लग्न करायंचय? मग हे वाचा..

imagesकाल एक मेसेज आला, की आता मुलगी पहायला जायचंय तेंव्हा काय बोलावं तिच्याशी हेच कळत नाही. अर्ध्या तासात काय काय बोलणार? आणि तिच्याबरोबर आपले लग्नानंतर पटेल की नाही हे कसे काय समजणार? खुप कन्फ्युज झालोय म्हणाला तो.

पुर्वीच्या काळी बरं होतं, मुलगी पहाण्याचा कार्यक्रम व्हायचा, अगदी पद्धतशीर पणे घरची सगळी वडीलधारी मंडळी आणि नवरा मुलगा मुलीच्या घरी जायचे, मग आधी मोठे सगळे मुलीला प्रश्न विचारायचे, ते पण ठरलेले.. तुला गाणं येतं? स्वयंपाक येतो? काय छंद आहेत तुझे? वगैरे वगैरे.. झाल्यावर मुलाला पण तुला काही विचारायचं असेल तर विचार म्हणुन सांगितलं जायचं. आता इतक्या वडीलधाऱ्यांसमोर काही विचारायची हिम्मत त्याची कधीच व्हायची नाही, आणि मुलगा बिचारा खाली मान घालुन, वडिलधाऱ्यांच्या नकळत तिच्याकडे बघुन उगीच आपलं, काही नाही असं म्हणुन वेळ मारुन न्यायचा.

हल्ली दिवस बदलले आहेत, मोठ्या शहरात आधी मुलगा मुलीला बाहेरच कॉफी हाउस मधे भेटतो, आणि मग तिथेच दोघांचं बोलणं होतं. बरेचदा ज्या गोष्टी प्रोफाइल मधे दिलेल्या नसतात- जसे नॉनव्हेज खाणे, ड्रिंक्स घेणे, स्मोकिंगची सवय आहे का वगैरे वगैरे, आणि ह्या प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची असतात, शेवटी बरोबर रहायचं असतं पुढचं संपुर्ण आयुष्य. पण तरीही एखाद्या अनोळखी मुलीबरोबर काय बोलायचं? आणि मग दोघेही नुसते बसुन रहातात , बोलायला विषयच सुचत नाही, तेंव्ह परिक्षेत तयारी न केलेला प्रश्न आलाय, आणि त्याचे उत्तर येत नाही अशी काहीशी अवस्था होते.

खरंच, मुलगी पहायला जातांना किंवा मुलगा पहायला जातांना थोडी तयारी करुन गेलं तर? म्हणजे काय प्रश्न विचारायचे ह्याची मनातल्या मनात उजळणी केली तर नक्कीच थोडा मोकळेपणा येईल, आणि गप्पा मारायला विषयही सुचतील. काही सॅंम्पल प्रश्न खाली देतोय, त्यात तुम्हीही तुमचे खास प्रश्न ऍड करु शकता. या प्रश्नांची योग्य/अयोग्य अशी काही उत्तरं नाहीत!

१) स्वयंपाकाची आवड आहे का? आणि स्वयंपाक करता येतो का? हा प्रश्न दोघेही एकमेकांना विचारु शकतात. नोकरी करणाऱ्या मुलीने ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच विचारावे.
२) मी पण नोकरी करते, तेंव्हा घरी यायला वेळ होईल, तेंव्हा स्वयंपाक घरात मदत करण्याची तयारी आहे का?  बरेचदा, काही मुलं मला चहा पण करता येत नाही हे अभिमानाने सांगतात. अशा मुलाची घरामधे कितपत मदत होईल हा प्रश्नच आहे.
३)तु स्वतःला दहा वर्षानंतर कुठे पहातेस/ पहातो? तुझे लॉंग टर्म गोल्स काय आहेत?
४) करीअर बद्दल तुझ्या काय कल्पना आहेत?
५)तुला कशामुळे आनंद होतो? म्हणजे अगदी ब्राउन पेपर पॅकेजेस टाईड विथ द स्ट्रिंग्ज, दिज आर माय फेवरेट थिंग्ज- हे अशा प्रकारचे उत्तर आले तर अजूनही स्वप्निल दुनियेत वावरते/ वावरतो आहे असे समजायला हरकत नाही.
६)धार्मिक संकल्पना, सोवळ्या- ओवळ्या वगैरे बद्दल काय वाटतं? धार्मिक विचार कितपत दृढ आहेत? उपवास तापास वगैरे बद्दल काय संकल्पना आहेत?
७)तुझ्या फ्लॅटचे किती लोन शिल्लक आहे? की फ्लॅट पेड अप आहे?
८)  नोकरी करायला आवडते का? की लग्नानंतर नौकरी करणे सोडणार ?
९)कुठल्या सिरियल्स आवडतात?
१०) हॉबी कुठली आहे?
११)तुझ्या आई वडिलांशी तुझे नाते कितपत क्लोज आहे?
१२)तुला कुठला पोलिटीकल नेता आवडतो? आणि का?
१३)तुला शहराच्या कुठला भाग रहायला आवडतो?
१४) तुला अगदी जवळचे किती मित्र मैत्रिणी आहेत?
१५) इंटरनेट चा उपयोग फेसबुक आणि इमेल सोडुन कितपत करते/करतोस? बॅंकिंग व्यवहार वगैरे येतात का?
१६) तु केलेली सगळ्यात डेअरींग बाज गोष्ट?
१७)तुझ्या फॅमिली मधे कोणाला ब्लडप्रेशर ,डायबिटीस वगैरे सारखे अनुवंशिक रोग आहेत का?
१८) ब्लडगृप कुठला आहे?
१९) माझी सिटीसी अमुक अमुक आहे- तुझी किती आहे?
२०) ब्लड टेस्ट   करण्याची तयारी आहे ? Very Important.
२१) तु केलेली सगळ्यात वाईट आणि चांगली गोष्ट?
२२) तुला सुटीच्या दिवशी आयडिअली  काय  करायला आवडतं?
२३) डिनर मधे कधी तरी ब्रेकफास्ट च्या वस्तू चालतील का? जसे कॉर्नफ्लेक्स वगैरे..
२४)इन्कम टॅक्स चे रिटर्न्स स्वतः भरले आहेत की कोणाकडून भरुन घेतोस/घेते?
२५)कपडे विकत घेतांना एकटा /एकटी जातो/जाते की आई वडिल सोबत असतात?
२६) तुला कधी पोलिस स्टेशनला जायचे काम पडले होते का?
२७) घरच्या कामाची जबाबदारी दोघांनी इक्वल घेण्याची तयारी आहे का? जसे भाजी चिरुन द्यायला मदत करणे , घर आवरायला मदत करणे  इत्यादी.
२८) बॉय फ्रेंड/गर्ल फ्रेंड होती का? आणि असेल तर ब्रेक अप चे कारण?
२९) तुला मुलं आवडतात का? साधारण पणॆ लग्नानंतर किती वर्षांनी मुलं व्हावी असे वाटते?
३०) तुला गावाकडे सुटी मधे रहायला आवडेल का? ( जर आई वडील गावाकडे असतील, तर हा प्रश्न महत्वाचा)

३१) पत्रिका पहायची आहे का?  आणि कितपत विश्वास आहे पत्रिकेवर?

आता वरच्या प्रश्नांची अशी बरोबर म्हणुन काही उत्तरे नाहीत. जी काही उत्तरं मिळतील त्यावरुन आपले समोरच्या व्यक्तीशी जुळेल की नाही हा अंदाज बांधता येइल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s