चॅलेंज? जस्ट डु इट!

 

download (1)कंटाळा आलाय रोजच्या रुटीनचा? तेच सकाळी उठुन तयार होणं, ७.३८ ची फास्ट पकडुन ऑफिसला जाणॆ आणि मग दिवसभर ठरल्याप्रमाणे दुपारी घरुन नेलेला टिफिन संपवुन संध्याकाळची ६.८ च्या फास्ट लोकल ने घरी परत येणे. घरी आल्यावर रोज ठरल्याप्रमाणे सोफ्यावर बसुन हातात मोबाईल, समोर टिव्ही वर …… तेच नेहेमीचे प्रोग्राम्स चिडचिड करत पहाणॆ, कंटाळा आलाय ना? तर हे वाचा.

रोजच्या ठराविक रुटीनचा कंटाळा येणं सहाजिक आहे. प्रत्येकालाच येतो. तर ह्या कंटाळ्यातुन रोजचं आयुष्य स्पाईस अप करायचंय? तर हे चॅलेंज स्विकारा. ३० दिवसांचं चॅलेंज! तुमच्या मधे काही तरी वाईट सवयी असतीलच, ज्या तुम्हाला पण माहिती आहेत, आणि तुम्ही कित्तेक दिवसापासुन सोडण्याचा प्रयत्न करत आहात.

तर तुम्ही काय करायचंय, की दररोज स्वतःला एक नविन गोष्ट करायला चॅलेंज करायचं. कुठली गोष्ट? अगदी कुठलीही- काय वाटेल ते! जे तुम्ही नॉर्मली करत नाही ते. मे बी, तुमची एखादी सवय बदलण्य़ाचे चॅलेंज किंवा इटींग हॅबिट्स चे . बघा एकदा. जस्ट आयडीया साठी काही चॅलेंजेस खाली लिहितोय, पण तुम्ही आपली स्वतःची ठरवाल तर जास्त बरे!

१) दुकानात गेल्यावर निगोशिएट करा. डीक्साउंट मागा. काहीही विकत घेतांना डिस्काउंट मागण्याची आपल्याला लाज वाटते. एक अनुभव सांगतो. एकदा मी बर्गर किंग ला गेलो होतो. तिथे गेल्यावर काउंटरला गेल्यावर ऑर्डर दिल्यावर डिस्काउंट मागितला, मागे उभा असणारा माणुस ” हा कोण च्युत्या?” या नजरेने माझ्याकडे बघत होता. पण काउंटरवरचा मुलगा म्हणाला, की डिस्काऊंट कुपन मेसेज आहे का? मी नाही म्हंटल्यावर त्याने मला मोबाईल वर एक ऍप डाउनलोड करायला सांगितले, आणि ते ऍप डाउनलोड केल्यावर २०० रुपयांचे कॉम्बो मिल १०० रुपयात मिळाले. एखाद्या दुकान्दाराने डिस्काउंट दिला नाही, तरी तुमच्या मनातली स्पेशली मोठ्या दुकानात गेल्यावर डिस्काउंट मागण्याची भिती नक्कीच कमी होईल.एक सांगतो, १० पैकी ८ दुकानदार काही ना काही तरी डीस्काउंट देतीलच.

२) नाही म्हणा. ( अर्थात बॉस आणि बायको सोडून इतरांना) बरेचदा तुमची इच्छा नसतांना तुम्ही केवळ इतरांना वाईट वाटु नये म्हणुन, तुम्हाला एखादी गोष्ट पटलेली नसतांना पण होय म्हणता. जसे मित्राने संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी निघतांना एका सेल मधे जाऊन कपडे बघु म्हंटल्यावर, तुमच्या डोळ्यासमोर ती उशीर झाल्याने होणारी लोकलची गर्दी, बायकोचा चिडलेला चेहेरा, मुलांच्या बरोबर संध्याकाळी आखलेला जेवणाचा कार्यक्रम येतो, पण केवळ मित्राला कंपनी म्हणुन तुम्ही होय म्हणता, आणि स्वतःचे सगळे कार्यक्रम ( जे आधी पासुन प्लान केलेले आहेत ते) खराब करता. तेंव्हा कमीत कमी ३० दिवस तरी ” नाही” म्हणायचा प्रयत्न करा, तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही तुम्हाला एखादी गोष्ट करायला लावु शकत नाही.

