आमची पण अमेरिका

सचीन ला  कॅंपस मधे  नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. इंटरव्ह्युच्या वेळेस त्याला सांगितलं म्हणे, की तुला ऑन साईट जावे लागेल, थोडी भिती वाटत होतीच, कारण सगळं शिक्षण मराठी शाळेतून झाले होते, तेंव्हा अमेरीकेत जायचे काम पडले तर कसे होणार हा प्रश्न मेंदूचा कुरतडून भुगा करत होता.

करायचं काय? इंग्रजी तसं बोलता येत होतंच, इंटरव्ह्यु मधे थोडी इंग्रजी, थोडी हिंदी वापरून वेळ मारून नेली, पण तिकडे कसं होणार? यावरचा जालिम उपाय म्हणून टोरंट वरून बऱ्याच इंग्रजी सिरियल्स आणि सिनेमे डाउनलोड करून सगळ्या सिरियल्स ची पारायणे करणॆ त्याने सुरु केले. इंटरनेट आणि टिव्ही शिवाय दुसरा चांगला गुरु कोणी असूच शकत नाही, हे सर्वसामान्य तरुणाप्रमाणे सचीन चे पण मत होतेच. हे सगळं झाल्यावर अमेरिकेत नेमकं काय आहे ते आमचा सचीन शिकला आणि त्याने काही नोट्स पण काढल्या. आता तो नोट्स चा कागद आमच्या हाती लागला, तोच इथे शेअर करतोय.

१) अमेरिकेत  मुलं   फक्त कुठली  बॉल गेम खेळण्यासाठी जातात. एकदा कसंही करून  बॉल गेम म्हणजे अगदी फुटबॉल, बास्केट बॉल, किंवा बेस बॉल. कसंही करून एकदाची मॅच जिंकायची, आणि खेळ म्हणजेच सर्वस्व असते, हे बहुसंख्य मुलांना समजले असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून खेळ, हशीश, मारीहूना ( स्पॅनिश मधे तसंच म्हणतात ) पॉट  या गोष्टी एंजॉय करण्यासाठीच हायस्कुल असते. ही मुलं म्हणजे पॉपुलर गॅंग , हे नेहेमीच च्युविंगगम चावत इकडे तिकडे उंडारत असतात.
२) जगातले सगळे सिरियल किलर्स फक्त अमेरिकेतच असतात.
३) डिटेक्टिव्ह, सी आय ए / एफ बी आय चे ऑफिसर्स नेहेमी आपल्या भिंती वर सगळ्या व्हिक्टीम्स चे किंवा संशयित आरोपींचे फोटॊ लावून ठेवतात. ऑफिस मधे असले आणि वेळ जात नसला, की ते ह्या फोटोंकडे पहात बसतात.
४) बरेच  गुन्हेगार पण आपल्या  घरच्या भिंतीवर अशीच चित्रं , वर्तमान पत्रातल्या बातम्या लावुन ठेवतात.
५) पोलिस गुन्हेगारांना पकडायला जातांना, आधी दारात उभे राहून मोठ्याने ” एन वाय पी डी’ ओपन द डोअर म्हणून ओरडतात, आणि मग जोरात धडक मारून दार तोडतात. आता ह्या ओरडण्याने आत असलेला आरोपी खिडकितून पळून जाण्याचा प्रयत्न नेहेमीच करतो.
६) रस्त्याने जाता मोठमोठ्याने सायरन वाजवत जातात.
७) एखादा   अभ्यासू आणि हुशार मुलगा  बेसबॉल कॅप्टन किंवा त्यासारख्या एखाद्या टोणग्याचं नेहेमीचं गिऱ्हाइक असतं, त्याला कधी डस्ट बिन मधे फेकणं, तर कधी खुंटीला टांगणे, कधी पैसे हिसकावून घेणे वगैरे प्रकाराने त्रास दिला जातो. पण शेवटी मात्र हाच नर्ड  त्या कॅप्टनच्या गर्लफ्रेंड्चे प्रेम जिंकतो.
८) मुलींना शाळेत जाण्याचे मुख्य उद्देश फक्त चिअरलिडर होऊन मुलांसमोर तोकड्या कपड्यात नाचणे  एवढाच असावा .
९) शाळांमधे प्रॉम नावाचा प्रकार जो असतो, तो सगळ्यात महत्वाचा. या प्रॉम ला चांगली सुंदर मुलगी आपली डेट असावी असे प्रत्येकच मुलाला वाटत असतं, आणि सुंदर मुलींना मात्र कोणाला हो म्हणावं आणि कोणाला नाही हाच प्रश्न असतो. कसंही करून प्रॉम मधे प्रॉम क्विन होणे  आणि शाळेतल्या सगळ्यात हॉट मुलाबरोबर डेट मिळवणे हे ह्या मुलींचे ध्येय असते. प्रॉम किंग किंवा क्विन होणे म्हणजे तर दुग्धशर्करा योग! Continue reading

