कॅशलेस? नॉट फॉर मी..

 

downloadनोटाबंदी झाल्याचा तो काळ होता, की ज्याने माझे आयुष्यभराचे खर्चाचे नियम बदलुन टाकले. मी जरी टेक्नोसॅव्ही असलो, तरी खर्च करण्याच्या बाबतीत पारंपारीक पद्धत म्हणजे कॅश वापरायचो. मग तो किराणा असो, की लाईट बिल असो. तशी पण हल्लीची मंडळी कॅशलेस कडे वळल्याने, बिल भरायला रांग नसतेच, अगदी दोन मिनिटात काम होतं.

तर , हजार आणि पाचशे च्या नोटा बंद केल्या गेल्या आणि आमचे प्रॉब्लेम्स सुरु झाले. नुकतेच दोन दिवसापूर्वी खर्चासाठी म्हणून ४० हजार रुपये काढून आणले होते. अर्थात त्या पैकी फक्त दोन हजार च्या शंभर च्या नोटा आणि बाकी सगळ्या पाचशे आणि हजार! त्यामुळे फारसा कधी कॅशलेसच्या वाटेला न जाणारा एकदम डेबिट कार्ड वापरायला लागलो. कदाचित लहानपणापासुनचे संस्कार असतील, मी क्रेडीट कार्ड शक्यतो वापरले नाही- आपलं अंथरुण पाहुन पाय पसरावे ही शिकवण अंगी भिनल्याचा परिणाम.

महिनाभर सगळा गोंधळ सुरु होता. माझे तसे दोन अकाउंट्स आहेत, एका अकाउंट मधे नेहेमीच्या खर्चाचे पैसे ठेवलेले असतात, ( ज्याचे कार्ड मी नेहेमी जवळ बाळगतो) .महिना उलटला होता, आणि एकदिवस डिमार्ट ला जाऊन किराणा घेतला आणि लागलेल्या नवीन सवयी प्रमाणे कार्ड पुढे सरकवले. त्या मुलाने कार्ड स्वाईप केले, अमाउंट टाकली आणि तेवढ्यात त्या मशिन वर मेसेज आला, इनसफिशिअंट फंड! क्षणभर एकदम लाजल्यासारखे झाले, अरे कार्ड डिक्लाइन होतं म्हणजे काय? पण मुलगी सोबत होती, तिने कार्ड दिले आणि पेमेंट झाले.

विचार मनात आला, हे असे कसे झाले? अकाउंट मधे जवळपास ८० हजार रुपये होते, गेले कुठे? नंतर एक एक खर्च आठवायला लागला, घराचे पडदे केले त्याचे २३८०० रुपये, सोफा कव्हर्स चे ८००० रुपये आणि इतरही बरेच खर्च डोळ्यासमोर आले. ह्या कॅशलेस मुळे प्रत्येक ठिकाणी कार्ड पुढे सरकवुन पेमेंट्स केल्याने खर्चाकडे लक्ष नव्हते.

मला वाटतं की मुख्य कारण म्हणजे जरी माझे ८० हजार खर्च झाले, तरी पण पैसे खर्च  केल्याचा फिल / गिल्ट अजिबात नव्हता. कारण खरे – पैसे म्हणजे से हार्ड मनी माझ्या हातातुन गेले नव्हते ,फक्त कार्ड स्वाइप करून पिन नंबर टाकला होता, त्यामुळे पैसे गेल्याचा फिल अजिबात नव्हता. जेंव्हा आपण खिशातुन कोणाला १५-२० हजार देतो, तेंव्हा पैसे आपल्या हातातुन ( अकाऊंट मधुन आपणच काढले असतात) तो फिल येतो, पण ऑन लाइन ट्रान्स्फर मधे /किंवा कार्ड पेमेंट मधे पैसे गेल्याचा फिल येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे  एकिकडे सरकार  म्हणते की कॅशलेस व्हा, आणि दुसरी कडे प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर ०.१ % ते २% टॅक्स लागतो. बरेच दुकानदार कार्ड पेमेंट साठी २% जास्त पैसे मागतात. हा एक्स्ट्रॉ खर्च आपण का द्यायचा? पैसे पण आपलेच आणि आपण टॅक्स भरायचा? ही कुठली पध्द्त? अमाउंट किती आहे टॅक्स ची हे महत्वाची नाही, पण आपण ते कुठल्याही कारणाने देण्याची गरज नाही. गॅस ऑन लाइन बुक केला की ५ रुपये सुट मिळते आणि ७.५० पैसे ट्रॅन्झॅक्शन फी द्यावी लागते. सिनेमाची तिकिट बुक केली  की पण सरचार्ज द्यावा लागतो.  आपण  आपले पैसे फुकट का म्हणून द्यायचे?

