उबंटू.

हे उबंटू म्हणजे नेमकं काय? आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं? वाचा पुढे.

download (1)सध्या जगात खूप निगेटीव्हिटी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायला मिळतो. पोट भरलेले असतांना पण प्रत्येक व्यक्ती आपल्याच पोळीवर तुप कसे ओढून घेता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या मानव जाती मधे एक कॉमन बॉंड आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ह्या बॉंड मुळेच एकमेकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होत असतो.

तर गोष्ट अशी आहे , एक ऍथ्रोपोलॉजिस्ट- म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यासक Continue reading

Posted in Uncategorized | 4 Comments

इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे??

मार्क झुकेरबर्ग म्हणतो प्रायव्हसी काही फारशी महत्वाची पण नाही, पण स्वतःच्या घराशेजारची चार घरं विकत घेतो, स्वतःला प्रायव्हसी मिळावी म्हणुन – दुतोंड्या कुठला!

जर इंटरनेट चा विचार केला तर हा अधिकार खरंच तुमच्याकडे आहे का? तुमची प्रायव्हसी कितपत सुरक्षित आहे? जर तुम्हाला जर असं वाटतं असेल की तुम्ही इंटरनेट वर जे काही पहाता, वाचता, ते इंटरनेट हिस्ट्री डिलिट केली की कोणालाच कळणार नाही . पण ते तसे नाही, तुम्ही फार तर तुमच्या घरच्या लोकांपासुन तुमची नेट ऍक्टीव्हीटी लपवू शकाल. Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | 3 Comments

अस्थी..

अस्थी..अण्णासाहेब पलंगावर झोपले होते, शेजारी हार्ट रेट मॉनिटर वरचा ग्राफ एका लयीत खाली वर होत होता. शेजारी असलेल्या तीन पेशंटस पैकी आपण एक पेशंट नंबर २, डॉ. राठींचा पेशंट! अण्णासाहेबांचे वय ९४, आज पर्यंत अगदी ठणठणीत तब्येत होती, पण परवा नेमकं बाथरुम मधे पाय घसरुन पडायचे निमित्त झाले, आणि इथे  दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली. आज पर्यंत कधी मला साधी सर्दी पण झाली नाही म्हणून ब्रॅगिंग करणारे अण्णासाहेब  आज पलंगावर पडून कसला तरी गहन विचार Continue reading

Posted in Uncategorized | 4 Comments

चैत्रांगण.

गुढीआज गुढी पाडवा. आज पासुन वसंत ऋतु चे आगमन होणार.  कालनिर्णय बघुन सकाळी ९ वाजता गुढीची पूजा केली आणि गुढी उभारली. पंचांगाची पण देवासमोर ठेऊन पूजा केली. आज पासुन नवीन वर्ष सुरु झाले. तेंव्हा नवीन वर्षाचे स्वागत तर करायलाच हवे.

खरं तर आम्ही ज्या भागात रहातो तो कॉस्मोपॉलिटीयन भाग, पण बरीच मराठी लोकांची घरं पण आहेत. असे असुनही समोरच्या दोन तिन बिल्डींग मधे एकही गुढी उभारलेली दिसली नाही, पण चित्रातल्या गुढ्या मात्र ढिगाने आल्या व्हॉट्स ऍप वर -शुभेच्छांच्या स्वरुपात. फक्त हिंदुत्वाचा गप्पा मारणं आणि धर्म वगैरे चे भांडवल करून फेसबुक वर शाब्दिक मारामाऱ्या करण्याइतकेच लोकांचे धर्माबद्दल चे प्रेम असावे. आपल्या परंपरांना , रुढींना काही अर्थ नाही असे म्हणून सगळ्या परंपरा मोडीत काढण्याची हल्ली फॅशनच निघालेली आहे. नेमका हाच फरक आहे इतर धर्मात आणि हिंदू धर्म  पालन करणाऱ्या लोकांमध्ये Continue reading

Posted in Uncategorized | 3 Comments

म्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.

काही वर्षापुर्वी आमच्या नागपूर ऑफिस ला कामानिमित्य जाणे झाले. तसं पाहिलं तर नागपूर ऑफिस लहानसे होते. इन मिन १६ लोकं होते काम करणारे, आणि एक १७वी चंदा नावाची मुलगी. ती रोज सकाळी येऊन झाडणे, टेबल स्वच्छ करणे डस्टबिन्स स्वच्छ करणे वगैरे काम करायची. पण ह्या वेळी मात्र चंदा सोबतच अजून एक मुलगी दिसली. साधारण पंचविशी मधली असावी. कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात दोन पदरी मंगळसुत्र आणि जुनीच पण स्वच्छ साडी नेसलेली. ती टेलेक्स मशिन वरून आलेले  टेलेक्स मार्क करून प्रत्येकाच्या टेबल वर आणुन ठेवत होती. आमच्या ऑफिस मधे नवीन भरती, आणि ती पण प्युनच्या लेव्हलची गेल्या कित्येक वर्षापासुन बंद होती, तेंव्हा ही कोण? हा प्रश्न अस्वस्थ करत होता.

समोर बसलेल्या मित्राला विचारले, ही कोण रे? तर म्हणाला ही संजय ची बायको रोहिता! संजय  म्हणजे कंपनीच्या जीपचा ड्रायव्हर. नबाब खान म्हणून एक ड्रायव्हर रिटायर्ड झाल्यावर, त्याच्या जागी ह्या संजयला डेली वेजेस वर ठेवले होते कामाला. २५-२६ चा संजय एक दिवस अचानक पणे हार्ट बर्न ने गेला. Continue reading

Posted in सामाजिक, Uncategorized | 2 Comments