या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,757,830
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: साहित्य…
नो कमबॅक्स……१
असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं … Continue reading
फिअर इज द मोटीव्हेटर..१
वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं … Continue reading
फिअर इज द मोटीव्हेटर.. २
रात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण? काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का? तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ … Continue reading
पहिली कमाई..
रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे लहानपणापासूनच ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.
क्राइम पेज…
(दीर्घ कथा- एकाच भागात) लिव्हाइस ची जिन्स , त्यावर काळा टी शर्ट, पायात पांढरे पण वर डिझाइन असलेले स्पोर्ट शूज , डोळ्यावर काळा रेबन चा ओव्हल शेपचा गॉगल घालून मी तिथे उभा होतो. सकाळचे ११ वाजले होते. त्या शॉपींग मॉल … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged कथा, चोरी, डिटेक्टीव्ह, थ्रिलर, परकीय कल्पना, मराठी, साहीत्य
47 Comments