बॅंका हल्ली खूप स्पॅमिंग करतात , दररोज तिन चार मेसेजेस तरी असतात. पण आपण नेहेमीचे स्पॅम असेल म्हणून ते मेसेजेस न पहाता डिलिट करतो. माझ्या पण बाबतित तेच झाले होते, मेसेजेस यायचे बॅंकेकडून पण मी ट्रू कॉलर मेसेज सर्व्हिस वापरतो, त्यामुळे ते सगळे स्पॅम मधे गेले होते. असो.

कॅशलेस म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे, त्याची गोडी लागली की तुम्ही त्यातुन कधीच बाहेर पडु शकत नाही. क्रेडिट कार्ड तर अजुन एक सापळा, पैसे नसतांना खर्च करण्याची संधी मिळते, मग आपण खर्च करतो आणि पुढे त्यावर व्याज भरत बसतो. शक्यतो क्रेडिट कार्डचा उपयोग टाळावा. त्यावर मिळणारे पॉइंट्स हवे, म्हणुन कार्ड वापरणारे बरेच लोकं आहेत , त्या फुटकर पॉइंट्स साठी आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात घालणे कितपत योग्य वाटते ?

एका महिन्यात हा प्रयोग करून पहा. बॅंकेतुन महिन्याभराचे पैसे कॅश काढून प्रत्येक ठिकाणी कॅश खर्च करा, आपोआप खर्चावर नियंत्रण येइल.मी आता पुन्हा पुर्वीच्या ट्रॅडीशनल पद्धतीने कॅश खर्च करणे सुरु केले आहे, आणि खर्च नक्कीच कमी झालाय. तुम्ही जेंहा स्वतः कॅश द्याल, तेंव्हा आपले पैसे जाण्याचे दुःख म्हणा किंवा फिल म्हणा तो येतो, आणि आपण सांभाळुन खर्च करतो.

तेंव्हा विचार करा, कॅशलेस चा वापर करता करता, तुम्ही कधी कॅशलेस होऊन जाल ते लक्षात पण येणार नाही, तेंव्हा सांभाळुन. फॅसिलिटी अगदी गरजेच्या वेळॆलाच वापरली तर उपयोगी, नाही तर सापळा.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to कॅशलेस? नॉट फॉर मी..

 1. yaman5 says:

  विचार करायला लावणारा आजचा तुमचा लेख आहे. तसे आजच्या जीवनात अनंत ( होय हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय ) सापळे आहेत. आपण त्यात न अडकता राहावे हे आपले आपण जमवावे. धन्यवाद.
  मंगेश नाबर

 2. हेमंत आठल्ये says:

  💯 सहमत! 👍 माझ्यासारख्या दोनशे रुपये खिशात बाळगणारा नॉटबंदीनंतर आता शक्य तितकी रक्कम खिशात बाळगतो. 😊 #बदल

 3. Yashodhan says:

  काका हा फार गहन विषय आहे, आता Cashless मुळे का होईना आपण ह्याकडे पाहू, हेही नसे थोडके.. या विषयाचा एक आढावा घेणारा लेख मी लिहिला होता. जमलं तर अवश्य वाचा पैसा झाला खोटा.. पुढील पिढ्यांच्या हितासाठी ह्याची जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे ..

 4. Ashvini says:

  मला वाटत हा जनरेशन गॅप चा मुद्दा आहे. मला कॅशलेस फार सोपा , डोक्याला कटकट न होणारा आणि चुका टाळता येणारा पर्याय वाटतो.
  मी पैशांच्या बाबतीत फार क्रिटिकल आहे. ३३०. ६४ हे कॅश मध्ये नाही एक्झॅक्ट देता येत , पण स्वाईप करता येतं , आजकाल अलमोस्ट सगळ्या किमती , पेट्रोल पंप वरचे खर्च असेच असतात.
  खर्चावर नियंत्रण हे आपल आपण ठेवायचं असतं . क्रेडिट कार्ड ची लिमिट चेंज करता येते. जिथे कॅशलेस शक्य नाही तिथे पैसे देतोच की आपण (पेपर , कामवाली बाई , दूध , भाज्या, रिक्षा , बस इत्यादी). मोठ्या रकमा (माझ्या साठी मोठी रक्कम हि हजार च्या पुढची असते ) सतत बाळगणं , आणि काढायला ATM मध्ये सतत जाणं पटत नाही मला. कॅश घेणारे सुद्धा उधारी ठेवतातच न.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s