३) फेसबुक डिऍक्टीव्हेट करा. कमीत कमी चार दिवसासाठी सोशल मिडीया वरुन अकाऊंट डिऍक्टिव्हेट करा. तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही तिकडे नसल्याने तुमच्या सो कॉल्ड २००० मित्रांना काही फरक पडला नाही. त्यापैकी अगदी ५ लोकांनी पण तुम्ही सोशल मिडीयावर नाही हे नोटीस केलेले नाही. शक्य झाल्यास हेच चार दिवस पुढे ३० दिवसापर्यंत एक्स्टॆंड करा. लक्षात येईल, हे आभासी जग तुमच्या रोजच्या जिवनावर अजिबात काही परीणाम करू शकत नाही.

४)स्वतः बद्दल दया वाटणे बंद करा. तुम्ही नेहेमी स्वतःची तुलना इतर कोणाबरोबर तरी करुन स्वतः दुःखी होत असता. तुमच्या इतकाच शिकलेला , तुमच्याच वर्गातला मुलगा आज १० लाखाचं पॅकेज घेतो, आणि तुम्ही मात्र ८ लाखावर घासताय, किंवा अशाच काही गोष्टी, ज्यावर तुमचा काही ताबा नाही, त्यांचा विचार करून स्वतःला दुःखी करुन घेणे, एक महिना तरी बंद करा. या उलट, तुमच्या क्लास मधल्या त्या मुलाला आठवा, ज्याला आजही ४ लाखाच्या पॅकेजवर काम करावं लागतंय. जिवनात पॉझिटीव्हिटी वाढेल एकदम, आणि जे काही आहे, त्यात सुख मानायला शिकाल तुम्ही. अर्थात हे सगळ्यात कठीण चॅलेंज आहे . पण ट्राय करा.

५) बोलतांना निगेटीव्हीटी टाळणे खूप आवश्यक असते. तुम्ही जेंव्हा कोणाला भेटता, तेंव्हा त्याला तुमचे प्रॉब्लेम्स सांगणे सुरु कराल, तर ती व्यक्ती तुम्हाला टाळणे सुरु करेल. तुमच्या प्रॉब्लेम्स मधे समोरच्या व्यक्तीला काडीचाही ईंटरेस्ट नसतो. तुम्ही ऑफिसमधले प्रॉब्लेम्स मित्रांबरोबर/ कलिग बरोबर डिस्कस करणे टाळा. तुम्ही जे काही बोलाल, ते कदाचित तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकते. निगेटीव्हीटी ही तुमच्यासाठी तर वाईट असतेच, पण तुमच्या सोबत रहाणाऱ्या लोकांसाठी पण तितकीच वाईट असते. जस्ट निगेटिव्हिटी बोलण्यात टाळा आणि तुमच्याच लक्षात येईल की तुमच्या सभोवतालचे लोकं पण आनंदी आहेत, आणि तुमची कंपनी एंजॉय करताहेत.

६) महिनाभर जंक फुड बंद करा. वडापाव, समोसा, पिझा , बर्गर वगैरे गोष्टी बंद करून महिनाभर तरी फक्त हेल्दी फुड घेणे सुरु करा. सुरुवातीला चार दिवस त्रास होईल, पण नंतर लक्षात येईल की इतरही हेल्दी ऑप्शन्स असतात हॉटेल मधे जे तुम्ही अव्हॉइड करता. महिना भरा साठी हे चॅलेंज फार अवघड नाही.

