काय असावे.

या प्रकाराने उत्तेजित होऊन हिंदू लोकं मुस्लीम लोकांवर हल्ले वगैरे करतील असा काहीसा गैरसमज कॉंग्रेसचा असावा. फेसबुक वर अतीउत्साही लोकं लगेच आता पब्लिकली डूक्कर कापा म्हणून कॉमेंट्स पोस्ट टाकु लागले.

तसे म्हंटले तर या केस मधे मुस्लिम लोकांचा सहभाग अजिबात नव्हता, असे असतांना पण मोदी सरकार विरोधात मुस्लिम वातावरण तयार करणे हे कारण असेल का? कारण मागच्या इलेक्शन मधे मुस्लिम लोकांनी पण भाजपाला भरभरून मतदान केले. सर्वसामान्यांच्या मनात धार्मिक द्वेश निर्माण करणे हे कारण आहे? की पुढिल इलेक्शन मधे मुस्लिम मतदारांची मते अनुकुल करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न?

या सगळ्या प्रकाराबाबत मुस्लिम समाज मात्र शांत राहिलेला दिसतो. कुठेही कुठल्याही प्रकारे या प्रकाराचे समर्थन कोणी केलेले नाही. ज्याची सदसदविवेक बुद्धी जागृत आहे, तो या प्रकाराचे समर्थन करूच शकत नाही.

सरसकट गैरसमज आहे, सगळॆ मुस्लीम बिफ खातात , आणि हिंदू अजिबात खात नाही.माझे बरेच मुस्लिम मित्र बिफ खात नाहीत, आणि हिंदू खातात! असे असतांना पब्लिक प्लेस मधे गाईचे स्लॉटरींग हे कशासाठी? त्या हिजड्यांना कुठली मर्दानगी दाखवायची होती, की मोठा गाजावाजा करत कुठलाही प्रतिकार करु न शकणारी गाय कापली? एवढीच मर्दानगी वाया जात असेल तर सैन्यात सिमेवर जाऊन लढत का नाहीत हे लोकं?

गाय कापली, त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही, कारण केरळ/ गोवा मधे गोमांस कायदेशिर आहे. आक्षेप आहे तो याचे राजकारण करण्याचा. कॉंग्रेस चा स्वतःवरचाच विश्वास संपत आलाय, आणि लवकरच कॉंग्रेस पण संपणार यात मला तरी अजिबात शंका नाही.

एकच समाधानाची गोष्ट म्हणजे लोकं ह्याच्या या करणीने चिथावुन काही करण्यास उद्युक्त झाले नाहीत. असो.

लहान मुलं सुसु कॉम्पिटीशन करतात, काटाकाटी, किंवा कोणाची दुर जाते वगैरे आता अशा मधे पायावर शिंतोडे उडणारच. आता कॉंग्रेस स्वतःचे पाय कसे वाचवतो ते पहायला नक्की आवडेल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

1 Response to केरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.

  1. खरंय… काँग्रेस चा अंत अटळ आहे. ज्यांच्या कडे लोकं काँग्रेस चे तारणहार म्हणून अपेक्षे ने बघतात तीच लोकं काँग्रेस च्या पतनाला कारणीभूत ठरत आहेत. आई आपल्या मुलाच्या प्रेमा पोटी, आणि मुलगा आपली नको त्या ठिकाणी अक्कल पाझळुन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s