Posted in Uncategorized | 12 Comments

NO Q PLZ

unnamedविकांत  म्हणजे ज्याची आपण अगदी सोमवार पासून वाट पहात असतो तो.  आता अशा एखाद्या विकएंड ला सकाळी चांगलं साडे नऊ दहा पर्यंत झोप काढायची, आणि मग नंतर टीव्ही, पेपर वाचत दिवस  लोळत काढायचा, असा प्लान केलेला असला, की हमखास सौ. चा स्वयंपाक घरातून आवाज येतो, “अहो.. नुसते बसु नका, लवकर लवकर आटोपून कामाला लागा”  आणि कामाची यादी सुरु होते, बाथरुम मधे फ्लश   आणि किचन  बेसिन मधला नळ   वहातोय, बेडरुम मधल्या एसी च्या पॉइंट मधून काल धूर निघाला होता, इलेक्ट्रिशियन ला फोन केला होता, पण तीन दिवस झाले, तो फक्त येतो म्हणतोय पण अजूनही आलेला नाही. बाथरुम चे पाणी भिंती मधे झिरपतंय,  लवकर   एखादा गवंडी  बोलावून काय झाले असेल, आणि काय करावे लागेल ते पहा. पुन्हा तुम्हाला आठवडाभर वेळ मिळणार नाही.

हे वर दिलेले अनुभव माझे एकट्याचे नाहीत, तर प्रत्येकालाच थोड्याफार फरकाने येत असतात. सध्याच्या या इंटरनेट आणि मोबाइल फोन च्या जमान्यातही, जेंव्हा एखादी वस्तू दुरुस्त करायची असते, तेंव्हा मात्र   काम करणारी माणसेच लागतात्त, इथे इंटरनेट काम करू शकत नाही.

या इलेक्ट्रिशिअन्स , प्लंबर्स , गवंडी वगैरे मंडळी तुमच्या कामाच्या वेळेस येतील तर शपथ. सकाळी ११ वाजता बोलावले, तर  हा गडी हमखास संध्याकाळी ६ वाजता तुम्ही सिनेमाला, किंवा मार्केटला निघाल्यावर येणार हे नक्की. बरं दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या अनोळखी प्लंबर, कार्पेंटर  ला घरात घेणे कितपत सेफ असेल? कायम भीती वाटत असते मनात!

सुटी म्हणजे चक्क घरातली कामे करण्याचा दिवस असे समीकरण  झालेले आहे. या सगळ्यांमध्ये घरातल्या स्त्रीला तर मनःस्ताप होतच असतो, कारण काही कामे ही पुरुषानेच करायची असतात असा अलिखित नियम आहे.

हे सगळे असे नेहेमीच्याच जीवनातले  आपण जे फेस करतो ते प्रॉब्लेम्स. हल्ली बायका कार चालवतात, पण पंचर झाली किंवा कुठे बंद पडली की मग मात्र यांची पंचाइतच होते. करायचं काय? ट्रॅफिक जाम झालेला असतो, नुसते हॉकिंग सुरु, अशा परिस्थिती मधे   आणखीनच घाबरल्या सारखं होतं. मेकॅनिक बोलवायचा, तर कुठून?  किती पैसे घेईल तो? आपल्या पर्स मधे पैसे आहेत की नाही  पुरेसे?
किराणा सामान कालच आणलं पण नेमकं तुरीची डाळ राहून गेली, आता जा आणि तुरीची डाळ घेऊन या पाच किलो. कपाळावर आठ्या निश्चितच पडतात, कारण रविवार म्हणजे डीमार्ट मधे मोठ्ठी रांग असण्याचा वार. अगदी एक सामान जरी असेल तरीही सामान घ्यायला कमीत कमी १५-२० मिनिटे तरी रांगेत उभे रहावे लागते.

या अशा अनेक प्रॉब्लेम्सला आपण नेहेमीच तोंड देत्त असतो. बहुतांश वेळेस घरातल्या स्त्री लाच याचा जास्त त्रास होतो. या कामगारांना बोलावल्यावर त्यांनी लवकर न येणे, अर्धवट काम करुन निघुन जाणे, आणि नंतर पुन्हा दहादा फोन केला तरीही फोन न उचलणे- या मुळे होणारा मनःस्ताप , आणि  नवऱ्याची रविवारची वाट लागली म्हणून चालणारी कुरकुर!