७) स्वतः बद्दल च्या भ्रामक कल्पना असतात आपल्या. मी कोणीतरी मोठा वगैरे. तुम्ही कोणीही असले तरीही, तुम्ही शेवटी एक समाजातलाच घटक आहात. स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पनांवर जर विजय मिळवायचा असेल तर, काही तरी वेगळं करुन पहा, जसे पब्लिक प्लेस मधे कानाला हेडफोन लाउन गाण्यावर नाचणे, गाणे म्हणणे( जरी आवाज फार चांगला नसला तरीही) . कठीण वाटतंय ना? आहेच कठीण. पण करुन पहायला हरकत नाही. ह्या चॅलेंजचा कन्सेप्टच आहे की जी गोष्ट तुम्ही करणार आहे ती तुमच्या दृष्टीने चॅलेंजिंग असायला हवी.

८)दररोज एखाद्या अगदी अनोळखी माणसाबरोबर बोला. अगदी हवापाण्याच्या गप्पा मारल्या तरी पण चालेल. तुमच्यातला शायनेस कमी होण्यास खूप मदत होईल. हे दररोज करायचं बरं एक महिना!

९)दररोजची झोप अर्ध्या तासाने कमी करा. जर सकाळी ५ वाजता उठत असाल , तर ४.३० ला उठा. हा अर्धा तास कसा वापरायचा ते तुमच्या हातात आहे, तुमच्या आवडीचे कुठलेही काम करा. गाणी ऐकायला , वापरला तरी हरकत नाही. हा अर्धा तास तुमचा हक्काचा. दिवसाची सुरुवात तुमच्या आवडीच्या कामाने करायला वापरता येइल. दिवस चांगला सुरु झाला , की संपतो पण चांगलाच.

१०) दररोज दोन नवीन इंग्रजी शब्द लक्षात ठेवा, आणि ते वापरा.

११) सकाळी पुश अप्स सुरु करा. ३० पर्यंत पहिल्या पंधरवाड्यात पोहोचण्याचे चॅलेंज स्वतःच स्विकारा, दिवस छान जातो व्यायाम केल्यानंतर. तुमच्या मेंदुमधले टेस्टेस्ट्रॉन चा स्त्राव वाढतो असे म्हणतात.

१२) सयकलींग सुरु करा. पहिल्या दिवशी एक किमी पासुन सुरु करा, आणि ३० दिवसानंतर ऍट अ स्ट्रेच २० किमी सायकलींग करण्याचे चॅलेंज घ्या.

हे फक्त सॅंपल म्हणुन दिलेले आहेत, तुम्ही तुमचे स्वतःचे चॅलेंजेस तयार करु शकता. प्रत्येकामधे काही ना काही तरी सवयी असतातच, ज्या सोडण्याचा आपण प्लान करत असतो. तर आजचा तो दिवस आहे, ज्या दिवसापासुन तुम्ही आपली सवय सोडण्याची प्रॅक्टीस सुरु करू शकता. ३० दिवसांचे चॅलेंज स्वतःलाच देऊन. कारण, तुम्ही जगाशी खोटं बोलु शकाल, पण स्वतःशी नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

8 Responses to चॅलेंज? जस्ट डु इट!

 1. Ganesh says:

  Khup Chhan..

 2. Vinayak Paranjpe says:

  खूपच छान! एकदम पटले तुमचे विचार!

 3. Tanvi says:

  Welcome back… मस्त पोस्ट महेंद्रजी…

 4. स्वप्नाली केळकर says:

  चांगलं लिहिलंय, मी कालच फेसबुक अकाउंट बंद केले संप या विषयामुळे.. आता बऱ्यापैकी डोकेदुखी कमी झालीय..

  बाकीचे उपाय पण करायला हवेत.

 5. sarika says:

  खूपच छान!

 6. Deepak says:

  The best

 7. Vabs says:

  Khup chan IDEA ahe.. sagle nahi pn most of try krnar ahe me 🙂

 8. mamta says:

  wow mst lihalay lekh…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s