या सगळ्या त्रासा  पासून पुण्याच्या  एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने  ने एक ऍप तयार केलंय –   ते कसे आणि का बरं करावे लागले असेल ?  एकदा तो ऑफिस मधे गेला असता, दोन वर्षाच्या मुलीने फोन करून आइसक्रीम हवे म्हणून निरोप पाठवला. २-३ दा घराजवळच्या किराणा दुकानदाराला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन बिझी असल्याने काही ऑर्डर देता आली नाही. काही वेळा नंतर ऑफिसच्या कामात व्यस्त झाल्याने आइस्क्रीम बद्दल विसरूनच गेला तो. पुन्हा एकदा मुलीचा फोन आला, आणि मग बराच वेळ प्रयत्न केल्यावर दुकानदाराचा फोन लागला.  तेंव्हा विचार मनात आला की , असे एखादे ऍप का असू नये??  मॅक डी जर होम डिलिव्हरी देऊ शकते, तर इतर बिझिनेस का नाही? आणि ह्या ऍप चा जन्म झाला.

स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःला  झालेल्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी  स्वतःला कसे ऍप हवे आहे याचा विचार करून  बनवलेले हे ऍप आहे. सध्या हडपसर परिसरातील दुकानदार, आणि इतर   लोकं या ऍप वर आहेत. तुम्ही किराणा, हॉटेल्स आणि    या ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला टाइप करत बसायची गरज नाही, तर तुम्ही इथे ऑडीओ मेसेजेस देऊन ऑर्डर नोंदवू शकता.

इथे अटॅच असलेल्या सगळे कारागिराचे   पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे करून मगच त्यांना इथे जोडलेले आहे, म्हणजे हे लोकं घरात आले तरीही तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. अनेकदा होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी हे ऍप निश्चितच उपयोगी पडेल .

पुणे हडपसर येथे या ऍप वर सध्या, किराणा, हॉटेल, मेकॅनिक्स, प्लंबर्स, पेस्ट कंट्रोल,  आणि अनेक जीवनोपयोगी सर्व्हिसेस जोडल्या गेलेल्या आहे.  पुणेकरांनी प्रयत्न करून पहायला निश्चितच हरकत नाही.

ही लिंक आहे ऍप ची..  https://play.google.com/store/apps/details?id=com.aruman.appss.noqplzuser

नाही तर गुगल प्ले वर noqplz शोधा बस्स!

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , | 11 Comments

खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?

आदित्य उद्धव ठाकरे,प्रितम आणि  पंकजा मुंडे, नितीश राणे  , राहूल गांधी, प्रणॊती शिंदे, ( बहूतेक नाव बरोबर लिहिले असावे) प्रिया दत्त, पुनम महाजन, सुप्रिया पवार सुळे , अमित किर्तिकर, अजिंक्य पाटिल ( डी वाय चा मुलगा ). वैभव पिचड, निरंजन डावखरे  वगैरे सगळ्या Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 21 Comments

द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद

सोशल मिडीयाचे महत्व या निवडणुकीत नक्कीच अधोरेखित झाले आहे. भाजपा ला जो मोठा निर्विवाद निर्भेळ विजय मिळाला त्या मागे सोशल मिडीयाचा मोठा हात आहे. सोशल मिडिया कोणा एका व्यक्तीने मोटिव्हेट केलेला नसतो,  कारण त्या मधे हजारो व्यक्ती आपणहून भाग घेतात. ” अच्छे दिन आने वाले है” म्हणून नरेंद्र मोदींनी दिलेली हाक अगदी प्रत्येक जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली, आणि जवळपास प्रत्येकच व्यक्ती नमो पंतप्रधान व्हावे या साठी आपणहून प्रचार करू लागली. नमो पंतप्रधान व्हावे म्हणून अगदी कोणीही नर्मदेतला गोटा जरी इलेक्शन मधे उभा केला असता तरी  निवडून आला असता . Continue reading

Posted in Uncategorized | 8 Comments

तिच्या मनातलं…

index कपाटातले सामान तिने बाहेर काढले होते. पॅकिंग सुरु होऊन दोन दिवस उलटले  होते. गेली १६ वर्ष ह्या घरात काढली. नागपूरहून मुंबईला बदली झाली, आणि तेंव्हापासून कंपनीच्या ह्या घरात रहायला आलो तेंव्हा  मोठी मुलगी सेकंड स्टॅंडर्ड आणि धाकटी नर्सरी मधे होती.  दोघीही ह्याच घरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनाही हे घर म्हणजे स्वतःचेच आहे असे वाटायचे.  कधी आपल्याला हे घर सोडून जावे Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , | 31 Comments